..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यह आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जातें हैं

मैं बांगाली छोकरा करूं प्यार को नमस्कारम
मैं मद्रसी छोकरी मुझे तुमसे प्यारम

>>>>>> वा भरत मयेकर दोन्ही सिच्युएशन्स मस्तच.

१७८ : नंदिनीला गाण्याची खूप आवड. आशाची खट्याळ गाणी म्हणायला तिला खूप आवडायचं. पण दिलीपशी लग्न झालं अणि काय मुकेशची दर्दभरी गाणीच तिच्या गळ्यातून निघू लागली. सासू वसुधाबाई अगदी कडक, त्यात नणंद ज्योत्स्ना लग्न झाल्यावरही हक्क गाजवायला आणि वहिनीकडून सेवा करून घ्यायला कधीही माहेरी टपकायची. अशात तिला तिची थोरली जाऊ शामला हिचाच काय तो आधार होता. पण एके दिवशी अगदी पहाटे अचानक शामलाला स्वतःच्या माहेरी जावं लागलं. नंदिनीला सांगायची उसंतही तिला मिळाली नाही. सकाळ झाली तर ज्योत्स्नाबाई हजर , आग लावायला.
अशा वेळी नंदिनीने कोणते गाणे म्हटले असेल?

भरत, दोन्ही कोडी मस्तच!

कोडं १७९:

अजित जोगींना काय करावं ते सुचत नव्हतं. त्यांचं एका श्रीमंतांच्या मुलीवर प्रेम बसलं होतं पण तिला हे कसं सांगावं तेच त्यांना समजत नव्हतं. शेवटी तिचे आईवडिल तिचं लग्न जमवण्याच्या प्रयत्नात आहेत असं कळताच त्यांनी धीर करून तिला सगळं सांगून टाकलं. तिने एक गाणं म्हणून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करायला नकार दिला. कोणतं गाणं असेल ते?

कोडं १७९: उत्तर

सोना ले जा रे
चांदी ले जा रे
पैसा ले जा रे
दिल कैसे दे दू रे जोगी
के बडी बदनामी होगी...

अक्षरी Happy

उत्तरः

सोना ले जा रे
चांदी ले जा रे
पैसा ले जा रे
दिल कैसे दे दू रे जोगी
के बडी बदनामी होगी...

१७८ ओळखा की.
क्लु: गाण्यात आलेल्या दोन महत्त्वाच्या शब्दांचे समानार्थी शब्द आणि गाणे ज्या चित्रपटातले आहे त्यातल्या दोन अभिनेत्रींची नावे किंचित बदलून दिली आहेत.
शिवाय हे गाणे अशा प्रचंड रुबाबदार अभिनेत्यावर चित्रित झाले आहे की ज्याला पडद्यावर फार कमी गाणी मिळाली आहेत.

कोडं १८०:

सागरचं सरितावर भारी प्रेम पण व्यक्त करायचं धाडस नव्हतं कारण ती कॉलेज क्कीन होती. ती आपल्याला धूप घालणार नाही ही त्याला खात्री. ऐन परीक्षेच्या दिवसात त्याच्या दोस्तांनी कॉलेजचा हिरो मोहन तिला प्रपोज करणार असल्याची पक्की खबर आणली. सागर बिचारा उद्याच्या परीक्षेसाठी जनरल नॉलेजचं पुस्तक उघडून बसला होता. ही बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दोस्तांनी त्याला 'इजहार-ए-मोहबत' करायचा सल्ला दिला. कसंबसं धैर्य गोळा करून सागरने तिला सगळं सांगितलं पण मोहन प्रपोज करणार असल्याची खबर तिला असल्याने तिने सागरच्या प्रेमाचा अव्हेर केला.

बिचारा सागर! परत खोलीवर आला तेव्हा त्याचा देवदास झाला होता. मित्रांनी त्याची खूप समजूत काढली. आणि प्रेमाचे तीनतेरा वाजलेच आहेत पण पेपरात तसं व्हायला नको म्हणून अभ्यास करायचा सल्ला दिला. सागरला काही सुचेना तो तसाच बसून राहिला तेव्हा एका मित्राने बळेबळेच एक पुस्तक त्याच्यासमोर धरलं. रागाने सागरने ते दूर भिरकावून दिलं आणि मित्राला एक हिंदी गाणं ऐकवलं. ओळखा ते गाणं.

