..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रध्दा बरोबर उत्तराबद्दल आमच्या मामलेदाराची झणझणीत मिसळ आणि मग तोंडाची आग शांत करायला केशरयुक्त खरवस Happy रच्याकने मला आधी आपकी कसमच सुचले होते पण त्यावरून कोडे बरोबर जमत नव्हते. तू म्हटले आहेस तसे दिले असते तर खूप सोपे झाले असते. म्हणून मग हे गाणे घेतले. Happy

स्वप्नाला एक अख्खं कॅडबरी सेलेब्रेशन.
१२९ : असेच कॉलेजातला एक तरुण तरुणी. फ्रेंडशिप डे ला मैत्री होते. कॉलेजच्या पिकनिकच्या कँप फायरला त्यांना कळतं, की आपल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालंय. अशा वेळी गाणं म्हटलंच पाहिजे नाही का?

उत्तर : दिल्लगी ने दी हवा थोडासा धुआं उठा
आउर आग जल गयी
तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गयी

आता एक सोप्पं कोडं. गाणं गोल्डन इरातलं नाही.

कोडं १३०:
"हॅलो, सुजीत? मी जरा खाली चाललेय बाजारात. आज किल्ली न्यायला विसरलास तू. आत्ता १० मिनिटात येते. तेव्ह्ढ्यात आलास तर थांब दरवाज्याबाहेर. लगेच शंख करू नकोस माझ्या नावाने" उर्मिलाने पर्समध्ये पैसे कोंबत म्हटलं.
"आता संध्याकाळी बाजारात?"
"कांदे पुरणार नाहियेत संध्याकाळच्या पार्टीच्या मेन्यूला. तू आणणार आहेस का येताना? मला त्यातलं काही कळत नाही म्हणतोस"
"अग, मी येतोच आहे १० मिनिटात मग एकत्रच जाऊ की"
"एकत्र? तिथे काय जेवण आहे?" उर्मिला वैतागत म्हणाली.
सुजीतला आपल्या बायकोचा स्वभाव माहित होता त्यामुळे जास्त वाद न घालता त्याने फोनवरच एक गाणं म्हणायला सुरुवात केली. गाणं संपेपर्यंत तो घरी हजर झाला आणि मग दोघांनी एकत्रच जाऊन कांदे आणले. गाणं ओळखा पाहू.

>>स्वप्ना, काश्मिरसारख्या बर्फाळ प्रदेशातली एक तरुणीचा संबंध नाही लागला मला
मेहबूबा मुफ्ती. मला वाटलं होतं "तबस्सुम" मुळे हे कोडं सोपं झालं असेल

>>स्वप्नाला एक अख्खं कॅडबरी सेलेब्रेशन.
याहू!! मी आता घरी जाताना रस्त्याने खात खात जाणार Happy

स्वप्ना गुलशन में फूल खिलते हैं छान होतं (मात्र मेहबुबा मुफ्ती या तरुणीसाठी असं गाणं म्हणणं कठीण आहे ). इशारों इशारों में पण छान. त्यात हुनर साठी व्यावसायिक शिक्षण ऐवजी स्किल्ड बेस्ड ट्रेनिंग (याला मराठीत काय म्हन्त्यात?हं कौशल्याधारित प्रशिक्षण)असं आणखी फिट्ट बसेल.

१३१. शोएब मलिकला एक सवय असते - घरात फुल एसी लावायचा आणि फायरप्लेसपण सुरु करायची. त्या दिवशी पण तो तसेच करतो. पण एसीमुळे सानियाचे सांधे धरतात आणि ती दुसर्‍या दिवशीचा विंबल्डन सामना हरते. ती शोएबला कुठले गाणे ऐकवेल?

