..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं १९३:

उत्तरः

"आ चल" के तुझे, मैं ले के चलूं इक ऐसे गगन के तले
जहा गम भी न हो, आंसू भी ना हो
बस प्यार ही प्यार पले
इक ऐसे गगन के तले

कोडं १९४:

हे कोडं जरा वात्रट आहे आणि या आधीच विचारून झालंय का माहित नाही.

"एक डायरीया झालेला वैतागलेला माणुस नुकताच 'जाऊन' आल्यावर शी ला उद्देशुन कुठलं गाणं म्हणेल ?"

(वात्रटपणा केल्याबद्दल क्षमस्व)

अक्षरी, उत्तर बरोबर आहे. पण फोड अशी आहे. आचल कपूर = आचल के

कोडं १९३:

"काय रे मन्या, २ दिवसांपासून पहातोय. गप्प गप्प आहेस. घरी तणातणी झाली काय?" चेतनने विचारलं.
"नाही रे यार"
"मग?"
"आचलला पाहिलंयस गेल्या २ दिवसांपासून?"
"कोण आचल?"
"आचल कपूर रे. एफवायवाली".
"ती होय? नाही, का रे?"
"काहीतरी झोल झालाय यार. सॉलिड उदास दिसतेय. तिचं आणि त्या हिरोचं, काय नाव त्याचं, हा रोहन. त्यांचं सूत होतं. बहुतेक ब्रेकअप झालाय."
"जाउ देत ना. तुला काय करायचंय? काही खास कारण?" चेतनने त्याच्या पाठीत थाप मारत विचारलं.
"आता तुझ्यापासून काय लपवायचं दोस्त. आपल्याला जाम आवडते ती. पण कधी धीर नाही झाला."
"मग? आता झाली ना लाईन क्लिअर? ट्राय मार. खुदा उनकीही मदत करता है जो खुदकी मदत करते है"
"ए, डायलॉग नकोत हं. एक मस्त पंचलाईन पाहिजे. अशी की ऐकून आचल हसली पाहिजे. आणि आपलं फर्स्ट इंप्रेशन एकदम चकाचक झालं पाहिजे"
"एक झक्कास हिंदी गाणं ऐकव तिला"
"हिंदी गाणं? काहीही काय. चप्पल फेकून मारेल मला ती"
"नाही मारणार, कान कर इकडे, सांगतो कुठलं ते" म्हणून चेतनने मन्याला एक गाणं सांगितलं आणि खूश होऊन मन्याने टाळीच दिली. सांगा बरं ते गाणं.

उत्तरः

"आ चल के" तुझे, मैं ले के चलूं इक ऐसे गगन के तले
जहा गम भी न हो, आंसू भी ना हो
बस प्यार ही प्यार पले
इक ऐसे गगन के तले

१९४ : शीला की जवानी >> नाही.
क्लु: हे गाणं शब्दच्छलावर आधारीत नाही. डायरीया झालेल्या माणसाची मनस्थिती लक्षात घ्या.

१९४ >> अजुन एक क्लू. हे एक आधुनिक काळातील चित्रपटाचं गाणं असून चित्रपटाचं नावही तेच दर्शवतं.

१९४ रुक जा ओ जाने वाली रुक जा....>> हे गाणं पण फिट होतंय पण मला आधुनिक काळातील चित्रपटाचं नाव अपेक्षित आहे.
उत्तर:

कोडं १९४: "एक डायरीया झालेला वैतागलेला माणुस नुकताच 'जाऊन' आल्यावर शी ला उद्देशुन कुठलं गाणं म्हणेल ?"

जुदा होके भी तु मुझमे कहीं बाकी है... - चित्रपट : कलियुग.
(हे एक आधुनिक काळातील चित्रपटाचं गाणं असून चित्रपटाचं नावही तेच दर्शवतं)

कहा गये वो लोग Proud

कोडं १९५:

शेरॉन स्टोनवर तिचा एक चाहता भलताच खूश होता. तिला फुलं काय पाठवायचा, उंची परफ्यूम्स, भारीतले दागिने असलं काय काय देण्याचा त्याने नुस्ता सपाटा लावला होता. शेरॉन अगदी वैतागून गेली होती. शेवटी काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून तिने त्याला एकदा भेटायला बोलावलं आणि आपलं काही जमणार नाही हे निक्षून सांगितलं. एकतर तो चिडेल किंवा प्रचंड दु:खी होईल असा तिचा अंदाज. मात्र त्याने एक हिंदी गाणं म्हटलं. कोणतं असेल ते?

