..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, भारीये धागा. मला ते वरचं कोडं काय सुटत नाही पण कदाचित 'देवदास' मधलं असावं गाणं पण बोल आठवत नाहीत!

मोरे पिया डरता है देखो मोरा जिया- हे गाणं म्हणायचंय का ट्यागो तुम्हांला?
किरण्यकेनी लिहीलंय की वर. Happy

मामी,

गम कि दवा तो प्यार है,
गम कि दवा शराब नही
ठुकराओ ना हमारा प्यार
इतने तो हम खराब नही.

हे गाणे अपेक्षित होते. (अमानुष / आशा / प्रेमा नारायण आणि उत्तम कुमार )

दिनेशदा मी लिहिलय ते पण चालेल का? :वशिला लावणारी बाहुली:

बरं खास लोकाग्रहास्तव मी माझ्या त्या गाण्याचं उत्तर देते नाहीतर म्हणाल मामी जाम भाव खाते. Proud
तर ते गाणं आहे.

आजा सनम मधुर चांदनी मे हम तुम मिले तो विराने भी आ जायेगी बहार
झूमने लगेगा आसमान....
(इथे तिला हार्ट ट्रबल सुरू होतो म्हणून ...)
कहता है दिल और मचलता है दिल
'मोरे' साजन ले चल मुझे 'तारों' के पास
लगता नही है दिल यहा ......

खरंच का सिच्युएशन कमी पडली? मला वाटलं पुरेशी आहे. तसं असेल तर स्वारी लोक्स.

त्याबदल्यात हे घ्या:

एका शेतकरणीचं शेत जोमच धरत नसतं. तिचा प्रियकर तिला फारेनहून अमेरीकन फर्टिलायझर पाठवतो. ते येतं त्यावेळी तिच्या हातात नेमके पाव असतात. ते कुठे ठेवावेत या विचारात तिचा पाय चुकून काहीतरी वस्तुवर पडतो. तर ती कुठलं गाणं म्हणेल?

Rofl

तेरा खत लेके सनम
पाँव कही रखते है हम
कही पडते है कदम.

मामी, हे माझ्या लहानपणीचं गाण. आजकालच्या मूलांना ठावकी नसणार !

एका स्त्री डॉक्टरला आपल्याच सुनेचं एक कठीण ऑपरेशन करायचं असतं. सुनेला ऑपरेशनला आत घेऊनही जातात. बाहेर तिची आई अत्यंत काळजीत उभी असते. तेवढ्यात तिच्या मुलीच्या सासुबाई तयारीत येताना दिसतात. सुनेची आई आपल्या मुलीच्या सासुकरता कोणतं गाणं म्हणेल?

ओटीत (OT) घातली मुलगी विहीणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी बाई

Biggrin

'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?

एका मुलीला आपला प्रियकर मूर्ख आहे असं वाटत असतं ( नव-याबद्दल वाटतंच म्हणा ). ती त्याला डाकमधून अक्कल पाठवते. पण त्याला राग येऊ नये म्हणून तू मूर्ख जरी असलास तरी माझ्या काळजाचा तुकडा आहेस या अर्थाची समजूतही काढते..

या सिच्युएशन ला फिट्ट गाणं कोणतं ?

पतंगराव कदम मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमी पळतात आणि थांबतात..
आता थांबले वाटतं असं वाटतानाच पुन्हा ते चालू लागतात....

हे गाण्यात कसं सांगाल ?

पतंगरावांना (कदमांना) त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं कि आपला वंश वाढवत ने. जसजसा आपला वंश वाढत जाईल तसतसे ढोल ताशे वाजवून गाणी म्हणत .रहा...

ही शिकवण गाण्यात कशी सांगाल ?

पतंगराव कदम मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमी पळतात आणि थांबतात..
आता थांबले वाटतं असं वाटतानाच पुन्हा ते चालू लागतात....

कदमांच्या या चालीला काय म्हणाल गाण्यातून ?

हरलात ?

सुनील नावाचा शायर होता. ...ती पण मोठी गायिका होती. ती त्याला सुन्या म्हणत असे. तिच्या गाण्याचे कार्यक्रम होत. तिला प्रसिद्धी मिळाली याला काहीच नाही. एकदा सहज तो तिच्या कार्यक्रमाला गुपुचुप गेला. पाहतो तो काय....
ती त्याचीच गाणी म्हणून पैसे कमवत होती.. रागाने तो तिच्यापुढे उभा राहीला..

या सिच्युएशनला ती कोणतं गाणं म्हणेल ?

Pages