मी_आर्या, गाण्यात 'बाजार' आहे

>>मात्र मेहबुबा मुफ्ती या तरुणीसाठी असं गाणं म्हणणं कठीण आहे
भरत Happy

श्रध्दा, तुला मघाची बाकरवडी आणि काजूकतली Happy

कोडं १३०:
"हॅलो, सुजीत? मी जरा खाली चाललेय बाजारात. आज किल्ली न्यायला विसरलास तू. आत्ता १० मिनिटात येते. तेव्ह्ढ्यात आलास तर थांब दरवाज्याबाहेर. लगेच शंख करू नकोस माझ्या नावाने" उर्मिलाने पर्समध्ये पैसे कोंबत म्हटलं.
"आता संध्याकाळी बाजारात?"
"कांदे पुरणार नाहियेत संध्याकाळच्या पार्टीच्या मेन्यूला. तू आणणार आहेस का येताना? मला त्यातलं काही कळत नाही म्हणतोस"
"अग, मी येतोच आहे १० मिनिटात मग एकत्रच जाऊ की"
"एकत्र? तिथे काय जेवण आहे?" उर्मिला वैतागत म्हणाली.
सुजीतला आपल्या बायकोचा स्वभाव माहित होता त्यामुळे जास्त वाद न घालता त्याने फोनवरच एक गाणं म्हणायला सुरुवात केली. गाणं संपेपर्यंत तो घरी हजर झाला आणि मग दोघांनी एकत्रच जाऊन कांदे आणले. गाणं ओळखा पाहू.

उत्तरः अकेली न बाजार जाया करो, नजर लग जायेगी

मेहबूबा मुफ्ती. >> ओह असं होतं तर. 'इशारो इशारोमे' मात्र खासच होतं.

भरत, तुमचं उतर मला जास्त आवडले माझ्या उत्तरापेक्षा Happy पण तरीओळखा माझे उत्तर!

माधव आणी श्रद्धा.. तुम्हा दोघाना 'करवटे' जोडुन___/\___ Happy
स्वप्ना... माझी गाडी चुकली .. इशारो इशारोमे.. मस्तच..:)
तुम्हा तिघाना मामींनी बनवलेला साजुक तुपातील शिरा.. ( इस्कु बोल्ते है बेरकीनेस) Proud

माधsssssव!!!!
१३१.
बालम तेरे प्यार की थंडी आग मे जलते जलते
मै तो हार गयी रे मै तो हार गयी रे

१३२ स्वप्ना जॉब इंटरव्ह्युसाठी गेली. इंटरव्ह्यु झाल्यावर तिला शॉर्टलिस्ट करुन पुढल्या फेरीसाठी ये म्हणून सांगितलं.वर आमचा डायरेक्टर फक्त त्यादिवसापुरता दुसर्‍या शहरातून येणार आहे, तेव्हा नक्की ये असं सांगितलं. कसं?

|| प्रथम तुला वंदितो दृपाळा, प्रथम तुला वंदितो ||

दृपाळाला नमन करून आजचं कोडं Happy (I hope आज तरी हा त्रास देणार नाही. Sad )

कोडं १३३ :
करीष्मा तापट डोक्याची तरूणी. एकुलती एक असल्याने भलतीच लाडावलेली. तिचे एका फायर ब्रिगेड ऑफिसरवर प्रेम जडते. मात्र त्याचे दुसर्‍याच एका मुलीवर प्रेम असल्याने तो तिला नकार देतो. प्रेमाच्या खुप विनवण्या करूनही तो ऐकत नाही. असच एकदा फोनवर दोघांचे भांडण होते आणि ती रागाने स्वत:च्या घराला आग लावते. इतर लोक फायर ब्रिगेडला फोन करून बोलावतात. योगायोगाने ती ज्या ऑफिसरवर प्रेम करत असते तोच आग विझवायला येतो. अशावेळी त्याला उद्देशुन ती कोणतं गाणं म्हणेल?

इंटरव्ह्युशी संबंधित एक कोडं दिनेशदांनी विचारलं होतं त्यात इंटरव्ह्युसाथी कोणता हिंदी-उर्दू शब्द वापरला होता, ते आठवा.

गुगु बरोबर आहे Happy

१३१. शोएब मलिकला एक सवय असते - घरात फुल एसी लावायचा आणि फायरप्लेसपण सुरु करायची. त्या दिवशी पण तो तसेच करतो. पण एसीमुळे सानियाचे सांधे धरतात आणि ती दुसर्‍या दिवशीचा विंबल्डन सामना हरते. ती शोएबला कुठले गाणे ऐकवेल?

उत्तरः बालम तेरे प्यार की थंडी आग मे जलते जलते मै तो हार गयी रे मै तो हार गयी रे

हायला (राम, शब्द उसना घेत आहे!) मुलाकात म्हणजे 'भेट' ना? एक्दम डायरेक्टर इंटरव्ह्यू घेतोय म्हणजे सही आहे. सॉल्लिड पगाराची नोकरी असणार. पण जिप्सी, माधव, मला डायरेक्टर नोकरीसाठी इंटरव्ह्यू करनार आहे, लग्नासाठी नाही Happy

Pages