..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, गाणं कृष्णधवल असलं तरी मी ऐकलेलं आहे पण ह्या कोड्याचं ते उत्तर नाही.

कोडं ११९:
नोकरीला कंटाळून मुकेश स्वतःचा व्यवसाय करायचा ठरवतो. पण काय करायचं याचा निर्णय होत नसतो. शेवटी विजेचे दिवे बनवायचा सल्ला एक मित्र त्याला देतो. मुकेश सुरुवात करतो आणि फॅक्टरी चांगली चालूही लागते. त्याची बायको सेजल त्याच्या फॅक्टरीत त्याला मदत करायला येत असते. पण काही दिवसांनी सेजलची तब्येत बिघडते. कुठल्या रसायनांचा परिणाम होतो की काय माहित नाही पण तिच्या सर्वांगाला दाह सुरु होतो. मुकेश तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा ती रोग आणि त्याचं कारण कोणत्या शब्दात सांगेल?

उत्तरः निस दिन निस दिन मेरा जुलमी सजन ऐसी बतिया बनाये हा
जले बैरी मन, सुलगे बदन, आगसी लग जाए हा.

बतिया=बत्तिया Happy

स्वप्नाssssssssssssss : "बतिया" बढीया हुआ ! व्वॉव....मी सेजल नावामागे धावत होतो.
(कुठून शोधून काढलेस हे नाव ?)

१२०: भरत मयेकर गाण्यातले दर्दी. खूप सुंदर गाणी त्यांच्या संग्रही आहेत. आणि ते त्यांचा नेहमी आनंद घेत असतात. पण एक गाणे लागले की मात्र त्यांच्या हृदयातली जखम भळाभळा वाहू लागते. त्यांचे नाव त्या गाण्यात हवे असे राहून राहून त्यांना वाटत असते.

उत्तरः
रामजीकी निकली सवारी
रामजीकी लीला है न्यारी
एक तरफ लक्ष्मन एक तरफ सीता
बीचमें जगतके पालनहारी

भरत म्हणतात लक्ष्मण आहे पण मी मात्र नाही त्या गाण्यात Sad

माधव पण राम चे तर हे गाणे आवडते असणार ना ?
स्वप्ना, बतिया चा अर्थ मला लहानपणी माहित नव्हता. पण गाण्यात कुठेही आला तरी गोड वाटतो !

कोडं १२२:
"आई ग" सुमेधा पुन्हा कळवळते.
"खूप दुखतंय़ का ग?" मयुरेश विचारतो.
"मग? मी काय हौस म्हणून ओरडतेय का?" सुमेधा चिडते.
"अग चिडतेस काय? कशाला उचलायला गेलीस ती भरलेली बादली? भरली ना उसण पाठीत?"
"मग इथे काय १० नोकर ठेवलेस तू काम करायला? का तू ऑफ़िसातून येऊन ती बादली उचलणार होतास? आई ग. आता किती दिवस असं कमरेत वाकून चालावं लागणार आहे कोणास ठाऊक."
"मला तर तुला बघून एक मस्त गाणं सुचतंय" असं म्हणून मयुरेशने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि पाठीचं दुखणं विसरून सुमेधा त्याला मारायला धावली. ओळखा पाहू ते गाणं.

>>स्वप्ना, बतिया चा अर्थ मला लहानपणी माहित नव्हता. पण गाण्यात कुठेही आला तरी गोड वाटतो !

दिनेशदा, माझ्या बी स्कूलच्या डॉर्ममध्ये एक बंगाली मैत्रीण होती. ती "गपियाना" आणि 'बतियाना" हे दोन शब्द 'गप्पा मारणे' ह्यासाठी वापरायची. "अरे, ऐसेही बतिया/गपिया रही थी" हे तिचं पालुपद. मी तोवर हा असा उपयोग ऐकला नव्हता Happy

"...सेजल हे एक अतिकॉमन गुजराती नाव आहे...."

~ गोड वाटते खरंच हे नाव....पण त्याचा अर्थ माहीत असेल तर टंक ना इथे !

(गुरुदासपूरच्या एका पंजाबी मित्राच्या फॅमिलीमधील दोन छोट्या मुलींची टोपण नावे मी ऐकली त्यावेळी त्या मुली चटकन नजरेसमोर आल्या ~ थोरली "लाली" तर धाकटी "रुमाली"...मस्तच. 'सेजल' ही तसेच वाटते.)

माधव, मी_आर्या नाही. Sad माझ्या मनातलं गाणं शब्दच्छल कॅटेगरीतलं आहे (असं मला वाटतंय) Happy

प्रतीक, मला ह्या नावाचा अर्थ माहित नाही. Sad ह्याच पठडीतली आणखी गुजराती नावं - तेजल, रुपल, हेमल, मीतल (हे नाव मी मुलाचं ही पाहिलं आहे), जिनल, हेतल, Happy

इइइइइ ते हेतल नाव पण आहे गुजराथीत! मला नै आवडत ते!
माझ्या एका इंदुरी मैत्रीणीचं नावच 'मित्तल' होतं!

