..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसरीया बालमा ओ जी, के बावरी बोले लोग
ना मै जिवती ना मरियो, बिरहा म्हारो रोग<<<

हो दिनेशदा. दोन वर्जन्स आहेत या गान्याची. दोन्ही आहेत माझ्याकडे. लेकिन मधली सगळीच गाणी सुंदर... सुरेश वाडकरांच्या आवाजात "सुरमई शाम इस तरहा"... तर प्रचंड अवडतं मला... Happy

@दिनेशदा ~ तूम्हे याद करते करते मधे खांब नाही दिसले का ?...

~ ही प्रतिक्रिया वाचल्यानंतर लागलीच परत ते गाणे पाहिले आणि खरंच एक नाही डझनावारी भाभू दिसले.

[शिरिष कणेकर म्हणतात, "मधुबाला जेव्हा भाभूला उद्देश्यून 'मुझे मुरली बना ले, ओठो से लगाले....पिया पिया" म्हणते त्यावेळी आम्हाला ओक्साबोक्शी रडू यायचे.]

Proud

दिनेशदा, हो ना. आणि प्रदिपकुमारच्या हातातली तलवार बघून आता तो कुठल्याही क्षणी कोथिंबीर चिरायला बसेल असं वाटायचं असेही निरीक्षण कणेकरांनी नोंदवलय. अफलातून सेन्स ऑफ ह्युमर!

अक्षरी, मला वाटतं माधव यांना "आज फिर "जीना" (जीने)की तमन्ना है..." हे गाईड चित्रपटातलं वहिदा रहमानचं गाणं हवं आहे.
http://www.youtube.com/watch?v=1odcNKyfZJU ते इथे मिळेल. mp3 हवी असल्यास संपर्कातून मेल करा. शोधून, डाऊनलोड करुन तुम्हाला पाठवेन...

भ्यँ!!!!!!!!!!!!! मोठ्ठा हंबरडा

दोनदा सांगून कोणी माझ्या कोड्याकडे बघितलही नाही... आणि त्याच त्या केसरीया बालमा च किती कौतुक चाललाय
ह्यँ!!!!!!!!!!!

मी निर्लज्ज पणे माझ घोड परत दामटवतोय

सांगा एका ळ दर्जाच्या डायरेक्टराने आपल्या पुत्राला एक य दर्ज्याच्या नवोदित नटी बरोबर लाँच केलेल्या चित्रपटातल हे गाण.

मला गॅसेस झालेत.
माझ डोक गरगरतय
माझ मन था-यावर नाही
मला नाही पण तुम्हालाही कळत नाही की मला काय होताय

"...ढोणीची सावळी बालमैत्रीण आपली ओळख गाण्यातून कशी करून देते? .."

"सगुण निर्गुण ढोणी विलक्षण..." अशी ?

>>क्युं चलती है पवन

अरेच्चा! हे गाणं एकदम फिट्ट बसतंय Proud गुगु, आता हे गाणं पाहिलं की तुमच्या ओळी आठवतील. ये तुमने अच्छा नही किया Proud

पण ते सबेरे वाली गाडीसे चले जायेंगे आणि वाली-सुग्रीव कॉम्बिनेशन काही कळलं नाही बुवा. Sad

चला....मीही एक प्रयत्न करून पाहतो :

राघू एक मैना पाहतो आहे आणि तिला रिझविण्यासाठी कोणते गाणे गाईल ?

तसे सोपेच आहे, पण चला स्टार्टर म्हणून ठीक समजतो.

अंजली
उत्तम

स्वप्ना
खरतर ते सगळ गाणच निरनिराळ्या आजारावर आधारीत हो ऊ शकत
खि!!!!!खि!!!!!खि!!!!!खि!!!!! (ही माझी सिग्नेचर ट्युन आहे)

आता अजून एक

अग अग म्हशी अग अग म्हशी
भेटताच तुला माझी झोप उडे कशी

.

>>राघू एक मैना पाहतो आहे आणि तिला रिझविण्यासाठी कोणते गाणे गाईल ?

ओ मेरी मैना, तू मान ले मेरा कहना, अभ मुश्किल हो गया जीना तेरे बिना

सुंदर सिलेक्शन. पण तरीही तुम्ही निवडलेला राघू थोडासा आग्रही/आक्रस्तळी वाटतोय. माझ्या मनी असलेला राघू लाघवी आणि सौम्य आहे. [तुम्हास नक्की आठवेल ते गाणे असा माझा कयास आहे.]

स्वप्ना
मलाही तेच गाण वाटल
पण हे बहुदा "एक डाल पर तोता बोले" आहे का?

माझ मगाचच कोड

अग अग म्हशी अग अग म्हशी
भेटताच तुला माझी झोप उडे कशी

क्लू: डब्ड फिल्म मधल हिट गाण

गुगु, माझ्याही डोक्यात ते गाणं आलं पण ही "मैना" म्हणजे "मै ना भुलुंगा" ह्या टाईप्समधली "मैना" असेल तर गाणं आठवणं मुश्किल आहे माझ्यासाठी. माधव __/\__

मिरा Happy

अशी मैने पासून बरीच गाणी येतिल

अरे जवा नविन पोपट हा ची हिंदी व्हर्जन तर नाही
मै तेरा तोता तू मेरी मैना

अरे हो पण तो पोपट लाघवी आहे ना

आता हे गाण

मी काडी मोड घेतलाय ज्याची मला लाज नाही कारण माझ दुस-यावर प्रेम आहे

Pages