सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>मी_योगी,
सगळ्यांची सगळी मते पटली पाहीजेतच असे नाही मात्र पंडितजींना - तुकाराम ओंबळेंसारख्या वीरश्रेष्ठांना सरकारच्या नालायकपणामुळे ए.के.४७ चा केवळ लाठीने सामना करावा लागला आणि होतात्म्य आले - अशा "प्रकारचे" हौतात्म्य मान्य नाही (त्याची चीड येते) - अस अभिप्रेत असावे.

सरकारचा नालायकपणा हे कारण एकदम मान्य. पण म्हणून काठीने सामना करुन शहीद झालेल्यांचं हौतात्म्य नाकारणं म्हणजे कृतघ्नपणा झाला. जरा विचार करा त्या वीराच्या घरच्यांना हे वाक्य ऐकून कसं वाटलं असेल. किंवा अगदी पुढे जाउन असाही विचार करुन पहा की जर त्यांनी "हातात फक्त काठी घेऊन मी अतिरेक्यांच्या समोर कसा जाऊ?" असा विचार केला असता तर...

-योगेश

लिंक अपडेट केली आहे. असा काही खुप खास लेख नाही पण कार्तिकी गायकवाड बद्दल थोडीफार अधिक माहिती मिळेल.

ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग (महाअंतिम फेरी) कधी आहे?

श्री. आगाऊ, माझा पोस्ट नीट वाचा. विरोधी मते लिहील्याने नव्हे तर ही ती जागा नव्हे म्हणून मी सगळे (माझ्या सकट) पोस्ट उडवा/हलवा अशी विनंती केली आहे. आणि पुन्हा माझी तिच विनंती नियामकांना असेल.
>> आधीच सांगतो 'वाद वाढवण्याचीच मला इच्छा आहे'.
मग तो योग्य जागी वाढवा. आजवर धादांत खोटे ईतिहास लिहून क्रांतिकारकांच्या कार्याचे अवमूल्यन कोणी केल हे सर्वज्ञात आहे. आणि "हे" आपले, "ते" त्यांचे अस ईथे कोणाच्याही मनात नाही - ह्या राष्ट्रासाठी झटणारे सगळे आपलेच - ह्यालाच आम्ही ज्वलंत राष्ट्रवाद म्हणतो आणि तो तथाकथित वरुन सर्वमान्यत्वाकडे गेला की २६/११ सारखे प्रसंग घडणारच नाहीत.
स्वप्निल, तुमच म्हणण पटल (पंडितजींचा "लाठीनिर्देश" कुठे होता) त्यामुळे मी_योगींच म्हणण मला पटूनही संदर्भ बदलल्याने ती चर्चा निरर्थक होते.

स्वप्नील ,
>>>>>
admin/वर्षा,
मी तुमच्या मताशी सहमत नाही. एवढ्या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही बोर झालो म्हणता, मला आश्चर्य वाटतं. शंकर महादेवनने असे काय मोठे केले. प्रत्येक गाणार्‍याचे जाउन पापे घेतले..लोकांनाही पहायला आवडलं आणि मलाही. गेले ६ महीने त्यांच असंच कौतुक चाललंय, अर्थात ते कौतुकास पात्र आहेत याबाबत दुमत नाही. >>>

तूम्ही जी वरील पोस्ट लिहीली आहे ती कोणाला उद्देशुन? Lol कारण admin ने ह्या बी.बी. वर काही लिहील्याचे मला तरी दिसत नाही आहे. आणि वर्षा म्हणजे varsha11 मी नाही हे मी clear करते.. कारण मला हा कार्यक्रम खुप आवडला हे मी खुप पुर्विच लिहीलेले आहे. मागच्या पोस्ट बघा. Wink
वर्षा

महान्तिम फेरी, ८ february. 2009, Mumbai...
I guess tyache live telecast dakhavnaar aahet...but, that I don know exactly...

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

नियामक/admin,
samuvai ला अनुमोदन... असंबंधीत पोस्ट्स इथून उडवा/हलवा.
ज्यांन्ना साड्या, काठ्या, लाठ्या, देशप्रेम, मंगेशकर, इत्यादी विषयांवर चर्चा करायची आहे त्यांची सोय होईल आणि फक्त सारेगमप मधिल गीत्-संगीत, आणि मुलांचे गाणे त्या अनुशंगाने ज्यांन्ना इथे मते मांडायची आहेत त्यांचा रसभंग होणार नाही.
त्याखेरीज इथे या बीबी वर कुठल्याही स्पर्धकाचे चित्र, पोस्टर, वा व्हिडीयो टाकायला परवानगी दिली जावू नये अशी वैयक्तीक विनंती कारण ते सर्व नेट वर उपलब्ध आहेत.. इथे केवळ लिंक देवून पुरेसे होईल.
आभारी!
ps: DJ, nothing personal, looks like our posts crossed... when I had uploaded my post, it didn't show your post with the poster- however cute that is Happy

योग च्या पोस्ट ला १०० % अनुमोदन..

