१२ जानेवारी:
पहिली फेरी:
आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.
दुसरी फेरी:
आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...
काय गायला
काय गायला हा मुलगा येशील येशील राणी वा वा
कार्तिकीचं दुसरं गाणं मस्त झालं..भुवई सहज आणि मस्त खरंच.
मुग्धा नारायणा जब्बरदस्त गायली
आर्या ग्रेटच
प्रथमेशच कोळीगीत ढींग्च्यॅक झालं
पाचही मुलं
पाचही मुलं अंतिम फेरीत... आज कुणीही एलिमीनेट झालं नाही.
पण हे सांगण्यासाठी किती टाईमपास केला झी मराठी वाल्यांनी...
चला... झोपायला जातो आता... शुभरात्री!
टि आर पी
टि आर पी कसा वाढेल मग. अवधुत आणी वैशालीचे ते बोलने पण लिहीलेच होते असे वाटतेय. त्यांना माहीती होत बहुदा.
हि सर्वच पोर लै भारी आहेत.
मुग्धा इज
मुग्धा इज मनी मेकर मशीन ती कशी बाहेर जाईल???
शेवटच्या फेरीत तिला किमान ३/४ लाख एस एम एस...
१०-१२ लाख का सोडणार आयडीया???
पुनः प्रक्षेपण केव्हा असते? ई एस टी प्रमाणे??
धन्यवाद.
सगळेच
सगळेच फायनलला गेले ते खुप छान झाले. जेव्हा आर्या, मुग्धा १ आणि २ वर पोचल्या तेव्हाच मला अंदाज आला होता की बहुतेक आज कोणीच जाणार नाही, तसेच झाले.
आता ही फायनल लवकर घेतली म्हणजे झाले, नाहितर ही मुले अजुन खुप कंटाळतील.
कार्तिकी एकच भुवई कशी मस्त उडवत होती.:)
सगळेच
सगळेच फायनलला गेले ते खुप छान झाले. >>>> अगदी अगदी... पण हाच निर्णय त्यांनी मागच्या आठवड्यात घेऊन शाल्मली ला पण ठेवायला हवं होतं फायनल ला..
काल मुग्धाचं नारायणा रमा रमणा खूपच सही झालं !!!! आर्या पण नेहमी प्रमाणेच ग्रेट..
वसंतोत्सव
वसंतोत्सवात या सर्व मुलांना ऐकण्याचा योग आला.. प्रत्येकाने अप्रतिम सादरीकरण केले होते..
प्रथमेश ने 'बगळ्यांची माळ ' आणि 'दत्ताची वारी' या दोन्ही गाण्यातुन धमाल आणली..
रोहीतचे 'अबीर गुलाल..' अप्रतिम
कार्तिकीचे 'मन सुद्ध तुझं..' पण मस्त..
मुग्धाचे '...' (मीच शब्द विसरलो, 'गोविन्द..' असे काहिसे आठवते...) सुद्धा अप्रतिम (शेवट तर झकास)..
आर्याचे 'ए मेरे वतन के लोगो' पण सुरेख.. (आता विशेषणे संपली..)..
उशीर झाल्यामुळे एक एक गाणे राहुन गेले माझे... पण ती सगळी गाणी पण मस्त झाली होती यात शंका नाही.. नाना तर वेडा झाला होता..
कालच्या
कालच्या एपिसोड मध्ये तर पोरांनी काय धम्माल केलीए... वा! कार्तिकी अप्रतिम गायली... नवरी नटली गं काल बाई सुपारी फुटली.... जबरदस्त ऍटिट्यूड .....
सगळेच विनर होण्यातले आहेत...
मुग्धा चे
मुग्धा चे गेले दोन परफॉर्मन्स खूपच छान झाले.. किम्बहुना मला तर आर्यापेक्षा जास्त आवडला.


दुर्दैवाने, स्पर्धा जशी अंतीऊम टप्प्यात पोचते आहे तसे आर्याच गाडीतल पेट्रोल सम्पतय अस वाटतय.. फारच थकलेली गाते.. सूरही सुटतायत आधीपेक्षा आणि माणिक वर्मा स्कॉलरशिप मिळाल्यापासून जास्तच नाकात गात आहे का..?
