सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अन्तिम फेरी फारशी नाही आवडली.
बहुतेक मी खूप अपेक्षा ठेवल्या होत्या.
एक तर सगळी आधीच्या भागात झालेलीच गाणी...ते पण एक वेळ ठीक्...पण मग प्रत्येकाचे बेस्ट गाणे तरी घ्यायचे....गाण्याच्या निवडीत कार्तिकी सोडून इतरावर अन्याय झाला की काय असे वाटले.
आणी मेकअप व कपडे याबद्द्ल बोलायलाच नको....इतर फ्रॉकमधे कार्तिकी , मुग्धा काय छान दिसतात...सर्वांचे आजचे झगमगीत कपडे मला तरी आवडले नाहीत.
निकालाबद्दल तर मी बोलतच नाही....मला तरी निकाल फारसा पटला नाही....आवाज तिचा वेगळा आहे हे मान्य...पण मग ज्यांचा आवाज वेगळा नाही पण तयारी जास्त चांगली आहे त्यांचा काय दोष?
मलाही कार्तिकीची कितीतरी गाणी आवडली...पण शेवटच्या काही भागांमध्ये ती फार लाऊड वाटत होती...अर्थात ते बहुतेकाना आवडले....या भागांत २-३ वेळा सूर जाऊनही परीक्क्षक कधी बोलल्याचे आठवत नाही....त्यामुळे परफॉर्मन्सच्या नादात तिला मिसगाईड केलं असं वाटलं मला...

कार्तिकीदेवींचाच विजय झाला,जय हो. Happy Happy Happy
नाही हो दिपांजली मला तरी तुमची 'ऑबव्हियस' कारणे कळली नाहीत.कदाचित तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी समजदार नसेन.पण "ते" एकमेव कारण काय आहे ते सांगा हो मोकळेपणाने,मज अज्ञास सूज्ञ करा.संगितातले प्राविण्य हा मुद्दा सोडून तुमच्या मनात कार्तिकिबद्दल नक्की काय पोटदुखी आहे ते बाहेर येऊच द्या एकदा.इथे लिहायला नको वाटत असेल तर मेल टाका,मी वाट पाहतोय.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

agaau,
ईमेल करायची मला गरज नाही वाटत, तुम्ही कार्तिकी चे फॅन असाल तर एंजॉय करा.
आर्या -प्रथमेश-रोहित सारख्या उत्कृष्ट गायकांना बाजुला करून कार्तिकी ला इतके flaws असताना ओव्हर रेट केले गेले तेंव्हा पासूनच बहुतेक आर्या-प्रथमेश्-रोहित च्या फॅन्स ना शंका होती, जी खरी झाली.

कार्तिकिचा विजय एंजॉय करायला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.मला वाटले आज राष्ट्रिय दुखवटा पाळावा लागणार.
अहो असं काय करताय,मी तुम्हाला प्रामाणीकपणे विचारतोय हो.५०% पॉप्युलर व्होटींग असलेल्या कार्यक्रमात ज्याला जास्त मते मिळणार तो जिंकणार हेच सगळ्यात 'ऑबव्हियस' कारण असते असे मला वाट्ते.या पलिकडे तुमचे जे काही 'खरे कारण' आहे ते मोकळेपणाने मांडा, तुम्ही एकट्या नाही आहात.आत्ताच नेटवर पाहिलेत तर अशी कारणे सांगणारे अनेक लोक सगळ्या ब्लॉगवर आहेत.
तुम्ही 'कारण' सांगितल्याशिवाय मला तुमची परवानगी मिळूनही कार्तिकिचा विजय नीट 'एंजॉय' करता येणार नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आणि कार्तिकी "का" जिंकली ते सांगायला नको, समजदार लोकांना माहितच असेल "ते" एकमेव कारण ! >>>>>
भा.पो. Happy ५०० % टक्के अनुमोदन.. !!

तुम्हाला जे वाटतय त्या कारणा साठी एंजॉय करा तुम्ही.
आणि तसही तुम्हाला मेगा फायनल च ५० टक्के पॉप्युलॅरिटी व्होटिंग वगैरे गोष्टी प्रामणिक असल्याची खात्री वाटत असेल तर मग प्रश्न च येत नाही !

