Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला विकेन्ड्ला आमटी-भात,
मला विकेन्ड्ला आमटी-भात, भाजी, पोळी असा चौरस आहार करायचा कन्टाळा येतो. मी इड्ली-साम्बार-चटणी, डोसा, Veg.Stew+Appam, पावभाजी, मिसळ अस काहितरी करते ... तर मला अजून options हवे आहेत. Make once, eat whole day
Plz. काही सुचवा... Thanks in advance.
मुकुला, इथे वन डिश मील नामक
मुकुला, इथे वन डिश मील नामक धागा होता, त्यावर बघा, बरेच पर्याय मिळतील : http://www.maayboli.com/node/14647
सुनिधीचा पहिला वाढदिवस आला.
सुनिधीचा पहिला वाढदिवस आला.
साधारण ४० माणसे(सर्वच मोठे लहान कुणी नाहीत) लोक जमतील. मी शक्यतो केटररला ऑर्डर देणार आहे. पण तरी काय मेनू ठेवता येइल?
त्याचबरोबर किती किलोचा केक लागेल?केकसाठी अजून काही सजेशन्स असतील तर सांगा.
सर्वच मोठे लोक असल्याने रिटर्न गिफ्ट म्हणून काय देता येइल?
नंदिनी, एक सुचवू का ?
नंदिनी, एक सुचवू का ? येणार्या सगळ्यांना सांग गिफ्ट नकोत म्हणून अन तुम्ही पण रिटर्न गिफ्ट देऊ नका. सुनिधीकडे कपडे / खेळणी चिकार असणार , अन यापुढेही तुम्हीच ते सगळं घेत रहाल. लोकांनी तिला गिफ्ट देण्यापेक्षा एखाद्या चॅरिटीला पैसे द्या असे सुचवून पहा.
आम्ही दोन्ही मुलांना पाच वर्षेपर्यंत असे केले होते. पाचच्या पुढे त्यांचा गिफ्ट करता हट्ट वाढलाय थोडा. पण आता फ्कत त्यांचे मित्र मैत्रिणी येतात , मोठी / आमच्या नात्यातली अशी कोणी मंडळी नसतात.
आम्ही रीटर्न गिफ्ट देताना टूथपेस्ट्, सन ब्लॉक, फ्लॉस, हँड सॅनिटायझर अशा गोष्टी देतो. क्वचित पेंसिल/ खोडरबर वगैरे. पण इथल्या मुलांना त्या वस्तू भरभरून मि़ळत असतात अन दोन दिवसात त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात. शक्यतो लॅंडफिल मधे जाणार नाहीत अशा वस्तू द्यायचा प्रयत्न असतो.
सगळेच मोठ्ठे असल्याने, आधी
सगळेच मोठ्ठे असल्याने, आधी पासून खुप चांगल्या लाकडी फोटो फ्रेम्स आणून ठेव व त्यावर तिचं नाव
अॅक्रेलिक मारकर्स नी चारी साईड ला लिहि. फ्रेम्स पण त्या आधी ब्राईट कलर्स मधे रंगव.
वाढदिवसाच्या दिवशी, either तिचा केक कापतानाचा फोटो किंवा केक खातानाचा फोटो किंवा ज्या व्यक्तिला गिफ्ट द्यायची आहे तिने बाळाला भरवतानाचा/ कडेवर घेतलेला फोटो काढुन , सगळे जेवत/ खात असताना कंप्युटर वर प्रिन्ट करून जाताना दे.
लोकान्ना तुझ्या समय सुचकतेचं कौतुक वाटेल. नंतर जेंव्हा खरे फोटो येतिल तेंव्हा त्याची एक एक copy मेल कर.
आता भारतात तशी सोय आहे कि नाही माहिती नाही पण coffee mugs वर पण बाळा चा फोटो प्रिंट करून घेऊन तिथे Thanks for coming for my first birthday ani date " घालुन दिलं कि रोज चहा पिताना आजी आजोबा खुश होतिल .
इथे लोकं तसे T shirts पण प्रिंट करुन देतात पण आपल्या कडे साडी नेसणारे जास्ती त्यामुळे ते शक्य नाही.
१२ महिन्यातले तिचे फोटो घेऊन एक कॅलेंडर प्रिंट करून घे आणी वाढदिवसाच्या महिन्याचा फोटो Happy Birthday ड्रेस मधे.