असो. प्रथमेश ने आता बोर केलय्..कारण शास्त्रीय, नाट्यगीत स्टॉक सम्पत आलाय.. त्याचा सर्वात मोठा drawback म्हणजे सगळी गाणी तशीच flat, एकसूरी पेश करतो.. (हरीजीन्नी हे सांगितले). अगदी ढिम्म हलत देखिल नाही गडी.
रोहीत मि आधी म्हटले तसा खूप व्हरसटाईल आहे अन गेल्या दोन तीन आठवड्यात प्रचंड सुधारलाय (सूरांच्या बाबतीत).
मला वाटत सुर, ताल हे जितके महत्वाचे आहेत तितकेच प्रत्येक गाण गायक कशा पध्धतीने पेश करतोय, त्याची आवश्यक treatment पकडतोय का, शब्दफेक भावानेनुसार बदलते आहे का, अगदी body language सुध्धा महत्वाची ठरते. उदा:"एक चतुर नार" गाण पेश करताना लागणारी body language, energy प्रथमेश नाही पेश करू शकणार..
शेवटी रोहीत, मुग्धा, आर्या तिघे रहातील असे वाटते. आणि मग पुन्हा परत एकदा मुलगा व मुलगी यांच्या गाण्यात एकूणच तुलना होवू शकत नाही असे "डोळे उघडल्यावर" काहीतरी स्टंट करून दोघानाही विजेते करतील..
my picks will be: Rohit and Arya.
त्यात
त्यात कार्तिकी, कडवे संपताना म्युझिशियन्स कडे हात करुन "हेsssssss" ओरडत होती ते पाहून तिच्या आत्माविश्वासाचे नवल, कौतुक वाटले आणि नंतर हसून हसून पुरेवाट झाली.

----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
आणि तिचा
आणि तिचा टोन थोडासा वेगळाच आहे त्यामूळे ते गावरान गाणं एकदम खुलवून गायली....
आशू, अगदी
आशू, अगदी अगदी. मी आत्ता मैत्रिणीशी कार्तिकीच्या "हेSSS" बद्दलच बोलत होते.
.
.
'ग्रीन फ्ल्युरोसंट प्रोटिन' च्या शोधाबद्दल्'नोबेल' (२००८) - जपानी संशोधक ओसामु शिमोमुरा
अगदी आशु.
अगदी आशु. ते हातवारे मस्तच होते तिचे. कॉन्फिडंन्सही मस्त आहे तिचा फक्त तिने भाषा जरा सुधारावी असे वाटते, अजुन लहान आहे सुधारेल हळुहळु.
आर्याचे 'चमचम करता' पण मस्तच झाले.
पण आर्याने
पण आर्याने माझ्यामते ते गाणं अजूनी ठसक्यात म्हणायला हवं होतं. अगदी मिळमिळीत वाटलं मला...
काल मस्तच
काल मस्तच गायले सगळे!

प्रथमेशचं 'सुरत पियाकी...' तर वा!
आर्याकडून 'चमचम'ची अपेक्षा नव्हती, त्यामुळे मस्त सर्प्राइज मिळालं आणि ती म्हणालीही छानच ते गाणं. वैशालीबाईंनी 'अजय-अतुल लाईव्ह्'ची भरपाई केली
काल त्या मानानी रोहीतच फिका वाटला..
माझे नंबर असे- आर्या, प्रथमेश, कार्तिकी, मुग्धा, रोहीत
------------------------------------------
चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो!
आर्याचे
आर्याचे चमचम करत हे गाणे ओरिजिनल पेक्षा उत्कृष्ट वाटले. वैशालीने त्यानंतर गाऊन तिच्या मर्यादा उघडया पाडल्या. अजिबात चढत नव्हता आवाज.
(No subject)
>>तिच्या
>>तिच्या मर्यादा उघडया पाडल्>> संपदा...
संपदा..आर्य
संपदा..आर्याचे चमचम करत हे गाणे ओरिजिनल पेक्षा उत्कृष्ट वाटले. वैशालीने त्यानंतर गाऊन तिच्या मर्यादा उघडया पाडल्या. अजिबात चढत नव्हता आवाज. >>>>
एकदम पटलं. वैशालीपेक्षा नक्किच चांगली गायली आर्या.
