..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुखसाना खुपच खुबसुरत होती. गल्लीतली सगळीच मुलं तिच्यावर मरायची. पण आदिलची तिच्याफार फार्फार म्हणजे फार्फारच मुहोब्बत होती. त्याला स्वत:ला रुखसानापाशी प्रेमाचा इजहार करायची हिंमत नव्हती. मग त्याने आपल्या बहिणीला - सुरैयाला - पटवले की तू रुखसानाला माझ्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला सांग. तर सुरैया रुखसानापाशी जाऊन कोणते गाणे म्हणेल?

>>> सांगू का? की अजून जरा थांबू? दिनेशदा आलेले दिसत नाहीयेत या धाग्यावर. ते लगेच ओळखतील हे गाणं. अजून जरावेळ थांबते.

एक मुलगी , " मी एक पेग घेऊन डोलायला लागले " हे तिच्या प्रियकराला कसे सांगेल ?>>>>>>>

मामी, पुढचं टाईपलं होतं. पोस्टलंच गेलं नाही. any way! पुन्हा लिहिते.
" ओ पिया ओ पिया 'ले'के 'डोली' आssssssssss!"

डॉक्टरांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधून त्याचं नाव ठेवलं "इश्क" !! पण डॉक्टरांना इश्क करण्याशिवाय काहीच येत नाही हे पाहून एकेक करून डॉक्टर्स त्यांना सोडून गेले. असच एक दिवस एक दिल का मरीज इमर्जन्सी केस म्हणून दाखल झाला. डॉक्टर आपले इथे तपास तिथे तपास असं करून वेळ मारून नेत होते. दुस-या चांगल्या हॉस्पिटलमधे न्या असं सांगणं त्यांच्या जिवावर आलं होतं.

डोक्टरांची गडबड पाहून पेशंटने ओळखल कि आपली इथं काही धडगत नाही. दुसरीकडे जायला पाहीजे. तो हे गाण्यात कसं सांगेल.

रुखसाना खुपच खुबसुरत होती. गल्लीतली सगळीच मुलं तिच्यावर मरायची. पण आदिलची तिच्याफार फार्फार म्हणजे फार्फारच मुहोब्बत होती. त्याला स्वत:ला रुखसानापाशी प्रेमाचा इजहार करायची हिंमत नव्हती. मग त्याने आपल्या बहिणीला - सुरैयाला - पटवले की तू रुखसानाला माझ्या प्रेमाला प्रतिसाद द्यायला सांग. तर सुरैया रुखसानापाशी जाऊन कोणते गाणे म्हणेल?

माझं गाणं होतं :

आ दिल से दिल मिला ले .... नवरंग सिनेमातलं.

सांजसंध्या...

कदाचित माझा अंदाज चुकत असेल, पण मरीजची सिच्युएशन पाहून या क्षणी तर मला एकच गाणे आठवते :

"तेरे 'इश्क' मे मर ना जाऊं कही,
तू मुझे आजमाने की कोशीश ना कर |"

सांजसंध्या, हे चालेल का ?
कंबख्त इश्क है ये, सारा जहां है ये
कब आता है,कब जाता है,
पर रहता है जबतक ये कंबख्त जन्नत दिखाता है !....

"तेरे 'इश्क' मे मर ना जाऊं कही,
तू मुझे आजमाने की कोशीश ना कर |".....हे पण सही !

@ मामी

रूखसाना, सुरैया या शब्दांना स्पेसिफिक अर्थ आहे का ? ते माहीत नसतील तर मग गंडणार ना लोक्स..

@ प्रतिक... लैच भारी !

मामी, कधी काळी आपण गप्पा मारत बसलो, तर बरीचशी गाडी कॉमन आवडीची निघतील. हे दिल से दिल मिलाले, इस दिल को घर बसाले, माझ्या आवडीचे. पण आता कुठे मिळत नाहीये ते.
सर्वच गाणी नायिका, संध्यांच्या तोंडी असली तरी हे तिच्या तोंडी नव्हते, त्यामूळे आशाने खुप वेगळा आवाज "लावून" गायलेय ते. चित्रीकरण पण खास. एकेका कडव्याला एकेक वाद्य, प्रामुख्याने दिसते.

@ रुणुझुणु

कंबख्त इश्क है ये, सारा जहां है ये,
पर रहता है जबतक ये कंबख्त जन्नत दिखाता है !....

सही आहे हे पण.. फिट्ट एकदम

@भरतजी
ये इश्क हाए बैठे बिठाए जन्नत दिखाए रे
हे पण सहीय्ये..

@प्रतीक देसाई
कदाचित माझा अंदाज चुकत असेल, पण मरीजची सिच्युएशन पाहून या क्षणी तर मला एकच गाणे आठवते :

"तेरे 'इश्क' मे मर ना जाऊं कही,
तू मुझे आजमाने की कोशीश ना कर |"

अंदाज अजिबात नाही चुकला.. माझ्या मनात हेच गाणं होतं..:)

दिनेशदा, ते गाणं इथे आहे बघा :
http://www.youtube.com/watch?v=4wi7Rypbix4

मामी, कधी काळी आपण गप्पा मारत बसलो, तर बरीचशी गाडी कॉमन आवडीची निघतील. >>> अगदी. पण तुमच्या गाण्यांच्या ज्ञानाला माझा ____/\____

कितीकिती फारशी माहित नसलेली गाणी तुम्हाला माहितेयत. अमेझिंग!