प्रत्येकाला एक छोटं रोप छानश्या कुंडीत घालून.
कुठे तरी ४० रोपं जाऊन लावायची ( ४० गेस्ट नी) किंवा १२ कारण ती वर्षाची झाली म्हणून.
बाकी नंतर लिहिन.
@नंदिनी मेन्यु सकाळी लंचचा,
@नंदिनी मेन्यु सकाळी लंचचा, डिनरचा की फक्त नाश्ता टाईप्स?
सध्या पावसाळी हवामान आहे त्यामुळे मस्त गरमागरम सुप्स विथ ब्रेड स्टिक्स, रोस्टेड किंवा बेक्ड व्हे़जि, वेगवेगळ्या प्रकारचे गरम गरम पराठे वगैरे छान वाटेल. चाट नको शक्यतो असं मला वाटतं.
केक फार फ्रेश क्रिम/फळे वगैरे घातलेला शक्यतो नको. पावसाळ्यात पोटं बिघडण्याचे प्रमाण जास्त असते.. फ्रेश क्रिम कितीही फ्रेश म्हंटले तरी केक शॉप मधे तो केक एखाद दिवस आधीच करुन ठेवलेला असतो बहुतेक वेळेस, तेव्हा अव्हॉईड. पण घरी करणार असशिल तर मग हरकत नाही
मेधाच्या पोस्ट्ला १००% अनुमोदन
>>>आता भारतात तशी सोय आहे कि नाही माहिती नाही पण coffee mugs वर पण बाळा चा फोटो ...
इथे लोकं तसे T shirts पण प्रिंट करुन देतात...कॅलेंडर्स... << भारतात सगळं होतं हल्ली... आणि ते ही इथल्या पेक्षा (इन कंपॅरिझन) स्वस्त आणि लवकर. फोटो फास्ट मधे मिळतं हे नक्की
नंदिनी, पावसाळी मौसम बघता
नंदिनी, पावसाळी मौसम बघता चाट/ भेळ / दही युक्त आयटेम्स शक्यतो नकोत. पावभाजी, तवा पुलाव, गुलाबजाम + आईसक्रीम सारखा मेनू ठेवता आला तर बघ.
रिटर्न गिफ्ट हा प्रकारच नको वाटतो... पण द्यायचेच असेल तर मेधाने सुचविलेल्या प्रकारांना अनुमोदन.
नंदिनी, एक सुचवू का ?
नंदिनी, एक सुचवू का ? येणार्या सगळ्यांना सांग गिफ्ट नकोत म्हणून अन तुम्ही पण रिटर्न गिफ्ट देऊ नका. सुनिधीकडे कपडे / खेळणी चिकार असणार , अन यापुढेही तुम्हीच ते सगळं घेत रहाल. लोकांनी तिला गिफ्ट देण्यापेक्षा एखाद्या चॅरिटीला पैसे द्या असे सुचवून पहा. >>> मेधा, चॅरिटीला पैसे न देता मी वस्तूरूप देणगी द्यायचे ठरवले आहे. पण इथे आम्ही जास्त कुणाला ओळखत नाही. येणारे बहुतेक जण सतिशच्या ऑफिसमधले आहेत. त्यातही घरी पहिल्यान्दाच येणार. मुख्य म्हणजे गेस्ट लिस्टचं अॅव्हरेज एज ४० च्या पुढे येतय.
त्यामुळे गिफ्ट्स नको असे सान्गितले तरी कोणतरी घेऊन येतंच (वर "तुमच्यासाठी आणलय का? बाळासाठी आणलय. त्याला नको म्हणून सांगू दे" असा युक्तीवाद एका बारश्यात ऐकला होता त्याची आठवण झाली) आणि मग इतराना एकदम कानकोंडं वाटतं. म्हणून इथे पहिल्या वर्षी तसं सांगयला जरा ऑड वाटेल(असं मला वाटतय, जर निमंत्रण पत्रिका छापली तर त्यावर स्पष्टपणे लिहिता येइल)
लोकानी गिफ्ट दिले नाही दिले तरी आपण रिटर्न गिफ्ट द्यावंच असे माझे मत आहे. रिटर्न गिफ्टसाठी मला कॉफी मगची आयडिया आवडली.
