..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, अण्णांच्या घराजवळ रेल्वेपूल नाही. मुळात असं काही झालं तर घारु त्या मुलीला इतका वेळ लेक्चर देईल की ती मुलगी परत कध्धी कध्धी चोरी कर्णार नै

प्रेमात वयाचे बंधन नसते आणि प्रेमात पडल्यावर मन नावाचा सिनेमा पाहायचा असतो हे प्रियकर आपल्या प्रेयसीला कसे सांगेल?

गाण्यातली अतिशय दर्दी अशी स्त्री. स्वतःही उत्तम गाणारी. पण तिचं प्रेम बसतं ते नेमकं गाण्याच्या बाबतीत औरंगजेब असलेल्या माणसावर. काही दिवस चांगलं चालतं पण गाणं या विषयावरून दोघांचं बिनसतं आणि ते एकमेकांपासून दूर जातात. पण त्या स्त्रीला त्याची आठवण येतच राहते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

>>> बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है.

एका शिंप्याचं (किंवा न्हाव्याचं) नुकतच लग्न झालेलं असतं. त्याची बायको माहेरी गेली असते. पण दुकानात काम करताना त्याला तिची खुप आठवण येत राहते. तर तो कोणतं गाणं म्हणेल?

>>> या कातरवेळी ..... पाहिजेस तु जवळी.

हे पहा जमलय का ? जरा हलकफुलकच आहे. Happy

१. सल्लू परदेसी व शिला जवानी यांच नुकतच गूटरगुं चालू झालेलं असतं. शिलाची मैत्रीण मुन्नी तिला सावधान करते (गाणं गाऊन) व म्हणते अगं असं त्या परदेसी सोबत ऑखमिचौली करु नकोस, एक न एक दिवस तो दुर जाईल.

२. शेवटी मुन्नीचं भविष्य खरं होतं, सल्लू तीला सोडुन सकाळच्या पहिल्या गाडीने जाण्याच्या बेतात असतो आणि नेमका याचा पत्ता शिलाला लागतो तर ती कोणते गाणे म्हणेल.

३. सल्लू तिला वापस येण्याचं वचन देतो, तरी शिला काही ऐकण्याच्या मन:स्थीतीत नसते, ती त्याला उद्देशुन न जाण्याची विनवणी करते(हो, गाण्यात), काय माहीत एखाद्या वेळेस 'करिष्मा' झाला तर...
पण सल्लुने ठान लिया वर तो त्याच्या मनाच पण ऐकत नाही हे त्या बिचारिला काय माहीत.
ती परत त्याला उद्देशुन म्हणते(हो, परत गाण्यात) जा तू जा, पण माझी आठवण तरी ठेव, मला विसरू नकोस.

१. परदेसियोंसे ना अखियां मिलाना..
२. तुम तो ठहरे परदेसी.. (सुबह पहली गाडी से घर को लौट जाओगे)
३. परदेसी परदेसी जाना नही... (मुझे याद रखना, कही भूल न जाना)

एकदा एक मुलगा सिनेमा बघायला जातो. त्याला आमिर माधुरी सिनेमा बघायचा असतो. थेटर वर पण त्याला हवं त्याच सिनेमाचं पोस्टर असतं, पण सिनेमा सुरू झाल्यावर त्याला कळतं की हा तर दिव्या शाहरूख चा सिनेमा आहे... तेव्हा तो कोणतं गाणं म्हणेल?

मी पण तेच लिहिणार होतो.
ये दिल दिवाना है, दिल तो दिवाना है ये
दिवाना दिल है ये, दिल दिवाना...

----------

काल जागू च्या उरणमधे बिबट्या शिरला होता म्हणे. पकडला गेला शेवटी, पकडला गेल्यावर काय गाणं म्हणाला असेल.

.

एक मुलगी, " मी एका पेयाचा(येथे आपापल्या कल्पनेतील पेयाचे नाव घेणे) अक्खा ग्लास पिऊन घेतला. आणि तो घेतल्यावर आनंदाने डोलले " हे गाण्यात कसे सांगेल ?

ला पिला दे साकिया.........पैमाने पै माने बाद ............हे बहुतेक गाने म्हणेल

श्री देशपांडे यांचं हृदय कमजोर झालेलं होतं. डॉक्टरांनी त्यांना श्रम करू नयेत, गोंगाट, गर्दी, मोठ्ठे आवाज इ. टाळावेत असे सल्ले दिलेले होते. त्याप्रमाणे ते चाळीतल्या खोलीत दुपारी आराम करायचे. पण कदमांचं कार्ट एकदम व्रात्य, उडाणटप्पू , मवाली होतं. नेमक्या याच वेळेला ते पोरं जमवून दोन चाळीतल्या जागेत क्रिकेट, फूटबॉल खेळायचं.

देशपांड्यांना त्रास व्ह्यायचा. एकदा त्यांनी सांगून बघितलं तर दुस-या दिवशी दुपारभर दिवाळी झाली. बाँब फुटले. देशपांड्यांना त्रास झाला. होणारच..

कमजोर हृदय आणि ते व्रात्य, मवाली कदमपुत्र..

देशपांडे ही व्यथा गाण्यात कशी मांडतील ?

निर्जंतुक जंतु,

गम दिये मुस्तकील, इतना नाजुक था दिल, ये न जाना
हाये हाये ये जालिम जमाना .......

एक लग्नपत्रिका :

श्री कुलस्वामिनी प्रसन्न!
आमचे येथे श्री कृपेकरून आमची ज्येष्ठ कन्या चि. सौ.कां. मनिषा नारायण लिमये हिचा विवाह चि. महेश नानासाहेब कुलकर्णी यांच्याशी करण्याचे योजिले आहे. वगैरेवगैरेवगैरेवगैरे.........

आता तुम्ही कोणतं गाणं म्हणाल?

एक मुलगी, " मी एका पेयाचा(येथे आपापल्या कल्पनेतील पेयाचे नाव घेणे) अक्खा ग्लास पिऊन घेतला. आणि तो घेतल्यावर आनंदाने डोलले " हे गाण्यात कसे सांगेल ?>>>>>>>>>>

थोडा बदल करते. एक मुलगी , " मी एक पेग घेऊन डोलायला लागले " हे तिच्या प्रियकराला कसे सांगेल ?

कमजोर हृदय आणि ते व्रात्य, मवाली कदमपुत्र..

ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा ???

ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा ???
>>> हो ग सांजसंध्या. बरोबर वाटतय. मस्त.

***************************************

एक लग्नपत्रिका :

श्री कुलस्वामिनी प्रसन्न!
आमचे येथे श्री कृपेकरून आमची ज्येष्ठ कन्या चि. सौ.कां. मनिषा नारायण लिमये हिचा विवाह चि. महेश नानासाहेब कुलकर्णी यांच्याशी करण्याचे योजिले आहे. वगैरेवगैरेवगैरेवगैरे.........

आता तुम्ही कोणतं गाणं म्हणाल?

>>>>> बरोब्बर. ते गाणं असं आहे :

नाते जुळले मनाशी मनाचे ......

रुखसाना खुपच खुबसुरत होती. गल्लीतली सगळीच मुलं तिच्यावर मरायची. पण आदिलची तिच्याफार फार्फार म्हणजे फार्फारच मुहोब्बत होती. त्याला स्वत:ला रुखसानापाशी प्रेमाचा इजहार करायची हिंमत नव्हती. मग त्याने आपल्या बहिणीला - सुरैयाला - पटवले की तू रुखसानाला माझ्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला सांग. तर सुरैया रुखसानापाशी जाऊन कोणते गाणे म्हणेल?

Pages