जिप्सी बरोबर

१७८ : नंदिनीला गाण्याची खूप आवड. आशाची खट्याळ गाणी म्हणायला तिला खूप आवडायचं. पण दिलीपशी लग्न झालं अणि काय मुकेशची दर्दभरी गाणीच तिच्या गळ्यातून निघू लागली. सासू वसुधाबाई अगदी कडक, त्यात नणंद ज्योत्स्ना लग्न झाल्यावरही हक्क गाजवायला आणि वहिनीकडून सेवा करून घ्यायला कधीही माहेरी टपकायची. अशात तिला तिची थोरली जाऊ शामला हिचाच काय तो आधार होता. पण एके दिवशी अगदी पहाटे अचानक शामलाला स्वतःच्या माहेरी जावं लागलं. नंदिनीला सांगायची उसंतही तिला मिळाली नाही. सकाळ झाली तर ज्योत्स्नाबाई हजर , आग लावायला.
अशा वेळी नंदिनीने कोणते गाणे म्हटले असेल?

जाऊं कहां बता ऐ दिल
दुनिया बडी है संगदिल
चांदनी आयी घर जलाने
सूझे न कोई मंझिल

चित्रपट छोटी बहन अभिनेत्री नंदा, शामला. पडद्यावर हे गाणं म्हटलंय रेहमानने.
वसुधा-पृथ्वी-दुनिया, ज्योत्स्ना-चांदणे
रेहमानला नूतन आणि धर्मेंद्रबरोबरच्या दिल ने फिर याद किया या गाण्यावर ओठ हलवायची संधी मिळाली होती.

जिप्सी बरोबर>>>>>>>>हुर्रे!!!!! Happy

आज बक्षिस काहीएक नको, उपवास आहे Proud

स्वप्ना, क्लु प्लीज Happy

कोडं १८१:

रामरावांचं कुटुंब तसं छोटंसंच, ते, त्यांची बायको रुक्मिणी आणि मुलगी ऋतुजा. घरात २ नोकर - सखाराम आणि आर्थिक व्यवहार पहाणारे मुनीम भोर. २ कारखाने होते त्यामुळे घरात पैसा बक्कळ. धंद्याची घडी व्यवस्थित बसलेली असल्याने रामरावांना हातात बराच मोकळा वेळ मिळायचा त्याचा उपयोग त्यांनी अलिकडेच समाजसेवेसाठी करायला सुरुवात केली होती. गावात एका मांत्रिकाचं प्रस्थ फार वाढलं होतं. त्याला रामरावांचा विरोध होता. मांत्रिकाने त्यांना धमक्या दिल्या होत्या पण रामराव त्याला काय घाबरणार?

आणि एक दिवस ती सकाळ उजाडली. नेहेमीप्रमाणे सकाळी उठून रामराव दिवाणखान्यात येतात तोच एका पोपटाचा आवाज आला. 'मालक, उठा, उठा लवकर, पळवलं मालक, आपल्या बेबीला पळवलं.'. २ क्षण रामरावांना काय झालं तेच कळेना. त्यांनी घाईघाईने रुक्मिणीबाईंना मुलीच्या खोलीत धाडलं. त्या घाबर्‍याघुबर्‍या होऊन ती खोलीत नसल्याचं सांगत आल्या.

रामरावांनी पोपटाकडे वळून विचारलं 'कोणी पळवलं?'. पोपट तारस्वरात ओरडत म्हणाला "त्या मेल्या मांत्रिकाने पळवलं. आता नाही यायची ती कध्धीच परत". रामराव मटकन खाली बसले. त्यांनी सखारामाला पाठवून पोलिस पाटलांना बोलावणं धाडलं. ते येईतो येरझार्‍या घालत असताना त्यांना आठवलं की आपण तर पोपट पाळलाच नाहिये मग हा पोपट कुठून आला? आणि तो आपल्याला मालक का म्हणतोय?

