..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मणिकर्णिका हे अगदी थेट प्रफुल-हंसा पारेख इष्टाइल होतं टेक धिस अ‍ॅज अ कॉम्प्लिमेन्ट Happy

निवडणुकीचा प्रचार सुरू होता. निवडणुकीला उभा असलेला एक उमेदवार एका बाईच्या घरी जाऊन मलाच मत द्या वगैरे सांगून गेला. तर ती बाई नंतर कोणतं गाणं गाईल?

दिल चिर के देख तेरा हि नाम होगा..... Happy

इन्स्पेक्टर प्रधानांचा मिस कामिनी वरचा संशय गडद होत चाललेला होता. खून झाला त्या दिवशी कामिनी कुठे होती याची ते चौकशी ते करत होते.
तिने ती ऑफीसमधेच होते म्हणून सांगितलेलं . त्यांनी सिक्युरिटीला विचारलं मिस कामिनी त्या दिवशी किती वाजता गेल्या ऑफीसातून ?
तो म्हणाला मला वेळ आठवत नाही पण रिमझिमता पाऊस पडायला सुरूवात झाली होती.. इस्न्पेक्टर खुषीत येऊन म्हणाले..

हेच आता गाण्यात सांग..
तर तो कसं सांगेल ?

एक चेटकीण पावांचे पक्षी बनवून विकायची. हे पक्षी प्रेमाची गाणी गायचे. तर या तिच्या बिझनेसच्या अ‍ॅडची जिंगल्स काय असतील?

सोसायटीची मिटिंग चालू असते. कुठल्यातरी मुद्द्यांवरून भांडणं सुरू होतात. कोणीच आपली बाजू ऐकत नाही म्हणून रागावलेल्या आजी उठून जायला लागतात. तर इतर सदस्य कोणतं गाणं म्हणतील?

हृदयात दुखतय म्हणून एक माणूस इस्पितळात दाखल होतो. डॉ. त्याची तपासणी करतात तर त्याच्या हृदयात तेरा ठिकाणी ब्लॉकेजेस निघतात. त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे हे डॉ त्याला सांगतात. तर तो माणूस आपली ही व्याधी दुसर्‍या पेशंटला कोणतं गाणं म्हणून सांगेल?

गाण्यातली अतिशय दर्दी अशी स्त्री. स्वतःही उत्तम गाणारी. पण तिचं प्रेम बसतं ते नेमकं गाण्याच्या बाबतीत औरंगजेब असलेल्या माणसावर. काही दिवस चांगलं चालतं पण गाणं या विषयावरून दोघांचं बिनसतं आणि ते एकमेकांपासून दूर जातात. पण त्या स्त्रीला त्याची आठवण येतच राहते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

सोसायटीची मिटिंग चालू असते. कुठल्यातरी मुद्द्यांवरून भांडणं सुरू होतात. कोणीच आपली बाजू ऐकत नाही म्हणून रागावलेल्या आजी उठून जायला लागतात. तर इतर सदस्य कोणतं गाणं म्हणतील?

दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ

चीर के देखे दिल मेरा तो
तेरा ही नाम लिखा रखा है

एका माणसाचं एका अत्यंत लाजाळू ख्रिश्चन मुलीवर प्रेम बसतं. तर तो कोणतं गाणं म्हणेल?

ओ मेरी
ओ मेरी
ओ मेरी
शर्मिली...

सोसायटीची मिटिंग चालू असते. कुठल्यातरी मुद्द्यांवरून भांडणं सुरू होतात. कोणीच आपली बाजू ऐकत नाही म्हणून रागावलेल्या आजी उठून जायला लागतात. तर इतर सदस्य कोणतं गाणं म्हणतील?

दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ
>>>> एवढं सरळ नाही आहे ते.

अजी रुठकर अब कहा जाईयेगा.

हृदयात दुखतय म्हणून एक माणूस इस्पितळात दाखल होतो. डॉ. त्याची तपासणी करतात तर त्याच्या हृदयात तेरा ठिकाणी ब्लॉकेजेस निघतात. त्यामुळे त्याच्या जगण्याची शक्यता फारच कमी आहे हे डॉ त्याला सांगतात. तर तो माणूस आपली ही व्याधी दुसर्‍या पेशंटला कोणतं गाणं म्हणून सांगेल?

चीर के देखे दिल मेरा तो
तेरा ही नाम लिखा रखा है

>>>>> नाही.

१३ बीमार मेरा दिल, मेरा जीना हुवा मुष्किल, करू क्या हाये!

ओ मेरी शर्मिली ...... बरोब्बर! Happy

गाण्यातली अतिशय दर्दी अशी स्त्री. स्वतःही उत्तम गाणारी. पण तिचं प्रेम बसतं ते नेमकं गाण्याच्या बाबतीत औरंगजेब असलेल्या माणसावर. काही दिवस चांगलं चालतं पण गाणं या विषयावरून दोघांचं बिनसतं आणि ते एकमेकांपासून दूर जातात. पण त्या स्त्रीला त्याची आठवण येतच राहते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?

हे राहिलय अजून.

Proud

मामे, हे गाणं ओळखायला माझ्याइतकी योग्य व्यक्ती दुसरी कोण असू शकेल?????

सजनाजी वारी वारी जाऊंजी मैं Biggrin

एका शिंप्याचं (किंवा न्हाव्याचं) नुकतच लग्न झालेलं असतं. त्याची बायको माहेरी गेली असते. पण दुकानात काम करताना त्याला तिची खुप आठवण येत राहते. तर तो कोणतं गाणं म्हणेल?

घारूअण्णा घरात एकटेच होते. जरा गार वारा यावा याकरता त्यांनी घराचे मुख्य दार उघडेच ठेवले होते. सोफ्यावर डोळे मिटून बसले असतानाच त्यांना जाणवले की कोणीतरी पटकन घरात घुसून टेबलावर ठेवलेला त्यांचा मोबाईल घेऊन पळतय. डोकावून बघितलं तर त्यांना दिसतं की ही तर समोरच्या रेल्वेच्या पुलावर राहणारी मुलगी. तर ते कोणतं गाणं म्हणून आरडाओरडा करतील?

Pages