..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सोपं होतं का जिप्सी Happy

१८४ : हृदय हा पाच वर्षांचा मुलगा स्वभावाने अगदी गरीब. गोड. त्याच्याबरोबर उलट शेजारचा पिंट्या दादागिरी मोडतोड करणारा. एकदा पिंट्या हृदयच्या घरी खेळायला गेला आणि त्याने हृदयची टॉय ट्रेन मोडुन टाकली, वर चारपाच मोटारीही स्वतःच्या घरी घेऊन गेला. साहजिकच हृदय रडत बसला. संध्याकाळी त्याच्या बाबांनी विचारले हा का रडतोय, तर आईने काय उत्तर दिले असेल?

उत्तर : दिल का खिलौना हाय टूट गया
कोई लुटेरा आके लूट गया

>>स्वप्ना सोप्प्या कोड्यासाठी क्लु?

भरत, "ज्यांचे केस गेले आहेत" ह्यावर लक्ष केंद्रित करा. मग येईल २ मिनिटात. Happy

कोडं १८३:

गेले काही दिवस टीव्हीवर, रेडियोवर एका नव्या हेअर टॉनिकची, जाहिरात येत होती - ज्यांचे केस गेले आहेत त्यांच्या डोक्यावर केवळ एका महिन्यात भरघोस केस उगवतील अशी हमी देणारी. एक बायको आपल्या नवर्‍याला हिंदी गाणं म्हणून ह्या टॉनिकबद्दल सांगते अशी कल्पना ह्या जाहिरातीत होती. सांगा पाहू कोणतं ते.

उत्तर:
सुनो सजना पपीहेने कहा सबसे पुकारके
संभल जाओ चमनवालो के आये दिन बहारके

या धाग्यावर गुगुने आशा काळेचा विषय काढला, तेव्हा `हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटाची आठवण निघाली होती. आज रात्री साडेनऊला झी टॉकीजवर हा चित्रपट दाखवला जाईल. इच्छुकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

आहात की सगळीजणं इथे Happy

कोडं १८४:

नेहा शानवर खूप प्रेम करायची. नेहमी त्याला फुलं पाठव, कुठे एसएमएस मधून रोमॅन्टीक गझला पाठव असे उद्योग ती नेहमी करायची. शानने बरेच दिवस दुर्लक्ष केलं कारण एक तर नेहा त्याच्या मित्रमंडळींपैकी होती आणि दुसरं म्हणजे त्याचं मीरावर प्रेम होतं आणि ते दोघं लग्न करणार होते. पण ह्या नेहाच्या प्रेमाचा अतिरेक झाल्यावर त्याने तिला सगळं खरं सांगून टाकलं. झालं! नेहाचा संतापाने भडका उडाला.एक दिवस शान घरी नाही असं पाहून तिने शानच्या घरालाच आग लावून दिली. त्यात शान आणि मीराचे सगळे फोटो, तिने लिहिलेली पत्रं, दिलेल्या भेटवस्तू सगळं जळून खाक झालं. 'मौका-ए-वारदात' वर नेहा सापडल्याने पोलिसांना तिला अटक करावीच लागली. त्यांनी तिच्या उलटतपासणीला सुरुवात केली. पहिलाच प्रश्न विचारला की तू हे का केलंस. ह्यावर तिने काय उत्तर दिलं असेल?

१८४:
दोस्तों से प्यार किया
दुश्मनों से बदला लिया
जो भी किया, हमने किया
शानसे..

श्रध्दा बरोबर Happy

उत्तरः

दोस्तों से प्यार किया
दुश्मनों से बदला लिया
जो भी किया, हमने किया
शानसे..

कोण आहे का इथे?

कोडं १८५:

सुधीर पत्ता शोधता शोधता हैराण झाला होता. गेला पाऊण तास तो त्या रस्त्यावरून फिरत होता. छत्री घ्यायला विसरला होता त्यामुळे नेमका पाऊस आला. त्यात चप्पल तुटली. ती कोपर्‍यावरच्या मोच्याकडून शिवून घेतोय तर तेव्हढ्यात जवळून गेलेल्या मोटारीने चिखलाचं पाणी अंगावर उडवलं. रस्ता तर बगदादमधल्या रस्त्यांच्या तोंडात मारेल एव्हढा जागजागी उखडला होता. फूटपाथ जवळजवळ नाहीच. त्यामुळे गाड्या चुकवत चुकवत चालताना समोरच आलेल्या मित्राला त्याने पाहिलंच नाही.

'अरे फडके, इथे रे कुठे तू?" मित्राने विचारलं.
"अरे मंत्री, बरं झालं यार, तू भेटलास ते, हा पत्ता बघ जरा. इथलाच आहे ना? ह्या अ‍ॅन्थनी गोन्सालविसचं घर शोधतोय गेला पाऊण तास. तुला माहित आहे का कुठे आहे ते?"
मित्र हसला. त्याने पत्ता नीट समजावून सांगितला आणि मैत्रीला जागून एक फुकटचा सल्लाही दिला - हिंदी गाण्यातून.

