बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन टिक्का चांगलाय ऑप्शन..वेजमधे पुलाव, रायते, अळुवडी आणी गोडात गुलाबजाम नाहेतर रसमलाई कसे वाटतेय? खुप कमी वाटताय का पदार्थ?

मुलीच्या वाढदिवसाचे हे बेत ( २ वेगवेगळ्या दिवशी ) कसे वाटतायत?
१. (दुपार साठी) केक ,श्रीखंड ,छोले ,बटाटयाची भाजी, पुर्‍या ,मसालेभात ,डाकर गोटे, चटणी काकडीची कोशिंबीर का रायता ठेउ?? .

२.(सन्ध्याकाळसाठी, ह्यावेळी ४-८ वयाची मुल जास्ती आहेत) केक ,स्प्रिग रोल ,गार्डन सलाड क्रुटॉन्स घालुन ,हक्का नुडल्स हे स्टार्टर म्हणून आधी सर्व्ह करेन आणि नन्तर पाव भाजी ,फ्राईड राईस

आणि काही ऑप्शन्स ?

तोषवी , पावभाजी चालेल का मुलांना? मुलं तिखट खावू शकतील का ?
इडली किंवा व्हेज बर्गर (कटलेट करुन) किंवा कॉर्न,चीज ,केचप वगैरे घालुन ओपन सँडविच कसं वाटेल? बर्गर केल तर वेगळ सलाड पण ठेवाव लागणार नाही.
सलाड ऐवजी कलिंगडाच्या फोडी ठेवता येतील. मुलांना आवडतात.

रायता आणि श्रीखंड एकत्र नको.
छोले न करता मटकीची/मुगाची मोड आणून उसळ केली तर पूर्ण मराठी मेनू होईल. बघ कसे वाटतेय.

मला १५ मोठी आणी २ लहान माणसांसाठी चिकन करी आणि बिर्यानी करायची आहे. सोबत चपाती , भाकरी, सॅलड , थंड घट्ट दही ( हे आमच्याकडे चिकनबरोबर आवडते ) आणी शेवटी केक असणार आहे. कूणाला लागला तर थोडा साधा भात.
मला चिकन आणी बिर्यानीसाठी प्रमाण सांगा ना Happy

मिनोति , मटकी उसळ करण्याची आयडीया आवडली.
सीमा, नुडल्स आणि राईस स्प्रिन्ग रोल तिखट नसेल( चीली सॉस ,सोया सॉस वेगळे ठेवेन ) पाव्भाजी ही खूप तिखट नसेल. मिनि इडली करता येतील स्टर्टर मधे , कस वाटतय?

बिर्यानी कसली आहे ? ती पण चिकनचीच का ? >>> झाली करुन आणी संपवुन कालच Proud
मी १ किलो ( ८ वाट्या ) तांदुळ आणी १.२५ किलो चिकन असे प्रमाण घेतले होते. जास्त झालेली संध्याकाळी संपली. पण पाउन किलो तांदळाची बरोबर पुरली असती.
रच्याकने मी कच्ची बिर्यानी करते.. पण कुकर वापरुन. ( माझ्या स्पेशालीटी असलेल्या २-४ पदार्थातिल एक पदार्थ Wink ) पुढच्यावेळी केली की फोटो सकट रेसिपी लिहील. Happy

मला मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी वेज मेन्यू हवाय. २० मोठे आणि ६ लहान (वय वर्ष ५ च्या आत).
माझ्या डोक्यात असलेला मेन्यु:
१) स्टार्टर्स : मिनि-स्प्रिन्ग रोल्स + स्वीट चिली सॉस आणि टोर्टीला चिप्स्/नॅचोस + सालसा डिप (हे सगळं बाहेरून आणेन.)
२) पाव-भाजी
३) गाजर हलवा आणि आईस-क्रीम
सोबत कोल्ड ड्रिन्क्स आणि फ्रुट जूसेस.
पाव-भाजी बरोबर आणखी काय करू साईड डिश?
अजून काय करता येइल्/करायला हवं?
बरेचसे लोक साउथचेच आहेत. आणि इतरांचा मुक्कामही कामानिमित्त साउथ मध्येच असतो. त्यामुळे साउथ्चा मेन्यु नकोय.
आणि साहित्याच प्रमाण पण सांगा प्लीज.
एवढ्या लोकांसाठी पहिल्यांदाच करतेय, त्यामुळे जरा धाक-धूक वाटतेय.

गोडगोजीरी, पावभाजीबरोबर दहीबुत्ती राईस चांगला वाटतो. मुलांना पण खाता येतो आणि मोठ्यांना पण.
(मी एकदा मिसळपाव सोबत केला होता. तेव्हा हीट झाला होता.)