विशेषत:
"ज्यांन्ना साड्या, काठ्या, लाठ्या, देशप्रेम, मंगेशकर, इत्यादी विषयांवर चर्चा करायची आहे त्यांची सोय होईल आणि फक्त सारेगमप मधिल गीत्-संगीत, आणि मुलांचे गाणे त्या अनुशंगाने ज्यांन्ना इथे मते मांडायची आहेत त्यांचा रसभंग होणार नाही. " ह्याला...

आणि

"त्याखेरीज इथे या बीबी वर कुठल्याही स्पर्धकाचे चित्र, पोस्टर, वा व्हिडीयो टाकायला परवानगी दिली जावू नये" ह्याला...

जिंकली ना ती वैशाली.. झालं की पुरे आता... Uhoh

महागुरू,
लींक बद्दल धन्यवाद! बाकी अशा लेखांचं टायमिंग हे आता महाअंतिम फेरी जवळ आल्याने निश्चीतच "संशयास्पद" वाटतं.. विशेषतः शेवटचे दोन परिच्छेद! पण तो वेगळा विषय! Happy
कार्तिकी बद्दल एकूण चांगली माहीती आहे त्यात... "संशय" दूर करण्यास या लेखामागील बोलवित्या धन्याने इतरही स्पर्धकांबद्दल अशीच माहिती दिलेली/लिहीलेली वाचायला आवडेल..

संशयास्पद का?
मला तर सगळेच चांगले वाटतात आणि एव्हाना प्रत्येकाचा चाहतावर्ग तयार झालेला आहे. शिवाय कोण किती पाण्यात आहे हे बहुतांश जाणकारांना माहिती झालेले आहेच. त्यामुळे अशा लेखाचा लोकांच्या मतदानावर परीणाम होईल असे वाटत नाही. शिवाय हा लेख लोकमत च्या सखी विभागात होता. (किती लोक हा फेकमत वाचतात ते माहिती नाही)
असो, इतर स्पर्धकाबद्दल पण मटा मधे माहिती आली होती, तुम्हा सर्वांनी वाचली असेलच. ज्यांनी वाचली नाही, त्यांच्या साठी हि लिंकः http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/msid-3755507.cms

>संशयास्पद का?
>>लेखांचं टायमिंग .. त्याचा कार्तिकीमय फोकस.. Happy
असो. पाचही जण विजेते आहेत आपापल्या विशीष्ठ ढंगात असं मी आधिच म्हटल आहे..

adm,
तुम्हीच तर दिली मला पोस्टर ची आयडिआ, अता बसा गप्प Biggrin
तसही वैशाली जिंकली त्याचा इथे काय संबंध, तुम्ही विषय भरकटवता फक्त .., वैशाली, भारत पाकिस्तान, हिंदी सारेगमप असले विषय इथे घेउन येता आणि म्हणे फक्त लिट्ल चँप विषयी बोला, मोठ्ठा जोक !:)
असो, ऍडमिन नी सांगितल तर करीन मी डिलिट!
योग,
Its ok, We all have our own opinions about what to post, So no misunderstanding at all and thanks for appreciating anyways!

दिपांजली, सही पोस्टर आहे!! लगे रहो. Happy
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आत्ताच सारेगम मराठीच्या साईट ला भेट दिली. तिथे ह्या स्पर्धेचे नियमावली पण आहे. नेहमी दाखवतात त्या साप-शिडी बद्द्दल त्यात काही लिहले नाही. स्पर्धा संपत आली पण त्या सापशिडी चे गुढ काही कळाले नाही.

महागुरु,
अहो गूढ वगैरे नाहीये ते - सोप्प आहे. अंतिम गुण आधीच ठरलेले असतात (समस + परीक्षक) आणि साप त्यानुसार "ऍट्जस्ट" केलेले असतात.

आजचा महाअंतिम फेरी आधीचा शेवटचा आठवडा... Sad (बरं झालं इथले "प्रकार" शेवटच्या आठवड्यातच सुरू झाले.. आधीचे इतके आठवडे चांगले गेले.. !)

