..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना Happy

मी मराठीतून हिंदी शिकलो ना, म्हणून मुलाखत्=मुलाकात >>>>म्हणजे गाण्यात "मुलाकात" हा शब्द नक्कीच आहे Happy

ह्यावरून एक गाणं आठवलं - फिरकीवाली तू कल फिर आना, नही फिर जाना तू अपनी जबानसे, के तेरे नैना है जरा बेईमानसे. पण ह्यात दुसर्‍या शहराचा उल्लेख नाहिये Sad

स्निग्धा यु आर अ जिनियस. तुला एक गाजर, आपलं गाजराचा हलवा.
१३२ स्वप्ना जॉब इंटरव्ह्युसाठी गेली. इंटरव्ह्यु झाल्यावर तिला शॉर्टलिस्ट करुन पुढल्या फेरीसाठी ये म्हणून सांगितलं.वर आमचा डायरेक्टर फक्त त्यादिवसापुरता दुसर्‍या शहरातून येणार आहे, तेव्हा नक्की ये असं सांगितलं. कसं?

उत्तर : फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो
हमसे इक और मुलाकात का वादा कर लो.

मला दाट शंका आहे, की हॅरी पॉटरला व्हॉल्डेर्मटचे आणि मिसेस तेंडुलकरमधल्या त्रिवेदीला पगारेचे विचार कळतात, तसे स्निधाला पण माझ्या डोक्यात काय चाललंय ते कळतं की काय?
स्वप्ना, काही काही वाक्य वातावरणनिर्मितीसाठी.

आता माझं कोडं सोडवा Happy

एक मोठ्ठा क्लु Happy
हे गाणं हिर्विन जम्पिंग जॅक साठी गातेय Happy

(आता ओळखता आलंच पाहिजे :-))

१३३:आओ ना गले लगाओ ना लगी बुझाओ ना ओ जानेजा? ओह, जिप्सीचा क्लू नंतर पाहिला. ह्यात 'काका' आहे, जंपिंग जॅक नाही.

भरत, Happy Happy Happy

मला पिया तू अब तो आजा आठवतंय, पण त्यावर मी असंच कोडं दिलं होतं.
तेच असेल, तर जिप्सीला ऐश्वर्याच्या डोहाळजेवणाचे फोटो काढायला पाठवा.

जिप्सी....

"बेचारा दिल क्या करे, सावन जले भादों जले
दो पल की राह नहीं, इक पल रुके इक पल चले..."

हे बसेल का ?

(द्रुपलरावाची दादागिरी चालूच आहे..)

कोड्याचं उत्तर सुचलं नाही की खुन्न्स काढायला आपण एक कोडं घालायचं असं मी ठरवलंय Proud

कोडं १३४:
".........कुठे ट्रॅफिक लागला नाही तर दीड-दोन तासात सहज पोचशील. कसं यायचं ते नीट लिहून घेतलंस ना?" मुग्धाने विचारलं.
"हो ग, लिहिलं." खरं तर सुमीतला आयत्या वेळी पेन मिळालं नव्हतं त्यामुळे मुग्धाने सांगितलेल्या directions त्याने मनातल्या मनात घोकून घेतल्या. पण हे तिला सांगितलं असतं तर भडकली असती म्हणून त्याने थाप मारली.
शेवटी व्हायचं तेच झालं. सुमीत रस्ता चुकला आणि कोणाला रस्ता विचारायचा नाही ह्या पुरुषांच्या जगप्रसिध्द हेक्याप्रमाणे तो स्वतःच डोकं लढवून पुढे जात राहिला. शेवटी तब्बल साडेतीन तासांनंतर पोचला तेव्हा मुग्धाला काय झालं असेल ह्याचा पुरेपुर अंदाज आला होता.
"नव्हत्या लिहून घेतल्यास ना directions?" ती वैतागून म्हणाली. पण सुमीत काय कबूल करतोय? त्याने एक हिंदी गाणं म्हणून आपल्या उशिरा येण्याचं कारण सांगितलं. सांगा ते गाणं.

"...उत्तर सांगु का?...

नक्को.....त्या जित्याला सोडतच नाही...थांब....तो पर्यंत तू कॅमेरा घेऊन ऐश्वर्या फंक्शनकडे धावलास तरी चालेल.

आर्ये...ssssssss... अगं 'माना तेरी नजर..." हेच सुलक्षणा पंडित या खानदानमधील हिरविनीचे गाणे टंकायला आलो होतो....आता हेच असेल आणि जिप्स्याने होय म्हणून सातार्‍याचे कंदी पेढे तुला दिले तर, माझा वाटा राखून ठेव.

माना तेरी नजर में तेरा प्यार हम नही

हे गाण पद्मिनी कोल्हापुरे च आहे आहीस्ता आहीस्ता मधल त्यात जितेंद्र नाही

आग है लगी हुई हर तरफ़ यहाँ वहाँ
जल रही है ये ज़मीं जल रहा है आसमाँ

स्वर्ग नरक मधल

Pages