..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>काय हे स्वप्ना तुझ्या फिल्ड मधल गाण मला वाटल तू सांगशिल

तुझ्याच भाषेत सांगायचं तर 'काम असतात आम्हाला' त्यामुळे आज उशीरा आले इथे, तोवर माधवने उत्तर दिलं होतं त्यामुळे विचार करायला वेळ नाही मिळाला Proud

कोडं १२८:
मूकबधीरांना व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था. ती दोघं उशीराने प्रवेश घेतल्याने वर्ग चालू झाल्यावर थोड्या वेळाने जॉइन झालेली. त्यामुळे शेवटच्या बाकावर बसायची. वर्ष संपेतो त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं ते तिचं तिलाच कळलं नाही. ते ती त्याला गाण्यातून कसं लिहून सांगेल?

चला, आता लंचला जाते. परत आल्यावर इथे नेहमीचे सगळे मेंबर्स दिसतील अशी आशा आहे. नाहीतर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं Sad

कोडं १२७:
ये रीश्ता क्या कहलाता है
मीनाक्षी मधल

१२८
ना बोले तुम ना मैने कुछ् कहां
बातो बातो मे

पण ती जर मुकबधीर असेल तर ती गाण्यातून कस सांगेल ते सांग बघू
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!

स्वप्ना.. १२८.. कुछ ना कहो कुछ भी ना कहो.. क्या कहना है क्या सुनना है.... हायला!!!! काय आठवले लंच ला तर कोइरालांची मनी.. Happy

ओ गुगुराव, उत्तर मी दिले आणि मला सोडून भरतला भाजी भाकरी आणि भजी वर मडक्यातल दही? ये सरासर नाइन्साफी है | पुढच्या वेळेस तुझा अनुल्लेख केला जाईल Proud

स्वप्ना १२८: फुल तुम्हे भेजा है खतमे ?

कोडं १२९:

ट्रींगsssssssट्रींगssssssssट्रींगssssssss
तीने फोन उचलला.
"मला तुमची एक गोष्ट माहीत आहे" पलिकडुन एक आवाज.
"क्कोण्णती?" तिचा आवाज कापरा झाला.
"ते उद्या सकाळीच समजेल". फोन कट.
ती घाबरली. विचार करू लागली कि कुणाचा फोन होतो तो, त्याला माझी अशी कुठली गोष्ट माहित आहे. विचार करून डोक्याचा पार भुगा झाला. काय ते उद्या सकाळीच कळणार होते. पण चिंतेने तीला झोपच येत नव्हती. रात्र सरता सरत नव्हती, अशा वेळी ती कोणतं गाण म्हणेल?

"नींद न मुझको आये, दिल मेरा घबराये" अपेक्षित नाही. Proud

कालचं हे बाकी आहे आजूनः
१२१: तो आपला मंगळ्या आहे ना त्याच्या डाव्या हातातून सारखा टेSSS असा आवाज यायचा म्हणून सगळे जण त्या अवयवाला 'टे' असेच म्हणतात. मंगळ्याची आणखी एक सवय असते - तो अस्वस्थ झाला की तो डावा हात आणि उजवा हात यांची सारखी आदलाबदल करायचा (मंगळ्याच तो त्याचे हात detachable असतात) एक दिवशी त्याला आपल्या जन्मभूमीची आठवण येते आणि तो जराही झोपू शकत नाही तर तो कुठले गाणे म्हणेल?

दृपाळा, दृपाळा मायबोली नंदन दृपाळा
येतो दरदिवशी कुठुन हा, ताप देई मज डोक्याला
दृपाळा, दृपाळा ....... Angry

प्रतिसाद देता दरदिवशी
अख्खी पोस्टच हा खातो अधाशी
काय करू मज सुचेना आता
कुठे आपटु मी माझ्या कपाळा
दृपाळा, दृपाळा .......

(गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाला
सांभाळ हि तुझी लेकरे पुण्या समजती पापाला

हि धोंड्याला म्हणती देवता
भगत धुंडती तया जोगता
उगाच त्यासी देत योग्यता
फुका शेंदरी दगडाला
गोपाला गोपाला

या चालीत वाचा Proud )

>>पण ती जर मुकबधीर असेल तर ती गाण्यातून कस सांगेल ते सांग बघू

ती गाणं लिहून दाखवते असं म्हटलंय मी कोड्यात. आणि मूकबधीर असल्याने ऐकू शकत नसली तरी नेटवर लिरिक्स वाचू शकते का नाही? Happy

>>तबस्सुम म्हंटल्यावर मला "फूल खिले है गुलशन गुलशन"च आठवतंय
जिप्सी, रस्ता बरोबर पकडला आहेस. आता कडेकडेने नीट ये पाहू Happy