माधव, बरोबर Happy

सुधीर फडके म्हणजे बाबूजी. अ‍ॅन्थनी गोन्सालविसचा पत्ता आठवतोय ना? रूप महल, प्रेम गली, खोली नं ४२०. त्यातली 'प्रेमगली' म्हणून प्यारमे जरा संभलना. Proud

कोडं १८५:

सुधीर पत्ता शोधता शोधता हैराण झाला होता. गेला पाऊण तास तो त्या रस्त्यावरून फिरत होता. छत्री घ्यायला विसरला होता त्यामुळे नेमका पाऊस आला. त्यात चप्पल तुटली. ती कोपर्‍यावरच्या मोच्याकडून शिवून घेतोय तर तेव्हढ्यात जवळून गेलेल्या मोटारीने चिखलाचं पाणी अंगावर उडवलं. रस्ता तर बगदादमधल्या रस्त्यांच्या तोंडात मारेल एव्हढा जागजागी उखडला होता. फूटपाथ जवळजवळ नाहीच. त्यामुळे गाड्या चुकवत चुकवत चालताना समोरच आलेल्या मित्राला त्याने पाहिलंच नाही.

'अरे फडके, इथे रे कुठे तू?" मित्राने विचारलं.
"अरे मंत्री, बरं झालं यार, तू भेटलास ते, हा पत्ता बघ जरा. इथलाच आहे ना? ह्या अ‍ॅन्थनी गोन्सालविसचं घर शोधतोय गेला पाऊण तास. तुला माहित आहे का कुठे आहे ते?"
मित्र हसला. त्याने पत्ता नीट समजावून सांगितला आणि मैत्रीला जागून एक फुकटचा सल्लाही दिला - हिंदी गाण्यातून.

उत्तरः
आ, बडे धोखे है, बडे धोखे है, इस राहमे
बाबूजी धीरे चलना, प्यारमे जरा संभलना

कोडं क्रमांकः १८६

मला सध्या कोडं काही सुचत नाही, पण एक सिच्युएशन सांगतो त्यावरून गाणं ओळखा (सोप्पंय). Happy

नायिका एक प्रतिथयश गायिका, तर नायक एक वाहनचालक. गाण्याच्या एका कार्यक्रमाला जात असताना नायिकेची गाडी बिघडते, योगायोगाने (?? :-)) नायक त्याची गाडी घेऊन तेथे पोहचतो आणि त्यांना लिफ्ट देतो. Happy मध्ये गाडी एका धाब्यावर थांबते, तेंव्हा धाब्याचा मालक नायिकेला गाण्याची विनंती करतो, पण "मी रस्त्यावर कुठेही गात नाही" असे सांगुन ती त्याला नकार देते. नायकाला राग येतो आणि तो धाब्याच्या मालकाचा मान राखुन स्वत: एक गाणं गातो. त्याचा आवाज ऐकुन नायिका प्रभावित होते. काहि दिवसानंतर तिच्या एका कार्यक्रमाला नायक त्याच्या प्रेयसीसह हजेरी लावतो आणि तिचा आवाज ऐकुन तोही खुष होतो.

तर नायकाने गायलेले गाणे आणि नंतर नायिकेने गायलेले गाणे अशी दोन्ही गाणी ओळखा Happy

जितूभाय आणी रीना रॉयचा 'आशा' का रे जिप्सी? तोच असेल तर माफ कर पण एकही गाणे स्मरणात रहाण्यासारखे नव्हते अगदी शिशा हो या दिल पण. Happy

तोच असेल तर माफ कर पण एकही गाणे स्मरणात रहाण्यासारखे नव्हते अगदी शिशा हो या दिल पण.>>>>>> Sad यातील सगळीच गाणी मला आवडतात. Happy

पहिले गाणे (नायक) — जाने हम सडकके लोगोंसे महलो वाले क्यो जलते है (मो. रफी)
दुसरे गाणे (नायिका) — शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है (लता मंगेशकर)

<<तोच असेल तर माफ कर पण एकही गाणे स्मरणात रहाण्यासारखे नव्हते अगदी शिशा हो या दिल पण. <<

काय सांगता??? त्यातलं 'तुने मुझे बुलाया शेरावालिये' - रफी नि नरेंद्र चंचलचं गाणं, हे एकच गाणं होतं तेव्हा दुर्दर्शनकडे वैष्णवदेवीचं!!

आर्या खूप वाजवले / दाखवले जाणे वेगळे आणि मनात उतरणे वेगळे.

किशोर 'आजच्या (म्हणजे त्यावेळचे) संगीताची पातळी किती घसरली आहे' हे दाखवण्याकरता त्यावेळचे 'हिट' गाणे 'शायद मेरी शादी का खयाल' हे नेहमी लाइव प्रोग्रॅममधे घ्यायचा अशी आठवण लताने सांगितली आहे.

१८७: सर्जा आणि शिर्पा दोघे भाऊ. शेवंता आणि कमळी ह्या त्यांच्या (अनुक्रमे) बायका. बाप्ये शेतात राबायचे तर बायका घरी. एकदा दोघे भाऊ आषाढीच्या वारीला पंढरपूरला जातात. घरी पाहुणे येतात आणि कमळीला विचारतात, "हे काय? तुम्ही दोघीच कशा? सर्जा आणि शिर्पा कुठे आहेत?" त्यावर कमळी काय उत्तर देईल?

Pages