प्रमुख पाहूणे म्हणून प्रशांत दामले, सचित पाटील (हा हल्ली काय करतो?? मागे एक हा असा धागा सुखाचा मधे होता.. ! ) आणि बांदेकर भाऊजी आणि वहिनी साहेब.. Uhoh
आणि हो हर्षवर्धन पाटिल पण.. Happy
आदेश बांदेकर वर सचिन च्या संगतीचा फारच परिणाम झालाय.. काय काय बोलत होता... !!!!
(किंवा उलटं झालेलं असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.. Happy )

प्रशांत दामले सुरुवातीला छान बोलला.. आम्ही इथे बडबड करत बसण्यापेक्षा आपण मुलांची गाणी ऐकूया, शब्द ऐकूया, त्यांच्या चेहेर्‍यावरचे हाव भाव पाहूया... ("Looks" नाही बर्का.. ) ते सगळेच आमच्या पेक्षा सिनियर आहेत.. !
पण प्रशांत दामले गायबच झाला मधेच.. कार्यक्रमाच्या शेवटी नव्हताच.. !

रोहीतच पहिलं गाणं लोकल ट्रेन मधे ऐकल्याचं आठवतय मागे.. Happy
मुगधाचं दिंडी चालली मस्त झालं !!! तिच्या नेहमीच्या style पेक्षा थोडं वेगळं...
आर्या नी निवडूंग मधलं गाणं छान म्हंटलं...
प्रथमेश च्या घेई छंद मकरंद चा सुरूवातीचा आलाप ऐकून मला आधी वाटलं की तो रामा रघूनंदना च म्हणतोय.. Happy खूप मस्त म्हंटलं त्याने ते... Happy

कार्तिकी चं दुसरं गाणं परत तिच्या वडिलांचं होतं.. माहितीचं नव्हतं आणि खूप अपिल पण नाही झालं.. Sad
मुग्धाचं दुसरं गाणं "हूरहूर असते तीच ऊरी" पण लई भारी होतं !! तिच्या वयाच्या मानाने खूप समजून गायल्या सारखी वाटली ..

आर्याचं नरवर कृष्णा समान simply superb !! ती नाट्यसंगीत सहीच म्हणते.. मागे युवती मन दारूण पण जबरी गायली होती... ते मी already सुमारे १00 वेळा ऐकलय.. पण आज परत एकदा युट्यूब वर शोधून ऐकलं.. Happy

रोहीत नी विंचू चावला मधे धमाल आणली एकदम.. मधले ते गावठी डायलॉग एकदम perfect म्हंटले... Happy

प्रथमेश नी शेवटचं closing "घनघन माला" छान म्हंटलं..

महाअंतिम फेरीची ऍड मस्त केलीये एकदम.. RDB चं म्युझिक सुट होतय छान...
एकूण साधा सिंपल एपोसोड छान वाटला आज... !!!

त्यांना कोणा मंगेशकरांची गरज नाही. >>

आगाऊ, आंधळा विरोध म्हणतो ना तो हाच. मगंशेकरांबद्दल जास्त लिहायची मला गरज नाही. त्यांचे कर्तूत्वच बोलते. पण पाहयाचे नाही असे ठरवील्यावर कुठला वाद घालनार? Happy त्यांची गणना 'कोणी' मंगेशकर अशी होउ शकत नाही मित्रा. Happy

आता तुझा मुद्दा.
व्यक्तीपुजेचे गाणी मंगेशकरांनी दिले नाहीत. मग ती सावरकरांची व्यक्ती पुजा असली असती तरी दिले नसते. अपवाद शिवाजी वरची जयदेव जयदेव सारखी मोजकीच दोन गाणी.
आंबेडकरांवरची सर्व गाणि व्यक्तीपुजेवरची आहेत. शिवाय बहुतेक सर्व गाणी ही हिंदी गाण्यांची चाल लावून बिभित्स केलेली आहेत. ऋदयनाथ तशी गाणी देऊच शकले नसते.

मुळात व्यक्तींवर गाणी फक्त आंबेडकरांवरच जास्त लिहीले जातात. सावरकर, गांधी, विनोबा, टिळक, आगरकर, नेताजी, नेहरु, पटेल, मौलाना, इंदिरा गांधी अश्यांवर नाही हे तू लक्षात घे. त्या दिवशीच्या कार्यक्रमात शिवाजी ह्या व्यक्तीवर किती गाणे होते व त्यांचा काळातल्या घटनांवर किती होते हे पण पाहा.

गाण्याच्या संदर्भ आहे, आणी मंगेशकर 'टाकावू मध्ये टाकन्यासारखे नाहीत म्हणून लिहीले. बाकी चालुदे.

(आंबेडकरांची गाणी बरेचदा ऐकलेला) केदार.