स्वप्ना माझ्या उत्तराचा पण निकाल लाव Happy

भरत, तुम्ही ते सगळे मनसोक्त खा. गुगुला दुसरे आणायला लाऊ आपण. चुकीची शिक्षा नको का? Happy

१२१: तो आपला मंगळ्या आहे ना त्याच्या डाव्या हातातून सारखा टेSSS असा आवाज यायचा म्हणून सगळे जण त्या अवयवाला 'टे' असेच म्हणतात. मंगळ्याची आणखी एक सवय असते - तो अस्वस्थ झाला की तो डावा हात आणि उजवा हात यांची सारखी आदलाबदल करायचा (मंगळ्याच तो त्याचे हात detachable असतात) एक दिवशी त्याला आपल्या जन्मभूमीची आठवण येते आणि तो जराही झोपू शकत नाही तर तो कुठले गाणे म्हणेल?

<<<<
याद में तेरी जाग जाग के हम, कर व टे बदलते रहें

माधव, कहर.. Lol त्या 'टे'वरनं शब्द शोधण्यात वेळ गेला बराच. भारी पण!

श्रध्दा सहीच Happy कठीणच होतं ऑळखायला.

१२१: तो आपला मंगळ्या आहे ना त्याच्या डाव्या हातातून सारखा टेSSS असा आवाज यायचा म्हणून सगळे जण त्या अवयवाला 'टे' असेच म्हणतात. मंगळ्याची आणखी एक सवय असते - तो अस्वस्थ झाला की तो डावा हात आणि उजवा हात यांची सारखी आदलाबदल करायचा (मंगळ्याच तो त्याचे हात detachable असतात) एक दिवशी त्याला आपल्या जन्मभूमीची आठवण येते आणि तो जराही झोपू शकत नाही तर तो कुठले गाणे म्हणेल?

उत्तरः याद में तेरी जाग के हम, रातभर करवटे बदलते रहें

कोडं १२८:
मूकबधीरांना व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था. ती दोघं उशीराने प्रवेश घेतल्याने वर्ग चालू झाल्यावर थोड्या वेळाने जॉइन झालेली. त्यामुळे शेवटच्या बाकावर बसायची. वर्ष संपेतो त्यांची मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कसं झालं ते तिचं तिलाच कळलं नाही. ते ती त्याला गाण्यातून कसं लिहून सांगेल?

उत्तरः इशारो इशारोमे दिल लेनेवाले बता ये हुनर तूने सिखा कहासे

माधव, बाकी तो मंगळ्या पृथ्वीवर एखादीच्या प्रेमात पडल्यावर 'करवटें बदलते रहे सारी रात हम.. आपकी कसम' गाईल नै? Proud
गाणं ओळखल्याबद्दल बाकरवड्या, काजूकतली वगैरे येऊ द्या. Happy

कोडं १२९:

ट्रींगsssssssट्रींगssssssssट्रींगssssssss
तीने फोन उचलला.
"मला तुमची एक गोष्ट माहीत आहे" पलिकडुन एक आवाज.
"क्कोण्णती?" तिचा आवाज कापरा झाला.
"ते उद्या सकाळीच समजेल". फोन कट.
ती घाबरली. विचार करू लागली कि कुणाचा फोन होतो तो, त्याला माझी अशी कुठली गोष्ट माहित आहे. विचार करून डोक्याचा पार भुगा झाला. काय ते उद्या सकाळीच कळणार होते. पण चिंतेने तीला झोपच येत नव्हती. रात्र सरता सरत नव्हती, अशा वेळी ती कोणतं गाण म्हणेल?

उत्तर :

जाने क्या बात है जाने क्या बात है
नींद नहीं आती बडी लंबी रात है

सारी सारी रात मुझे इसने जगाया
जैसे कोई सपना जैसे कोई साया
कोई नहीं लगता है कोई मेरे साथ है

१२९ : असेच कॉलेजातला एक तरुण तरुणी. फ्रेंडशिप डे ला मैत्री होते. कॉलेजच्या पिकनिकच्या कँप फायरला त्यांना कळतं, की आपल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालंय. अशा वेळी गाणं म्हटलंच पाहिजे नाही का?

कोडं १२७:
काश्मिरसारख्या बर्फाळ प्रदेशातली एक तरुणी. पण ती आपल्या प्रियकराला भेटली ते मात्र एका वाळवंटात. हे ऐकून तबस्सुमला हसू आलं. बूझो ये पहेली

क्लू - फुलं

उत्तरः मेहबूबा, मेहबूबा, गुलशनमे गुल खिलते है
जब सेहरामे मिलते है मै और तूऽऽऽऽऽ

Pages