जिप्सी, मी_आर्या बरोबर. तो चिडला नाहिये किंवा दु:खी झाला नाहिये. तिचा पाठपुरावा करतच रहाणार आहे.

कोडं १९५:

शेरॉन स्टोनवर तिचा एक चाहता भलताच खूश होता. तिला फुलं काय पाठवायचा, उंची परफ्यूम्स, भारीतले दागिने असलं काय काय देण्याचा त्याने नुस्ता सपाटा लावला होता. शेरॉन अगदी वैतागून गेली होती. शेवटी काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून तिने त्याला एकदा भेटायला बोलावलं आणि आपलं काही जमणार नाही हे निक्षून सांगितलं. एकतर तो चिडेल किंवा प्रचंड दु:खी होईल असा तिचा अंदाज. मात्र त्याने एक हिंदी गाणं म्हटलं. कोणतं असेल ते?

उत्तरः
किसी पत्थर कि मूरत से मोहब्बत का इरादा है

चला आता २०० पूर्ण व्हायला ५च कोडी राहिली आहेत. डोकी चालवा पटापट. ह्या आठवड्यात २०० चा कोटा झाला पाहिजे Happy

जिप्सी, मी_आर्या बरोबर. >>>>>>हुर्रे!!!!! Happy

आर्ये, तुझ्या आधी मी उत्तर सांगितलं :टुकटुकः Wink

१८४९ पोस्टी झाल्यात. अ‍ॅडमिनने येऊन धागा बंद करायच्या आधी ५ कोडी घाला रे.

१९६: एक मांत्रिक असतो. कोणतेही भूत हमखास उतरवणारा. सगळी भूतं ही देवनागरी अक्षरांप्रमाणे असतात अशी त्याची धारणा होती. आणि प्रत्येक भूतावर काबू करण्यासाठी काय लागेल याचे ठोकताळे ठरलेले असायचे त्याचे. जसे ठ आकारातला प्रेतात्मा असेल तर तो झपाटलेल्याचे मन मागायचा भूतावर काबू करायला. ड आकारातला असेल तर फक्त अर्ध केळं मागायचा. कसं सांगायचा तो हे गाण्यातून?

१९६:
---- बना दो..... असे काहीतरी.
मधे बरेच दिवस इथे यायला जमले नाही.

१९७: रजनीताई कॉलेजात प्राध्यापिका असतात. त्यांच्या वर्गात चंदा नावाची खूप सुंदर मुलगी असते. त्यांच्या मुलाचे (सूरजचे) तिच्यावर प्रेम असते आणि रजनीताईंना त्याची कुणकुण लागली असते. त्यांनाही चंदा पसंत असते सून म्हणून. त्या मुलाकडून लग्नाकरताचा अर्ज भरून घेतात - दुसर्‍या दिवशी रजीस्ट्रारच्या कार्यालयात नेऊन देण्यासाठी.
चंदा गणितात अगदी ढ असते. दुसर्‍या दिवशी बाई शिकवत असताना आयत या भूमितीय आकृतीचा संदर्भ येतो. चंदाच्या पार डोक्यावरून जाते ते. तेंव्हा बाई म्हणतात, "बाई गं आयत शिक अथवा नको शिकूस. हा अर्ज घे म्हणजे तुला आयताचे सर्वच अंतरंग समजेल"

चंदा है तु मेरा सुरज है तु ओ मेरी आखो का तारा है तु हे पहिल्या दोन ओळीतून लिहीले. खालच्या ओळीसाठी डोके लढवावे लागेल.

जागू नाही.

१९८. एकदाच्या साडीच्या मिर्‍या काढून झाल्यावर अनघाने बागेश्रीला उद्देशून कोणते गाणे म्हटले असेल?

Pages