..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन लंगडे भिकारी त्यांच्या कुबड्या घेऊन नेहमी भीक मागायचे. पण एकदा ते झोपले असताना त्यांच्या कुबड्या चोरीला जातात. ते बर्‍याच जणांना विचारतात पण काही पत्ता लागत नाही. तर ते कोणतं गाणं म्हणतील?

दो बेचारे, बिना सहारे
देखो पूछ पूछ कर हारे
बिन ताले कि चाबी लेकर
फिरते मारे मारे.. व्हिक्टोरिया २०३

बरोब्बर दिनेशदा.

श्रीयुत मोरे यांच्या प्रेयसीला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तिला शहरातले ख्यातनाम हार्टस्पेशालिस्ट डॉ तारे यांची ट्रीटमेंट सुरू होती. एकदा तिने फोन करून मोरेला शहराबाहेरच्या एका ओसाड जागी भेटायला बोलावलं. छानशी पोर्णिमेची रात्र होती. तिने गाणं वगैरे म्हणायला सुरवात केली. तेवढ्यात तिच्या छातीत दुखायला लागलं. तर ती कुठलं गाणं म्हणत असेल /म्हणेल?

प्रेयसी आणि प्रियकर एका जिन्यात एकमेकाच्या डोळ्यात डोळे घालुन बसलेले असतात. अचानक ते स्वतःहा वाळवंटात गाण म्हणत असतात तर ते गाण कोणत असेल. Happy

मामी

मोरे, दिलबर (किंवा तत्सम), तारे, दिलका दर्द, पूनमकी रात ह्या शब्दांना मीटरमध्ये बसवलेलं कुठचंतरी गाणं आहे. बादवे शब्द मीटरमध्येच का बसवतात सेंटिमीटर / किलोमीटरमध्ये का नाही ?

श्रीयुत मोरे यांच्या प्रेयसीला हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तिला शहरातले ख्यातनाम हार्टस्पेशालिस्ट डॉ तारे यांची ट्रीटमेंट सुरू होती. एकदा तिने फोन करून मोरेला शहराबाहेरच्या एका ओसाड जागी भेटायला बोलावलं. छानशी पोर्णिमेची रात्र होती. तिने गाणं वगैरे म्हणायला सुरवात केली. तेवढ्यात तिच्या छातीत दुखायला लागलं. तर ती कुठलं गाणं म्हणत असेल /म्हणेल?

>>>>> ओळखा अजून. मग सांगेनच. Proud

जरा अजून डोकं चालवायचा प्रयत्न तर करा. सगळे शब्द एकत्र आणले तर सहज मिळेल गाणं. नाहीतर मी सोमवारी सांगेन. Happy

एका छांदिष्ट माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे गोंद (gum) गोळा करायचा छंद होता. त्याच्या मते त्याच्याकडे भरपुर गोंदसंग्रह होता. पण एके दिवशी तो एका गोंदाच्या प्रदर्शनात गेला तेव्हा त्याला कळले की इतरांनी इतके एकापेक्षा एक सरस गोंद गोळा केले आहेत की त्यांच्यापुढे त्याचा गोंदसंग्रह काहीच नाही. तो अफाट संग्रह पाहताना त्याला स्वतःच्या संग्रहाचाही विसर पडला. अशा वेळी तो कोणते गाणे गाईल?

त्याची म्हणजे त्या गमबाबाची, त्याला खराब वाटणारी प्रेयसी, त्याची प्रेमाने समजूत काढताना कुठले गाणे म्हणेल ?

एका जोडप्याला अ‍ॅक्सिडेंट होतो. दोघांनाही त्यात खुप लागतं. त्यांना हॉस्पिटलात आणल्यावर डॉक्टर सांगतात की दोघांवरही हृदयरोपणाची आणि रेटिनारोपणाची शस्त्रक्रीया करणं गरजेचं आहे. त्यावेळी एकच हृदय उपलब्ध असतं. तर ते त्या जोडप्यातला माणूस पटकवतो. नंतर योगायोगानं एकच रेटिना उपलब्ध आहे असं कळतं. तर ती बाई आपल्या नवर्‍याला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?

दिल दे के देखो, दिल दे के देखो, दिल दे के देखो जी...
दिल लेने वाले, दिल देना सिखो जी...

येस्स प्राची. ते आधीचं गाणं ओळखा की. सोप्पय.

दिनेशदा सिच्युएशन देऊन पसार झालेले दिस्तायत. उत्तर बरोबर आहे का ते कोण सांगणार?

तर एका बाईचा पेंटर दूर कामावर गेलेला असतो आणि तिकडे मोबाईलचे रेंज नसते म्हणून तो लँडलाईनवरून तीला कॉलतो तर ती बाई कोणत गाण म्हणेल?

Pages