मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

मला mpkulkarni@rediffmail.com एवजी दुसरा आयडी प्रोफाईलला द्यायचा आहे काय करु?

मी "मायबोली बाईक ट्रेक.....वृत्तांत" लिहितोय पण तो चुकुन प्रकाशित झालाय. तर कृपया ते लिखाण डीलीट कराल काय?

प्रवासाचे अनुभव आणि ललित या दोन ठीकाणी प्रकाशित झालेय ते.

मुकु : माझे सदस्यत्व --> संपादन अशा क्रमाने गेल्यावर येणार्‍या पानावर तुम्हाला नवीन ईमेल देता येईल.

राज्या, अरे मग संपादनात जाऊन अप्रकाशित करता येतंय का ते बघ. किंवा प्रकाशित धागा डिलीट करता येतो आहे का बघ. नसेल डिलीट होत तर तसे कळव. तुझ्या नावावर मला एकच धागा दिसतो आहे.

तुझ्या नावावर मला एकच धागा दिसतो आहे.>>>>>>
तुला दिसणारा धागा जर "प्रवासाचे अनुभव" या गृप मधला असेल तर तो डीलीट कर, मला तो डीलीट करता येत नाहीये.

राज्या एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे? इथे दर्शविल्याप्रकारे केलेस तर तो धागा अप्रकाशित होईल. तुझा धागा फक्त प्रशासकच डिलीट करू शकतात.

मला रामो राजमणी श्लोक हवा आहे जर कुणाकडे ध्वनीमुद्रीत अथवा लिखीत अशा कोणत्याही स्वरुपात असेल तर कृपया मला द्यावा

डॉ. विनायक - मदतपुस्तिकेत लेखनासंबंधी प्रश्न विभागातला , "लेखनात प्रकाशचित्रे कशी द्यावीत" हा उपविभाग कृपया बघा. तिथे तुम्हाला उत्तर सापडेल.

देवबाप्पा : हे बघा

मला नासाची "Send your photo in space" link सर्वाशी शेअर करायची आहे. "खगोलशास्त्रीय सटरफटर" धाग्यात केली आहे शेअर पण बहुतेक तंत्र आणि मंत्र ग्रुपच्या सभासदांनाच दिसेल.

तर अशाच अनेक उपयुक्त लिंक सर्व सभासदांना दिसाव्यात यासाठी काही विभाग/बाफ आहे का?

गौतम
मायबोलीवरील कानोकानी विभाग त्याचसाठी आहे. पानाच्या उजव्या बाजूला हिरव्या रंगात कानोकानीचा दुवा दिसेल.

लिहीतांना अनेकदा बॅकस्पेस दाबल्यास त्यआधीचे अक्षर देखील पुसुन (जोडाक्षरातील) पुन्हा लिहावे लागते.
हे बदलता येणार नाही का?

क्रोम ब्राऊझर मध्ये तर बॅकस्पेस दाबल्यास अजुनच भानगडी होतात (निदान मॅक वर तरी)

क्योटो-हारवर्ड आणी इतर स्टँडर्ड पद्धती (सुद्धा) वापरता येतील असे काही करता येईल का?

मागे कोकणाबद्दल माहिती असलेले १० लेख वाचले होते, ते परत कसे वाचायला मिळतील. आम्ही कांही जण दि.१५/३/२०११ ला बाइकव्रर कोकणात जाणार आहोत.

मला प्रतिसादमध्ये एखादी माहिती उपयुक्त वाटली तर ती मी डाऊनलोड कशी करू? नुसते copy & paste केल्यास फक्त चौकोन दिसतात. कोणत्या देवनागरी फाँट मध्ये असते?

aabasaheb जर विशाल कुलकर्णी यांनी तिसरा भाग लिहीला असेल तर तो त्यांच्या पाउलखुणातल्या पानांवर सापडेल.
अन्यथा त्यांना विचारपूसमध्ये विचारू शकता.

मला ६,७ दिवसापूर्वी जुन्या मायबोलीतल्या चांगले लेख संकलित केलेले एक पान मिळाले होते.पण ते आता दिसत नाही.मी ते कुठे शोधू?

मी क्रिकेट वर्ल्डकप या धाग्यावर नियमित प्रतिसाद देत असे. आतां उपउपांत्यफेरी पासूनच्या चर्चेसाठी उघडलेल्या नवीन धाग्यावर मात्र "ग्रुपचा सभासद असल्याशिवाय भाग घेता येणार नाही" अशी मला ताकीद येते. असें कां ?

समई , जर पानाचे नाव आठवत असेल तर पान गूगलशोध वापरून शोधू शकता.

भाऊ, आधीचा धागा सार्वजनिक असेल आणि नवीन धागा नसेल तर तशी 'ताकीद' सगळ्याच ग्रुपसाठी येते.

एकाच नावाच्या दोन पोस्ट पडल्यात त्या एकत्र करता येतील का? आणि कशा करायच्या?

<< भाऊ, आधीचा धागा सार्वजनिक असेल आणि नवीन धागा नसेल तर तशी 'ताकीद' सगळ्याच ग्रुपसाठी येते. >> हा धागा आताच सार्वजनिक न ठेवण्यामागे कांही विशिष्ठ कारणं आहेत का? कीं, लिंबुटींबू संघांप्रमाणे माझ्यासारख्याना आता विश्वचषकाच्या बादफेरीत मज्जाव आहे ? Wink

साहित्यचोरीबद्दल काय करता येईल? माझी http://www.maayboli.com/node/24568 ही कविता माबोच्या कविता विभागात कुणी 'सत्या' नामक सदस्यानं स्वतःच्या नावावर प्रकाशित केली आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

अ‍ॅडमिन,
माझ्या "साहित्य लेखन" विभागात बरेच नको असलेले लिखाण/कचरा (rough drafts) साठलेला आहे. पण सध्या delete चा पर्याय नसल्यामुळे ते तसेच पडुन आहे. मी मागे पण एकदा delete चा पर्याय उपलब्ध करून देण्याबद्दल विनंती केली होती. तशी सोय उपलब्ध करून द्याल काय?

मदत्_समिती,
अण्णा हजारेंनी जन लोकपाल बिलासाठी भ्रष्टाचाराविरूद्ध मोहिम ऊघडली आहे. तर मायबोलीवर आपण त्यासाठी एखादा धागा सुरु करु शकतो का? त्यामध्ये लोकांचे विचार, गटग, मूकमोर्चा असे उपक्रम राबविले जातील.
धन्यवाद,
चंदन

Pages