..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी
मी दिलेल कोड हे तुझ्या त-हेच नाही, थेट अर्थ व कथानकाशी संबधीत आहे त्यामुळे हे गाण हो ऊ शकत नाही.
शिवाय हवा हवा हे ८८-८९ मधल आहे.

१२५ : आमच्या ऑफिसपर्यंय पोचणार्‍या बेस्ट बसचा स्टॉप अगदी आमच्या घराशेजारीच आहे. आज निघायला अगदी मिनिटभराचा उशीर झाला आणि बस माझ्या डोळ्यादेखत निघून गेली. तिच्याकडे बघत मी कोणातं गाणं म्हटलं असेल?

१२४: गुगु

नॉन-फिल्मी आहे तर मग....अझिझ नाझा यांचे ते सुप्रसिद्ध
"झूम बराबर झूम शराबी, काली घटा है, मस्त फिजा है, जाम उठाकर झूम झूम..." असेल का ?

१२५ : भरत
"तुमने किसी की जान को जाते हुए देखा है ?
ओ देखे मुझसे रूठकर मेरी जान जा रही है...!"

~ ऑफिसला जाणार्‍या व्यक्तीला 'त्या' हताश क्षणी बायको पकडण्यापेक्षा बस पकडणे महत्वाचे वाटते, म्हणून...!

नाही प्रतिक

नॉन फिल्मी म्हटल की लगेच अल्बम मधलच असल पाहीजे का?????

खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!

आता असच खेचू बघु उद्याची मंडळी देतात का उत्तर

मी दिलेल कोड हे तुझ्या त-हेच नाही, थेट अर्थ व कथानकाशी संबधीत आहे त्यामुळे हे गाण हो ऊ शकत नाही. शिवाय हवा हवा हे ८८-८९ मधल आहे.>>>>अरे मी या अल्बम मधलं आहे का ते विचारतोय. "हवा हवा" हे उत्तर नाही सांगत आहे. Proud

१२४: सुबह मालिकेचे शिर्षक गीत? तो मालिकांचा सुवर्णकाळ होता आणि हे गाणे आर.डी. ने म्हटले होते.

ए जमाने तेरे सामने आ गये
आज के दौर के नौजवान आ गये

उत्तर द्यायचा आणखी एक निष्फळ प्रयत्न. :p
अजून एकही उत्तर बरोबर देता आलं नाही
(खरं तर याबद्दल मला पारितोषिक द्यायला हवं :D)

१२५ चं उत्तर :
कारवाँ गुजर गया
गुबार देखते रहे

थोडा बदल केलाय. आता सोप्प होईल.
१२५ : आमच्या ऑफिसपर्यंत पोचणार्‍या बेस्ट बसचा स्टॉप अगदी आमच्या घराशेजारीच आहे. आज निघायला अगदी मिनिटभराचा उशीर झाला आणि बस स्टॉपवर लागलेली होती. रांगही संपत आलेली दिसली. स्टॉपकडे धावता धावता मी कोणतं गाणं म्हटलं असेल?

कोडं १२३

शोभनाताई पाल्पिटेशन वाढले म्हणून डॉक्टरांकडे गेल्या. पण हाय री किस्मत, त्यांच्याकड्चे लाइटस गेले. बराच वेळ थांबून त्या निघून आल्या, तपासणी झालीच नाही, तक्रार तरी कुणाकडे करायची.. तर त्या कुठले गाणे म्हणतील ?

पण डॉक्टर त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांना न सांगताच शोभनाताईंचे दुखणे कळले. त्यांनी उपाययोजना पण सांगितली. हे समजल्यावर शोभनाताई कुठले गाणे म्हणतील ?

उत्तर :
१) हाले दिल उनको, सुनाना था, सुनाया न गया
शिकवा होठोंपे लाना था, वो लाया न नया (सुमन कल्याणपूर)

२) हाले दिल यूं उन्हे सुनाया गया,
आंख ही को जुबां बनाया गया ( लता मंगेशकर )

वरील नसेल तर....मग हे :

"रुक जाना.
तुमसे मिलने को दिल करता है
रे बाबा तुमसे मिलने को दिल करता है..."

राम आणि प्रतीक, बरोब्बर. रामला ३ मलाई सँडविच, तर प्रतीक दोनवर चालवा.

१२५ : आमच्या ऑफिसपर्यंत पोचणार्‍या बेस्ट बसचा स्टॉप अगदी आमच्या घराशेजारीच आहे. आज निघायला अगदी मिनिटभराचा उशीर झाला आणि बस स्टॉपवर लागलेली होती. रांगही संपत आलेली दिसली. स्टॉपकडे धावता धावता मी कोणतं गाणं म्हटलं असेल?