माझ्या मते final ला आर्या आणि कार्तिकी ह्यांमधे काहितरी एक निर्णय लागेल, पण mostly आणि माझ्यामते सुद्धा आर्या बाजी मारणार. she deserves it.
गेले दोन
गेले दोन दिवस काहीच नवीन झाले नाही?
बहूतेक
बहूतेक लोकांना हा धागाच सापडत नव्हता
***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?
झाले ना...
झाले ना... दोन भाग झाले!
रोहीत ने म्हटलेले अजय-अतुल कम्पोजिशन भिडले अक्षरश: !\
आता मला असेवाटायला लागलेय की रोहीतच घेऊन जाईल !
कार्तिकीचेही पर्फॉर्मन्स अगदी जबरदस्त होताहेत! काल पहिल्या गाण्यात मुग्धा अगदीच पडेल गायली पण दुसरे गाणे जीव ओतून केले.
_________________________
-Impossible is often untried.
गेले
गेले दोन्ही एपोसोड मस्तच झाले...
मिले सुर मेरा तुम्हारा पण लई भारी !!!
आर्या सही गात्ये एकूणात आणि कार्तिकी पण...
मुग्धा मधेच कधितरी ढेपाळते...
रोहीत च ते अजय अतूल वालं गाणं मस्त झालं एकदम..
मुलांना
मुलांना आता गाण्यांचा ओवरडोस होतोय असं वाटतंय... एक आर्या सोडली तर कोणाच्याही गाण्यात सातत्य नाहीये...
-योगेश
कार्तिकीन
कार्तिकीने धम्माल केली परवाच्या एपिसोडमध्ये... "लिंगोबाचा डोंगर...." अशक्य गायली.
शिवाय नवरी नटलीच्या फर्माईशीने तर तिच्या परफॉर्मन्सला चार चांद लागले...
मला पण आता
मला पण आता वर्सटाईल सिंगर आहे म्हणून रोहितलाच विजेता बनवतील असं वाटायला लागलंय... अर्थात आर्याची तगडी कॉम्पिटीशन आहेच.. प्रथमेश अगदीच दमल्यासारखा गायला लागलाय.. कार्तिकी आणि रोहीतने स्वतःला परफॉर्मर म्हणून सिद्ध केलंय..
मला आत्ता
मला आत्ता भारत वारीत २ -३ भाग पहायला मिळाले. त्यात मला तीनही मुली मुलांपेक्षा आवडल्या.
लघाटे का माहीत नाही पण अजिबात भावला नाही. बोर झाले त्याचे ऐकताना. रोहीत ठीक. एक चतुर नार मधे शेवटचा घोडे-चतुर वाला तुकडा आवडला. काहीकाही गाण्यात शब्दांवर नको तितका जोर देतो असे वाटले. पण मी बाकी काही पाहिलेले नसल्याने हेच भाग बघुन लिहिले आहे (कदाचीत ते दोघे जास्त चांगले असतीलही).
पण कार्तिकी आणि आर्या फार आवडल्या. गुप्तेसाहेब ठीक पण सामंत बाई नको हव्या होत्या.
माझ्या
माझ्या अल्पमतीनुसारः
खरं तर गुणवत्तेच्या बळावर सर्वच जण आपापल्या जागी विजेते आहेत. अर्थात मुग्धा इतकी लहान असूनही इतक "मोठं" गाते हा कौतुकाचा भाग जास्त आहे पण उर्वरीत चारातः
१. कार्तिकी: लोकगीत, भक्तीगीत, unconventional गीते यात तीचा आवाज, भाव, सूर, range, हे सर्वांच्यात अधिक चांगले आहे.immense confidence in self abilities and capability हा एक प्रचंड मोठा गुण तिच्यात आहे.