ह्या टोपणनावांवरून आठवलं - इसाक मुजावर ह्यांच्या एका पुस्तकात (बहुधा 'स्क्रीनप्ले') उल्लेख आहे की बद्रीप्रसाद नावाचे चरित्र अभिनेते आपल्या मुलीला 'टुणटुण' म्हणून हाक मारत असत. ते नाव नौशादना खूप आवडलं आणि म्हणून त्यांना 'उमादेवी'चं नाव बदलायचं होतं ते त्यांनी 'टुणटुण' ठेवलं Happy

माधव सेजल= नदीचं पाणी. इति गुगल उवाच.

आमच्या एका सायबाच्या मुलींची नावं टापुर आणि टिपुर अशी आहेत. या मुलींना तुम्ही ओळखत असाल आणि त्यांच्या आजोबांना पण.

मी_आर्या, खरंय. मलाही ही सगळी नावं म्हणजे कल्पनाशक्तीचा अभाव असल्याने गडबडीत ठेवल्यासारखी वाटतात. Sad त्यातल्या त्यात 'जिनल' हे तर अत्यंत विचित्र वाटतं.

>>आमच्या एका सायबाच्या मुलींची नावं टापुर आणि टिपुर अशी आहेत
ह्या दोघी त्या मॉडेल्स तर नाहीत ना?

कोडं १२२:
"आई ग" सुमेधा पुन्हा कळवळते.
"खूप दुखतंय़ का ग?" मयुरेश विचारतो.
"मग? मी काय हौस म्हणून ओरडतेय का?" सुमेधा चिडते.
"अग चिडतेस काय? कशाला उचलायला गेलीस ती भरलेली बादली? भरली ना उसण पाठीत?"
"मग इथे काय १० नोकर ठेवलेस तू काम करायला? का तू ऑफ़िसातून येऊन ती बादली उचलणार होतास? आई ग. आता किती दिवस असं कमरेत वाकून चालावं लागणार आहे कोणास ठाऊक."
"मला तर तुला बघून एक मस्त गाणं सुचतंय" असं म्हणून मयुरेशने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि पाठीचं दुखणं विसरून सुमेधा त्याला मारायला धावली. ओळखा पाहू ते गाणं.

उत्तरः मेरे दिलदारका 'बांक'पन अल्ला अल्ला Happy
द्या आता काय शिव्या द्यायच्या त्या. उद्या येऊन वाचते Happy

हो स्वप्ना, टापुर आणि टिपुर चॅटर्जी. हृषिकेश मुखर्जींच्या नाती. त्यांचे जावई होते आमच्या हापिसात.

फोरम (सुगंध) हे पण एक गुजराती नाव आहे.

मुलींची नावं टापुर आणि टिपुर अशी आहेत.>>>>मला ते "सोना करे झिलमिल झिलमिल ....... वृष्टी पडे टापुर टिपुर" गाणं आठवलं Happy

उत्तरः मेरे दिलदारका 'बांक'पन अल्ला अल्ला >>>>>>या स्वप्नाला राम गोपाल वर्माचा "आग" चित्रपट पूर्ण पाहण्याची शिक्षा. तोही बॅक टु बॅक Happy

कोडं १२३

शोभनाताई पाल्पिटेशन वाढले म्हणून डॉक्टरांकडे गेल्या. पण हाय री किस्मत, त्यांच्याकड्चे लाइटस गेले. बराच वेळ थांबून त्या निघून आल्या, तपासणी झालीच नाही, तक्रार तरी कुणाकडे करायची.. तर त्या कुठले गाणे म्हणतील ?

पण डॉक्टर त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांना न सांगताच शोभनाताईंचे दुखणे कळले. त्यांनी उपाययोजना पण सांगितली. हे समजल्यावर शोभनाताई कुठले गाणे म्हणतील ?

क्लू : पहिल्या गाण्याचा क्लू याच बीबी वर आहे. दुसर्‍या गाण्याचा या किंवा आधीच्या बीबीवर आहे बहुतेक.
दोन्ही गाणी सरळ सरळ आहेत. कुठलाही शब्दच्छल नाही. पण पहिल्या दोन ओळी अगदी समर्पक आहेत.

कोडं १२४
नव्या पहाटे हे नवतरूण आजकालच्या जगात काय आदर्श ठेवणार?
ड्रग्ज... डिस्को... ड्रींक्स...

क्लु: ओळखलत तर खुप नॉस्टेल्जिक व्हाल.
गायक संगीतकार म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे.

अरे अस नका ना विचारू गंमत जाईल
बर हे हेमंतकुमारचे ही नाही एस डी चेही नाही आणि भप्पी दाचे पण नाही.

ओळखल तर तो काळ असा होता नी तसा होता वगैरे वगैरे विषय निघेल. पण संगीताचा सुवर्णकाळ नाही ८० च दशक. त्या नॉस्टेलजियात जाण्यात मजा आहे रे!!!

मी हे गाण नॉस्टेल्जिक करेल अस म्हणतोय.

बर गाणी शोधुन झाली असतिल तर अजुन एक क्लु हे नॉनफिल्मी गीत आहे.

आणि दिनेशदा ८० च दशक तुला नाही पण मला नॉस्टेल्जिक करत.

स्वप्ना मामी प्रतिक जिपसी राम काय करताय!!????

Pages