..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही प्रतीक. मी उत्तर देऊनच टाकते.

पी टी उषा एकदा महाराष्ट्रातल्या एका छोट्याश्या खेड्यात तिथल्या क्रीडांगणाचं उदघाटन करायला जाते. तिथल्या लोकांना ती खुपच जोरात धावते आणि तिनं जगात नाव कमावलय इतकंच माहित असतं. तर तिच्या स्वागताच्या वेळी ते कोणतं मराठी गाणं म्हणतील?
>> उत्तरः
आली आली ग भागाबाई, आली आली ग भागाबाई .....

ओके. एका जुन्या सदस्यानं सुचना केली आहे की धाग्याचा दुसरा भाग सुरू करावा कारण पान लोड व्हायला त्रास होऊ शकतो. आता प्लीजच जी कोडी आहेत ती संपवा की मग नविन धागा सुरू करूया.

आधी नको असं वाटत होतं पण इथे छान मैफिल जमत आहे. दुसरा भाग हा केवळ तांत्रिक कारणांकरता आहे त्यामुळे रसभंग होण्याची काळजी नाही. तुम्हा सर्वांची परवानगी आणि सहकार्याची अपेक्षा करू ना? कारण तुम्हा सर्वांशिवाय हा धागा इतका यशस्वी झालाच नसता ना!

धाग्याला कोणतेही नाव द्या मामी ... पण ही इतकी सुंदर आणि वाडीच्या कंदी पेढ्यासारखी गोड मैफल बंद होणार नाही याची काळजी घ्या.....फार फार प्रेमात आहोत आम्ही या धाग्याच्या ! हल्ली तर असे झाले आहे की, बाहेरून आल्यावर वा कामातून थोडासा जरी रीलिफ मिळाला तर उंदीरमामा प्रथम या धाग्याकडे क्लिकतो...मग बाकीचे.

अहो, ही स्वप्ना....साधना....अक्षरी....आर्या.....स्निग्धा....श्रद्धा....याना प्रत्यक्ष भेटायचे तर दूर की बात, पण इथे मायबोलीवरदेखील कधी 'हाय, हॅल्लो' झालेले नसतानाही केवळ या धाग्याच्या जादूमुळे दोन-तीन दिवसात अगदी एकेरीवर आलो आम्ही....ही किमया फक्त या धाग्यातील आपलेपण (मराठीत 'अपनापन') करू शकले आहे.

संगीत अमर रहे !!

इन शॉर्ट....नो बाय टु धिस स्वीट थ्रेड...मामी !!

मामी... तुमचा दुसरा धागा सुद्धा २००० चा टप्पा पार करेल यात कसलाही संशय नाही.. Happy दुसर्‍या धाग्याची वाट पहात आहे.. Happy

Pages