Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
पर्सनल संपर्कासाठी काही ऑप्शन
पर्सनल संपर्कासाठी काही ऑप्शन आहे का? एकाद्या व्यक्तीला फक्त संपर्क करायचा आहे. तो कुठे आणि कसा करावा. ऑर्कुटवर जसे स्क्रॅपबुक आहे तसे?
गोजिरी, तुमच्या प्रश्नासाठी
गोजिरी, तुमच्या प्रश्नासाठी कृपया ही लिंक बघा - http://www.maayboli.com/node/2228
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24939
हा बाफ मी गणु आणि इतर डुआय यानी चालवलेल्या घाणेरड्या प्रतिसादा ला बंद करण्यासाठी चालु केलेला पण तो दिसत नाही आहे.......माझ्या लेखन मधे सुध्दा दिसत नाही आहे........
हे लोक इतर लोकांच्या बाफ वर जे अवांतर असबध्द बोलत असतात त्यामुळे मुळ बाफ चा गाभाच हरवुन बसतो...आणि नको त्या वादाला तोंड फुटते..............उगाच हेवे दावे प्रकार होतात
हा प्रकार बंद करण्यासाठीच खास हा बाफ उघडलेला ......बॉक्सिंग रिंग सारखा.....पण अॅडमीन ने तो बंद केला का?????
अॅडमीन ला सुध्दा असे घाणरेडे प्रतिसाद बाफ मिळावेत असे वाटते का...............???????
प्रतिसाद द्या...........
माझे एक लिखाण चुकून ३ वेळा
माझे एक लिखाण चुकून ३ वेळा सेव्ह झाले आहे. त्यातील फक्त एकच प्रत प्रसारीत करायची आहे. बाकीच्या दोन जादा कॉपी कशा डिलीट करायच्या?
नमस्कार sumiit
नमस्कार sumiit
उपरोल्लेखित धागा का बंद केला याचे कारण प्रशासकांना माहिती असेल. कृपया त्यांना ते संपर्कातून विचारावे ही विनंती. आपल्याला इतर सदस्याचे प्रतिसाद पटत नसल्यास दुर्लक्ष करावे ही दुसरी विनंती.
सुनिल जोग, प्रशासकांना याबाबत कळवले आहे.
मदत_समिती.
इथे स्वतःचे लिखाण प्रकाशित
इथे स्वतःचे लिखाण प्रकाशित करायचे असल्यास काय करावे? सविस्तर कळवल्यास बरे होईल.
नाहीतर मला त्या विषयाला अनुसरून लिहिलेल्या लेखामधे प्रतिसादातच लिहायला लागेल?
गोजिरी, कृपया मदतपुस्तिकेतले
गोजिरी, कृपया मदतपुस्तिकेतले 'लेखनासंबंधी प्रश्नोत्तरे' हे सदर वाचून काही शंका असल्यास इथे परत विचारावे.
धन्यवाद !
मदत_समिती
प्रकाशकांना कसे विचाराय्चे
प्रकाशकांना कसे विचाराय्चे .......???????? कूठे विचारायचे.............???????????
मी काही प्रतिसाद लिहीला, तर
मी काही प्रतिसाद लिहीला, तर त्याच्याखाली 'संपादन' असं का येतयं?
Sunder's Bookmarks Marathi
Sunder's Bookmarks Marathi Gita-s
At this link I have recorded in (mp3) 4 Maathi Gita-s:
Mukteshvara's Ovibaddha Gita
Vaman Pandita's Samashloki Gita
Moropanta's Arya-Gita
Tukarama's Mantra-Gita
मला "स्माईली "कसे टाकायचे ते
मला "स्माईली "कसे टाकायचे ते सांगू शकाल का?
हर्षदा, प्रतिसाद बॉक्स खाली
हर्षदा, प्रतिसाद बॉक्स खाली तुम्हाला काही वाक्य दिसतील
त्यातल्या "Textual smileys" या शब्दांवर क्लिक करा.
आपल्या सोयीसाठि ते बोल्ड केलं आहे खाली.
# Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
-
-
-
![]()
# Textual smileys will be replaced with graphical ones.
# Allowed HTML tags:
1) I can't type here in
1) I can't type here in marathi and forced to type in english only.
2) I try occasionally to give pratisaad. But every time I click on reply or save, they are not been uploaded. I always get same page again and again. Why? How can I give my reply to any enquiry?
रविंद्र प्रधान, सहज आपल्या
रविंद्र प्रधान, सहज आपल्या पाउलखुणा बघितलं तर सुख या धाग्यावर दिलेला प्रतिसाद तर व्यवस्थित दिसतोय....
--------------------------------
रविंद्र प्रधान | 5 May, 2011 - 06:05 नवीन
सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे.
...
--------------------------------
ही अडचण तुम्हाला कधीपासुन येतेय? कोणता browser / OS? काही नवीन install केलय का? हे सांगितलं तर कोणी मगत करू शकेल. नाहितर shutdown n restart करुन बघा
धन्यवाद मंदार सर.