पण आईस्क्रीम, ज्यूसेस इ सोबत दही? पावभाजी, गा. हलवा आईस्क्रीम हेच खूप हेवी होईल. शिवाय स्टार्टर्स आहेतच. गा. हलवा ऐवजी दहीबुत्ती ? (चालणार नाही. Proud )आहे हाच मेनू बरोबर असावा. Happy

साइड डिश ठेवायचीच असेल तर स्प्राऊट्स चाट / मूग चाट किंवा स्प्राऊट्स युक्त व्हेजी सॅलड हे ठेवता येईल.... किंवा अळूवडी/ कोथिंबीर वडी/ सुरळीची वडी वगैरे.
खरं तर जो ठरवला आहेस तो मेन्यू पुरेसा वाटतोय. शुभेच्छा! Happy

आशूडी आणि अकु ला अनुमोदन. अजून काही नसलं तरी खरं चालेल ह्या मेनु मध्ये. आणि वाढदिवस आहे म्हण्जे केक असणारच न. मग मी तर म्हणेन गाजर हलवा पण बाद कर. केक आणि आईसक्रीम खूप झालं गोडात. स्टार्टर्स मध्ये हवं तर एखादा चाट प्रकार ठेवता येईल.

लेकाच्या वाढदिवसाला sleepover(आता ह्याला मराठीमध्ये काय म्हणायचे??) पार्टी आहे. सगळी १०- ११ वर्षाचे आहेत. ह्यावेळची थीम कॅम्पिंग आहे त्यामुळे रात्रीच्या जेवणाला ग्रिल चिकन टिक्का, ग्रिल पनीर, बटर कॉर्न, डेझर्ट म्हणून ग्रिल पाईनापल/ मॅन्गो, नंतर कॅम्प फायर बरोबर मार्शमेलो आणि चोकोलेट असा बेत आहे.

दुसर्या दिवशीच्या नाश्त्यासाठी काय करु???

नाश्त्याला तू स्वतः करणार असलीस तर शेक अँड पोअर पॅनकेक करू शकतेस. झटपट होतात आणि मुले मदत करू शकतात तयारीसाठी. एक मोठ्या बरणीभर शेक अँड पोअर मिक्स मधे ६-७ पॅनकेक होतात. एका मुलाला साधारण ३ पॅनकेक धर. एकावेळेस एक बरणीभर मिक्स तयार करून घे, नाहीतर ते चांगले फुलणार नाहीत. एखाद दुसरे सिरिअलचे ऑप्शन ठेव, पॅनकेक न खाणार्‍या एखाद्या मुलासाठी.

ब्लुबेरी, क्रॅनबेरीज, बनाना वॉलनट असे कोणतेही मफिन्स्/कपकेक्स आदल्या दिवशी करून ठेवले तरी सोपे पडेल.

अननस, सफरचंद वगैरे सारखी फळे वापरून एखादे गोड सारण करून ठेवायचे. ऐनवेळेला पफपेस्ट्रीमधे भरून वळकटी करायचे. कच्चे असतानाच स्लाईसेस कापण्यासाठी अर्धे अधीक कापून ती अक्खी वळकटी बेक करायची. ऐनवेळी कापून देता येतील.

थॅंक्स आशुडी, वत्सला, अरुंधती, बीएस, प्रडि, सावनी.
आहे तोच मेनु ठेवला होता आणि तोच भरपूर झाला. नवर्याकडूनही तंबी मिळाली होती अजून काहिही ना करण्याबद्दल...
पण मस्त झाली पार्टी आणि सगळ पब्लिक खूष "बॉम्बे पावभाजी" वर!

येत्या शनिवारी साबांच्या वर्षश्राद्धानिमित्त ५० माणसांचे पारंपारिक घरगुती मालवणी पद्धतीचे जेवण करायचे आहे. भात, डाळ, सफेद वाटाण्याची उसळ, काळ्या वाटाण्याचे सांबार, भोपळ्याची भाजी, चवळीच्या शेंगांची(वालीची) भाजी, भाजणीचे वडे, पापड, लोणचे नी वेळ मिळालाच तर कोशिंबीर करण्याचा बेत आहे. आदल्या दिवशीपासून मदतीला कोणीही नाहीय, नणंद नी मी दोघींवरच सर्व जबाबदारी आहे. तर तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. तर मला खालीलप्रमाणे माहिती हवी आहे.

१. तुरडाळ, दोन्ही वाटाणे, उसळीत आणि वालीच्या भाजीत घाल्ण्यासाठी बटाटे यांचे प्रमाण किलोमध्ये.
२. उसळ नी सांबार यासाठी कांदा, खोबरे, लसूण, आलं यांचे प्रमाण वाट्पासाठी किलोमध्ये.
३. आदल्या दिवशी वाटप, भाजी चिरणे याव्यतिरी़क्त काय काय करता येईल??
४. ५० माणसांसाठी अंदाजे भाताचे(तांद्ळाचे) प्रमाण. तांदुळ कोणता घेऊ रोजचा कोलम की बासमती? बासमती यासाठी की कुकरला २ शीट्ट्यात होईल. एवढ्या भाताचा टोपात अंदाज येणार नाही म्हणुन
२-३ मोठे कुकर (३-४ फेर्‍यात)लावुन टोपात काढुन घेण्याची योजना आहे. असं जमेल ना? अशा कार्यासाठी बासमती घेतला तर चालेल ना?