आगाऊ, त्यात येवढे विशेष काय वाटते तुला? अन काय जाणून घ्यायच हे????
सिम्पल हे!
कलाक्षेत्रात देखिल रिझर्वेशन्स सुरू झालिहेत हेच खरे! Proud
काय गो दिपान्जली, असच काहीस कारण वाट्ट हे ना तुला????? तस असेल तर कधी नव्हे ती तुझी नि माझी मते जुळताहेत अस म्हणायला हव! Happy
अन्यथा ४० पेक्शा जास्त वेळा नी मिळवलेली आर्या आणि पन्नासपेक्षा जास्त वेळा नी मिळवलेला प्रथमेश, तसेच आधीच्या दोन महिन्यात स्वतःमधे अफलातुन बदल घडवीत सामोरा आलेला रोहीत यान्ना डावलुन "कार्तिकी" नावाच्या एकसुरी पात्रास निवडण्यात कुणाचे काय स्वारस्य होते?????
अशक्य निर्णय हेच खरे! एका नितान्तसुन्दर कार्यक्रमाचा पार विचका करुन ठेवला शेवटच्या दिवशी!
कॉम्पिटीशन झाली तर प्रथमेश, रोहित अन आर्यातच होत होती!
कार्तिकी व मुग्धा कॉम्पिटीशनच्या पात्रतेचे नव्हते! हे माझे मत! असो!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

तसही काल त्यांनी मार्क्स, SMS ह्या बद्दल काहीच सांगितलं नाही.. नुसताच निकाल..
चांगल्या कार्यक्रमाचा शेवट विचका केला हे मात्र खरं..

शेवटचा निकाल एकुण "शॉकिंग" होता. कार्तिकी सुंदरच गाते, तिचे अभिनंदन.

मलातरी आर्या किंवा प्रथमेश जिंकतील असे वाटत होते. सगळ्या प्रकारची गाणी तर आर्या जास्त छान गात होती.
याआधीच गायलेली गाणी गाण्यापेक्षा नविन गाणी गायली असती तर जास्त चांगला झाला असता कार्यक्रम. यापेक्षातर आधीचे एपिसोड उच्च दर्जाचे होते.

आणि कार्तिकी "का" जिंकली ते सांगायला नको, समजदार लोकांना माहितच असेल "ते" एकमेव कारण ! >>
शप्पत!
१०००% अनुमोदन!
फा ल तू रीझल्ट!
ब क वा स.
Sad
बाकी काही लिहायची इच्छा नाही.
----------------------
एवढंच ना!

खरच काहीच लिहायची इच्छा नाही Sad
खूप बोअर झालं , मला वाटत होतं की रोहीत किंवा आर्याच जिंकावी म्हणून .
पण छ्या बारा वाजेपर्यंत जागून नंतर एक तास झोप नाय आली ह्या फालतू रीझल्ट मूळे Sad

रिझल्ट मधे खरच 'ते' कारण असू शकेल ? Uhoh
-----------------------------------------
सह्हीच !

>>>>>पण छ्या बारा वाजेपर्यंत जागून नंतर एक तास झोप नाय आली ह्या फालतू रीझल्ट मूळे
अगदी अगदी, Sad मी तीन वाजेस्तोवर जागा होतो! Sad भयानक अस्वस्थ!

दिप्या, "रिझर्वेशन्स" तसेच्/आणि/किन्वा "पैशाची देवघेव" ही दोन कारणे मनात समोर येताहेत
खरेखोटे झी मराठि, त्या गुणी स्पर्धकान्चे मायबाप अन देव जाणे!
स्टारमाझाने घेतलेली पाचीजणान्ची मुलाखत बघितली का लगेचची???
मुलाखतकर्तीने कार्तिकी विजयी झाली याबद्दलची प्रतिक्रिया विचारली
एकट्या प्रथमेशने कॉमेण्ट दिली प्रसन्गोचित, आणि रोहित व मुग्धाने अधिक न बोलता प्रथमेश जे म्हणतो त्यास अनुमोदन दिले! मुलाखतकर्तीने समयोचित प्रसन्गावधान राखून आर्याला मग तो प्रश्णच न विचारता विषय वळवला दुसरीकडे! आर्याची त्या एका क्षणी "शून्यातली नजर" बरेच काही सान्गुन गेली (असे मला वाटते)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

