Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागे भरतन लिहीलय त्यावरून
मागे भरतन लिहीलय त्यावरून आठवल
हल्ली झी सिनेमा रात्री बरे चित्रपट दाखवतो.
मी परवा बरेच वर्षानी माफिचा साक्षिदार पाहीला. त्यात एकगज़ल चांगली होती पद्मा खन्नावर चित्रीत झालेली.
तेव्हा ऐकताना आवडली पण आता बोल आठव॑त नाहीत. कोणाला माहीत असेल तर सांगा
त्यावर आधारीत अनुराग कश्यप चा पांच कधीच रीलीज झाला नाही. पण माफिचा साक्षिदार इतका भयानक मला तो वाटला नाही.
१९० : पावसाने गाड्या लेट
१९० : पावसाने गाड्या लेट होत्या. नवाच्या ऑफिसला लीना तीनला पोचली. मग गाद्या लेट असतील म्हणून चारलाच निघाली. तसंही दिवसभर अंधारच होता.
तिने बॉसला म्हटलं "जाते मी घरी". बॉस म्हणाला "लगेच". हे सगळं गाण्यातूनच झालं. कसं काय?
१९० : ढल गया दिन हो गयी
१९० :
ढल गया दिन हो गयी शाम
जाने दो जाना है
अभी अभी तो आयी हो
अभी अभी जाना है ????
जिप्सी बरोबर उत्तर
जिप्सी बरोबर उत्तर दिल्याबद्दल लीना चंदावरकरच्या बर्थडे पार्टीचं इव्हिटेशन.
लहानपणी असली एक दोन कोडी
लहानपणी असली एक दोन कोडी ऐकलेली आठवताहेत.
आनंद नावाचा मुलगा चक्क सेक्स चेंज सर्जरी करून घरी येतो. हे पाहून कोणतं गाणं सुचेल?
इब्लिस, हे कोडं इथे यापूर्वी
इब्लिस, हे कोडं इथे यापूर्वी विचारलं गेलंय. कदाचित पहिल्या भागात.
तरी ज्यांनी वाचलं नसेल , ज्यांना आठवत नसेल, त्यांना प्रयत्न करता यावा म्हणून उत्तर देत नाही.
जिप्सी बरोबर उत्तर
जिप्सी बरोबर उत्तर दिल्याबद्दल लीना चंदावरकरच्या बर्थडे पार्टीचं इव्हिटेशन.>>>>>लीनाच्या बड्डेचे आता इन्व्हिटेशन नको कटरीनाच्या असेल तर पाठव.
जितेंद्रचं चालेल का?
जितेंद्रचं चालेल का?
जितेंद्रचं चालेल
जितेंद्रचं चालेल का?>>>>>जितेंद्र नको आणि सलमानपण नको.
इब्लिस, बहुतेक 'किती सांगू की
इब्लिस, बहुतेक 'किती सांगू की सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला' असावं.
कोडं १९२: सुनील-मेधाचं तान्हं
कोडं १९२:
सुनील-मेधाचं तान्हं बाळ पार्टीत सगळ्यांचं 'सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन' झालं होतं. बच्चेकंपनी तर खेळ विसरून त्याच्या भोवतीच घुटमळत होती. 'मेधा मावशी, तू नको काळजी करू. आम्ही बघतो बाळाकडे' असं म्हणून त्यांनी बाळाचा ताबा घेतला होता. त्याची दुधाची बाटली, खुळखुळा, दुपटी, टोपडी सगळं खोलीत ठेवून मेधाही निश्चींत मनाने बाहेर सगळ्यांशी गप्पा मारत बसली होती. एव्हढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती धावत खोलीत गेली तर कविता म्हणाली 'मावशी, बाळाने सूसू केली म्हणून डायपर आणि दुपटं चेंज करत होते गं तर रडायला लागला.". बाळाला बोलता येत असतं तर त्याने काय गाणं म्हटलं असतं?
स्वप्ना, क्लु प्लीज
स्वप्ना, क्लु प्लीज
गिला/गिले, शिकवा/शिकवे असं काही आहे का?
स्वप्ना_राज, बरोबर. एक
स्वप्ना_राज, बरोबर.
एक अजून
१९३. शाळेची वार्षिक परिक्षा संपते. हीरो, हिरॉइन अन व्हिलन तिघे पास होतात. नवीन वर्षी मात्र हीरो 'बी' डिव्हिजन ला, अन हीरॉइन व्हिलन बरोबर 'जी' डिव्हिजन ला 'वर्ग' केली जाते. या सिच्युएशनला हिरॉइन कोणते गाणे म्हणेल?
जिप्सी नाही. कोड्याच्या
जिप्सी नाही. कोड्याच्या उत्तरातला शब्द कोडयातच लपलाय....थोडंसं शब्दच्छल टाईप्स आहे कोडं.
कुठे गेले सगळे?
कुठे गेले सगळे?
स्वप्ना, अजुन एक क्लु दे ना
स्वप्ना, अजुन एक क्लु दे ना
जिप्सी.....शेवटचा क्लू हा आता
जिप्सी.....शेवटचा क्लू हा आता - मुजरा.
