बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते तुम्ही इथे सुद्धा कुठल्या भागात राहता त्यावर अवलंबून आहे ग. आमच्याइथे भारतीय जेवणासाठी हा पर्यायच उपलब्ध नाही. आम्हाला घरीच करावं लागतं. Sad

मंजु आणि अकु ने छान सुचवलेत मेन्यु. पार्टीसाठी ऑल द बेस्ट , स्वप्ना.

इतर प्रांतीय लोकांसाठी मी नेहमी आपला महाराष्ट्रीय बेतच करते. आणि तो सगळ्यांना आवडतो असा माझा अनुभव आहे. त्यांचेच पदार्थ त्यांना खाऊ घालण्याऐवजी आपल्या पदार्थंची ओळख व्हावी हा हेतु. हॉटेलात आम्ही हे पदार्थ खातो पण घरच्याचवीचे नसतात असे त्यांचे म्हणणे असते.आम्ही हे पदार्थ घरी करुन बघतो पण ती चव येत नाही. फक्त आपले गोड पदार्थ करायचे टाळते. कारण पुरणाची पोळी कशी खावी त्यांना कळत नाही तसेच श्रीखंड जेवणात रुचत नाही. त्यापेक्षा फळं चिरुन ठेवावीत आयत्या वेळेस त्याचीच चाट्/सॅलॅड करता येतं. मधुमेहींकरिता वेगळं गोड करायला नको.

स्वप्ना, महाराष्ट्रीयन मेनू ठेवायचा असेल तर पेरूचे पंचामृत, खमंग काकडी/ हिरवे मूग - गाजर-मूगडाळ इ.चे चाट, मसालेभात / दहीभुत्ती, अळूभाजी/मटकी उसळ/ मटार उसळ/ भरलं वांगं/ फ्लॉवर-मटार-बटाटा-टोमॅटो रस्सा/ व्हेज कोल्हापुरी, ओले खोबरे/ पुदिना चटणी/ ताज्या कैरीचं लोणचं, मठ्ठा / सोलकढी, भाजलेले पापड, पुर्‍या/ पोळ्या असा मेनू ठेवू शकतेस. गोडासाठी अगदी कमी साखरेचा पायनॅपल शिरा/ आंब्याचा शिरा/ गाजर हलवा. जेवणानंतर विडा.

मी लग्नानंतर पहिल्यांदा नवर्‍याच्या मित्रांना आणी कुटुंबीयांना जेवायला बोलावले आहे.....
होळी च्या दिवशी......

मी ठरवलेला मेन्यु असा.....
पुरण पोळी (पुरण आधी करुन ठेवणार - करनारी मी एकटीच आहे)
कटाची आमटी (रेसीपी शोधण्यापासुन तयारी आहे.....)
मसालेभात
चण्याची भाजी (कांदा खोबर्‍याचं वाटण लावुन - साबां ने शीकवलेली..)
फुलके (मला छान जमतात... :))
कोशींबीर (काकडी + दही + दाणेकुट + फोडणी)
मिक्स वेज भाजी....

एकंदर पाककौशल्याचा show off करायचा आहे......
पण मला मेन्यु अर्धवट वाटतो आहे... Sad
प्लीज काही छान छान सुचवा ना.....
दोन्ही कुटुंब अमराठी आहेत..... पेकी एक सात महीने गरोदर, तर एकीला एक+ वर्षाची मुलगी आहे.......बच्चु साठी पन काहीतरी करायची इच्छा आहे.....

मी मायबोली वर नवीन आहे......आशा करते सामावुन घ्याल...

पुरणपोळी , कटाची आमटी आणि पुन्हा चण्याची भाजी?
अहो, काय विचार आहे तुमचा? पाहुण्यांना शर्यतीत नसेल उतरवायचे तर हे सर्व चण्याचे पदार्थ खावून लवकर घरी पाठवा पाहुण्यांना, ज्यास्त वेळ बसवून ठेवू नका. Proud

जरा गंमत केली. पण फारच चण्याचे पदार्थ एकाच वेळेला बरे न्हवे.

आपण स्वंयपाकात काही हुशार नाही पण खाण्यात असल्याने सुचवले. बाकीचे कुशल कारागीर (स्वंयपाकातले) सांगतीलच.

बापरे खरच...... माझ्या लक्षातच आलं नाही..... :o

खरच नको खुप चणा..... पण आता काय करु..... मदत..... मदत....

चक्षू

मसाले भात बरोबर टोमॅटो सार मस्त लागते अगदी सोपे ही आहे.
श्रीखंड सोपे जाईल कारण तुम्ही पोळ्या प्लस फुलके म्हणजे फार लाट्णे व करणे होईल. व आधी करून फ्रिज मध्ये ठेवता येइल. हा मेनू कसा वाट्तो बघा.