हे दिल से दिल मिलाले, इस दिल को घर बसाले, माझ्या आवडीचे. पण आता कुठे मिळत नाहीये ते.
सर्वच गाणी नायिका, संध्यांच्या तोंडी असली तरी हे तिच्या तोंडी नव्हते, त्यामूळे आशाने खुप वेगळा आवाज "लावून" गायलेय ते. >>>>> अगदी अगदी.

चित्रीकरण पण खास. एकेका कडव्याला एकेक वाद्य, प्रामुख्याने दिसते. >> हे निरिक्षण खास तुमचच दिनेशदा. पण तुमच्यामुळे ही दृष्टी मिळते आम्हाला हे काय कमी आहे?

रूखसाना, सुरैया या शब्दांना स्पेसिफिक अर्थ आहे का ? ते माहीत नसतील तर मग गंडणार ना लोक्स..

>>> त्यामुळे गंडले होय लोक्स. सॉरी हा. मी ते जरा मुस्लिम वातावरणनिर्मिती करता केलं... हम्म पण नावं नसती दिली तरी चाललं असतं. फक्त आदिलचं द्यायला हवं होतं.

@ सांजसंध्या ~ थॅन्क्स फॉर एनकरेजिंग. या धाग्यात मी प्रथमच भाग घेतला आणि चक्क पहिलाच प्रयत्न "विजेता'च ठरला.

@ मामी ~ आमच्याकडे आहे 'नवरंग' ची डीव्हीडी. त्यामुळे हे गाणे परत एकदा पाहिले. आशाताईंचा या गाण्यातील बैठकीचा 'खास टच' अगदी रोशन सातारकरांच्या अदाची आठवण करून देतो. मात्र गाण्यातील अभिनेत्री ओळखीची वाटत नाही, आय मीन, याना बापूंच्याच अन्य चित्रपटात कधी पाहिल्याचे स्मरत नाही (सहसा राजकमलची टीम फिक्स असते). सुरूवातीला मला थोडासा मिनू मुमताजचा (साहिब बिवी और गुलाम मधील एका मैफीलगीतात आहे) भास झाला. पण नाही.

नाव माहीत असल्यास इथे प्रतिसादात दिल्यास सर्वानाच कळेल.

मामी

सॉरी. कोड्यातला पंच मठ्ठ डोक्यात आत्ता शिरला. ही नावं दिली नसती तरी कोडं नसतंच सुटलं..! एनीवे, गाणंही माहीत नव्हतं.
दिनेशदा आणि तुम्हाला सॅल्युट

मामी परत एकदा थोडी अनोखी माहिती. अदिल हा मराठी शब्द आहे. ज्ञानेश्वरी मधे आला आहे.
आदिल कोण जो नोळखीजे.. अशी ओळ आहे.
एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित झाल्यास काही काळाने दोन्ही दिवे समान तेज देतात. त्यमूळे आधी कोणता दिवा पेटला होता (आदिल) ते कळत नाही असा भावार्थ.
ज्योत से ज्योत हे गाणे या ओवीवर बेतलेय. पण हा अर्थ त्यात नाही.

आदिल मराठी शब्द पण आहे? नवलच की. फारसीमध्ये आदिल म्हणजे जस्टीस किंवा ऑनेस्ट असं येतय. ह्म्म.....

जंतु. ... मला तर तुझं म्हणणं योग्यच वाटलं. Happy

अरे! सहीच आहे हा धागा!

आता एक मी सुचवून पहाते:

सुमन तिच्या मैत्रिणीच्या, विमलच्या, नव्या घरात प्रथमच जात असते. ती विमलला पत्ता विचारते तेव्हा विमल तिला सांगते की स्टेशनवर उतर आणि सावरिया जनरल स्टोअरच्या समोरच्या रस्त्याने ये. सुमन स्टेशनवर उतरते खरी पण जेव्हा ती बाहेर येऊन आजूबाजूला बघते तेव्हा त्या चौकाच्या चारी दिशांना एकेक सावरिया जनरल स्टोअर असतं. आता आपली अडचण ती विमलला कोणत्या गाण्यातून सांगेल?

"माझा प्रियकर इतका येडपट आहे. मी इथे रात्रभर त्याची आठवण काढत तळमळत असते (आणि त्याला फोन करायचही सुचत नाही.) काय उपयोग आहे या जगण्याचा?" असं ती स्त्री आपल्या मैत्रिणीला कोणत गाणं गाऊन सांगेल?

चाळ अगदी मोडकळीला आलेली. विशेषतः जिना तर अगदीच खिळखिळा झालेला. चालता चालता मध्येच एखादी पायरी सटकन तुटायची की माणूस डायरेक्ट खाली. अशी कितीतरी माणसं मेली होती. तरी चाळकर्‍यांना हाच जिना वापरण्यावाचून पर्याय नव्हता. तर असा जिना चढता-उतरताना ते कोणतं गाणं म्हणतील?

बरोबर.

ते आजोबा रोज संध्याकाळी बागेत नातवाला खेळायला घेऊन जायचे. तिथे येणार्‍या एका आजीबाईंवर त्यांचं प्रेम बसतं. ते रोज तिची वाट बघत बसायचे. ही गोष्ट नातवाच्याही लक्षात आली. मग एक दिवस नातवानेच यातून मार्ग काढायचं ठरवलं आणि सरळ आजीबाईंकडे जाऊन या परिस्थितीची जाणीव करून दिली. कशी? कुठलं गाणं गाऊन?

Pages