तसेच, स्टीलचे मोठे कुंडे आणले तर कसे वाटेल? किंवा कॉपर बॉटमचे एखादे भांडे? (बहुतेक लोक आंटी कॅटेगरीमधले आहेत)
पावसाळा बघता लोकाना गरम गरम देता येइल असा मेनू सुचवा ना. पावभाजी वगैरे केटरर एकदम करून आणतात. (ठेला लावायला जागा नाहिये)
नंदिनी, केक च्या प्रमणाबद्दल
नंदिनी, केक च्या प्रमणाबद्दल तुला जिथून केक ऑर्डर करणारेस ते बरोब्बर अंदाज सांगतील किती माणसांना किती किलो लागेल ते.
कॉफी मग किंवा फोटो फ्रेम ची आयडीया चांगली आहे पण एक सांगू का? तसे फोटो अगदी जवळचे नातेवाईक वगैरे असतील तरच द्यावे. शेजार पाजार्यांना किंवा ऑफीसमधल्या लोकांना असा कितीसा इंटरेस्ट असेल आपल्या बाळाचा फोटो असलेला कप आवर्जून वापरण्यात? किंवा फोटो फ्रेम दिली तर ते थोडीच घरात कुठे ठेवणारेत? मग आपल्याला तरी आवडेल का आपल्या बाळाचा फोटो असलेली गोष्ट अशी दुसर्याच्या घरात कुठेतरी पडलेली.
बायकांना द्यायला तुला छोटी भांडी, मावेच्या भांड्यांचा सेट किंवा हॅन्डबॅग्स वगैरे देता येतील.
सावनी, अगदी हेच मला काल नवरा
सावनी, अगदी हेच मला काल नवरा पण म्हणाला.
कॉफीमग दिले तर बाळाचे फोटो प्रिंट न करता देऊ या म्हणून.
शनिवारी माझ्याकडे एक अमेरिकन
शनिवारी माझ्याकडे एक अमेरिकन फॅमिली जेवायला यायची आहे. दोघेही अजिबात तिखट खाउ शकत नाहीत. काय करावे सुचत नाही. मला एकही अमेरिकन पदार्थ धड करता येत नाही.
इंडियन पदार्थ जरा कमी स्पायसी
इंडियन पदार्थ जरा कमी स्पायसी केलेस तर? माझ्या इथल्या अमेरिकन मैत्रिणींना आपले इंडियन पदार्थ आवडतात. विशेषतः बटाट्याचं काहीतरी. किंवा पनीर (इंडियन चीज म्हणून खपतं मस्त.)
ज्ञाती, ऑप्शन्सः: मिक्स अँड
ज्ञाती, ऑप्शन्सः: मिक्स अँड मॅच मेन्यु सांगतेय
१::दीपचे पंजाबी स्टाईलचे सामोसे आणून बेक कर स्टार्टर्स म्हणून.
२: एखादी पंजाबी पनीरवाली भाजी कर (सोप्पी सुटसुटीत अशी). बरोबर रेडिमेड नॉन स्पायसी पराठे आण फ्रोजन आणि आयत्यावेळी तव्यावर भाज.
३. बरोबर पास्ता, गार्लिक ब्रेड, सॅलड वगैरे ठेव.
४. हवं असल्यास साधा जिरा राईस असू देत.
५. डेझर्ट म्हणून फ्रूट सॅलड वगैरे.
दही वडे एखादा पदार्थ म्हणून
दही वडे एखादा पदार्थ म्हणून ?
बिन तिखटाची आलु टिक्की वगैरेही चालु शकेल, टॅमॅरिन्ड डेट चटणी बरोबर.
काश्मिरी पुलाव पण गोडसर असतो ना, तो ही चालेल.
माझ्या ओफिस वाल्याना पाव्भाजी
माझ्या ओफिस वाल्याना पाव्भाजी खूप आवडा यची.
कमी तिखट छोले पण हिट अस्सायचे .
थॅन्क्स मला पराठे वगैरे
थॅन्क्स
मला पराठे वगैरे खातील का शंका आहे. फ्रुट सॅलड आणी समोसे करतेच.
सामोसे करु नकोस. बेक कर.
सामोसे करु नकोस. बेक कर.
पास्ता सलाड व चीज केक? चीज
पास्ता सलाड व चीज केक? चीज केक विकत आणता येइल. आजकाल देशात हीच फुल मील आहे
आतापर्यंत येउन गेलेले सगळे
आतापर्यंत येउन गेलेले सगळे नॉन-भारतीय आवर्जून भारतीयच जेवणाचा आग्रह केलेले आहेत. येणारे अपवाद
सामोसे करु नकोस. बेक कर>> हो हो बेकच
चीज केक आणि आलु टिक्की पण मस्त वाटतेय. बघते यातलं काय काय करता येइल.
