..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७३ : उडी बाबा उडी बाबा उडी बाबा
नशा यह कैसा मुझे हो गया दिल मेरा खो गया ?

शब्द बसतायत पण लॉजिक नाही .

येस्स भरत. बरोब्बर!

कोडं १७३.
बाबा आझमी (शबाना आझमीचा भाऊ आणि तन्वीकिरणचा नवरा) नावाजलेला फोटोग्राफर. एकदा तो आणि तन्ची रात्रीचे बाहेर पडतात. बाबाला फोटोग्राफी करायची लहर येते. त्याने नुकताच 'नशा' कंपनीचा नविन कॅमेरा घेतलेला असतो. पण त्याला मनासारखा फोटो जमत नसतो तर तन्ची कोणतं गाणं म्हणून त्याला सल्ला देईल?

उत्तर :
ये रात में जो नशा है
नशा ये कुछ नया नया है
ये आज दिल को क्या हुआ है के झूमता ही जा रहा है (हे सिच्युएशन मध्ये घातलं नाहीये. पण मे बी तन्वीची मनस्थिती अशीच असेल ना?)
झूम झूम झूम बाबा

पावसाने घरी बसवल्यामुळे आम्ही बरेच दिवसानी डोकावू शकलो.
घात झाला, ऑफिसमधला आमचा अ‍ॅक्सेस बंद झाला.
असो!!!

१७३ तर एक मराठी गाण ओळखा

वात झालाय आणि अंगावर पित्तही उठलय त्यामुळे एक बाई ओरडत (गात) फिरतेय.

१७४: एक प्रतिथयश गायक नट पण काही केल्या पार्श्वगायन जमेना. गायलेल गाण नीट झाल नाही मग दिग्दर्शकाने शक्कल लढवली स्टुडीयोत मैफिल मांडली, तबला पेटी वगैरे आणि तिन अप्रतिम गाणी जन्मली

अर्रे, माझ्याकडून कसा काय मिसला हा धागा देव जाणे. भन्नाट आहे हं! आता अगदी पहिल्या पानापासून रोज वाचणार.

धन्यवाद शांकली. हा दुसरा भाग आहे. पहिला भागही जरूर वाच. वरती त्याचीही लिंक आहे. Happy

कोडं क्र. १७५.
एक फॉरेनर एका भारतीय मुलीच्या प्रेमात पडतो. ती बिचारी अनाथ असते. तिचे आईवडील खूप आधीच वारलेले असतात आणि मग तिला तिच्या वडिलांच्या चार बहिणी मिळून सांभाळतात. त्या तिच्याबाबतीत खूपच प्रोटेक्टीव्ह असतात. त्या फॉरेनरला हिच्याकडून प्रेमाची खात्री असते पण तिच्या घरच्या लोकांना तो घाबरत असतो. तर त्याच्या मोडक्यातोडक्या हिंदीतून तो तिला हे कसे सांगेल?

बरोब्बर ग श्रध्दा.

तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार
तेरा इमोशनल 'आत्या' 'चार'

गेले काही दिवस, काही कारणास्तव मी क्वचितच OL येऊ शकत होतो.
हा धागा अजूनही जोरात वाहतोय हे पाहून खूप बरं वाटलं.

उद्यापासून पुन्हा काही दिवस OL येणं जमेल असं वाटत नाही.

मामी आणि हा सुंदर धागा विणणार्‍या सर्वांना शुभेच्छा

१७६. शंकरराव आणि पार्वतीबाई हे नवरा बायको उत्तम लेखक असतात. शंकरराव कथा लिहून झाल्या झाल्या लगेचच तिला समर्पक नाव देउन टाकायचे पण पार्वतीबाईंना मात्र नाव द्यायचा भयंकर आळस! पार्वतीबाईंना कुत्रा पाळायची भयंकर आवड असते. एकदा एक चाहता पार्वतीबाईंना कुत्रा भेट देतो. तो त्यांचा भयंकर लाडका बनतो आणि त्याच्याही पार्वतीबाई भयंकर लाडक्या असतात. बरेच दिवस होतात पण आपल्या स्वभावानुसार पार्वतीबाई कुत्र्याचे बारसे काही करत नाहित. शंकररावांची नवीन गोष्ट लिहून, त्याला योग्य ते शिर्षक देऊन ते ती प्रकाशकाला देऊन येतात अणि घरी आल्यावर पार्वतीबाईंना एक गाणे म्हणून दाखवतात.

???

आर्या बरोबर रस्त्यावर आहे. रफी साहेबांचे अप्रतिम गाणे आहे. (पण त्यांच्या फेमस गाण्यांच्या यादित सहसा नसते)

१७६. शंकरराव आणि पार्वतीबाई हे नवरा बायको उत्तम लेखक असतात. शंकरराव कथा लिहून झाल्या झाल्या लगेचच तिला समर्पक नाव देउन टाकायचे पण पार्वतीबाईंना मात्र नाव द्यायचा भयंकर आळस! पार्वतीबाईंना कुत्रा पाळायची भयंकर आवड असते. एकदा एक चाहता पार्वतीबाईंना कुत्रा भेट देतो. तो त्यांचा भयंकर लाडका बनतो आणि त्याच्याही पार्वतीबाई भयंकर लाडक्या असतात. बरेच दिवस होतात पण आपल्या स्वभावानुसार पार्वतीबाई कुत्र्याचे बारसे काही करत नाहित. शंकररावांची नवीन गोष्ट लिहून, त्याला योग्य ते शिर्षक देऊन ते ती प्रकाशकाला देऊन येतात अणि घरी आल्यावर पार्वतीबाईंना एक गाणे म्हणून दाखवतात.

उत्तरः मैने रखा है मुहब्बत अपने अफसाने का नाम
तुम भी कुछ अच्छासा रखदो अपने दिवानेका नाम

अर्रे १७२ राहिलय का अजून. हा घ्या दुसरा क्लू:

क्लू १ - गाणे खलनायकावर चित्रीत झालय
क्लू २ - माणसाला सिंहावरून येणारे एक विशेषण

आता यायला हवे Happy

क्लू ३: एक भन्नाट गायिका आणि संगीत दिग्दर्शक दोघही उधळले या चित्रपटापासून. (दोघांच्याही कारकिर्दीच्या सुरुवातीचा सिनेमा)

ओ हसिना झुल्फोंवाली??
हम्म...पण इथे खलनायक नाहीय.

Pages