कार्तिकी चं अभिनंदन... तिला विजयी "बनवणार्‍यांना" तिने शेवटी केलेला सॅल्युट आवडला.
आता मूळ निकालाबद्दल काय बोलायचं..? सरस्वतीच्या गाभार्‍यात sms ची आरती केली की असा देवीचा अनपेक्षित कृपाप्रसाद मिळणारच त्यात एव्हडं वाईट वाटून घ्यायला नको.. आणि हे काय नविन आहे का..?

वैशाली म्हाडे पण "का" झिंकली (मराठीत अन हिंदीतही) हेही सर्वाना माहितच आहे तेव्हा तिला व तीच्यासारख्या ईतरांन्ना पाठीम्बा देणार्‍यांच्या तोंडी आता हे प्रश्ण शोभत नाहीत.. Happy पेराल तसे उगवते!

रोहीत चं शेवटचं गाणं छानच झालं.. पण मोरया सुध्धा काल फितूर झाला होता मग तो कसा धावून येईल निकाल बदलायला..? Happy

पुढील little champs स्पर्धेत मायबोलीकर लिंबूटींबू यान्नी भाग घ्यावा.. केवळ मा.बो. करांच्या समस वर आम्ही त्यांन्ना जिंकून देवू!

झी टीम चं अभिनंदन.. निकाल ठरलेला असताना तो इतक्या कुशलतेने ताणणे, करोडोंची जाहिरात्-कमाई करणे, करोडोंचा समस धंदा करणे, मोठ मोठ्या संगीत तज्ञाना बोलावून स्पर्धेस एक उंची प्राप्त करून देणे, इतक्या मोठ्या ज्युरींन्ना बोलावून इतका चुकीचा निर्णय देणे, अन सर्वात म्हत्वाचं म्हणजे अशा लहान वयात अशा गुणी मुलांवर हे संस्कार घडवणे... हे सर्व येर्‍या गबाळ्याचे काम नव्हे.

तेव्हा झालं गेलं विसरा अन पुढील पर्वाच्या तयारीला लागा बघू... Happy

रोहित आला असता तरी लोकांनी हेच म्हणले असते की आर्या ( वा फारतर प्रथमेश) यायला पाहीजे. आर्याला समस नक्कीच खुप कमी मिळाले असतील व कार्तिकीला नं दोनचे ( प्रथम अर्थातच मुग्धा). शिवाय मार्कही तिला तोडीचे आहेत. आर्याला समस जास्त मिळाले असते तर ती आली असती कदाचित.

ज्यूरी मध्ये जे पाच आहेत व रेग्युलर परिक्षक ह्यांना झी ने विकत घेतले असे वाटते का तुम्हाला? ह्या पाचही जनांत कार्तिकीला सर्वात जास्त बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे मिळालय, ह्या कडेही दुर्लक्ष करु नका.

'ते' कारण?

येथे जातीयवाद कसा काय आला बुवा? मागच्या वेळी वैशाली भैसने जिंकली तेंव्हाही काही ब्लॉग्स आणी लेखकांनी वैशाली चांगली नाही, सायली पानसे चांगली आहे, जात, गरिबी मुळे वैशाली जिंकली असाच सूर लावला होता. तसेच काहीसे आता दिसतेय इंटरनेट व पेपरात. फक्त जास्त मोठ्या प्रमानावर. ह्यावरुन आपला समाज किती खोलवर जातियवादी आहे हेच दिसते, फक्त वर वर गप्पा मात्र वेगळ्या.
शेवटी जातीवर आलेच सर्व. ( उद्वीग्न चेहरा)

डिस्क्लेमर. पुर्वीचेच - "आर्या, रोहित, प्रथमेश किंवा अगदी मुग्धा जिंकली असती तरी मला आवडलेच असते. पाचही हिरे आहेत. एक कोहीनुर तर दुसरा शालीमार इतकाच काय तो फरक. त्यातल्या त्यात आर्या जास्त आवडते.

