Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाही, गुणेश चला उत्तर
नाही, गुणेश
चला उत्तर सांगतोच
कोडं १३३ :
करीष्मा तापट डोक्याची तरूणी. एकुलती एक असल्याने भलतीच लाडावलेली. तिचे एका फायर ब्रिगेड ऑफिसरवर प्रेम जडते. मात्र त्याचे दुसर्याच एका मुलीवर प्रेम असल्याने तो तिला नकार देतो. प्रेमाच्या खुप विनवण्या करूनही तो ऐकत नाही. असच एकदा फोनवर दोघांचे भांडण होते आणि ती रागाने स्वत:च्या घराला आग लावते. इतर लोक फायर ब्रिगेडला फोन करून बोलावतात. योगायोगाने ती ज्या ऑफिसरवर प्रेम करत असते तोच आग विझवायला येतो. अशावेळी त्याला उद्देशुन ती कोणतं गाणं म्हणेल?>>>>>
उत्तर :
मैने तुम संग प्यार किया, मै कैसी दिवानी
मैने आग लगायी, तुने आगपे डाला पानी
सजन मेरे इश्के दी, तुने कदर नही जानी
(चित्रपट: बिदाई. जितेन्द्र/लीना चंदावरकर)
गुगु.... "माना तेरी नज़र में
गुगु....
"माना तेरी नज़र में तेरा प्यार हम नहीं
कैसे कहें के तेरे तलबगार हम नहीं..."
हे जीतेन्द्र, सुलक्षणा पंडित अभिनीत 'खानदान' मधील आहे ना?
आत्ताच यू ट्यूबवर पाहिले तर खालील माहिती मिळाली :
Song by Naqsh LayllPuri; Singer; Salakhshana Pandit: Music: Khayyam; Film: Orginally sung for Khandaan[1979] but used for Ahista Ahista [1981];
खानदान मी पाहिलेला नाही, त्यामुळे त्या चित्रपटात ते गाणे आहे की नाही याची कल्पना नाही.
छ्या. माझा वाचनाचा वेग
छ्या. माझा वाचनाचा वेग वाढवावा लागणार. छान चाललय.
जिप्सीच्या उत्तरवारुन मला एका गाण्यातल्या ओळी आठवल्या.
बुरा हो बैरन इन सखीयोंका, कर बैठी नादानी
पहले आग लगायी, देखो अब बरसाया पानी.... आठवतेय हे गाणे ?
.
.
माना तेरी नज़र में तेरा प्यार
माना तेरी नज़र में तेरा प्यार हम नहीं
कैसे कहें के तेरे तलबगार हम नहीं..."
हे जीतेन्द्र, सुलक्षणा पंडित अभिनीत 'खानदान' मधील आहे ना?>>>>>हे गाणं "आहिस्ता आहिस्ता" मधलंच आहे". खानदान मध्ये "ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है" हे आहे (जितेन्द्र, सुलक्षणा पंडित आणि बिंदिया गोस्वामी).
बुरा हो बैरन इन सखीयोंका, कर बैठी नादानी
"जोगी हम तो लूट गये तेरे प्यारमें, जाने तुझको खबर कब होगी" हेच ना? 
पहले आग लगायी, देखो अब बरसाया पानी.... आठवतेय हे गाणे ?>>>>आठवतंय
फक्त "सखीयोंका" का ऐवजी "अखियों" का आहे.
१३५: शमा शेवडे एक नंबरची
१३५: शमा शेवडे एक नंबरची कंजुस बाई होती. एकदा इंदोरला आपल्या बहीणीकडे - नेहा नेनेकडे - गेली पण भाच्याकरता (निलेश) साधा खाउ पण नाही नेला. नेहाला मात्र शमाचे भारी प्रेम ती जायच्या आदल्या दिवशी शमाकरता कलाकंद आणून ठेवते. निलेश वस्ताद, मावशीला अद्दल घडवण्याकरता तो सगळा कलाकंद फस्त करतो आणि लगेच आपल्या चेहरापुस्तकावर एक गाणे टाकतो. काही रेषा इकडच्या तिकडे होतात पण गाणे प्रसंगाला अगदी योग्य असते.
हो तेच ते. अखिया आहे का ?