याशिवायही काही सबंधित उपयुक्त माहिती दिली तरी चालेल( मी विचारायची राहुन गेली असल्यास) .
तरी क्रूपया अनुभवी मंड्ळीनी योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती....

साक्षी, आमच्याकडे पण हाच बेत असतो. पण हे जेवण कुणी भरपेट जेवत नाही. प्रसाद म्हणूनच जेवतात. जेवताना आग्रहही करायचा नसतो.
वडे वगैरे करण्यासाठी शक्यतो एखादा आचारी मिळाला तर बघा. (मुंबईत आहात का, मी रेफरन्स देऊ शकेन. ) दोन बायकांवर याचा फार ताण पडतो.
भाज्या वगैरे तूम्ही करा. शिवाय काळे वाटाणे शिजवण्यासाठी कूकर लागेल.

आणि आपल्याकडे वडे भाजणीचे नसतात बहुतेक. ते जरा विचारून घ्या. तांदळाचेच असतील तर ते पिठ आदल्या रात्रीच भिजवावे लागेल.

नाही दिनेशदा भाजणीचेच वडे आहेत, त्याचे ५ किलोचे द्ळण तयार केलेय नणंदेने.
बाकी बाहेरुन जेवण आणण्याचा विचार झाला करुन, नणदेचे मत काळ्या वाटाण्याचे सांबार, भोपळ्याची भाजी, चवळीच्या शेंगांची(वालीची) भाजी, भाजणीचे वडे, पापड, लोणचे हे घरीच करायचे असे होते, म्हणुन मग मी म्ह्टले फक्त भात, डाळ, सफेद वाटाण्याची उसळ बाहेर देण्यात काय उप्योग? म्हणुन न्ग फायनली हा सगळा घाट!!!

रुचिरा मधे ५० ( कींवा १०० असेल )लोकांच्या जेवणासाठी लागणार्‍या साहित्याचं प्रमाण दिलंय. त्यात पाहून ठरवता येईल. मी घरी गेल्यावर बघून लिहू शकते

अरे , इथे लिहायचं राहिलंच त्यादिवशी. त्यांनी १०० माणसांच्या जेवणाला १० किलो तांदूळ - ४ किलो साधा भात , ६ किलो मसाले भात अस लिहिलंय. पुर्‍या ६ किलो कणीक, तळायला ५ किलो तेल दिलंय. उसळ टाइप प्रकार नव्हते त्यांच्या मेनूत. पण बाकीच्या भाज्या ( तोंडली, वांगी ) ८ किलो, बटाटे १० किलो असं दिलंय.

रोज जर एक किलोची वांग्याची भाजी करत असाल तर एका वेळच्या भाजीचा मसाला / फोडणीचं सामान/ मीठ हे एका ताटात काढून घ्यावे, मग आठ किलो वांगी असतील तर अशी ८ ताटे करावीत अन मग ते सामान एकत्र करून भाजी करताना वापरावे. मला जर एकावेळी एक प्रकार १० पेक्षा जास्त माणसांसाठी करायचा असला तर मी तरी हीच पद्धत वापरते Happy .थोडा वेळ जास्त लागतो पण मग स्वैपाक करताना अ‍ॅन्झायटी थोडी कमी होते .

पापड १०० माणसांना ५० नग लिहिले होते. बहुतेक तळून छोटे तुकडे करून वाढतात तसले पापड असावेत.
वरणासाठी / आमटीसाठी डाळ पण लिहिली होती त्यांनी पण आता मी विसरले. संध्याकाळी परत पाहून लिहिते .

मेधा, हे प्रमाण जरा जास्तच वाटत आहे.
३५ लोकांसाठी आम्ही २ किलोचा भात केला होता. त्यातला बराच उरला होता.

रोज जर एक किलोची वांग्याची भाजी करत असाल तर एका वेळच्या भाजीचा मसाला / फोडणीचं सामान/ मीठ हे एका ताटात काढून घ्यावे, मग आठ किलो वांगी असतील तर अशी ८ ताटे करावीत अन मग ते सामान एकत्र करून भाजी करताना वापरावे >>>>>
मी पण अगदी असचं करते Happy

बासमती शक्यतो वापरू नका श्राद्धाचे जेवण आहे. बाकी तुम्हा दोघींना फार मेहनत पड्णार आहे.

बासमती शक्यतो वापरू नका श्राद्धाचे जेवण आहे. >> आपण जे रोज वापरतो तेच त्यादिवशी वापरलेले चालते.

बरेच लोक महाग असतो आणि जास्त प्रमाणात लागणार असतो म्हणुन वापरत नाहीत. कारण बजेट पण सांभाळायचे असते. असे मला वाटते.

Pages