लींब्याभाऊ तुमचा नाद खुळा!! इतक्या प्रांजळपणे आपले मत मांडल्याबद्दल अभिनंदन.इतरांप्रमाणे 'ते' कारण वगैरे ताकाला जाउन भांडे लपवण्याचा प्रकार तुम्ही कधीच करत नाही.
दिपांजलीताई तुम्हाला कार्तिकी जिंकल्यापेक्षा गायकवाड जिंकल्याचा जास्त त्रास होत आहे हे आधीच कळले हो मला,पण ते स्पष्टपणे सांगायचे धैर्य तुम्ही दाखवता का हेच पहात होतो.
आता पॉप्यूलर व्होट्सचा मुद्दा- वैशाली जिंकते तेंव्हा ही व्होट्स 'प्रामाणीक'असतात,काल आर्या वा प्रथमेश जिंकले असते तरी ती प्रामाणिकच असती,कार्तिकि जिंकल्यामुळे ती एकदम अप्रामाणीक,मॅन्युप्युलेटेड वगैरे झाली याची मला फारच मजा वाटतेय.तरी बरं ज्युरी आणी जजेसची आडनावे;गुप्ते,फडके,अभ्यंकर,खाडीलकर,पंडित वगैरे होती.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

मी काही कार्तिकीचा खुप मोठा पंखा नाहिये किंवा इतर स्पर्धकांचा दुश्मनसुद्धा नाहिये.. पण केवळ कार्तिकी जिंकली म्हणुन इतर सगळ्या गोष्टिंकडे बोट दाखवणे घृणास्पद आहे.. मागील पर्वांमध्ये समस च्या संख्येत झी मराठी ने घोटाळा केल्याचे आरोप झाल्याने यावेळी त्यांनी संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडे ५०% जबाबदारी दिली होती तरीही विचका केला असे म्हणणे चुकीचे आहे. लिहिणार्‍यांच्या आवडीचा स्पर्धक जिंकुन आला असता तर मात्र याच सर्वांनी झी मराठीचे अभिनंदन वैगरे केले असते... सर्वच स्पर्धक सुंदर गात होते यात शंका नाही .. प्रथमेश हा माझा सर्वात आवडता स्पर्धक होता.. आणि तोच जिंकावा असे मला मनोमन वाटत होते पण पं. संजीव अभ्यंकरांनी म्हटल्याप्रमाणे प्रथमेश हा बैठकीचा गायक आहे आणि जनसामान्यांना बैठकीच्या गायकाचे गाणे रुचेलच असे नाही, याचा अर्थ प्रथमेश चे गाणे कुठेही कमी पडते असे नाही, फक्त जनतेची आवड वेगळी असु शकते. थोडक्यात काय की जनता आणि मान्यवर परिक्षक यांच्या निर्णयाला मान देउन कार्तिकीच्या आनंदात सहभागी व्हा .. आणि केवळ आवडता स्पर्धक जिंकला नाही म्हणुन जिंकलेल्या स्पर्धकाची निंदा करणे थांबवा (निदान रिझर्वेशन्स बद्दल बोलण्याच्या अयोग्य पातळीवर जाउ नका)

हे पाचही जण अजुन लहान आहेत आणि पुर्ण ताकदी निशी आपल्या समोरे वेळोवेळी येत राहणार आहेत.. पुढे जाउन कळेलच की कोण किती महान आहे ते...

स्पर्धा संपल्यावर इतर चार उपविजेत्यांचे प्रसन्न चेहरे आठवा मग कळेल की लहानांकडुन किती शिकण्यासारखे आहे ते..

