..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमा, प्रेमा आणि शामा या तिघी मैत्रिणी त्यांच्या एक मैत्रिणीच्या घरी जातात. मैत्रिण खुप आदरातिथ्य करते. सामोसे, उपमा, सरबत, फळं. हेमा, शामा सगळं खातात. प्रेमाला फक्त सामोसे, सरबत आणि फळंच दिली जातात. का?

मामीच्या घरी पार्टी होती. मामीने कामवालीला संध्याकाळी बोलावले. ती आली खरी, पण आल्या आल्या म्हणाली, उशीर झाला, जाते मी.

तर ती आणि मामी मिळून, काय गाणे म्हणतील ?

एका राजाला दुनिया नावाची मुलगी असते. तिच एका सामान्य तरुणाशी प्रेम जुळतं म्हणून राजा तिला एका वेगळ्या महालात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. सबंध वेळ तिच्यावर लक्ष ठेवायला एक पहारेकरी असतो. तर तो तरुण त्या पहारेकर्‍याकडे जाऊन आपली बाजू कशी मांडेल?

एका स्त्रीला दुर्मिळ पशुपक्षी जमवण्याचा छंद असतो. एकदा तिला एक अतिशय दुर्मिळ असं हिरव्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लु मिळतं. ते घेऊन ती घरी येते. "आता याला कुठे ठेवावं बरं?" असा विचार करत असतानाच ते पिल्लु बोलतं "मला झोपायला एकदम मऊमऊ गादी लागते". तर आनंदाने ती स्त्री कोणतं गाणं म्हणेल?

एका माणसाच्या मित्राला एक छानसा सुट शिवून हवा असतो. हा आपल्या मित्राला स्वत:चा शिंपी सजेस्ट करतो. तो मित्र त्या शिंप्याकडनं सुट शिवूनही घेतो. मस्त फिट बसलेला असतो. तर तो माणूस खूश होऊन शिंप्याला काय म्हणेल?

घनश्याम अभ्यासात तसा यथातथाच. त्यातही त्याचं इंग्लिशचं स्पेलिंग फारच बोंबा! नेहमी जास्तीची लेटर्स शब्दांच्या स्पेलिंग्जमध्ये घुसवणार. एकदा शिक्षक त्याची स्पेलिंग्ज तपासत असताना त्यांना दिसतं की घनश्यामनं प्रत्येक शब्दात जास्तीचे i आणि o घालून ठेवलेत. तर शिक्षक त्याला त्याची चूक दाखवून देताना कोणतं गाणं म्हणतील?

मामी ...
सूट शिवायचं गाणं ( किशनकुमार द ग्रेट च्या पिक्चरमधलं)

अच्छा सिला दिया तूने मेरे यार का

नाही.

एका राजाला दुनिया नावाची मुलगी असते. तिच एका सामान्य तरुणाशी प्रेम जुळतं म्हणून राजा तिला एका वेगळ्या महालात कडेकोट बंदोबस्तात ठेवतो. सबंध वेळ तिच्यावर लक्ष ठेवायला एक पहारेकरी असतो. तर तो तरुण त्या पहारेकर्‍याकडे जाऊन आपली बाजू कशी मांडेल?>>>>>>>>..

ओ री दुनिया
सुरमयी आंखों के प्यालों की दुनिया ओ दुनिया
सतरंगी रंगों गुलाबों की दुनिया ओ दुनिया
Proud

लंबी दीवारे चुनवा दो
लाख बिछा दो पहरे
दुनिया क्या कर लेगी ?
बस कहते ही रहेगी
प्यार करने वाले
कभी डरते नही

नो.

Biggrin

हो ना, टायमिंग.

आता जरा तुम्ही लोकं सिच्युएशन टाका. मी एकटी किती डोकं चालवणार?

एक तरूण असतो. त्याची एक मैत्रीण असते. तो तिच्यावर एवढं प्रेम करत असतो की वाईट जमान्याने तिच्याकडे पाहून नये असं त्याला वाटत असतं. जमाना वाईट आहे असं तो तिला सांगत असतो आणि तिने नकाब घालून बाहेर पडावं अशी त्याची इच्छा असते. तर तो कोणतं गाणं म्हणेल?

एका स्त्रीला दुर्मिळ पशुपक्षी जमवण्याचा छंद असतो. एकदा तिला एक अतिशय दुर्मिळ असं हिरव्या रंगाचं कुत्र्याचं पिल्लु मिळतं. ते घेऊन ती घरी येते. "आता याला कुठे ठेवावं बरं?" असा विचार करत असतानाच ते पिल्लु बोलतं "मला झोपायला एकदम मऊमऊ गादी लागते". तर आनंदाने ती स्त्री कोणतं गाणं म्हणेल?

हे एक राहिलय अजून. एकदमच सोप्पं आहे.

ठमे हे फारच सरळसोट झालं ग. त्या गाण्याला एक वेगळं इंटरप्रिटेशन देईल अशी सिच्युएशन टाकायची.

निकलो ना बेनकाब, जमाना खराब है.

एक कुत्रा एका मुलीच्या मागे लागलेला असतो. ती जिथे जाईल तिथे तो तिच्यापाटून जातो. मग तिला हळू हळू तो आवडू लागतो. पण हा आपला कोण असा प्रश्न तिला पडतो. मग ती त्या कुत्र्याला काय म्हणेल?

Pages