..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

माझाही एक प्रयत्न, जरासा अमानवीय कॅटॅगरीमधला आहे Happy

प्रेयसी प्रियकराला भेटायला येते... गॉगल घालून.
गॉगल कशाला? तर म्हणे कावीळ झालीये. नाही पण गॉगल काढच आता....
गॉगल काढल्यावर पाहतो तर काय.... खरोखरच कावीळ झालीये! पण डोळे पिवळे नाहीत.. तर गुलाबी !!!
प्रियकर जाम घाबरतो... आणि झिंगल्यासारखा गायला लागतो.. कोणते बरे हे गाणे ?

शशिकलाबाईंना वयपरत्त्वे रात्री झोप येत नसे. डॉक्टरच्या प्रिस्किप्शनवर त्यांनी झोपेच्या गोळ्या आणल्या. त्याच दिवशी त्यांचा नवरा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणार होता. त्याने सामानात आपली औषधं भरताना चुकून शशिकलाबाईंच्या झोपेच्या गोळ्याही घातल्या. रात्री झोपायला जायच्या वेळी ही बाब लक्षात येताच शशिकलाबाईंनी रात्रभर नवर्‍याला शिव्यांची लाखोली वाहिली. कारण आता झोप येणं अशक्यच होतं. ह्यावेळी त्या कुठलं गाणं म्हणाल्या असतील?

"माझा प्रियकर इतका येडपट आहे. मी इथे रात्रभर त्याची आठवण काढत तळमळत असते (आणि त्याला फोन करायचही सुचत नाही.) काय उपयोग आहे या जगण्याचा?" असं ती स्त्री आपल्या मैत्रिणीला कोणत गाणं गाऊन सांगेल?
>>> मीच सांगते आता.

यारा silly silly, बिरहा की रात का जलना

Proud

@ स्वप्नाराज ~ पण मला वाटते झोप उडालेली ती बिच्चारी चित्रलेखा नसून आम्रपाली असावी.

मी वेडेपणा करुन बसलेय कि शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्रेम केले. म्हणजे मीच डोळा मारला. आता मात्र दगडावर डोके आपटून जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण तो काही माझ्याकडे येणार नाही. तसे भास मात्र होतात मला. तो आला तरी मी बोलणार नाहीच म्हणा, त्याच्याशी !

एक स्त्री, हे गाण्यातून कसे सांगेल ?

>>पण मला वाटते झोप उडालेली ती बिच्चारी चित्रलेखा नसून आम्रपाली असावी.

येस, येस, यू इज म्हणींग द राईट Proud

हो ना चित्रलेखा काय झोप येण्यासाठी गोळ्या नाही घ्यायची. ती लोकांची झोप उडवायची.

कालचे उत्तर तसे सोपे होते..

केसरीया बालमा, के तूमसे लागी नैन
टकराके सर को जान ना दू
तो क्या करु ?
कब तक पियाके आनेके सदमे सहा करु ?
मै तो हजार चाहू के बोलू ना यार से
काबू मे अपने दिल को ना पाऊ
तो क्या करु ?

मी वेडेपणा करुन बसलेय कि शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्रेम केले. म्हणजे मीच डोळा मारला. आता मात्र दगडावर डोके आपटून जीव देण्याशिवाय गत्यंतर नाही, कारण तो काही माझ्याकडे येणार नाही. तसे भास मात्र होतात मला. तो आला तरी मी बोलणार नाहीच म्हणा, त्याच्याशी !

एक स्त्री, हे गाण्यातून कसे सांगेल ?
>>>

@ दिनेशदा..

गलती से कल मै इन्हे देख के जो
युं ही जरा सा हस गयी
अल्लाह बचाए मेरी जान
के रझिया गुंडोमें फस गयी. Lol

दिनेशदा, मी हे गाणं कधी ऐकलं नव्हतं. Sad मला प्रथम, "कब तक पियाके आनेके सदमे सहा करु" ह्याचा अर्थ नीट लागला नाही. म्हणजे सरळसरळ अनुवाद केला तर तो पिया एव्हढा भयानक आहे की त्याला पाहून हिला शॉक बसतो असा अर्थ काढला मी. पण तो येण्याची शक्यता नसताना आला तर (सुखद) धक्का बसतो असा अर्थ आहे का ह्यात "पियाके आनेके सदमे" मधला "न" राहिलाय?

एक हात छातीवर चोळत "अ‍ॅसिडीटी झाली आहे हो डॉक्टर' असं डोळ्यात पाणी आणून सांगणार्‍या पेशंटला डॉक्टर काय म्हणतील?

स्वप्ना

धक धक करने लगा
हो मेरा जियरा डरने लगा

किंवा

जिया जले जान जले
नैनो तले धुआं चले

अरे हो बरोबर धक धक ला आम्ही हार्ट ट्रबलच गाण म्हणायचो.

बरं विचार करतो

तोवर मी पण एक गाण देतो

पेशंट सांगतोय "डॉक्टर!!!
मला गॅसेस झालेत
डोक गरगरतय
मन थार्यावर नाही
मला कळत नाहीय पण तुम्हालाही निदान करता येत नाही"

एक हात छातीवर चोळत "अ‍ॅसिडीटी झाली आहे हो डॉक्टर' असं डोळ्यात पाणी आणून सांगणार्‍या पेशंटला डॉक्टर काय म्हणतील?
>>>>>
सीने मे जलन, आंखो मे तूफान सा क्यूं है? (अ‍ॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होते ना? :))

स्वप्ना, येण्याच्या भासाचे धक्के असतात ना ?

तेरे वादे पे जिये हम, तो ये जान झुट जाना
के खुशी से मर न जाते, अगर ऐतिबार होता...

तसेच हे.
अमित.
शिवसेनेच्या कार्यकर्यांना गुंड कसे म्हणता येईल ? (मग बाकिच्यांना काय म्हणायचे ?)

@ भरत मयेकर : "हो ना चित्रलेखा काय झोप येण्यासाठी गोळ्या नाही घ्यायची. ती लोकांची झोप उडवायची."

~ होय. व्हेरी ट्रू ! पण शेवटी (पडद्यावरील) चित्रलेखा आणि आम्रपाली यानी ज्या ठोंब्यांसाठी आपली झोप हराम करून घेतली ते पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा पोस्टाच्या पेट्या जास्त आकर्षक वाटल्या असते असे राहूनराहून वाटते.

केसरीया बालमा, के तूमसे लागी नैन
टकराके सर को जान ना दू
तो क्या करु ?
कब तक पियाके आनेके सदमे सहा करु ?
मै तो हजार चाहू के बोलू ना यार से
काबू मे अपने दिल को ना पाऊ
तो क्या करु ?

हे असं आहे....

कब तक फ़िराक़-ए-यार के सदमे सहा करूँ

Pages