खूप अपेक्षेने महाअंतिम फेरी, महाअंतिम फेरी म्हणून गाजावाजा केलेला हा कार्यक्रम पाहिला. आख्खा दिवस सफारी पार्कमधे घालवून सुद्धा फक्त माकडंच दिसावीत तसा अपेक्षाभंग झाला. Sad

नाही म्हणायला काही गाणी फार छान झाली. पण तीही सगळी आधी ऐकलेलीच होती.
'आता कशाला उद्याची बात' मधे आर्या खूपच गोड दिसत होती Happy

निकाल... पार निकाल लावला स्पर्धेचा! माझ्यापुरतं बोलायचं तर विजेत्यांची क्रमवारी अशी हवी - आर्या, प्रथमेश, रोहित, मुग्धा आणि सगळ्यात शेवटी कार्तिकी. पण....

परचुरेने कार्तिकीच्या वडिलांना प्रतिक्रिया विचारल्यावर ते काय बोलले होते, आठवतं? कार्तिकी जिंकू नये... सर्व पाचही जण विजेते व्हावेत... का बरं म्हणाले असतील ते असं? त्यांना आधीच निकाल माहीत होता का?

असो. रोहित ने शेवटचं गाणं काय गायलं. अहाहा. अक्षरशः काटा आला अंगावर.

हं.... यापुढे सोमवार्-मंगळवार सुद्धा लवकर झोपता येईल... Happy
-योगेश

>मागच्या वेळी वैशाली भैसने जिंकली तेंव्हाही काही ब्लॉग्स आणी लेखकांनी वैशाली चांगली नाही, सायली पानसे चांगली आहे, जात, गरिबी मुळे वैशाली जिंकली असाच सूर लावला होता. तसेच काहीसे आता दिसतेय इंटरनेट व पेपरात. फक्त जास्त मोठ्या प्रमानावर
खरय्...लोकं तक्रार कशाबद्दल करत आहेत हे कळत नाहीये... ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा झाल्या.. खरी कला अन गुण मागे पडले अन त्याचा धंदा झाला तेव्हाच खरं तर या स्पर्धा अन निकलांन्ना विशेष अर्थ उरला नव्हता. पण यावेळी अधिक प्रमाणात जर तसा टीकेचा सूर असेल तर इतकच म्हणता येईल की याचा अर्थ लोकांन्नी बहुदा deserving candidate ला मतं पाठवली असणार पण झी ने नेहेमीप्रमाणे याही वेळी त्यात फेरफार केले.. of course this time they got it terribly wrong!
रोहीत चं दुर्दैव! त्याच्या "मोरया" ची अलिकडेच दिल्लीतून उचलबांगडी झाली त्यामूळे नवस फसला..

केदार,
नुसतं जातीयवादी म्हणून कसं चालेल..? आपल्या समाजाला बरेच पैलू आहेत.. Happy
तेव्हा असे "मनोरंजनाचे कार्यक्रम" हे तेव्ह्ड्यापुरतेच राहू द्यावे.. माऊली म्हणतातः
पायी ती वहाण पायी बरी!

कूल, जेव्हा निकाल "अनाकलनीय" ठरतो, तेही जजेसना पन्नास टक्के प्रतिनिधित्व देऊन, तेव्हा वरील रिझर्वेशन, पैशाची देवघेव वगैरे कारणान्कडे वळावे लागते!
माझ्या सम्पर्कात आलेल्या बहुसन्ख्य प्रेक्षकान्चे मताप्रमाणे प्रथमेश, रोहित व आर्या यान्च्यातच स्पर्धा होऊ शकत होती पहिल्या नम्बरकरता! कार्तिकीला विजयी "ठरवणे" हे धक्कादायकच होते! अन अर्थातच जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे अनाकलनीय घटनान्ची कारणमिमान्सा करू पहाणारच! अन त्या कारणात वरील कारणे दुर्दैवाने येत असली तर कारणमिमान्सा करणारा दोषी कसा?
आमच्या मते, रोहित राऊत याने वेळीच स्वतःमधे बदल करून प्रथमेशला जबरदस्त कॉम्पिटीशन निर्माण केलेली होती व एका घरातच प्रथमेश की रोहित या बद्दल मतभेद होते (जर रोहीत पहिला आला अस्ता तर वरले आक्षेप घेणे अयोग्य ठरले अस्ते! कारण त्याने क्षमता सिद्ध केली होती!)
आर्या बाबत कुणाचेच दुमत नव्हते, तिचा आवाज, स्वर, तालसन्गत रहाणे, वरच्या पट्टिची फेक आणि गाण्याच्या बदलत्या अर्था नुसार परफॉर्मन्स हे अफलातून होते
प्रश्ण येवढाच होता की मेल व फिमेल आवाजाची स्पर्धा कशी काय होऊ शकणार या तिघान्मधे?