आजचा एपीसोडही आवडला.
मुग्धा ने 'पालखी' डोळ्यासमोर आणली. त्याबद्दल तिचे अभिनंदन.
विलंबीत मधील घेई छंद - क्या बात है.
कार्तिकी ने दुसरे गाणे लक्षात ठेवता येईल असे घ्यायला हवे होते कारण त्यावर समस अवलंबून आहे. मला तरी ती आवडते Happy मुख्य म्हणजे तिचा ऑडियन्स इतर गायकांपेक्षा जास्त असनारा आहे. सामान्य मराठी माणूस. ती लोकं समस करतीलच असे नाही. त्यांना मस्त बांधून ठेवले आहे तिने.

आर्याचं नरवर कृष्णा समान simply superb > सहमत. काय म्हणली ती.
रोहित पण मस्त.

आर्या, कार्तिकी किंवा प्रथमेश कोणीही महाविजेता झाला तरी चालेल. पण कार्तिकी झाली तर आनंद पोटात माझ्या माईना होईल. Happy

aagaau
तुम्हीच म्हणताय ति "त्यांची" गाणी आहेत म्हणून आणि तुम्हालाच वाटतं ते देशभक्तीपर गीत म्हणून दाखवायला पाहीजे. अहो गाणी "ह्यांची" असो वा "त्यांची" हा विषय होता का? आणि जरी समजा असतील तरी ती चांगली चाल लावलेली असायला हवी ना, तर ती कार्यक्रमात येतील.
का ईथेही आरक्षण हवे?

केदारभाऊ आणी स्वप्निल तुम्हा दोघांनाही तुमच्या खरडवहीत उत्तर दिले आहे.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

केदारभाऊ आणी स्वप्निल तुम्हा दोघांनाही तुमच्या खरडवहीत उत्तर दिले आहे.
>>>> हे बरे केलेत, बाकी लोकही असेच करतील ही अपेक्षा Happy

कालचा एपिसोड छान झाला. मला सगळ्यांची गाणी आवडली. तरीही आर्या आणि प्रथमेशमध्येच लढत होईल असे वाटतेय.
महाअंतिम फेरीची जाहिरात खरंच गोड. झी मराठी खूप कष्ट, विचार या पर्वासाठी घेत आहे असे पहिल्यापासूनच वाटले. याही जाहिरातीमध्ये मुलं युद्धासाठी निघाली आहेत वगैरे आचरटपणा न दाखवता, ईझमध्ये दाखवली आहेत. छान वाटले ते पाहून Happy
आज शेवटचा भाग असेल ना?
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..

कारण सरदार वल्लभभाई पटेल आणी आंबेडकरांनी गाणी/कवीता वगैरे लिहीलेल्या (किंवा त्यांना अनुसरुन लिहीलेल्या) मला तरी माहीत नाही आणी आम्हा अजाण लोकांना माहीत नसल्यास त्या थोर नाडकर्णीनी पुढच्या लेखात छापाव्यात मग मंगेशकर साहेब त्याला चाल देतिल आणी मग पुढच्या sa re ga ma pa मध्ये ती गाणी ऐकवू.
>>>>
स्वप्नील, शिवाजी महाराजांनी लिहिलेली कुठली गाणी तुम्हाला माहिती आहेत? जी काही गाणी ह्या कार्यक्रमात म्हटली गेली ती त्यांच्यावर लिहिलेली होती, त्यांनी नाही ना!! आणि आंबेडकरांवर लिहिली जाणारी गाणी 'आम्हा अजाण' लोकांना माहिती नाही वगैरेतून तुमचा उपहासात्मक नाही, खराखुरा अजाणपणाच जाणवतो आहे.. ती प्रस्थापित कबिल्यातून आली असती तर मात्र वाह वाह असे उद्गार आले असते..

'ह्या निळ्या सैनिकाची घे ही निळी सलामी' वगैरे गाणी बघताना पांढरपेशा हसतो हो बेंबीच्या देठापासून.. पण ह्या गाण्यांनी चळवळीत दिलेले योगदान हे थोर आहेच. अगदी तितकेच जितके संघात वीररसपूर्ण गाण्यांनी दिले आहे..

हम्म... आजचा शेवटचा भाग. काल अवधूतही जरासा सेंटी झाला होता ना...