ज्ञाती, तु रूनीचा लेमन
ज्ञाती, तु रूनीचा लेमन तिरामिसु पण करु शकतेस.
थोडा देशी टच यायला मॅंगो तिरामिसु करता येइल.
मेन्स मधे पोळी/पराठे आणि फार ग्रेव्ही वाल्या भाज्या/दाल शक्यतो नको.. या गोर्या लोकांना आपल्यासारखी पोळी भाजीला लावुन खाता येत नाही. सगळा राडा करुन खातात....
स्टफ्ड आलु पुरी आणि सोबत बुंदी रायता आणि बिर्याणी करता येइल. किंवा देशी स्टाईल पास्ता आणि गार्लिक नान/कुल्चा सारखं काहीतरी...
ज्ञाती माझ्या मते तू पोळ्या
ज्ञाती
माझ्या मते तू पोळ्या भाजी अश्या प्रकारात पडू नये, सुरूवातीला मसाला पापड, भाताचा एखादा प्रकार, रायता, एखादे स्वीट असे कर. पाहीजे तर ढोकळा कर सपोर्टींग डीश म्हणून
जिरा राईस वगैरे केलास तर सोबत दाल तडला. मॉ की दाल असे काही तिखट न घालता करता येईल. Keep it Simple
माझ्याकडे एकदा ऑफीसचा एक
माझ्याकडे एकदा ऑफीसचा एक ग्रुप बोलावला होता. एकालाही भारतीय जेवणाचा गंध नाही. ते कर असा आग्रहही नव्हता. बरं तिखट खाण्याची लेवल म्हणजे माईल्ड सालसा खाल्ला तर घाम फुटेल
खास करून ज्यानी कधी भारतीय जेवण खाल्लं नसेल असे.
मी तेव्हा अगदी कमी मसाले वापरून म्हणजे नुसता अॅरोमा येईल इतपतच एग बिर्याणी केली होती. अॅपेटायझर ला मिनी समोसे बेक केलेले, छोटे तांदळाचे पापड मिळतात ते तळले होते. आणि मेन जेवणात बिर्याणीबरोबर फ्रूट रायतं( हे प्रचंडच आवडलं होतं), अगदी कमी मसाले आणि अंगसर ग्रेव्ही ठेवून छोले केले होते. गोड म्हणून गुलाबजाम. (हा अजुन एक हीट्ट आयटेम आहे)
खूप पदार्थ करू नकोस. त्यांना गोंधळल्यासारखं होतं. पोळी, पराठे नको. खूप भाज्यायुक्त पण नको. आमच्याइकडे तरी सगळे भाज्या म्हणलं की विशेष उत्साही नसतात
ह्याउलट गेल्या वर्षी ४-५ गोर्या पोरींना गणपती बघायला यायचं होतं तेव्हा कोबी बटाटा भाजी, चवळीची उसळ, टमेटो सार असलं काय काय खायला घातलं होतं
ज्ञाती मी गंमत नाही केली.
ज्ञाती मी गंमत नाही केली. ndtvgoodtimes.com वर शेफ विकी रत्नानीच्या रेसीपीज बघ. खरेच खूप मस्त असतात. बेक्ड खिमा- एग्प्लांट लसान्या, ग्रिल्ड फिश, व्हाइट वाइन, क्रॅकर्स, ब्रुशेटा, चीजकेक ग्रीक सलाड हे फार बास आहे. आयत्यावेळी करायचे कमी ठेवावे मंजे तुला त्यांच्या बरोबर कॉन्वर्सेशन करता येइल. नाहीतर त्यांना अवघड होइल. इथे मेधा यांच्या रेसीपीज जसे स्ट्फ्ड मशरूम्स, फिश केक्स वगैरे मस्त असतात.
तिखट खाण्याची लेवल म्हणजे
तिखट खाण्याची लेवल म्हणजे माईल्ड सालसा खाल्ला तर घाम फुटेल >>> अगं सेम परिस्थिती आहे
फारच छान्छान टीपा मिळाल्या आहेत. पोळी-पराठे रद्दच करते. ब्रेडचा एखादा प्रकार ठेवते.
