..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७२. एकदा एका नुकत्याच वयात आलेल्या सिंहाच्या छाव्याला एक तरुण छावी भेटते - एकद्दम किल्लर! फक्त डोळ्याने चकणी असते तर तो तिला कुठले गाणे म्हणेल?

उत्तरः पतली कमर है तिरछी नजर है खिले फुलसी तेरी जवानी कोइ बतादे कहा कसर है

माफ करा बरेच दिवस येता नाही आल.

क्लु दिला तर लगेच ओळखाल

१७४: एक प्रतिथयश गायक नट पण काही केल्या पार्श्वगायन जमेना. गायलेल गाण नीट झाल नाही मग दिग्दर्शकाने शक्कल लढवली स्टुडीयोत मैफिल मांडली, तबला पेटी वगैरे आणि तिन अप्रतिम गाणी जन्मली

यातली दोन गाणी वाजली नाहीत तर गणापती येत नाहीत

???

आर्या
उत्तर सांगितल तर लक्षात येइल की इतकी साधी सरळ गोष्ट का नाही सुचली.

आज मायबोली चालतय त्यामुळे संध्याकाळ पर्यंत उत्तर सांगतो तो वर प्रयत्न कर

मामी स्वप्ना दिनेशदा कोणी नाही का इकडे???

१७४ : प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया;गणपती तू गुणपती तू;दाटून कंठ येतो : वसंतराव देशपांडे

वसंतरावांनी १९५० पासून पार्श्वगायन केलंय की! माझ्या कोंबड्याची शान, माझं ठरल्यालं लगीन मोडलं, इ.इ.

१७५ : मोरेश्वर रहाण्यांना असाध्य आजार झाला होता. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनीही हात टेकले आणि "इन्हे अब दवा की नही दुवा की जरूरत है" असे सांगितले. अशा वेळी त्यांना डॉ दिलीप रुपेश बापट हे त्या आजारावर उपचाराची नवी पद्धत आजमावत आहेत अशी माहिती मिळाली. धावपळ करून ते डॉक्टरांच्या इस्पितळात पोचले तर डॉक्टरसाहेब एक कॉन्फरन्ससाठी परदेशी जायला निघालेले. डॉक्टरांनी सांगितले "आत्ता मी काहीही करु शकणार नाही"

डॉक्टरांची मनधरणी करताना मोरेश्वराने कोणते गाणे म्हटले?

गुगुला अनुमोदन. मोरे आणि दिलरुबा एकत्र येऊन कोणततरी गाणं तयार होत असेल.

अन्यथा बापटांकडे रूपेश होण अशक्य >>>> आँ??? म्हणजे काय??? रुपेस नाही होणार पण रुपेश व्हायला कोणाची आडकाठी आहे? आँ???? Proud

तेच तर. बापटांना काय अगदी हे समजलात का?
मामी ते मोरे नाही, मोर आहे. हा आणखी एक क्लु.
शोधा शोधा. दिलरुबावादनाचा आणखी सराव करा.:)

मला दिलरूबा टांगेवाली नावाच गाण अचानक आठवल. याच नावाच्या बी ग्रेड चित्रपटातल. श्रीप्रदा नावाची एका हत्तीण सुमती सहगल ची हिरोईन होती.

बरोबर प्रशांत Happy

१७५ : मोरेश्वर रहाण्यांना असाध्य आजार झाला होता. त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनीही हात टेकले आणि "इन्हे अब दवा की नही दुवा की जरूरत है" असे सांगितले. अशा वेळी त्यांना डॉ दिलीप रुपेश बापट हे त्या आजारावर उपचाराची नवी पद्धत आजमावत आहेत अशी माहिती मिळाली. धावपळ करून ते डॉक्टरांच्या इस्पितळात पोचले तर डॉक्टरसाहेब एक कॉन्फरन्ससाठी परदेशी जायला निघालेले. डॉक्टरांनी सांगितले "आत्ता मी काहीही करु शकणार नाही"

डॉक्टरांची मनधरणी करताना मोरेश्वराने कोणते गाणे म्हटले?

तुझे क्या सुनाऊं मैं दिलरुबा तेरे सामने मेरा हाल है
तेरी इक निगाह की बात है मेरी जिंदगी का सवाल है

१७६ राकेशच्या मैत्रिणीचे केस काळेभोर कुरळे तरी लांबसडक असतात. पण त्यात काही जीवांनी आपली वसाहत स्थापन केलेली असते. पुन्हा तिला भडक वासाच्या तेलांनी आपल्या केसांचे पोषण करायला आवडते. त्यामुळे राकेश जरा हैराणच असतो. पण मैत्रिणीला न दुखावता हे कसे सांगायचे ते त्याला कळत नाही. एकदा तीच त्याच्या निळ्या निळ्या डोळ्यांची तारीफ करते, तेव्हा ती संधी साधून तो तिच्या केसांबद्दलचे आपले विचार तिला कळवतो. कसे?

१७७ : काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी गांधर्व विवाह करून जुहूच्या एका बंगलीत संसार थाटला होता. त्यांचे शेजारी सांगतात की हे दोघे एक गाणं ही म्हणायचे, पुन्हा पुन्हा. कोणतं?

ती : यह आंखें देख कर हम सारी दुनिया भूल जातें हैं
इन्हे पाने की धुन में हर तमन्ना भूल जातें हैं
तो : तुम अपनी महकी महकी जुल्फ के पेंचों को कम कर दो
मुसाफिर इनमें घिर के अपना सर्स्ता भूल जातें हैं

धनवान : राकेश रोशन-रीना रॉय
साहिर लुधियानवी - हृदयनाथ मंगेशकर- लता-सुरेश वाडकर

१७७ : काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी गांधर्व विवाह करून जुहूच्या एका बंगलीत संसार थाटला होता. त्यांचे शेजारी सांगतात की हे दोघे एक गाणं ही म्हणायचे, पुन्हा पुन्हा. कोणतं?

मैं बांगाली छोकरा करूं प्यार को नमस्कारम
मैं मद्रसी छोकरी मुझे तुमसे प्यारम

ग्रेट !

काल खरतर ये आखे देखकर... आठवल होत पण, त्यात निळे डोळे नाहीत म्हणुन सोडून दिल....... अरेरे................

Pages