हो तेच ते. अखिया आहे का ? जून्या भगतसिंग मधले ना ? गीत संगीत : प्रेम धवनचे होते बहुतेक. खुप वर्षे झाली ऐकून.
जून्या भगतसिंग मधले ना
जून्या भगतसिंग मधले ना ?>>>>>येस्स्स. मस्त गाणं आहे
जिप्सीचा तीव्र
जिप्सीचा तीव्र निषेध.....'लीना चंदावरकर..." पक्की धारवाडकरीण....आयुष्यात एकही मराठी शब्द उच्चारला नसेल तिने.....मग ती 'मराठी' कशी? फार फार तर तिला 'कोकणी' म्हणता येईल. [आईकडून ती गिरिश कर्नाड यांची नातलग लागते....कारवारी फॅमिली].
प्रतीक, लीना चंदावरकर पक्की
प्रतीक, लीना चंदावरकर पक्की धारवाडकरीण होती ह्यात वादच नाही. पण त्यावरून तिला मराठी येत नसेलच हा निष्कर्ष काढणं चुकीचं होईल. माझ्या आईचे काही नातेवाईक धारवाडला रहात असत त्यांच्या शेजारी ती रहायची आणि त्यांच्या घरी तिचं येणंजाणं होतं. आमचे नातेवाईक पक्के मराठी होते - पक्के धारवाडकर असूनही.
आता ती त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोलायची हे मला माहित नाही.
गिरिश कर्नाड हे कानडी आहेत. त्यांच्याशी असलेल्या नात्याने ती कोकणी कशी झाली हे मला काही कळलं नाही....
स्वप्ना... माझी मावशी (आणि
स्वप्ना...
माझी मावशी (आणि आज्जीही....आईकडून) धारवाडची आणि 'कर्नाटक कॉलेज' ची विद्यार्थिनी....जिथे जी.ए.कुलकर्णी इंग्रजीचे प्राध्यापक होते....लीनाचे आणि मावशीचे घरही माळमड्डी या परिसरात....रेल्वे स्टेशनच्या आसपास. मावशी लीनाची आठवण सांगते तेव्हा तिच्या बोलण्यात लीनाने कॉलेजची पायरी कधीच चढली नाही आणि दहावीनंतर (त्यावेळेची 'मॅट्रिक') तिचे शिक्षण बंदच झाले, अशी माहिती येते. सुरुवातीला मराठी माध्यम, नंतर एक वर्ष कन्नड आणि त्यानंतर दोन वर्षे इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूल्समधे ती गेली आणि तिच्या शिक्षणाचा तसा विचकाच झाला....अर्थात त्यानंतर आईवडील मुंबईला शिफ्ट झाले आणि वयाच्या १७ व्या वर्षीच तिने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. बाकी पुढील इतिहास माहीत आहेच.
(मावशी आणखीन एक आठवण सांगते. ~~ पुढे ज्यावेळी लीना चंदावरकर ही एक नावाजलेली अभिनेत्री झाली त्यावेळी 'कर्नाटक कॉलेज धारवाड' ने तिला वार्षिक पारितोषिक समारंभासाठी प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रित केले होते; तर त्या वर्षी विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षेत संस्कृत भाषेत सुवर्णपदक मिळविलेल्या त्या कॉलेजच्या विद्यार्थ्याने लीनाच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिला होता. तशी बातमीही दुसर्या दिवशी स्थानिक वर्तमानपत्रात झळकली होती म्हणे. कारण काय होते हे गुलदस्त्यातच राहिले.)
लीना 'कोकणी' होती हे मात्र कन्फर्म.
एक कैच्याकै कोडं कोडं
एक कैच्याकै कोडं
कोडं १३६:
रीनाची आज्जे सासु आणि सासु व टिनाची मावस सासु आणि चुलत सासु एकाच क्लबचे मेंबर. एकदा सगळ्या सासवा किटी पार्टीला जातात. तिथे रीनाच्या दोन्ही सासवा मस्तपैकी अत्तर लावून आलेल्या असतात. तो सुगंध आवडुन टिनाच्या सासवा विचारतात "कोणता हा परफ्युम"?
