..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गल्लीतली ती गोरी गोरी मुलगी गावात लागलेला सिनेमा बघायला चालली होती. सिनेमा होता 'मिलन'. पण जाण्याआधी तिने एक दोन पेग घेतले होते. तर गल्लीतली मुलं तिला बघून कोणतं गाणं म्हणतील?

काल काय झालं की आपल्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि ती संपवायची नावच घेईनात. ममता बॅनर्जींना कोलकत्त्याला जायचं असतं म्हणुन त्यांचा जीव वरखाली होऊ लागला. अशा वेळी त्या कोणतं गाणं म्हणतील?

दरोडेखोर लिंबू, टिंबू आणि तंबूला किडनॅप करून पळतात. लिंबू-टिंबू खूपच घाबरलेले असतात. ते गप्प असतात. पण तो तिसरा जामच आरडाओरडा करत असतो. तर दरोडेखोरांचा सरदार त्याला मध्येच सोडून द्यायचं ठरवतो. तो ते आपल्या साथीदारांना कसं सांगेल?

काल काय झालं की आपल्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि ती संपवायची नावच घेईनात. शरद पवारांना आयपीएलची मॅच बघायची म्हणुन त्यांचा जीव वरखाली होऊ लागला. अशा वेळी ते कोणतं गाणं म्हणतील? (टीप पवारांना हिंदी गाणी येत नाहीत)

====
मला जाऊ द्या ना घरी अता वाजले की बारा...

दरोडेखोर लिंबू, टिंबू आणि तंबूला किडनॅप करून पळतात. लिंबू-टिंबू खूपच घाबरलेले असतात. ते गप्प असतात. पण तो तिसरा जामच आरडाओरडा करत असतो. तर दरोडेखोरांचा सरदार त्याला मध्येच सोडून द्यायचं ठरवतो. तो ते आपल्या साथीदारांना कसं सांगेल>>>...

इथेच टाका तंबू...

दोन मुलींचे अमर नावाच्या एकाच मुलावर प्रेम असते. त्यातली एक मात्र प्रेम करायला घाबरत असते.
===

तेरा मेरा प्यार अमर, फिर क्युं मुझको लगता है डर

Rofl

एक मुलगा असतो. तो खूप चांगला असतो. पण काय होतं कुणास ठाऊक. वाईट संगतीने बिघडतो. त्याला पाहून लोक काय गाणं म्हणत असतील?

लादेन ला कमांडो शोधत आले. तर त्याची बायको सामोरी आली. ती म्हणे माझ्या रुममधे तर कुणीच नाही, त्यावर कमांडो म्हणाले, बये आता तर सगळ्यांना माहिती आहे, तो इथेच आहे....

पण गाण्यात कसे म्हणतील ?

एक मुलगा असतो. तो खूप चांगला असतो. पण काय होतं कुणास ठाऊक. वाईट संगतीने बिघडतो. त्याला पाहून लोक काय गाणं म्हणत असतील?

======

अम्मा देख आ देख तेरा मुंडा बिगडा जाये

कुणी तरी ममता बॅनर्जीना प्लेबॅक द्या. क्लु : मला शरद पवारांच्या जागी ममतबाईना आणावं लागलं.
काल काय झालं की आपल्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि ती संपवायची नावच घेईनात. ममता बॅनर्जींना कोलकत्त्याला जायचं असतं म्हणुन त्यांचा जीव वरखाली होऊ लागला. अशा वेळी त्या कोणतं गाणं म्हणतील?

बबन आणि प्रिया यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम असतं. या प्रेमाची खुण म्हणून पुस्तकप्रेमी बबन आपल्या प्रेयसीला व्हॅलिंटाईन डेला एक 'प्रीत' नावाची मराठी कादंबरी गिफ्ट देतो. पण तिला ती कादंबरी कळतच नाही. तर बबन कोणतं गाणं म्हणेल?

कुणी तरी ममता बॅनर्जीना प्लेबॅक द्या. क्लु : मला शरद पवारांच्या जागी ममतबाईना आणावं लागलं.
काल काय झालं की आपल्या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि ती संपवायची नावच घेईनात. ममता बॅनर्जींना कोलकत्त्याला जायचं असतं म्हणुन त्यांचा जीव वरखाली होऊ लागला. अशा वेळी त्या कोणतं गाणं म्हणत

====

नवाची बी गाडी गेली, दहा ची बी गेली अता बारा ची गाडी निघाली, मला जाऊ द्याना घरी अता वाजले की बारा...

Pages