उत्तर :
रुक जा ओ जानेवाली रुक जा
मैं तो राही तेरी मंजिल का

ओक्के....दोन तर दोन....शेवटी तोंडात काहीतरी गेले हेच महत्वाचे.

आता गुगु चे नॉन-फिल्मी राहिले आहे का अजुनी ?

कोडं १२६ :

शामरावांच्या अचानक छातीत दुखु लागले. घरचे सगळे घाबरेघुबरे झाले. डॉक्टरांना फोन करून त्वरीत यायला सांगितले. क्षणोक्षणी त्यांची तब्येत जास्तच ढासळत होती. त्यांना दुखणे सहन होत नव्हते. डॉक्टर ट्राफिक मध्ये अडकले. सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांच्या येण्याकडे लागल्या होत्या. शेवटी व्हायचे तेच झाले आणि शामराव गेले. काहीवेळातच डॉक्टर घरी आले, पण आता काहीच उपयोग नव्हता. अशावेळी घरचे डॉक्टरांना पाहुन कोणते गाणे म्हणतील?

कोडे १२६ :

कदाचित हा वाईल्ड गेस असेल, पण या निमित्ताने 'मधुबाला' आठवली आणि बरेsssss वाटले :

"...गुजरा हुआ जमाना, आता नहीं दुबारा
हाफिज खुदा तुम्हारा...."

"शिरी फरहाद...." काय दिसत्ये मधुबाला या गाण्यात. राम राम !!
(संगीतकार एस.मोहिंदर....कुणी ऐकल्ययं हे नाव ?)

प्रतीक, "गुजरा हुआ जमान" गाणं आणि मधुबाला सुंदरच आहे Happy पण उत्तर चुकलं Happy

रच्याकने, मला "गुजरा हुआ जमाना" आणि "अखेरचा हा तुला दंडवत" हि दोन गाणी सारखीच वाटतात. Happy

जिप्सी... १२६...बडी देर से दर पे आखें लढी थी .. हुजुर आते आते बहुत देर कर दी.. बरोबर असेल तर २ प्लेट मिसळ दे.. Happy

राम, तुम्हाला दोन प्लेट झणझणीत मिसळ Happy

कोडं १२६ :

शामरावांच्या अचानक छातीत दुखु लागले. घरचे सगळे घाबरेघुबरे झाले. डॉक्टरांना फोन करून त्वरीत यायला सांगितले. क्षणोक्षणी त्यांची तब्येत जास्तच ढासळत होती. त्यांना दुखणे सहन होत नव्हते. डॉक्टर ट्राफिक मध्ये अडकले. सगळ्यांच्या नजरा डॉक्टरांच्या येण्याकडे लागल्या होत्या. शेवटी व्हायचे तेच झाले आणि शामराव गेले. काहीवेळातच डॉक्टर घरी आले, पण आता काहीच उपयोग नव्हता. अशावेळी घरचे डॉक्टरांना पाहुन कोणते गाणे म्हणतील?

उत्तर :
हुजुर आते आते बहोत देर कर दी
बहोत देर से दर पे आंखे लडी थी
हुजुर आते आते बहोत देर कर दी
मसीहा मेरे तुने बिमार्-ए-गम की
दवां लाते लाते बहोत देर कर दी

एक सोप्पं कोडं Happy
कोडं १२७:
काश्मिरसारख्या बर्फाळ प्रदेशातली एक तरुणी. पण ती आपल्या प्रियकराला भेटली ते मात्र एका वाळवंटात. हे ऐकून तबस्सुमला हसू आलं. बूझो ये पहेली
Happy

कुठे गेले सगळे>>>>काश्मीरला, स्वप्नाचे कोडे सोडवायला..:P
स्वप्ना... मला ये हसीं वादीया आठवते आहे पण बहुतेक ते नसावे.. क्लु प्लीज

भरतला सिंहगडावरची भाजी भाकरी आणि भजी वर मडक्यातल दही

प्रतिक ओळखल रे त्याने

काय हे स्वप्ना तुझ्या फिल्ड मधल गाण मला वाटल तू सांगशिल

आर डी ने संगीत देऊन गायलेल हे एकमेव मालिका शिर्षक गीत.

१२४ : उत्तर
ऐ जमाने तेरे सामने आ गये
आज के दौर के नौजवां आ गये
दर पे तेरे लेके सूरज आज सुबह आ गये हम तो
सुबह को कर सलाम

Pages