बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, ऑकेजन काय आहे आणि येणारे पाहुणे कोण/किती आहेत? तुला घरी करायला वेळ आहे का???

अ‍ॅप्पल हलवा (विथ कस्टर्ड/आईस्क्रिम), शाही टुकडा, रबडी विथ फ्रुट्स, चॉक ब्राऊनी विथ आईस्क्रिम... हे असलं काही करता येइल का?

दुधी/ गाजर हलवा? मूग डाळीचे पायसम् / मूग हलवा? ओल्या नारळाच्या करंज्या? किंवा शेवयांची सुका मेवा इत्यादी घालून शाही खीर (शीर कुर्मा)? फालुदा? (स्लर्प!) खुबानी का मीठा?

वरच्या टीपा वापरून आज दुपारचा बेत मस्त झाला. पाहुणे खुश होते. तांदळाचे/साबुदाण्याचे पापड, उपासाची बटाट्याची भाजी, ढोकळा, शेवयाचा उपमा, सौम्य वेज पुलाव, फ्रुट सॅलड, (विकतचे) लाडु, असा बेत होता. सोबत सॅलड, फोकाचिआ ब्रेड आणि ज्युस होतेच. त्यामानाने फारच पटकन स्वयपाक झाला आणि पाहुणी उरलेली भाजी आणि उपमा घेउन गेली. Happy
सर्वांना पुन्हा थॅन्क्स Happy

ज्ञाति, बरंच काही बनवलं होतंस की... छान.

लाजो, बाळाचा पहिला वाढदिवस आहे. पन्नास ते पंच्याहत्तरच्या दरम्यान गेस्ट लिस्ट आहे. केटरर गुलाबजामुन असतील तर मी आणेन दुसरे स्वीट असेल तर तुम्हीच बघा, असं म्हणतोय. आणि सतिशला गुलाबजामुन नकोय. मी शक्यतो दुसरीकडून ऑर्डर करणार आहे. कारण मला आयत्यावेळी बनवायला जमणार नाही. आधी घरी बनवून ठेवता येणारे किंवा आणून ठेवता येणारे स्वीट सान्गा प्लीज. (मैसूर पाक नको. Proud )

बाळाचा पहिला वाढदिवस म्हणजे केक आणणार असशील तर जेवणा नंतर स्वीट म्हणुन तो आहेच. तेव्हा जेवणातला गोड पदार्थ पोळी / पराठा /पुरी बरोबर खाता येईल असा असावा. तसंच भारतात सध्या पावसाळा. रीलेटिवली थंड हवा. तेव्हा जेवणातला गोड पदार्थ गरम वाढता येईल असा असेल तर उत्तम. सर्व प्रकारच्या खीरी , बासुंदी ( गरम किंवा रुम टेंपरेचरची ).
तसच पोळी / पुरी बरोबर नाही पण त्याच्या सारखे किंवा त्या ऐवजी --- साटोर्‍या, जिलेबी, ओल्या नारळाच्या करंज्या, पाकातल्या पुर्‍या इ.
बाळाला वाढदिवसाचा गोड पापा आणि अनेक आशीर्वाद.
तुला पार्टी साठी शुभेच्छा.

मला ३०० ते ४५० लोकांसाठी गोड न्यायचे आहे. आधी करुन ठेवता येईल असेच हवे.

गुलाबजाम चा ऑपशन आहेच. ( प्रोफेशनल किचन मिळु शकेल ). पण अजुन काही सुचवा , वेळ आणि कष्ट होतिल थोडे , ते चालेल पण रेसिपी किचकट नको.

३००- ४५०?? एकटी करून नेणारेस? बापरे , खूप आहे ग हे. एवढ्या लोकांसाठी सगळ्यात सोप्पे म्हणजे फ्रूट सॅलड.

ऑकेजन काय आहे आनि क्राऊड काय आहे? देशी, विदेशी???

७ कप बर्फी, कोकोनट स्लाईस, चॉक ब्राऊनी, छोट्या डिस्पोजबल कप्स मधे घट्ट खीर/राईस पुडिंग आणि त्यावर कॅरॅमल क्रंच / हनी-नट क्रंच ....

इडली चटणी/सांबार बरोबर स्टार्टर्स म्हणून झटपट होणारे काहीतरी सुचवा.
मँगो शिरा गोडामध्ये आहे. सो त्याला सुट होईल असे काहीतरी.
नुसतेच मिनी पापड ठेवू का? त्यासोबत काय देता येईल?

