मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

नमस्कार होमो सेपियन.
ती लिंक आली याचा अर्थ दुसरे पान आले. कथेचे नव्हे तर प्रतिसादांचे दुसरे पान दिसते. आणि २ हा आकडा भरीव चौकोनात दिसतो अशा प्रकारे ते दर्शविले जाते. कथा ही प्रतिसादांच्या आधी दिसते तेवढीच आहे. कथेचे दुसरे पान नसते.

श्वेतांबरी - माझे सदस्यत्व --> खाजगी जागा या क्रमाने दुव्यांवर गेल्यावर , खाजगी जागा लिहीलेला भरीव चौकोन ज्या ओळीत आहे त्याखाली 'upload, thumbnails, delete' अशा प्रकारचे मेन्यू दिसतील. या मेन्यूच्या ओळीतच सर्वात डावीकडे हेल्प नावाचा मेन्यू आहे. तो अशाप्रकारे दिसतो

यामधील कुठल्या पायरीवर तुम्हाला अडचण आहे, हे कळल्यास अधिक मदत करता येईल.

मदत समिती,
मला आवडलेल्या कविता, कथा, लेख आदि लेखन मला "बूकमार्क" कसे करता येईल ? "
माझे सदस्यत्व मध्ये एखाद्या पानावर मला माझे BOOK MARKS ठेवता येतिल?

गिरिश देशमुख
बुक मार्क ही सुविधा मायबोलीवर सध्या नाही पण बरेच जण "निवडक १०" ही सुविधा बुकमार्कसारखी वापरतात. "माझे सदस्यत्व" मध्ये या "निवडक १०" चा दुवा दिलेला आहे.

मी चायना पोस्ट नावाची लेखमालिका लिहिते आहे. सध्या १ ते ५ अशी पोस्ट्स टाकलेली आहेत. मला ही सगळी पोस्ट्स प्लीज एकत्रित करुन मिळू शकतील का? वाचणार्‍यांना सगळे भाग एकदम पहाता येणे सोयीचे होईल तसं केलं की.

नव्या माबोवर मी नविन आहे.गुलमोहोर मध्ये कथा ,लेख लिहायचे असले तर कसे पोस्ट करायचे?

शर्मिला,
आपली विनंती प्रशासकांकडे पोचवली आहे.
नोरा,
मदतपुस्तिकेत "लेखनासंबंधी प्रश्न" विभाग आहे त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

अ‍ॅडमीन, कृपया मी "माहिती हवी आहे" ह्या सदराखाली "रामदासस्वामी आणि झाडांची निगा" असा नविन लेखनाचा धागा चालु केलेला पण मला तो delete करायचा आहे. कृपया तो काढुन टाकणार का? मला माहिती मिळाली आहे पण धागा काढता येत नाहिए.
कृपया तो धागा काढुन टाका.

How to send an email to Sanyukta members for Sanyukta membership?

नमस्कार प्रियम्वदा

उजव्याबाजूला चार लिंका आहेत हिरव्या रंगात
* गणेशोत्सव २०१०
* गुंतवणूक
* संयुक्ता
* मराठी उद्योजक

त्यातील संयुक्ता या धाग्यावर टिचकी मारून गेलात की तुम्हाला "संयुक्ता" (उपक्रम आणि सदस्यत्वासंबंधी माहिती) हा धागा दिसेल. त्यावर सर्व माहिती मिळेल. धन्यवाद.

***

मी कवी आहे. मला माझा कविता तुम्हाला पाटवायच्या आहेत.
तर मी काय करू ?

प्र दी प जा ध व
९९२११६९८१०

माझा पासवर्ड सेव होतोय पण मी लॉगिन करताना accept होत नाहिये....त्यामुळे रोज मला पासवर्ड reset करावा लागतोय....
काहि problem आहे का?

