..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव....येस्स...स्कूलमास्टर मधील वसंत देसाईंचे गाणे, ऐकलेय मी...तलत सीडीमध्ये आहे. पण पडद्यावर राजा गोसावी म्हणतोय असे वाचल्यावर ते पाहण्याचा मूडच गेलाय !! श्रवणीय असल्याने ऑडिओच ऐकावा झालं.

वसंत देसाईंचा, झनक झनक पायल बाजे कसा विसरता येईल ? तूफान और दिया पण त्यांचाच ना ? त्यातली लताची अप्रतिम गाणी (म्हाणे चाकर राखो, पिया ते कहा गयो, मुरलीया बाजेगी जमुना के तीर ) आता जास्त ऐकायला मिळत नाहीत. शक पण त्यांचाच (मेहा बरसने लगा है.. आशा )

हाही कोड्याचा एक उपप्रकार चांगला आहे...पण तो इथेच येऊ दे>>>>>ओक्के प्रतीक Happy

अजुन एक (सोप्पय :-))
कोडं ११०:
नायक एक कवी मनाचा माणुस. त्याच्या कवितेतील प्रेरणा त्याला नेहमीच दृष्यरुपाने दिसायची. एकदा काय होत, त्याला ती दिसतच नाही. तो बेभान होऊन सैरावैरा तिला सगळीकडे शोधु लागतो.
हे गाणं कुठलं?

भरत, दिनेशदा, प्रतीक, माधव बरोब्बर Happy
सगळ्यांना एकेक प्लेट गरमा गरम कांदा/बटाटा/मूगडाळ/पालक भजी Happy

बघ जिप्स्या, या खेळात, मी, भरत, माधव आणि प्रतीक तडीपार होणार (म्हणजे आम्हाला तडीपार केले जाणार. )

भरत त्यात लता आणि गीताचे, मेरी प्यारीसी बहन हे पण छान गाणे होते. पडद्यावर नंदा आणि डेझी इराणी. गीताचेच, मेरी आन, भगवान हे पण चांगले गाणे होते. हिरो राजेंद्रकुमारच होता.

गाण्याबात ड्म शेरास खेळ पण खेळता येईल. अगदी एक थातूर मातूर क्लू आणि जास्तीत जास्त, ५ प्रश्न असा !

दिनेशदा...आणि भरत : होय, मी देखील हेच म्हणत होतो की, वसंत देसाई म्हटले की सर्वप्रथम आठवतात ते सारे शांतारामबापूंचे चित्रपट....

त्यांचा असा म्हणावा तो फक्त 'गुंज उठी शहनाई" च.
"आशीर्वाद" आणि 'प्यार की प्यास' हे देखील त्यांच्या संगीताने नटलेले दोन सुंदर चित्रपट होते.

भरत, संध्याचा अभिनय नाही तरी तिचे नृत्य हे कोणाचीही प्रेरणा होउ शकते Happy 'तीन बत्ती चार रास्ता' मधला तिचा अभिनय देखील बराच नैसर्गिक होता पण शांताराम स्कूलमधून ती कधीच पूर्णपणे बाहेर पडली नाही Sad

"...पण शांताराम स्कूलमधून ती कधीच पूर्णपणे बाहेर पडली नाही अरेरे...."

~ किंवा त्या स्कूलच्या हेडमास्तरानी तिला बाहेर पडू दिले नाही...असेही असेल.

कोडं १११:
अनघाचे रजतवर मनापासुन प्रेम. पण तो तिला सोडुन नोकरीनिमित्त दूर परदेशात निघुन जातो. नंतर अनघाच्या आयुष्यात सिद्धेश येतो. ती त्याच्यावर प्रेम करते पण त्याचे दुसर्‍याच एका मुलीवर प्रेम असते. या दोन प्रेमभंगामुळे ती खचुन जाते. नंतर तिच्या आयुष्यात कमलेश येतो. दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतात. यथावकाश त्यांचे लग्नही ठरते, पण अचानक एका मोठ्या अपघातात त्याचा मृत्यु होतो. या सगळ्या प्रकाराने तिला जबरदस्त मानसिक धक्का बसतो आणि ती आजारी पडते. अशा वेळी ती कोणतं गाणं म्हणेल?

