..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. 'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची उर्दु मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?

२. भारत-चीन युध्दात काही चिनी सैनिकांना पकडून भारतातल्या तुरुंगात टाकलेलं असतं. पण त्यातले काही जण तुरुंगातून पळून जातात. तर हे त्या तुरुंगाचा अधिकारी त्याच्या बॉसला जाऊन कसं सांगेल?

२. चीनी कम है, चीनी कम है ........

१. त्ये गुलाबराव तितं ताटकळून र्‍हायलेत, त्येंच्याकडं त्येवडं बगा म्हंजे झालं. त्यात वरती एक हिंटही अ‍ॅड केली आहे.

'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची उर्दु मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?

>>>>>>> 'पांव' छू लेने दो फूलों को 'इनायत' होगी....

ओटीत (OT) घातली मुलगी विहीणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी बाई >>>>>>>>>>>>:हहगलो:

ओटीत.. ग्रेट !
गुलाबराव वरुन मला रोज वगैरे वाटत होते.

गांधीजी आणि हरिलाल बसले आहेत. हरिलालची आई बाहेर गेलीत. तिला भेटायला तिचा एक मित्र येतो. पण ती घरी नाही म्हणून लगेच जायला निघतो. तर त्याला थांबवण्यासाठी हरीलाल कुठले गाणे म्हणेल ?

धन्स दिनेशदा.

ठाडे रहियो ओ बा के यार रे ठाडे रहियो ...... Rofl मस्तच.
(तिथे स्वर्गात कस्तुरबांना काय वाटलं असेल नाही? Happy )

एका माणसाने एक कुत्रा पाळलेला असतो. त्याचं नाव ठेवलेलं असतं - मन. एकदा त्या माणसाकडे त्याचा एक मित्र येतो. मित्राकरता पाणी आणायला म्हणून तो माणूस आत जातो तेवढ्यात त्याचा मित्र कुत्र्याला खोलीतून हाकलून द्यायला बघतो. माणूस हे पाहतो आणि बाहेर येऊन मित्राला या कृतीचा जाब विचारतो. तर तो कुठलं गाणं म्हणेल?

एक आधी कधीतरी ऐकलेल्यातलं :

एक माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. उपचारादरम्यान त्याचं त्याच्या वॉर्डात काम करणार्‍या आयाशी प्रेम जमतं. तर तो कोणतं गाणं म्हणेल?

डोळ्याच्या एका डाक्टरणीने एक नवाच धंदा काढला. मरणोत्तर नेत्रदान केलेल्या मयताची ताबडतोब माहीती घेणारी यंत्रणा उभारली आणि ते डोळे गर्भश्रीमंत अंधांना देण्याचा घाट घातला. छान चाललं होतं, बडे बडे लोक येऊ लागले.. अ‍ॅड्व्हान्स तर घेतलेला असायचा.

मयताची माहीती मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. डेड बॉडी वेळेत मिळाली तर हायसं वाटायचं नाही मिळाली तर अस्वस्थ वाटायचं, भीती वाटायची..

सिनेमात डेड बॉडी ला उद्देशून नायिका (डाक्टरीण) कोणतं गाणं म्हणेल ?

अखिया चुराऊ कभी अखिया मिलाऊ, क्या तूने किया जादू
कभी घबराऊ, कभी गले लग जाऊ, मेरा मुझपे नही काबू
बिना पायलके बजे घुंगरु ???

मिलो ना तुम तो, हम घबराये
मिलो तो आंख चुराये,
हमे क्या हो गया है ?

एक माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. उपचारादरम्यान त्याचं त्याच्या वॉर्डात काम करणार्‍या आयाशी प्रेम जमतं. तर तो कोणतं गाणं म्हणेल?
>>>>>> बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है |

anjali_12 >> तेरा बिमार मेरा दिल...मेरा जिना हुआ मुश्किल बरोबर का?
दिनेशदा >> कौन आया मेरे मन के द्वारे, पायल कि झंकार लिये ... ?

हे दोन्हीही फिट होतायत तसे. Happy

श्रीयुत गोरे यांनी एका गुजराथी बाईशी लग्न केलं होतं. त्यांच्या मुलाच्या प्रेमात पडलेली मुलगी त्याला कसं बोलवेल?

Pages