मात्र मी पुन्हा पुन्हा लिहितो हे की प्रथम क्रमान्काच्या स्पर्धेत कार्तिकीच्या एकसुरी पद्धतीने, शब्दोच्चारान्मधील दोषान्मुळे, काहीश्या भसाड्या खरखरीत तसेच लाऊड आवाजामुळे, आणि, वयाने फारच लहान असल्याने मुग्धा अशा दोघीन्ना प्रथम क्रमान्काच्या स्पर्धेत खरे तर "धरलेच" जाऊ शकत नव्हते या बद्दल किमान माझ्या पहाण्यातील बहुसन्ख्य प्रेक्षकान्चे एकमत हे!

योग, सन्स्कारान्चा प्रश्णच भयावह हे! Sad
काल पन्चेचाळीस जण स्टेज वर आले असे म्हणले गेले, मला तर त्यात शमिका, राधिका, अवन्ती कुठे दिसल्या नाहीत, कुणाला दिसल्या होत्या का?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

>>> परचुरेने कार्तिकीच्या वडिलांना प्रतिक्रिया विचारल्यावर >>>>
मी_योगी.... अगदी अचूक निरीक्षण, ती प्रतिक्रिया ऐकल्याक्षणीच मला ही यात काहीतरी पाणी मुरतय असे वाटले होते! निकालानन्तर आमच्या घरीदेखिल सगळ्यान्निच "त्या" वाक्याचा उल्लेख केला! असो, योगायोगही असू शकेल!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

का बरं म्हणाले असतील ते असं? त्यांना आधीच निकाल माहीत होता का? >> TV वर जाहीर करण्याआधी एक तास सकाळच्या ताज्या घडामोडी विभागात कार्तिकी जिंकल्याचे वृत्त होते...

स्पर्धा संपल्यावर इतर चार उपविजेत्यांचे प्रसन्न चेहरे आठवा मग कळेल की लहानांकडुन किती शिकण्यासारखे आहे ते.. >> चेहर्‍यावरील प्रतिक्रिया मनापासुन आल्या असतील असे कश्यावरुन??

SMS इत्यादी हा फक्त पैसे मिळवण्याचा मार्ग आहे हे कळुनही ७-७ रुपये खर्च करुन SMS करणार्‍या लोकांनी तरी आता धडा घेऊन यापुढे आपले पैसे वाचवावेत.

बाकी कोण चांगले कोण वाईट हे काळच ठरवेल. सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन आणी शुभेच्छा!!

>>>>> लींब्याभाऊ तुमचा नाद खुळा!! इतक्या प्रांजळपणे आपले मत मांडल्याबद्दल अभिनंदन.इतरांप्रमाणे 'ते' कारण वगैरे ताकाला जाउन भांडे लपवण्याचा प्रकार तुम्ही कधीच करत नाही.
आगाऊ, धन्यवाद!
तरीही "ऍट्रासिटी" कायद्याचे बन्धन पाळावेच लागते प्रत्येक शब्द लिहिताना! Proud
होप सो, की माझ्या पोस्ट मधून मी या कायद्यान्तर्गत काही आक्षेपार्ह लिहित नाहीये!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मला तरी यात फक्त निकाल न आवडल्यामुळे विजयी स्पर्धकाची निंदा आणि आयोजकांच्या हेतुबद्दल शंका एवढेच दिसतेय...