खोबर्‍याची चट्णी, काकडीची कोशिंबीर, फ्लॉवर - मटार - बटाटा सुकी भाजी. टोमॅटो सार, तुमची मिक्स व्हेज भाजी, सुरुवातीस वरण भात/ मसाले भात पापड कुरड्या / साधी भजी/ सुरळी वडी/ ढोकळा/ पांढरा ढोकळा , श्रीखंड/ गुलाब जाम शेवटी दही भात.
( विकतचे आणले तर तुमची मेहनत वाचेल. व आदल्या दिवशी फ्रिज मध्ये आणून ठेवता येइल. )

पुरण पोळी पण ग्रेटच आहे फक्त तुम्हास मेहनत जास्त आहे त्यात.

बुफे ठेवणार कि पंगत वाढणार?

मायबोलीवरील कटाच्या आमटीची कृती इथे आहे.

पुरणपोळीबरोबर मटकिची उसळ/ बटाट्याची उकडून भाजी चांगली वाटेल. मिक्स व्हेजमधे बटाटे घालणार असाल तर कोबीची परतून भाजी करता येईल. पण त्यात चण्याची डाळ नको Wink मटार घाला.

खरेच मस्त. इथे खूप मस्त भाज्या आहेत. दुसरे म्हणजे सर्व भाज्या आमट्यांचा पार्टीच्या आधी एक ट्रायल रन घ्या छोट्या प्रमाणात. म्हणजे आयत्यावेळी धावपळ नाही होणार व हवे ते इन्ग्रेडियंट्स आधीच आणून ठेवता येतील.

>>>>पुरणपोळीबरोबर मटकिची उसळ/ बटाट्याची उकडून भाजी चांगली<<<<

चक्षू, तुम्ही चांगले अत्तर वगैरे भरून ठेवा फुलदाणीत. Wink

हे दोन्ही उच्च प्रथिने खावून पोटाला जड जातात हो बर्‍याच जणांच्या असे पाहणीत आहे म्हणून पुन्हा सुचवतेय, जरा हलके-जड असा मेनु असु द्या. (हि पण मदतच बरं का?)

पुपो केल्यावर कटाचे पाणी काय करणार?( एक फा. उ. प्र.)

Uhoh

हे पण इन्व्हॅलिड कॉम्बी का? बरं.

आमच्याघरी पुपोबरोबर बटाट्याची ठोकळा भाजीच लागते. काय अत्तर/रूम फ्रेशनरची गरज भासत नाही कधी... आणि लोकांना काय जेवल्या जेवल्याच... ? Happy (ते .... म्हणजे काय समजून जालच Wink )

जेवण झाल्या झाल्या थोडी ना लोकं लगेच निघून जाणार घरी. Wink

मंजूडी, अहो जराशी गंमत करतेय.
पण खरेच मटकीची उसळ व पुपो ह्याला जड म्हणतेय. Happy

अश्विनीमामी, मंजूडी thank you so much.....
लग्नांनंतर पहिल्यांदाच एकटीने एवढा घाट घातलाय, म्हणुन खुप टेन्शन आल होतं.....
( नवरा करतो मदत पण त्याची मदत म्हणजे "त्याने मदत न करणं" हीच आहे..... Happy )
पण आता तुम्ही आहात तर जरा confidence आलाय.....
अश्विनीमामी तुमची ट्रायल रन ची टीप खरच खुप आवडली.... कारण पहिल्यांदा करायचं तेव्हा ट्रायल रण हवाच....
बुफे च आहे.....
पुरण पोळी फर्माईशी आयटम आहे......त्यामुळे करावा लागेल (मला पण आवडते).....
बाकी मेन्यु फायनल झाला आणी पार्टी झाली की मी ईथे मस्त फोटो टाकेन......
पण तुमचा पाठिंबा असाच असु द्या.....

आता "पुरणपोळी" ह्यांना केंद्रस्थानी ठेवुन मेन्यु ठरवावा लागेल.....
जेणेकरुन पाहुणे आणी आम्ही दोघेही नंतर आरामात बसुन गप्पा मारु शकु..... Happy
मला ना जेवणानंतर मसाला मीठा पान पण बनवायच आहे.... कसं वाटेल.....
मी जरा जास्तच उड्या मारतेय का?? जमेल का एकहाती..???

मंजूडी, अहो जराशी गंमत करतेय.>>> Happy

अहो, आपल्याला त्रास नाही झाला तरी लोकांना काय कॉम्बी चालू शकणार नाही याची कल्पना येते Happy

चक्षू, तुम्ही भारतात आहात ना?
उन्हाळा आहे ना तर मठठा मस्त वाटतो प्यायला.
एखादी पालक वगैरे भाजी (दिनेश ह्यांनी एकदा शाही पालक दिली होती),
का. व गा. कों.
आपल्या डोक्यात एवढच येतं जेवणातले. बाकी जाणकार सांगतिलच.

