मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

sarvashRut = सर्वशृत
sarvashrut = सर्वश्रुत

>>> sarvashRut = सर्वशृत sarvashrut = सर्वश्रुत

गजानन,

यात "श्रु" आहे. मला "श्र" वापरायचा आहे. "Shruti" शब्द लिहून पहा.

>>> गजानन, त्यांना 'श्र' ला रुकार द्यायचा आहे.

बरोबर. मला हे नीट सांगता आले नाही. धन्यवाद मंजूडी!

प्रशासक, IEमध्ये मायबोलीच्या जाहीराती व्यवस्थीत दिसत नाहीयेत.IE_Breaking.jpg सोबत जोडलेली इमेज पाहा. अर्थात ईतरही काही संस्थळावर तेच होतेय त्यामूळे हा कदाचित IEचा दोष असू दिसते. माबो FireFox मध्ये व्यवस्थित दिसते.

काल बकासुर नावाच्या id ने एक नविन बीबी चालु केला होता. ब्राम्हणांना मारायचा कट शिजतोय अशा काहीतरी नावाचा. मी आज तो शोधला तर सापडत नाही आहे. तो बीबी बंद केला आहे का ? जर नसेल तर कसा शोधायचा ?

अभिजित तो बीबी आता अस्तित्वात नाही. प्रक्षोभक विषय असल्याने उडवण्यात आला असावा.

एखाद्या सदस्याचे लिखाण शोधून काढायचे असल्यास (मायबोलीकरांच्या सूची मधुन तो आयडी शोधून काढायचा त्यानंतर) त्या आयडीच्या पाऊलखुणा मधे जाऊन लेखन टॅब वर टिचकी मारल्यास त्या सदस्याने उघडलेले सगळे बीबी दिसतात.

"मंजूडी" मदत पुस्तिका पूर्ण वाचून काढायला किती वेळ लागेल.
>>>

मंजूडीच्या ऐवजी मी सांगितले तर चालेल ना?
३७ तास ४१ मिनिटे लागतील.

HH, मी ते करुन पाहिले तरी सापडले नाही म्हणून ईथे विचारले. कारण तो विषय माझ्या पण पाउलखुणा मधे दिसत नाहीये....

छ्या उगाच काढला राव तो बीबी. मजा आली असती बरेच दिवस असा कोणता बीबी नव्हता, मते मांडायला ( भांडायला ) Happy Happy

बापरे!३७ तास ४१ मिनिटे लागतील, HH धन्यवाद हे आधीच सांगितल्याबद्द्ल म्हणजे आता मदत पुस्तिका कधीच वाचणार नाही (:खोखो::हाहा:)

२५७९२ "हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही, ग्रूपचे सभासद व्हावे लागेल" असा मेसेज दिसतो आहे,
पण ग्रूपचे नाव दिसत नाही तर सभासदत्व कसे घेणार.

महेश, ज्या पानांवर असा मेसेज येतो, तिथेच ग्रुपचे नावही येते. याबाबतची घोषणा इथे आहे बघा. वरील पानावर
""हे पान पहायची परवानगी नाही.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
""

असा मजकूर आहे. याची मुख्य कारणे असू शकतात.
१. लेखन अप्रकाशित केले आहे.
२. लेखन उडवले आहे.

वगैरे. वरच्या आकड्यासंदर्भात ते लिखाण प्रशासकांनी उडवले असावे असे मला वाटते.

काही कारणाने महिकावतीची बखर - भाग ७ : कोकणात निका मलिकचे आगमन ... हा लेखनाचा धागा ३ वेळा प्रकाशित झाला आहे...

मला त्यातील २ डिलीट करता येत नसल्याने कृपया डिलीट कराल काय..

'पिकासा'वरून प्र.चि. पोस्ट करतानाची पद्धत अवलंबूनही माझ्या संगणकावरून प्र.चि.पोस्ट होत नाही कारण 'एम्बेड'खालची लिन्क कंट्रोल'सी' व 'व्ही' वापरून 'फाईल ब्राउझर' मधे कट व पेस्ट होत नाही [ पण इतरत्र होते]; कां होत असावं असं ? प्लीज !

Pages