तन्याला १००% अनुमोदन.
कालचा भाग मस्तच झाला.खास करुन 'नरवर कृष्णासमान' तर अशक्य झाले.
सगळेच परत फॉर्मात आलेत,हा फरक कशाने पडला बरे? Wink
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

सगळेच परत फॉर्मात आलेत,हा फरक कशाने पडला बरे? >>
योगा..योगा! भार्गवी ने शिकवलाय ना! Happy
कालच्या एपि. बद्दल वर सगळ्यांनी आधीच योग्य ते लिहून ठेवलंय!
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

******************************************************
इथे व्यक्त करण्यात आलेले मत हे माझे स्वतःचे असुन त्याद्वारे कुणाही मा.बो. करास दुखवायचा हेतु नाही.
तसेच व्यक्त केलेल्या मताशी कुणी मा.बो. कर सहमत असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा Lol Happy
******************************************************
कालचा भाग खुप आवडला.
by the way अंतिम फेरीच्या जागी जर उपस्थित रहावयाचे असेल तर काय करावे लागेल ?
======================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

बघितले कालचे एपिसोड्स ट्युब वर... नाही आवडले.. एक रोहीत च विंचू चावला सोडलं तर बाकी फारच उतरलेले होते अगदी आर्यासकट.. नरवर कृश्णा समान तर अगदीच सामान्य (तबलेवाल्यानी ते अगदी पूरेपूर पाडलं..) आणि प्रथमेश तर निव्वळ बेसूर आणि बालकविता गात होता.. माझ्या कानात दोष असेलही कदाचित पण बात कुछ जमी नही.. सगळ्यात मुग्धाचं ते शुभा जोशींच मूळ गाणं आवडलं..
मला वाटतं महाअंतीम फेरी आधीच इथे प्रत्त्येकाच्या उत्कृष्ट गायकीचा पूर येवून गेलाय )sort of anticlimax) त्यामुळे त्या फेरीत फार काही उच्च प्रतीचं ऐकायला मिळेल अशी अपेक्षा न ठेवलेली बरी..
बघुया...

महाअंतिम फेरीत सादर होणारी गाणी ही अगोदरच ध्वनिमुद्रीत झाली आहेत. आणि ती उत्कृष्ट व्हावीत यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले आहेत. पार्ल्यातील एका स्टुडीयोत हे ध्वनिमुद्रण झालं... त्यामुळे गाण्याच्या दृष्टीने महाअंतिम फेरीला तसा काही अर्थ नाही. Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

आजचा शेवटचा एपिसोड महाअंतिम फेरीआधीचा!

  • प्रथमेश ने पंडित भीएमसेन जोशींचं 'रम्य ही स्वर्गाहून लंका' काय गायलं... अप्रतिम, सुंदर!
  • आर्याचं "हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र" अचाटच... खूप खूप छान
  • प्रथमेशच्या 'गालावर खळी' चं जेवढं कौतुक झालं तितकं काही ते चांगलं नाही गायला तो असं मला वाटलं. असो, शेवटचा एपिसोड होता हा.
  • रोहितने अक्षरशः धमाल केली... निव्वळ अशक्य गायला तो... पल्लवी म्हणते तसं तो खरंच "Future Combo Music Director" होऊ शकतो... एकदम पैसे वसूल... (केबलचे हो!:))
  • कार्तिकीचं "कोंबडी पळाली" सुद्धा प्रथमेशच्या "गालावर खळी" सारखंच...
  • मुग्धाने 'डोकं फिरलंया' छान गायलं. पण तिची यापेक्षाही छान छान गाणी ऐकलेली असल्यामुळे हे एवढं प्रभावी नाही वाटलं

एकूणात सगळ्यात बेश्ट आज होता रोहित राऊत!

-योगेश

मला आर्या च 'नरवर कृष्णा समान ' आणि रोहित च भारुड फार आवडल, बाकी सगळे जस्ट ओके !
काय ऍटिट्युड आहे रोहित कडे, हॅट्स ऑफ !!
भारुडा मधले संवाद खास ग्रामीण स्टाईल मधे, भारुडाचा फील अचूक पकडला त्यानी, जबरीच एकदम 'स्टार' सारखा!!
त्याच्या परफॉर्मन्स ला दाद द्यायला 'मराठी बाणा' चे अशोक हंडे हवे होते !
परफॉर्मन्स मधे मला तरी त्या कार्तिकी पेक्शा नेहेमीच रोहित उजवा वाटतो, पण वैशाली ताईंनी कार्तिकी जिंकावी अशा कॉमेंट्स देउन पुन्हा एकदा चढवल कार्तिकीला Sad
प्रथमेश गातो छान च पण जास्त व्हरायटी नाहीये त्याच्या कडे आणि एक्स्प्रेशन्स पण Sad

कालचा शेवटचा भाग असल्यामुळे सगळेच थोडे सेंटी झाले होते, मी पण.
सगळ्यांची गाणी मस्तच झाली.

Pages