मी सींगापुरात आहे... Sad
म्हणुन तर एकटीने करतेय.....आणी ते पण अमराठी पाहुण्यांसाठी....
आणी मराठी जेवण किती छान असतं हे पण दाखवायच आहे म्हणुन एवढा खटाटोप....

अरेरे , मी थोड्याच दिवसापुर्वी सिंगापूरला होते. जरा आधी कराचा हा बेत. मे नसते का आले.:)

माझ्या कडे २५ तारखेला २० लोक फराळाला येणार आहे. काय करता येईल ? संध्याकाळी ७ वाजता येतील जेवण + नास्ता असा प्रकार हवा आहे. शेवटी आइस्क्रीम हे पक्क ठरल आहे बाकी काही नविन करता येइल का?

हाय! माझ्या कडे २० तारखेला ७-८ जण येणार आहेत संध्याकाळी..मी सुरुवातीला आल्यावर रसना, मेन कोर्स मधे मिसळ, तवा पुलाव आणि शेवटी आईस्क्रीम असा मेनु ठरवला आहे..किंवा चायनीज(नूड्ल्स्,फ्राईड राईस्,मंच्यूरियन्,सूप) करायचा पण ऑप्शन आहे..सगळे जण चमचमीत खाण्याचे भोक्ते आहेत..कुठला मेनु बरा वाटेल? अजुन काही वेगळे करता येईल का? पोळी भाजी प्रकारातले काही नकोय..
आत्तापर्यंत अंडा करी+पोळ्या+व्हेज बिर्याणी आणि पाव भाजी + एग बिर्याणी +कोरडे गुलाबजाम असे मेनु झाले आहेत..आता माझी टर्न आहे..काही तरी वेगळं सुचवाल का?

नाही ग मला बिर्यानी नाही करायची. आमच्या इथे जे येणार आहे ते भात /बिर्यानी मधे खुप हुशार आहे मला नाही जमणार त्यांच्या तोडीचे प्रकार करायला.
मी विचार करतेय पाव भाजीचा ह्या सोबत काय करता येइल अजुन? (ग्रुप मधे जास्त कोणी पाव भाजी खाली नाही, बंगाली उडीया, गुज्जु असे लोक आहे) काजुकतली गोड म्हणुन करणार आहे. मदती ला कोणीही नाही २ वर्षाची लहान मुलगी सांभाळून करायचे आहे. सगळ्या बायका आधी ४ वाजता गप्पा मरायला येतील त्यामुळे मला सगळ आधी करुन ठेवायच आहे.

अखि, पावभाजी बरोबर जेवणातले अजून काही नाही ठेवलसं तरी चालेल. गोडात काजु कतली ऐवजी थोडंसं हेवी असा गोडाचा पदार्थ ठेव. गुलाबजाम आदल्या दिवशी करून ठेवता येतील. फ्रुट सॅलड हा एक ऑप्शन आहे. अजून एक सोप्पा प्रकार म्हन्जे टीन मधले पायनॅपल्स, ऑरेंजेस, पीच अशी फळं एकत्र करून त्यात व्हीप्ड क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क घालुन सगळे एकत्र करायचं. ३-४ तास फ्रीज मध्ये थंड होऊ द्यायचे. वरून मस्त चेरीज किंवा ज्या काही फ्रेश बेरीज मिळतील त्या लावून सर्व्ह करायचं.
२-३ विकतचे स्नॅक्स चे प्रकार ( बाकरवडी, चकल्या, कचोरी) ठेव.

ध्वनी, पुढल्या वेळेस आलात की नक्की कळवा.....आणी नक्की घरी या.......
पण मेन्यु पण तुम्हीच ठरवायचा...... तुम्हाला मी विपु करु शकत नाहीये.... Sad

जवळचे चायनीज आज्जी-आजोबा (वय अंदाजे ५०-५५ वर्षे) जेवायला येणार आहेत. त्याना भारतीय जेवण जेवायचेय पण ते फारसे वेज खात नाहीत आणी मला नॉनवेज फारसे येत नाही. काय करु सुचत नाहीए..अर्थातच नॉनवेज बाहेरुन मागवेन पण कुठले पदार्थ मागवु? मला नी लेकीलापण चिकन / टर्कीशिवाय काही चालणार नाही.

तुझ्या लेकीचे आजीआजोबा. मला वाटलं तू म्हणतेस त्यांना आजीआजोबा. Happy

चिकन टिक्का किंवा चिकन बिर्याणी मागव. जास्त तिखटही नाही.

दही घालून केलेल्या कोशिंबिरीला मिरचीची फोडणी देताना ती थंड झाल्यावर कोशिंबिरीत घालायची असते का ? माझा नेहमी गोंधळ उडतो. Sad

Pages