ते कोडं त्यांना उलगडतंय तोच पोलिस पाटिल आले. त्यांनी काय झालंय ह्याची चौकशी करताच रामरावांनी पोपटाकडे बोट करून त्यांना घडला प्रकार सांगितला तो एका हिंदी गाण्यात. ओळखा.

हे कोडं कैच्या कै प्रकारातलं आहे हे आधीच सांगते. Happy

भरत सही! Happy

कोडं १८०:

सागरचं सरितावर भारी प्रेम पण व्यक्त करायचं धाडस नव्हतं कारण ती कॉलेज क्कीन होती. ती आपल्याला धूप घालणार नाही ही त्याला खात्री. ऐन परीक्षेच्या दिवसात त्याच्या दोस्तांनी कॉलेजचा हिरो मोहन तिला प्रपोज करणार असल्याची पक्की खबर आणली. सागर बिचारा उद्याच्या परीक्षेसाठी जनरल नॉलेजचं पुस्तक उघडून बसला होता. ही बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दोस्तांनी त्याला 'इजहार-ए-मोहबत' करायचा सल्ला दिला. कसंबसं धैर्य गोळा करून सागरने तिला सगळं सांगितलं पण मोहन प्रपोज करणार असल्याची खबर तिला असल्याने तिने सागरच्या प्रेमाचा अव्हेर केला.

बिचारा सागर! परत खोलीवर आला तेव्हा त्याचा देवदास झाला होता. मित्रांनी त्याची खूप समजूत काढली. आणि प्रेमाचे तीनतेरा वाजलेच आहेत पण पेपरात तसं व्हायला नको म्हणून अभ्यास करायचा सल्ला दिला. सागरला काही सुचेना तो तसाच बसून राहिला तेव्हा एका मित्राने बळेबळेच एक पुस्तक त्याच्यासमोर धरलं. रागाने सागरने ते दूर भिरकावून दिलं आणि मित्राला एक हिंदी गाणं ऐकवलं. ओळखा ते गाणं.

उत्तरः

जब दिलही टूट गया
तो जीके(जी के) क्या करेंगे

एका गाण्याच्या चॅनेलवर तळाला येणार्‍या टिकरमध्ये हा जोक होता त्याचं कोडं केलं.

१८१:
भोर भये पंछी, धुन ये सुनाये
जागो रे गई रितु फिर नही आयें..
सिनेमा: आंचल. गाणं मस्त आहे हे.

......... आणि काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर खेळाडूंनी पुन्हा एकदा खेळास सुरूवात केली आहे. Proud

चालू द्या, चालू द्या.

श्रध्दा Happy मलाही आवडतं हे गाणं.

कोडं १८१:

रामरावांचं कुटुंब तसं छोटंसंच, ते, त्यांची बायको रुक्मिणी आणि मुलगी ऋतुजा. घरात २ नोकर - सखाराम आणि आर्थिक व्यवहार पहाणारे मुनीम भोर. २ कारखाने होते त्यामुळे घरात पैसा बक्कळ. धंद्याची घडी व्यवस्थित बसलेली असल्याने रामरावांना हातात बराच मोकळा वेळ मिळायचा त्याचा उपयोग त्यांनी अलिकडेच समाजसेवेसाठी करायला सुरुवात केली होती. गावात एका मांत्रिकाचं प्रस्थ फार वाढलं होतं. त्याला रामरावांचा विरोध होता. मांत्रिकाने त्यांना धमक्या दिल्या होत्या पण रामराव त्याला काय घाबरणार?

आणि एक दिवस ती सकाळ उजाडली. नेहेमीप्रमाणे सकाळी उठून रामराव दिवाणखान्यात येतात तोच एका पोपटाचा आवाज आला. 'मालक, उठा, उठा लवकर, पळवलं मालक, आपल्या बेबीला पळवलं.'. २ क्षण रामरावांना काय झालं तेच कळेना. त्यांनी घाईघाईने रुक्मिणीबाईंना मुलीच्या खोलीत धाडलं. त्या घाबर्‍याघुबर्‍या होऊन ती खोलीत नसल्याचं सांगत आल्या.