१०९. आपली नायिका पण दहाविला बसली आहे. आज निकालाचा दिवस त्यामुळे मनात धडधड होतेय. म्हणून ती आपल्या 'खास' मित्राला बरोबर घेउन निघाली आहे रिझल्ट आणायला त्याचा हात घट्ट पकडून. ती पक्की निसर्गप्रेमी तर तो मात्र उगाच पाने फुले तोडणारा. आजही त्याचे ते चालूच आहे जाता जाता. आणि एवढ्या दबावाखाली असताना देखील ते तिला सहन होत नाही. ती त्याला म्हणते ..... ?

क्लू - माधुरी Happy आता २ मिनिटात सुटायला हवे

माधव ११०:
धक धक करने लगा ओ मोरा जियरा डरने लगा
सैंया बैया छोडना, कच्ची कलिया तोडना

नाही माधव Happy
खरंतर हे गाणं अपेक्षित नाही असं लिहायला विसरलो. Happy

जिपस्याला भाजलेले मक्याचे कणीस Happy

१०९. आपली नायिका पण दहाविला बसली आहे. आज निकालाचा दिवस त्यामुळे मनात धडधड होतेय. म्हणून ती आपल्या 'खास' मित्राला बरोबर घेउन निघाली आहे रिझल्ट आणायला त्याचा हात घट्ट पकडून. ती पक्की निसर्गप्रेमी तर तो मात्र उगाच पाने फुले तोडणारा. आजही त्याचे ते चालूच आहे जाता जाता. आणि एवढ्या दबावाखाली असताना देखील ते तिला सहन होत नाही. ती त्याला म्हणते ..... ?

उत्तरः धक धक करने लगा ओ मोरा जियरा डरने लगा
सैंया बैया छोडना, कच्ची कलिया तोडना

धन्स, माधव Happy
भरतला, गवती चहाची पाती घातलेला मस्त वाफाळता चहा Happy
कोडं १११:
अनघाचे रजतवर मनापासुन प्रेम. पण तो तिला सोडुन नोकरीनिमित्त दूर परदेशात निघुन जातो. नंतर अनघाच्या आयुष्यात सिद्धेश येतो. ती त्याच्यावर प्रेम करते पण त्याचे दुसर्‍याच एका मुलीवर प्रेम असते. या दोन प्रेमभंगामुळे ती खचुन जाते. नंतर तिच्या आयुष्यात कमलेश येतो. दोघेही एकमेकांवर खुप प्रेम करतात. यथावकाश त्यांचे लग्नही ठरते, पण अचानक एका मोठ्या अपघातात त्याचा मृत्यु होतो. या सगळ्या प्रकाराने तिला जबरदस्त मानसिक धक्का बसतो आणि ती आजारी पडते. अशा वेळी ती कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
रसिक बलमा दिल क्यो लगाया तोसे दिल क्यो लगाया
जैसे रोग लगाया

११२ संसद भवनाच्या आवारात शत्रुघ्न सिन्हा कुणाला तरी शोधत असतात. बाकीचे खासदार विचारतात, काय तुमची गाडी आली नाही वाटतं अजून?
आणखी एक विचारतो की अमिताभ-गोविंदा नाहीतर राजेश खन्नाला शोधताय का ?
उत्तरार्थ बिहारी शॉटगन बाबू काय उत्तर देतील?

हे थोडं मामींच्या आणि थोडं जिप्सीच्या स्टाइलचं कोडं आहे.
गाण्याची फक्त पहिलीच ओळ.

११३ : रामला एसेसीच्या निकालाचं प्रचंड टेन्शन आलं होतं. पण सगळ्या गाणंवेड्यांच्या सांगण्यावरून त्याने आपला हा धागा वाचण्यात खंड येऊ दिला नाही. आणि त्याचं टेन्शन थोडं कमी झालं. तर या धाग्याला धन्यवाद देताना तो कोणतं गाणं म्हणेल?

Pages