प्रदीप जाधव,
वरती असलेल्या 'लेखनासंबंधी प्रश्न' ह्या विभागातले सर्व दुवे नजरेखालून घालावेत. आपल्याला उत्तर तिथे सापडेल.

king_of_net
पासवर्ड लिहीतांना तुम्ही टाईप करता का तुमच्या ब्राउझरतर्फे आधीच सेव्ह केलेला पासवर्ड भरला जातो ?
नोटपॅडमध्ये पासवर्ड लिहून तो योग्य ठिकाणी पेस्ट करून बघा. त्यामुळे पासवर्ड इंग्रजीतच असेल व एक कारण [पासवर्ड देवनागरीत आहे की नाही] हे कळून चुकेल. त्यानेही फरक पडत नसेल तर कृपया प्रशासकांना विचारपूसमध्ये विचारावे लागेल.

दुसर्‍यान्च्या कविता त्यान्च्या नावाने टाकता येतील का..........

काहि खुपच छान असतात........पन दुसरी कडे असतात.......

काय करावे........????

मी नवीन खाते चालू केले आहे आणि माझ्या सदस्यत्वाच्या पानावर जाऊन सदस्य खात्यामध्ये व्यक्तिगत संपर्काची सोय हवी आहे अशी विनंती केली आहे. मी त्या नंतर जाण्याची नोंद करून परत येण्याची नोंद केली. मला एका सदस्याने संपर्क सुविधेतून निरोप पाठविला आहे. परंतु अजूनही मला माझ्या पानावर संपर्क सुविधेचा tab दिसत नाही.
कृपया काय समस्या आहे ते सांगणे.

गौरांग
तुमच्या प्रोफाईलमध्ये संपर्क सुविधा दिसतेय हे पहा http://www.maayboli.com/user/31561
उदयवन -
गुलमोहर विभागात फक्त स्वतःचे साहित्य लिहीणे अपेक्षित आहे. इतरांनी केलेले लिखाण तुम्हाला मायबोलीकरांना वाचायला द्यायचे असेल तर त्या लेखनाचा दुवा कानोकानी विभागात द्या http://kanokani.maayboli.com/.

आत्ताच जुना फोटो डिलीट करून नवीन अपलोड केला. केलेला बदल साठवण्यात आलाय असा मेसेज दिसतोय पण फोटो गायब आहे. पूर्वी पेज रिफ्रेश केलं कि लगेच दिसू लागत असे.. प्लीज मदत!!!!!

@ रूनी पॉटर
धन्यवाद. परंतु माझ्या सदय्त्वाच्या पानावर जी लिंक तुम्ही दिली आहे तिथे संपर्क सुविधा दिसत नाही आहे.
Maayboli.png

गौरांग
Ahh got it, दुसरे सदस्य तुम्हाला संपर्क साधणार ना त्यांना दिसते आहे ही सुविधा तुम्हाला स्वतःला दिसत नाही, तुम्ही स्वतःच स्वतःशी संपर्क साधणार नाही ना म्हणून. तुम्ही दुसर्‍या सदस्यांच्या प्रोफाईलमध्ये बघीतले तर तुम्हाला संपर्क दिसले.

OK. बरोबर आहे. मी दुसर्या सदस्यांच्या पानावर गेल्यास मला हि सुविधा दिसत आहे. पण मला कोणी संपर्क संदेश पाठवला असेल तर तो मी कसा वाचू? मी त्या सदस्याच्या संपर्क पानावर गेलो, परंतु मला पाठविलेला निरोप कसा वाचवा?

तत्काळ मदतीबद्दल आभारी आहे.

माननिय अ‍ॅडमिन,

मला मायबोलीवर येण्याची नोंद करताना काही अडचण आहे.

१) घरच्या इंटरनेट कनेक्शनवर डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण आहे.
काय प्रॉब्लेम असु शकतो ?

२) घरच्या त्याच इंटरनेट कनेक्शनवर लॅपटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.
३) ऑफिसच्या इंटरनेट कनेक्शनवर ऑफिसच्या डेस्कटॉप वरुन लॉग इन व्हायला अडचण येत नाही.

Pages