"हां ना "First Love" नावाचा imported परफ्युम आहे." असं म्हणत त्या ते अत्तर त्यांच्या अंगावरपण शिंपडतात. पार्टी संपल्यावर जेंव्हा रीनाच्या सासवा घरी येतात तेंव्हा रीनाला तो सुगंध ओळखीचा वाटतो, पण आठवत नसतो म्हणुन ती टिनाला फोन करते आणि एका गाण्यातुन विचारते.
ओळखा ते गाणं
रीनाच्या सासवा घरूनच अत्तर
रीनाच्या सासवा घरूनच अत्तर लावून गेल्या होत्या ना?मग फोन रीना का करेल? टीनाने करायला हवा ना?
भरत त्याने सांगितलय ना की
भरत त्याने सांगितलय ना की कैच्याकै कोड आहे.
आता रीनातला री अत्तरातला त्त जुळावून बघ काही होतय का ते
जिप्सी, मेरी सासोंको जो मेहका
जिप्सी, मेरी सासोंको जो मेहका रही है...... तेरे सासोंसे शायद आ रही है.............???
स्निग्धा जीनियस. हे सांसो
स्निग्धा जीनियस.
हे सांसो प्रकरण एवढे वेळा झाले तरी माझी ट्युब काही पेटत नाही.
जिप्सी ने शिक्कामोर्तब करु दे
जिप्सी ने शिक्कामोर्तब करु दे म्हणजे झाल...
१३७: एका मोठ्या नेत्याची
१३७: एका मोठ्या नेत्याची मुलीला राणीच्या बागेतला चाँद नावाचा वाघ खूप आवडत असतो. तशी तिला वाघ हाताळायची थोडी सवय असते आणि बर्याचदा ती त्याच्या पिंजर्यातदेखील जायची. एकदा तिला रात्री चाँदला भेटायची हुक्की येते. ती पिंजर्यात जाते आणि शॉर्ट सर्किट होऊन लाईट जातात. झाल्या प्रकाराने चाँद बिचकतो आणि तिच्या अंगावर झडप घालतो. ती घाबरून भांगडा करायला लागते. जय त्या रात्री ड्युटीवर असतो. तो चपळाई करून तारेतला दोष ठीक करतो आणि लाईट परत आणतो. मग बाकीचे त्या मुलीची सहिसलामत सुटका करतात. दुसर्या दिवशी मिडिआवाले तिची मुलाखत घ्यायला येतात. ती त्यांच्या प्रश्णाचे उत्तर म्हणून फक्त एक गाणे म्हणते...
स्निग्धाला मलई सँडविच कोडं
स्निग्धाला मलई सँडविच
कोडं १३६:
रीनाची आज्जे सासु आणि सासु व टिनाची मावस सासु आणि चुलत सासु एकाच क्लबचे मेंबर. एकदा सगळ्या सासवा किटी पार्टीला जातात. तिथे रीनाच्या दोन्ही सासवा मस्तपैकी अत्तर लावून आलेल्या असतात. तो सुगंध आवडुन टिनाच्या सासवा विचारतात "कोणता हा परफ्युम"?
"हां ना "First Love" नावाचा imported परफ्युम आहे." असं म्हणत त्या ते अत्तर त्यांच्या अंगावरपण शिंपडतात. पार्टी संपल्यावर जेंव्हा टिनाच्या सासवा घरी येतात तेंव्हा टिनाला तो सुगंध ओळखीचा वाटतो, पण आठवत नसतो म्हणुन ती रीनाला फोन करते आणि एका गाण्यातुन विचारते.
उत्तर :
मेरी सासोंको जो मेहका रही है
पहले प्यार की खुश्बु
तेरे सासोंसे शायद आ रही है
स्वप्ना, माधव क्लु प्लीज
स्वप्ना, माधव क्लु प्लीज
१३५ क्लू: आर.डी. + आशा चे एक
१३५ क्लू: आर.डी. + आशा चे एक अतीव सुंदर गाणे
१३७ क्लू: चाँद म्हणजे?
१३५ आता खूपच सोप्प झालय
कोडं १३४: ".........कुठे
कोडं १३४:
".........कुठे ट्रॅफिक लागला नाही तर दीड-दोन तासात सहज पोचशील. कसं यायचं ते नीट लिहून घेतलंस ना?" मुग्धाने विचारलं.