इथल्या उन्हाळ्यात बरे असे डेझर्ट, बरोबर आइस्क्रीम ठेवता येइल.
अमा, त्यातल्या रेसिपी बघेन, मी शक्यतो माबो वरच्या बघुनच करते.
मी स्वतः शाकाहारी आहे, मांसाहार बनवतच नाही. त्यामुळे बिचार्यांना असंच खावं लागणार.
ज्ञाती अमांनी सांगितल्या
ज्ञाती अमांनी सांगितल्या प्रमाणे मेधाची स्टफ्ड मश्रूम्स ची रेसिपी नक्की हिट्ट होईल.हल्ली छान मोठे बटण मश्रूम्स मिळायला लागलेत.ईंग्लिश कुकुंबर्स मिळतात.त्याच्या लेंथवाईज स्ट्रिप्स तासून घ्यायच्या. प्रत्येक स्ट्रिप्मधे एक छोटा तुकडा गाजर्,छोटासा पनीरचा किंवा टोफूचा तुकडा आणी पुदिना किंवा कोथिंबिरीचं पान घालून रोल करायचं टूथपिकने टोचून घ्यायचं.वरून चिमुकला सावर क्रीमचा डॉट द्यायचा. जोडीला एखादं सूप, लाजोने मोझरेला सँडविचच्या बीबी वर एक रेसिपी दिलीय तसे सँडविचेस.,एखादं कोल्ड सॅलेड.
ज्ञाती, स्टार्टर म्हणून आपली
ज्ञाती,
स्टार्टर म्हणून आपली उपासाची उकडून बटाट्याची भाजी असते तशी भाजी बटाट्याचे थोडे मोठे तुकडे करून ( मिरची न घालता) स्पाइसी पोटॅटोज म्हणून ठेवता येईल.
राईसमध्ये जिरा राईस / पुलाव असा सौम्यसा प्रकार बघ शक्यतो.
पनीरची भुर्जी झटपट होते व त्यासाठी फार खिटपिट लागत नाही.
व्हाइट सॉस मध्ये उकडलेल्या भाज्या (दुधी, स्वीट कॉर्न, घेवडा इ.) घालून त्यावर मीठ मिरपूड घालूनही मस्त साइड डिश/ तोंडीलावणे होते व चवीला अतिशय सौम्य असते. (व्हाइट सॉस = १ कप दूध + १ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर/ मैदा + १ टेबल स्पून लोणी ह्या प्रमाणात)
स्प्राऊट चाट ठेवता येईल.
टोमॅटोचे सार / सूप ठेवता येईल.
गोड म्हणून फळे + आइसक्रीम किंवा गुलाबजाम + आइसक्रीम असेही ठेवता येईल. किंवा कोल्ड कॉफी वुइथ व्हॅनिला आइस्क्रीम + चॉको चिप्स.
शक्यतो उग्र वासाचे असे कोणतेच पदार्थ ठेवू नकोस. कोणाला एखादा वास अजिबातच आवडत नाही.
ज्ञाती माझ्या अनुभवानुसार
ज्ञाती माझ्या अनुभवानुसार गोर्यांचे बटाटावडे, सामोसे,मँगो लस्सी, मँगो मूस,गुलाब जाम विथ व्हॅनिला आईसक्रीम,गाजर हलवा(कमी गोड) हे ऑल टाईम फेव्ह. आहेत. काहींना बटर नान आणि कमी स्पाईसी पंजाबी भाज्याही, रायते आवडतात. दिनेशदांची शाही बिर्याणी (अगदी अगदी mild flavored) पण ऑफीस पार्टीत हिट झाली होती.
हो हो.. अमेरिकन इंडियन
हो हो.. अमेरिकन इंडियन रेस्टॉरंट्स वाल्यांनी पॉप्युलर केलेली ओव्हर हाइप्ड मँगो लस्सी अमेरिकन लोकांना फार आवडते.. पनीर बटर मसाला पण !
धन्यवाद सर्वांना!! मस्त सूचना
धन्यवाद सर्वांना!! मस्त सूचना आहेत. उद्या काय केले ते लिहीनच.
व्हेज बिर्याणी, आलू टिक्की,
व्हेज बिर्याणी, आलू टिक्की, बूंदी रायता, पापड आणि लोणचे यासोबत स्वीट म्हणून काय ठेवता येइल. गुलाबजाम नकोत. (दरवेळेला तेच तेच काय- नवरा)
Pages