रामरावांनी पोपटाकडे वळून विचारलं 'कोणी पळवलं?'. पोपट तारस्वरात ओरडत म्हणाला "त्या मेल्या मांत्रिकाने पळवलं. आता नाही यायची ती कध्धीच परत". रामराव मटकन खाली बसले. त्यांनी सखारामाला पाठवून पोलिस पाटलांना बोलावणं धाडलं. ते येईतो येरझार्‍या घालत असताना त्यांना आठवलं की आपण तर पोपट पाळलाच नाहिये मग हा पोपट कुठून आला? आणि तो आपल्याला मालक का म्हणतोय?

ते कोडं त्यांना उलगडतंय तोच पोलिस पाटिल आले. त्यांनी काय झालंय ह्याची चौकशी करताच रामरावांनी पोपटाकडे बोट करून त्यांना घडला प्रकार सांगितला तो एका हिंदी गाण्यात. ओळखा.

हे कोडं कैच्या कै प्रकारातलं आहे हे आधीच सांगते.

उत्तरः

भोर भये पंछी, धुन ये सुनाये
जागो रे गई रितु फिर नही आयें..

अक्षरी Happy आता एक सोप्पं कोडं

कोडं १८२:

दीपक आणि ज्योती एकाच ऑफ़िसात कामाला होते. एका प्रोजेक्टच्या निमित्ताने एकत्र काम करू लागले. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं पण ह्या प्रेमाला दोघांच्याही घरून प्रचंड विरोध. त्याला न जुमानता दोघांनी लग्न करायचं ठरवलं. पण ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता कारण नाहीतर घरच्यांनी ऐनवेळी गोंधळ घालायला कमी केलं नसतं. तरी लग्न म्हटलं की २-४ डोकी तरी साक्षीदार म्हणून हवीतच हा ज्योतीचा आग्रह होता. ती खूपच हिरमुसली होती.

शेवटी दीपकने आपले वरिष्ठ डॉक्टर सप्तर्षी ह्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनीही सहकुटुंब लग्नाला यायचं आणि ज्योतीचं कन्यादान करायचं आनंदाने मान्य केलं. ज्योतीची खास मैत्रीण अरुंधतीसुध्दा लग्नाला हजर रहाणार होती. सगळी तयारी पूर्ण करून दीपकने ज्योतीला फ़ोन लावला. तो हे सगळं कोणतं हिंदी गाणं म्हणून तिला सांगेल?

१८२:
तारे है बाराती, चांदनी है ये बारात..
सातों फेरे होंगे अब, हाथों मे लेके हाथ..
के जीवनसाथी हम..
दिया और बाती हम..

श्रध्दा, सही आहेस!

विरासत नावाच्या टुकार पिक्चरमधलं गाणं आहे. मला फार आवडतं. सुरुवात आणि शेवट फार सुरेख आहे.

आजचं शेवटचं कोडं, हेही सोप्पं.

कोडं १८३:

गेले काही दिवस टीव्हीवर, रेडियोवर एका नव्या हेअर टॉनिकची, जाहिरात येत होती - ज्यांचे केस गेले आहेत त्यांच्या डोक्यावर केवळ एका महिन्यात भरघोस केस उगवतील अशी हमी देणारी. एक बायको आपल्या नवर्‍याला हिंदी गाणं म्हणून ह्या टॉनिकबद्दल सांगते अशी कल्पना ह्या जाहिरातीत होती. सांगा पाहू कोणतं ते.

स्वप्ना सोप्प्या कोड्यासाठी क्लु?

१८४ : हृदय हा पाच वर्षांचा मुलगा स्वभावाने अगदी गरीब. गोड. त्याच्याबरोबर उलट शेजारचा पिंट्या दादागिरी मोडतोड करणारा. एकदा पिंट्या हृदयच्या घरी खेळायला गेला आणि त्याने हृदयची टॉय ट्रेन मोडुन टाकली, वर चारपाच मोटारीही स्वतःच्या घरी घेऊन गेला. साहजिकच हृदय रडत बसला. संध्याकाळी त्याच्या बाबांनी विचारले हा का रडतोय, तर आईने काय उत्तर दिले असेल?

Pages