..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेयसि तिच्या प्रियकराचे आंग दुखत आसताना त्याला म्हणते कि तुझ्या मुळे मि आधिच बदनाम झाले आहे आता फुल व शस्त्र देखिल बनायला तयार आहे. या आर्थाचे गाणे ओळ्खा.

मामी, एकदम सही , फंटुश धागा !
हे असेल का गाणं ? Uhoh
मनमोहना....तुम बिन पाऊं कैसे चैन, तरसु तुम्हीं को दिन रैन !

वेगवेगळ्या दाण्यांची एकदा सभा भरते. वाटाणे, चणे, शेंगदाणे असे सगळे दाटीवाटीने बसलेले असतात. त्या सभेत ते शेंगदाण्याला सगळ्यांचा राजा म्हणून कसा घोषित करतील?

काल काय झालं की आपल्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि ती संपवायची नावच घेईनात. ममता बॅनर्जींना कोलकत्त्याला जायचं असतं म्हणुन त्यांचा जीव वरखाली होऊ लागला. अशा वेळी त्या कोणतं गाणं म्हणतील?

हे शामसुंदर राजसा मनमोहना
विनवुनी सांगते तुज
जाउ दे मला परतुनी

Biggrin सांजसंध्या, मगाशीच मी सगळा धागा वाचून काढला!!!! केवढा वेळ लागला मला, पण सोडवला नाही.... मामे, तुस्सी ग्रेट हो!!! Rofl

एका शाळेत दुनिया नावाच्या बाई तोंडी परिक्षा घेणार असतात. मुलांचा अभ्यास झालेला नसतो. मुलं कुठलं गाणं म्हणतील ?

दुनिया मे रहना है तो, काम कर प्यारे
हाथ जोड, सबको, सलाम कर प्यारे
नही तो ये दुनिया, जीने देगी
जीने नही देगी, मरने नही देगी

झिया-उल-हकला तुरूंगात टाकलेलं असतं तेव्हा त्याला भेटायला त्याची आई येते. पण काही केल्या तुरूंगाचे अधिकारी त्यांची भेट होऊ देत नाहीत, झियाने खूप विनवण्या केल्या तरीही! तर झिया कुठलं गाणं म्हणेल?

एकाच वर्गात स्वप्ना आणि जमाना नावाच्या दोन मुली, स्वप्ना सुंदर तर जमाना निष्ठूर. वर्गातल्या एका मुलाच स्वप्नावर प्रेम. जमाना चुगली करते. स्वप्नाला 'बी' तर जमानाला 'जी तुकडीत टाकतात.

सांजसंध्या, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर मला अपेक्षित उत्तर " दुनिया करे सवाल तो हम, क्या जवाब दें ?" हे आहे.

अस्मानी Lol

एका मुलगी 'मन' नावाच्या गावात रहात असते. तिच्याशी एक तरुण मैत्रीचे नाटक करतो आणि तिला भेटायला जायचे निमित्त करुन एक एक करुन गावातल्या सगळया वस्तू चोरुन न्यायला लागतो. जेंव्हा तिला हा प्रकार लक्षात येतो, तेंव्हा ती प्रचंड हताश होते आणि तिचा चांगुलपणावरचा, मैत्रीवरचा आणि 'आपल्या' माणसांवरचा विश्वास पार उडून जातो. अशा अवस्थेत ती कोणते गाणे म्हणेल?

एका मुलगी 'मन' नावाच्या गावात रहात असते. तिच्याशी एक तरुण मैत्रीचे नाटक करतो आणि तिला भेटायला जायचे निमित्त करुन एक एक करुन गावातल्या सगळया वस्तू चोरुन न्यायला लागतो. जेंव्हा तिला हा प्रकार लक्षात येतो, तेंव्हा ती प्रचंड हताश होते आणि तिचा चांगुलपणावरचा, मैत्रीवरचा आणि 'आपल्या' माणसांवरचा विश्वास पार उडून जातो. अशा अवस्थेत ती कोणते गाणे म्हणेल?

====

लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी....

हेहेहे! सही ना. बरोब्बर ओळखलंय अक्षरी Happy

लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी....
अपनोमें कभी ऐसा कही होता हैं
ये तो बडा धोका हैं
लूटे कोई मन का नगर बन के मेरा साथी.... Proud

मी सर्व धागा नाही वाचलेला पण आय होप ही सिच्यएशन आधी कोणी टाकली नसावी.

एक मुलगा वडापाव पार्सल बांधून घेतो. पार्सल उघडल्यावर तो पाहतो तर पावाच्या खाली 'जन्नत' चित्रपटाची मोठ्ठी अ‍ॅड असते. तर त्या मुलाच्या सरांचे नाव काय आणि का?

Pages