..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं १७०:

त्याचं चपला, बूट विकायचं दुकान. एक्दा ती चपला घ्यायला आली. त्याला ती आवडली, तिला तो. मग भेटी सुरु झाल्या. सगळं मस्त चालू असताना एक दिवस दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. कशावरून? तो म्हणाला तू उंच टाचांच्या चपला घालू नकोस, त्याने पायाला त्रास होतो. तिचं म्हणणं मला अश्याच चपला घालायला आवडतात, काही त्रास होत नाही. दोघंही मागे हटायला तयार नाहीत. शेवटी रागारागाने ती आपल्या उंच टाचांच्या चपला टकटक वाजवत तिथून तरातरा निघून जाऊ लागली. तिची समजूत काढायला तो कुठलं गाणं म्हणेल?

माधव, लताच्या आवाज लावण्याबाबत मस्त शब्द योजले आहेत. प्रत्येक संगीतकाराकडे ती वेगळे गायली, तरीही तिचे "लता" पण कमी होऊ दिले नाही.

मी_आर्या, जिप्सी बरोबर Happy गरमागरम कचोरी आणि पॅटिस दोघांना

कोडं १७०:

त्याचं चपला, बूट विकायचं दुकान. एक्दा ती चपला घ्यायला आली. त्याला ती आवडली, तिला तो. मग भेटी सुरु झाल्या. सगळं मस्त चालू असताना एक दिवस दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. कशावरून? तो म्हणाला तू उंच टाचांच्या चपला घालू नकोस, त्याने पायाला त्रास होतो. तिचं म्हणणं मला अश्याच चपला घालायला आवडतात, काही त्रास होत नाही. दोघंही मागे हटायला तयार नाहीत. शेवटी रागारागाने ती आपल्या उंच टाचांच्या चपला टकटक वाजवत तिथून तरातरा निघून जाऊ लागली. तिची समजूत काढायला तो कुठलं गाणं म्हणेल?

उत्तरः
वादियां मेरा दामन, रास्ते मेरी बाहें
जाओ मेरे सिवा, तुम कहाँ जाओगे

Sad Sad

१७१: मी, मीना आणि नासाकी (हा जपानचा आहे) जिवलग मित्र पण भेटलो की मात्र कोणत्याही गोष्टीबाबत एकमत व्हायचे नाही. एकदा नासाकी त्याच्या खास मैत्रिणीला घेउन आला. तिला बघताच आम्हाला खूप आनंद झाला आणि तिच्या आजोबांचे नाव काय असणार यावरून आमच्यात कधी नव्हे ते एकमत झाले. आम्ही तिला ते गाउनच सांगितले.

गाणं गोल्डन एरातले अजाबात नाहीये.

इतक्या लगेच उत्तर? Happy आर्या आणि जिप्सीला वाफाळता आलं घातलेला चहा आणि खेकडा भजी (खेकड्याची नव्हेत. ती हवी असल्यास जागूकडे मागावीत Happy )

भांडू नका. पुढचे कोडे घ्या.

१७२. एकदा एका नुकत्याच वयात आलेल्या सिंहाच्या छाव्याला एक तरुण छावी भेटते - एकद्दम किल्लर! फक्त डोळ्याने चकणी असते तर तो तिला कुठले गाणे म्हणेल?

कोडं १७३.
बाबा आझमी (शबाना आझमीचा भाऊ आणि तन्वीकिरणचा नवरा) नावाजलेला फोटोग्राफर. एकदा तो आणि तन्ची रात्रीचे बाहेर पडतात. बाबाला फोटोग्राफी करायची लहर येते. त्याने नुकताच 'नशा' कंपनीचा नविन कॅमेरा घेतलेला असतो. पण त्याला मनासारखा फोटो जमत नसतो तर तन्ची कोणतं गाणं म्हणून त्याला सल्ला देईल?

Pages