२. आर्या: अर्थातच गीत संगीताचा पक्का बेस असल्याने सर्व प्रकराची गाणी तितक्याच ताकदीने ती पेलते. शिवाय प्रत्त्येक गाण्याला आवश्यक असणारी, treatment, voice modulation, आणि भाव हे तिने चांगलेच आत्मसात केले आहे. पण गाणे गाताना ती एन्जोय करते आहे असे अलिकडे वाटत नाही, उलट अवघड गाणे "गावूनच" दाखवायचे असा एक त्रासिक प्रयत्न, दडपण तिच्या चेहेर्यावर मला दिसतं, which is quite worrying..
३: प्रथमेशः शास्त्रीय, नाट्यगीते या प्रकारच्या गाण्यांमधे त्याला विशेष अंग आहे.. technically perfect but could do better with "expression and presentation" of any song. good singer for conventional mehefil setting..
4: रोहीतः सुरुवाती चा आणि आत्ताचा यात खूप फारक पडलाय. प्रचंड सुधारणा आहे. स्वताची energy गाणं गातना कशी channelize करायची हे तंत्र बहुदा त्याला आता अवगत होवू लागलय..(बहुदा ओंकार साधना शिकवलेली दिसतीये गुरुन्नी) मला त्याची सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे, प्रत्त्येक प्रकारचे गाणे तो गायचा प्रयत्न करतो, खास स्वताच्या पध्धतीने ते पेश करतो, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व गाणि तो enjoy करतो असे वाटते. definitely a performer and playback singing material..
त्यामुळे खरं तर आर्या आणि रोहीत आपापल्या जागी विजेते आहेत.. मुलगा अन मुलगी यांच्यात मुळातच संगीताच्या बाबतीत स्पर्धा, तुलना होवू शकत नाही त्यामुळे दोघांन्नाही त्या त्या category मधे विजेते घोषित करायला हरकत नाही.
पण, परंतु, शेवटी सर्व "समस" चा मामला असल्याने इथेही काहीही होवू शकते.. srgmp मोठ्यांच्या स्पर्धेत नुकतेच घडले तसे. तेव्हा सूज्ञास अधिक सांगणे न लगे..:)
कालचा
कालचा एपिसोड भावविवश!


मुलांनी जयोस्तुते म्हटलं तेव्हा अक्षरशः काटा उभा राहिला अंगावर..! आणि त्यात स्वा.सावरकरांची चित्रे! अहाहा..
पंडितजींनी प्रत्येक गाण्याविषयी जे स्पष्टीकरण दिलं ते खरोखर माहितीपूर्ण..त्यांचे वक्तॄत्वही अत्यंत ओघवतं आणि श्रोत्यांना गुंगवून टाकणारे आहे.
पल्लवी रडलीच असती काल पण त्यांनी किती छान शब्दात तिची समजूत काढली.."हा कार्यक्रम वीररसाचा आहे. शूरा मी वंदिले असं नावच आहे. त्या वीरांना प्रणाम करायचा आहे. तेव्हा तुम्ही भावुक होऊ नका नेहमीसारख्याच हसत हा कार्यक्रम पुढे न्या." छानच. नाहीतर हिंदी कार्यक्रमांसारखा काल "प्लॅन्ड मेलोड्रामा" होतोय का काय अशी भीती वाटत होती.
रिपीट टेलीकास्ट ही पाहणार!
अजून एक. आपण इथे रोज लिटिल चॅम्प्स विषयी बोलतो, कौतुक करतो पण पल्लवी, अवधूत आणि वैशाली हे लोक ज्याप्रकारे हा कार्यक्रम हाताळतात (खासकरुन पल्लवी व अवधूत.) त्यामुळे मुलांना अजिबात भीती, टेन्शन वाटत नाही. स्पर्धेचं दडपण येत नाही. एकमेकांबद्दल स्पर्धा असूनही द्वेष/ मत्सर न वाटता(हे शब्दही या मुलांसाठी अयोग्य वाटतात.) ही स्पर्धा निकोप होते. अतिशय खेळीमेळीचं वातावरण अन आपुलकी, प्रेम जिव्हाळ्याचं जे नातं यांनी निर्माण केलंय त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात!
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!!
लिटल
लिटल चॅम्प्स सुरू झाल्यापासून सगळ्यात कंटाळवाणा भाग झाला कालचा.. शिव कल्याण राजा चीच प्रसिद्धी चालू असल्या सारखे वाटले.
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो
Pages