"हो ग, लिहिलं." खरं तर सुमीतला आयत्या वेळी पेन मिळालं नव्हतं त्यामुळे मुग्धाने सांगितलेल्या directions त्याने मनातल्या मनात घोकून घेतल्या. पण हे तिला सांगितलं असतं तर भडकली असती म्हणून त्याने थाप मारली.
शेवटी व्हायचं तेच झालं. सुमीत रस्ता चुकला आणि कोणाला रस्ता विचारायचा नाही ह्या पुरुषांच्या जगप्रसिध्द हेक्याप्रमाणे तो स्वतःच डोकं लढवून पुढे जात राहिला. शेवटी तब्बल साडेतीन तासांनंतर पोचला तेव्हा मुग्धाला काय झालं असेल ह्याचा पुरेपुर अंदाज आला होता.
"नव्हत्या लिहून घेतल्यास ना directions?" ती वैतागून म्हणाली. पण सुमीत काय कबूल करतोय? त्याने एक हिंदी गाणं म्हणून आपल्या उशिरा येण्याचं कारण सांगितलं. सांगा ते गाणं.
उत्तर: कभी कभी ऐसा भी तो होता है जिंदगीमे
राहमे चलते चलते राही खो गये बेखुदीमे
काल रात्री कुठल्यश्या चॅनेलवर लागलं होतं. जंपिंग जॅक आणि हेमा गाडीत बसून म्हणतात. बाहेर पाऊस. गंमत म्हणून ह्या 'वारिस' पिक्चरमधली आणखी गाणी चेक केली तर बघा काय मिळालं
कौन है वो कौन है मुझे जिसने जगाया
अरे धरती पर यार यमलोकसे बुलाया
सत्यवान-सावित्रीच्या गोष्टीला परफेक्ट मॅच आहे ना? हे गाणं खरंच ह्या चित्रपटात होतं का? काय सिच्युएशन होती?
थकलो रे दृपाळा, थकलो रे
थकलो रे दृपाळा, थकलो रे दृपाळा
१३५? बेचारा दिल क्या करे?
१३५?
बेचारा दिल क्या करे?
नाही आर्या.
नाही आर्या.
चांद म्हणजे पूनम आहे का
चांद म्हणजे पूनम आहे का गाण्यात?
१३७: रात का समा झुमे
१३७:
रात का समा झुमे चंद्रमा
तन मोरा नाचे रे जैसे बिजुरीया
चांद पूनम कसा होइल? चांद
चांद पूनम कसा होइल? चांद म्हणजे चंद्र, चंदा, चंदामामा वगैरे वगैरे
गुगु बरोबर १३७: एका मोठ्या
गुगु बरोबर
१३७: एका मोठ्या नेत्याची मुलीला राणीच्या बागेतला चाँद नावाचा वाघ खूप आवडत असतो. तशी तिला वाघ हाताळायची थोडी सवय असते आणि बर्याचदा ती त्याच्या पिंजर्यातदेखील जायची. एकदा तिला रात्री चाँदला भेटायची हुक्की येते. ती पिंजर्यात जाते आणि शॉर्ट सर्किट होऊन लाईट जातात. झाल्या प्रकाराने चाँद बिचकतो आणि तिच्या अंगावर झडप घालतो. ती घाबरून भांगडा करायला लागते. जय त्या रात्री ड्युटीवर असतो. तो चपळाई करून तारेतला दोष ठीक करतो आणि लाईट परत आणतो. मग बाकीचे त्या मुलीची सहिसलामत सुटका करतात. दुसर्या दिवशी मिडिआवाले तिची मुलाखत घ्यायला येतात. ती त्यांच्या प्रश्णाचे उत्तर म्हणून फक्त एक गाणे म्हणते...
उत्तरः
रात का समा
'झू'मे चंद्रमा
तन मोरा नाचे रे
जयसे बिजुरीया
आता ही मोठ्या नेत्याची मुलगी
आता ही मोठ्या नेत्याची मुलगी म्हटलं तर पूनमताई आठवल्या तर आमचं काय चुकलं?
Pages