इब्लिस तुमच्या ताज्या
इब्लिस तुमच्या ताज्या कोड्याला १९३ क्रमांक देणार का?
घरी जायच्या आधी उत्तर टाकू
घरी जायच्या आधी उत्तर टाकू का?
कोडं १९२:>>>>>इन्ही लोगो ने
कोडं १९२:>>>>>इन्ही लोगो ने ले लीना दुपट्टा मेरा.... ???
हे शाब्बास! कोडं
हे शाब्बास!
कोडं १९२:
सुनील-मेधाचं तान्हं बाळ पार्टीत सगळ्यांचं 'सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन' झालं होतं. बच्चेकंपनी तर खेळ विसरून त्याच्या भोवतीच घुटमळत होती. 'मेधा मावशी, तू नको काळजी करू. आम्ही बघतो बाळाकडे' असं म्हणून त्यांनी बाळाचा ताबा घेतला होता. त्याची दुधाची बाटली, खुळखुळा, दुपटी, टोपडी सगळं खोलीत ठेवून मेधाही निश्चींत मनाने बाहेर सगळ्यांशी गप्पा मारत बसली होती. एव्हढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ती धावत खोलीत गेली तर कविता म्हणाली 'मावशी, बाळाने सूसू केली म्हणून डायपर आणि दुपटं चेंज करत होते गं तर रडायला लागला.". बाळाला बोलता येत असतं तर त्याने काय गाणं म्हटलं असतं?
उत्तरः
इन्ही लोगो ने ले लीना दुपट्टा मेरा
इब्लिस, तुमच्या कोड्यात
इब्लिस, तुमच्या कोड्यात 'जी'मे आना वगैरे काहीतरी असणार असं वाटतंय पण अजून उत्तर सुचलं नाहिये
हे शाब्बास!>>>>हुर्रे!!!!
हे शाब्बास!>>>>हुर्रे!!!!
स्वप्ना, 'दुपट्टा मेरा..'
स्वप्ना, 'दुपट्टा मेरा..' भारी!
इब्लिस यांच्या कोड्याचे उत्तरः
मेरा सुंदर सपना 'बी'त गया
मै प्रेम मे सब कुछ हार गई,
बेदर्द जमाना 'जी'त गया
हे आहे का?
श्रद्धा, एकदम बरोब्बर.
श्रद्धा, एकदम बरोब्बर.
मयेकर, हे कोडे 'ओरिजिनली' मा़झे नसल्याने नंबर द्यावा वाटत नाहिये.
श्रध्दा __/\__
श्रध्दा __/\__
इब्लिस धागा सुरळीत चालावा
इब्लिस धागा सुरळीत चालावा म्हणून नंबर हो. एकावेळी अनेक कोडी आली की गोंधळ होउ नये यासाठी.
मेरा सुंदर सपना 'बी'त गया छानच. श्रद्धा तुम्ही मात्र 'ए' मध्ये
बापरे...कसलं अवघड होतं हे!
बापरे...कसलं अवघड होतं हे! श्रद्धा..सलाम!
श्रद्धा, __/\_ इब्लिस, सह्ही
श्रद्धा, __/\_
इब्लिस, सह्ही कोडं
कोडं १९३: "काय रे मन्या, २
कोडं १९३:
"काय रे मन्या, २ दिवसांपासून पहातोय. गप्प गप्प आहेस. घरी तणातणी झाली काय?" चेतनने विचारलं.
"नाही रे यार"
"मग?"
"आचलला पाहिलंयस गेल्या २ दिवसांपासून?"
"कोण आचल?"
"आचल कपूर रे. एफवायवाली".
"ती होय? नाही, का रे?"
"काहीतरी झोल झालाय यार. सॉलिड उदास दिसतेय. तिचं आणि त्या हिरोचं, काय नाव त्याचं, हा रोहन. त्यांचं सूत होतं. बहुतेक ब्रेकअप झालाय."
"जाउ देत ना. तुला काय करायचंय? काही खास कारण?" चेतनने त्याच्या पाठीत थाप मारत विचारलं.
"आता तुझ्यापासून काय लपवायचं दोस्त. आपल्याला जाम आवडते ती. पण कधी धीर नाही झाला."
"मग? आता झाली ना लाईन क्लिअर? ट्राय मार. खुदा उनकीही मदत करता है जो खुदकी मदत करते है"
"ए, डायलॉग नकोत हं. एक मस्त पंचलाईन पाहिजे. अशी की ऐकून आचल हसली पाहिजे. आणि आपलं फर्स्ट इंप्रेशन एकदम चकाचक झालं पाहिजे"
"एक झक्कास हिंदी गाणं ऐकव तिला"
"हिंदी गाणं? काहीही काय. चप्पल फेकून मारेल मला ती"
"नाही मारणार, कान कर इकडे, सांगतो कुठलं ते" म्हणून चेतनने मन्याला एक गाणं सांगितलं आणि खूश होऊन मन्याने टाळीच दिली. सांगा बरं ते गाणं.
Pages