निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उघडुन पाहिल्यावर प्राजक्ता म्हात्रे, दिनेश शिंदे इ. नावे दिसल्यावर इतके बरे वाटले
साधना,जागु
इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
आता संध्याकाळी जाताना 'माहेर' कुठे सापडतं का ते बघतो...
एक सत्यकथा...गेल्या आठवड्यात प्राजक्ता म्हात्रे हे नाव १-२ वेळा कुठेतरी (बहुतेक लेखनासबंधी) वाचलं, खुप वेळ वाटतं होतं, हे नाव यापुर्वी नक्की आपण कुठेतरी वाचलयं, मग काल इथे वाचल्यावर आठवलं.
:स्मितः

अनिल कुठे वाचलत ? बुलबुलच नर्सिंग होम मागच्या महिन्यात लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीत प्रकाशीत झाल होत.

दिनेशदा,
आता हे पाहिलं :-). सकाळी तुम्हाला परत विपु केली होती. हे सगळ चुकणार बहुतेक माझं Sad
मी आता ७ दिवस नाही घरी :-(.
असो थोड्या छोट्या पण आहेत बहुतेक त्या भेटतील परत आल्यावर.

मस्त आहे एडेनियम.... मानुषी याला डेझर्ट रोज हेही नाव आहे. अर्थात प्रचलित. बोटॅनिकल नाव शशांकनी दिलंय तेच.

मानुषी, अमेरिकेला असताना ज्यानी कुणी झाडांची काळजी घेतली, त्याला शाबासकी द्यायला पाहिजे.

हं......दिनेशदा, शरद म्हणून एक १५/१६ चा मुलगा आहे. तो माझ्या अनुपस्थितीत झाडांना पाणी घालायचा. तेही जेव्हा पाऊस नसतो तेव्हाच. नवरोबा बागेकडे काही पहात नाहीत.(सांगू नका हं कुणाला!!)

(सांगू नका हं कुणाला!!)

मानुषी Lol नाही सांगणार हो दिनेशदा कोणाला, हा कंस फक्त त्यांनाच दिसतो.

आता पडला ना मला प्रश्न !
मानुषीची बाजू घ्यायची का व्यवसायबंधूची ?
हा घ्या आज टिपलेला गुलाब.

इथे अगदी व्यावसायिक पद्धतीने गुलाबांची लागवड होते. त्यासाठी ग्रीन हाऊसेस असतात.
तपमान ३ अंश सेंटीग्रेड राखलेले असते. गुलाब अगदी एकसाची, ठराविक आकाराचे,
ठराविक रंगाचेच असतात.
त्यांचे देठही सरळसोट आणि ग्राहकाच्या मागणीनुसार लांबीचेच असतात. यासाठी
अनेक प्रकारची रसायने वापरतात. रंगांच्या अचूक निवडीसाठी, आणि त्यानुसार वर्गवारी
करण्यासाठी संगणकाची मदत घेतात.
त्यामूळे उत्पादन भरमसाठ येते आणि किरकोळ बाजारात फुलांची किंमत साधारण २
रुपये एवढीच असते.
इथे मुलीला (म्हणजे प्रेयसीला) भेटायला जाताना, रुग्णाला भेटायला जाताना गुलाबाची
फूले नेणे अत्यावश्यक मानतात. पण फूले फक्त फुलदाणीतच ठेवतात.
फुल उत्पादन करणारे बहुतांशी भारतीय वंशाचे असल्याने देवळात शेकड्याने फुले पाठवली
जातात. ही फुले तशीच देवाजवळ फुलदाणीत ठेवतात. अगदीच हौशी पुजारी असला तर
फक्त फुलांचे हार करुन देवाला घालतात.

आता पडला ना मला प्रश्न !
>>>>>>>>>>> !!!!!!!!!!!!!!!!!
बाकी गुलाब मस्तच आहे. आणि तिकडच्या गुलाबाच्या लागवडी संबंधीची आणि इतर सर्व माहिती अगदी नवीन आणि इंटरेस्टिन्ग!

५०० पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन!
दिनेशदा, जिप्सी, जागू,साधना,माधव, अनिल, प्रज्ञा, चला सगळ्यांसाठी ही फुले.
DSCN0174.jpgDSCN0177.jpgDSCN0181.jpgDSCN0182.jpgDSCN0196.jpg

Lol

Pages