..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रेक्ट है जिप्सिला जागूचे २१ उकडीचे मोदक Happy

१८७: सर्जा आणि शिर्पा दोघे भाऊ. शेवंता आणि कमळी ह्या त्यांच्या (अनुक्रमे) बायका. बाप्ये शेतात राबायचे तर बायका घरी. एकदा दोघे भाऊ आषाढीच्या वारीला पंढरपूरला जातात. घरी पाहुणे येतात आणि कमळीला विचारतात, "हे काय? तुम्ही दोघीच कशा? सर्जा आणि शिर्पा कुठे आहेत?" त्यावर कमळी काय उत्तर देईल?

उत्तरः सजनाजी वारी वारी जाउ मै

१८८ : एकदा दिलीपकुमार आणि सायराबानू यांच्यात वाद झाला. कशावरून ? टीव्हीच्या रिमोट कंट्रोलचा कंट्रोल कुणाकडे असावा यावरून. दिलीपसाहेबांना क्रिकेट मॅच बघायची होती. तर सायराला अमीरखानचा एक आणि काका-अम्मा यांचा एक असे दोन चित्रपट बघायचेच होते. त्यातून भारतीय संघ सारखा हरत असलेला पाहून तिला वीट आला होता. तिने म्हटलं "माझं तुमच्यावर किती प्रेम आहे गडे. (तुमचं माझ्यावर आहे की नाही?) मला हे चित्रपट बघायला द्याल तर खरंच उपकार होतील. हे गाण्यात कसं म्हटलं असेल?

१८८: एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो
मुझे तुमसे मुहब्बत हो गई है मुझे
पलकों की छाँओ में रहने दो???

आर्याबरोबर आम्हाला पण साबुदाणा वडे देणार असाल तर आम्ही का रागवू भरत?
कोडं मस्त होतं.

हैला...लोकांना उकडीचे मोदक देता आणि कधी नव्हे ती आमची वेळ आली की उपास???/
वर खाऊही द्यायचं म्हणालात तर इतके वाटे(हिस्से) त्यात!! Sad

भरत रुचिरेचे नाही तरी कमीतकमी चक्षूंचे तरी लाड पुरवा. तुम्ही दिलेली लिंक नुसती 'वाचा, वाचा आणि वाचा' च आहे. तुम्ही करा आणि फोटो टाका तिथे Happy
<'a href='http://yourlink.com'>इथे<<'/a> असे लिहा भरत. फक्त < नंतरचा ' देउ नका.

'इथे' असं लिहून ते सिलेक्ट करायचं आणि 'Insert/edit link' वर क्लिक करायचं. Link Href मध्ये लिंक टाकायची आणि ओके क्लिकायचं. झालं!

अरे वा जमलं. आज एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली.
स्वप्ना, उपासाचा ढोकळा चालेल का? कुठल्यातरी रेसिपी शोत बघितला होता, वरीच्या तांदळाच्या पिठाचा.

१८९ : सचिन हा भूगोलाचा विद्यार्थी तर सारिका मानसशास्त्र शिकणारी. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. दोघांच्या परीक्षेचा निक्काल एकाच दिवशी लागला. नापास होऊनही त्या संध्याकाळची डेट त्यांनी चुकवली नाहीच, वर निकाल काय लागला ते सांगणारं गाणंही म्हटलं. कोणतं?

१८९ : सचिन हा भूगोलाचा विद्यार्थी तर सारिका मानसशास्त्र शिकणारी. पण दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. दोघांच्या परीक्षेचा निक्काल एकाच दिवशी लागला. नापास होऊनही त्या संध्याकाळची डेट त्यांनी चुकवली नाहीच, वर निकाल काय लागला ते सांगणारं गाणंही म्हटलं. कोणतं?

उत्तर : क्यों चलती है पवन
क्यों झूमे है गगन
क्यों मचलता है मन
ना तुम जानो ना हम
क्यों आती है बहार
क्यो लुटता है करार
कों होता है प्यार
ना तुम जानो ना हम

भरतजी.. __/\__ Lol

मी उगाच 'ये धरती चांद सितारे, ये नदिया पवन घटारे" ढुंढत होते. Proud

भरत सचिन एक्दम मठ्ठ होता म्हणजे - भूगोलाचे तिन्ही प्रश्ण सोपे होते तरी त्याला आली नाहित उत्तरं Happy

Pages