अंजली_१२, चाट प्रकारांपैकी काही स्टार्टर म्हणून ठेवता येईल. आलू चाट/ स्वीट कॉर्न चाट/ मोड आलेल्या कडधान्यांचे (किंवा हिरव्या मुगाचे) चाट करता येईल.

हम्म स्वीट कॉर्न चाट चांगला ऑप्शन आहे आणि हराभरा कबाब लवकर बनतील का? टुथपिक टोचून मोठ्या प्लेटमधे ठेवू शकेन. इथे रेसिपी शोधते. मला असं मधे काहीतरी ठेवून जे आपापलं खाऊ शकतील असं स्टार्टर पाहिजे आहे कारण बाऊल, चमचे लिमिटेड आहे Proud

मग पायनॅपल क्यूब्ज + चीज क्यूब्ज + पाकवलेल्या चेरी टूथपिकला खोचून ठेवायच्या प्लेटमध्ये रचून!

पालक पकोडे/ मिरची पकोडे किंवा अन्य कोणत्या तरी प्रकारची भजी

मोनॅको/ क्रॅकजॅक टाइप्स बिस्किटांवर वेगवेगळी टॉपिंग्ज घालून सर्व्ह करायचे.

किंवा पापड्या/ कुरडया/ मिरगुंडं टाइप्स तळून

पापड भाजून मसाला पापड

उद्या माझि बहीण येते आहे जेवायला. २ मुल + जीजाजि. हा मेनु ठरवला आहे.
आलू पराठा, हिरवी मिरचि ची चटणी, पुलाव, टोमेटो चं सार, दही, रस मलाइ (विकतची).starter म्हणुन पालक पकोडे.
कसं वाटतोय मेनु? सन्ध्याकाळी घरी जाउन स्वैपाकिणी च्या मदतीने करणार आहे.
खुप कोरडा तर नाहि ना होणार?

शनिवारी माझ्याकडे काही जण जेवायला येणार आहेत. सोलकढी,बिर्याणी,रायतं आणि फ्रूटसॅलड असा बेत ठरवत आहे.पण बिर्याणीच्या जोडीला पोळी/पराठा/पुरी असे काहीतरी पाहिजे असे वाटते.काय करता येईल? किंवा दुसराच एखादा बिर्याणीबरोबर मॅच होणारा पदार्थ कोणता?

सोलकढी का बरं आहे पूर्वा? काही स्पेसिफिक कारण नसेल तर सोलकढी नको करूस. बिर्याणी बरोबर नाही बरोबर वाटणार. आलू पराठे चालतील का? स्नॅक्स असणारे का काही?

बिर्याणी आणी सोलकढी बात कुछ जमी नही. बिर्याणी स्पाईसी असेल तर विकतचे पराठे आणी एखादी पालक पनीर किंवा आलू मटर अथवा पनीर माखनी सारखी माइल्ड ग्रेव्ही वाली भाजी ह्या मेन्युला काँप्लिमेंट करेल.

सोलकढीचं काही स्पेसिफिक कारण नाही.खूप दिवसांपासून करायची होती म्हणून...मलाही ते जरा ऑड वाटतच होतं.पराठे-भाजी जास्त बरं वाटतंय ना....स्टार्टरमध्ये समोसा चाट चांगलं वाटेल ना?

मग सोलकढी करायची असेल तर बिरडं भात कर. त्याबरोबर एखादी उसळ, फुलके, कोशिंबीर. साधाच पण मस्त बेत होईल.

नाहीतर बिर्याणी, आणि प्रज्ञाने सुचवलयं तसं भाजी- पराठे. समोसा चाट मस्तच स्टार्टर. Happy

फारच मनात असेल सोलकढीचं तर जेवणा बरोबर न देता सुरवातीलाच छान काचेच्या ग्लासमधे सर्व कर. वेलकम ड्रिंक आहे म्हणून सांग. हा.का.ना.का.माझी आई गोळा भात करते. त्याबरोबर पण सोलकढी छान लागते. पण ते कंफर्ट फूड कॅटेगरी आहे.

रायतं दह्यातलं करणार आहेस का पूर्वा? फ्रूटसलाडच्या जोडीला चालेल का? बिर्याणीबरोबर मेथी/ पालक/ तिखटमीठाच्या पुर्या, चटणी, सॉस असा मेनू छान जमून येतो.

Pages