धन्यवाद मंदार सर.:दिवा:
sorry wrongly posted here .
sorry wrongly posted here . now deleted
मी कोठेही प्रतिसाद दिला कि
मी कोठेही प्रतिसाद दिला कि उजव्या बाजुला " संपादन " असं का येत आहे.बाकी कोणाच्याही प्रतिसादाला" संपादन " असं येत नाही आहे. माझं काही चुकलं आहे का?
हर्षदा, प्रत्येकाला स्वतःचा
हर्षदा, प्रत्येकाला स्वतःचा (आणि फक्त स्वतःचाच) प्रतिसाद 'संपादित' करायची ती सुविधा आहे.
(उदा. इथे तुझ्या प्रश्णावरची प्रतिक्रिया बघितली तर मनीशाने नंतर ती 'संपादित' केल्यासारखी दिसतिये)
आई शप्पथ"सॅम"तुम्ही
आई शप्पथ"सॅम"तुम्ही सांगितलेलं मला काहीच समजलेलं नाही.डोक्यावरून गेलं.
"संपादन "फक्त मी दिलेल्या प्रतिसादालाच का दिसत आहे ते सांगा. इतर कोणाच्याही प्रतिसादाला" संपादन " असं येत नाही आहे. (उदा. इथे तुम्ही दिलेल्या प्रतिसादाला" संपादन " असं का आलं नाही आहे. )
हर्षदा, त्या 'संपादन' वर
हर्षदा, त्या 'संपादन' वर क्लिक करून पहा. म्हणजे कळेल.
हर्षदा, आपण स्वतः दिलेला
हर्षदा, आपण स्वतः दिलेला प्रतिसाद बदलण्यासाठी संपादन (एडिट) ची सोय आहे.
गजानन,भरत मयेकर कोणालाच माझा
गजानन,भरत मयेकर
कोणालाच माझा प्रश्न समझलेला दिसत नाही आहे. संपादन "फक्त मी दिलेल्या प्रतिसादालाच का दिसत आहे ते सांगा.तुम्ही दिलेल्या प्रतिसादाला" संपादन " असं का येत नाही आहे. (आपण स्वतः दिलेला प्रतिसाद बदलण्यासाठी संपादन (एडिट) ची सोय आहे.)ही सोय तर सगळ्यांसाठी आहे ना मग, फक्त मी दिलेल्या प्रतिसादानंतरच" संपादन " असं का दिसत आहे? मला असे वाटतंय कि "प्रतिसाद"देताना माझं काहितरी चुकतयं, पण काय ते मला माहित नाही.
तुम्ही वरचे सगळे "प्रतिसाद"बघा म्हणजे तुम्हां लोकांना मी काय म्हणते आहे ते कळेल.( कि" संपादन "फक्त मी दिलेल्या प्रतिसादानंतरच दिसत आहे.)
तुमचा प्रश्न कळला
तुमचा प्रश्न कळला आहे.
प्रत्येकाला आपापल्या पोस्टी संपादीत करायचा पर्याय दिसतो. मला फक्त माझ्या पोस्टींकरता 'संपादन' हा पर्याय दिसतो. मला हर्षदा परब किंवा भरत मयेकर यांच्या पोस्टींखाली 'संपादन' असे दिसत नाही. कारण मला त्यांच्या पोस्टी संपादन करायचा अधिकार नाही.
ओ! आत्ता मला कळलं म्हणजे
ओ! आत्ता मला कळलं म्हणजे प्रत्येकाला आपापल्या पोस्टींखाली 'संपादन' असे दिसतंच.मी उगाचच सगळ्यांच डोकं खात होती ! माफ करा.
मी परत आली आहे सगळ्यांच डोकं
आपण मोबाइलवर काढलेले फोटो मायबोलीवर टाकु शकतो का?
आणी जर टाकु शकतो तर ते कसे टाकायचे?
हर्षदा, वर निळ्या अक्षरांत
हर्षदा, वर निळ्या अक्षरांत 'लेखनासंबंधी प्रश्न' असे लिहिले आहे, त्यावर क्लिक करा. उघडणार्या पानावर 'लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?' या प्रश्नावर क्लिक केलेत तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
सर्वात आधी, ही मदत पुस्तिका पूर्ण वाचून काढा.
"सर्वशृत" किंवा "शृती" हे
"सर्वशृत" किंवा "शृती" हे शब्द "श्री" मधला "श्र" वापरून कसे लिहायचे? यातला "श" हा "श्री" मधला "श्र" आहे. पण हे शब्द लिहिताना तो तसा लिहिता येत नाही.
सर्वश्रुत sarvashrut
सर्वश्रुत sarvashrut
श्रु - shru
श्रु - shru
श्र = shra श्रु = shru असे
श्र = shra
श्रु = shru
असे लिहावे.
Pages