हा एक बीबी चाळून पाहिला तरी आढळेल की प्रत्येक स्पर्धकाच्या बाबतीत मते ही बदलत गेली.. याच बीबीवर प्रथमेश हा एकसुरी होत चालला आहे असा उल्लेखही मी वाचला आणि रोहीतचा उल्लेख "रोहीत्या" असाही एका ठिकाणी वाचला.. याचाच अर्थ ते ते स्पर्धक त्या त्या क्षणी लोकांना जसे भावले तसे त्यांनी उल्लेख केले ... मग हिच गोष्ट कार्तिकीला का लागू होत नाही.. भसाडा आणि लाउड असा तिचा आवाज असेल तर वेळोवेळी तिला बेस्ट परफॉर्मर चे बक्षीस आणि याच बीबी वर मिळालेली दाद खोटी असेल काय.. तिच्या गाण्याचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक या बीबीवर सुद्ध वेळोवेळी झालेले आहेच की..

मी वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रथमेश जिंकला असता तर मला खुप आनंद झाला असता पण तरिही कार्तिकी जिंकली म्हणून तिच्या दुर्गुणांचा पाढा मी वाचणार नाही..

नात्या टिव्हीवर डिले होता. रिअर लाईव्ह न्हवतं, कारण ऍडस. ( लाईव्ह एडीटिंग म्हण हव तर).

योग अगदी,
समस आणी गायन हे तुला वा मला ( आणि अजुन य लोकांना) झेपनार नाही, कारण आपण दर्दी कानसेन आहोत. Happy ह्या कानांवर किशोरी, अण्णा, जसराज अश्यांचे संस्कार आहेत.
असल्या स्पर्धा (स्पेशली हिंदी) टुकार आहेत्(च). पण एकदा स्पर्धा म्हणली की त्याचे फॉर्मॅट मान्य करुन मगच आपण ऐकत आहोत ना? मग आता 'समस' बद्दल बाऊ करन्याचा काय फायदा? तस्मात, 'जे आहे ते असे आहे'. Happy

cool,
मला वैयक्तीक काल कार्तिकीची गाणी आवडली.. आर्या चं वंदे मातरम प्रचंड पडलं अन प्रथमेश ने LIGHT SONGS च्या त्यातही हिंदी गाण्यांच्या वाटेला जावूच नये.. (मी इथेही याही आधीच इथेच म्हटलं होतं की प्रथमेश हा एक उत्तम शास्त्रीय मैफल्/बैठकीचा गायक आहे. होवू शकतो) मुग्धा चा अगदी स्पष्ट आवाज, स्पष्ट सूर (आशाताई खाडीलकरांन्नी हेच सांगितल) अन कार्तिकीची एनर्जी लेव्हल मला अजूनही सर्वांच्यात ज्यास्त चाम्गली वाटते..अपिलींग वाटते.. रोहीत चं ग्रास्पिंग अन नव नविन आत्मसात करण्याची आवड अन मेहेनत सगळ्यांपेक्षा खूपच अधिक आहे. तेव्हा घृणा आहेच पण जातीयवादाची नाही तर एकंदर संगीत अन कलेच्या प्रांतातही शिरलेल्या या धंदेवाईकपणाची. आणि हे बघा, म.टा. मधिल. अधिक काही लिहीण्या बोलण्याची गरज आहे असे वाटत नाही: Happy
ref: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4096513.cms
>स्पधेर्त कोणीतरी विजेता ठरतो या नियमाचे पालन करण्यासाठी आम्ही कातिर्कीची एसएमएस आणि परीक्षकांचा कौल यांचा मेळ साधत निवड केली. 'उरलेले चारही लिटल चॅम्प हे आमच्यासाठी दुसऱ्या क्रमाकांवरच आहेत म्हणूनच त्या सर्वांनाच आम्ही सारखीच संगीत शिष्यवृत्ती दिली', असे 'झी नेटवर्क'चे सीओओ नितिन वैद्य यांनी सांगितले

>SMS इत्यादी हा फक्त पैसे मिळवण्याचा मार्ग आहे हे कळुनही ७-७ रुपये खर्च करुन SMS करणार्‍या लोकांनी तरी आता धडा घेऊन यापुढे आपले पैसे वाचवावेत.
नात्याभाऊ, भारी विनोदी लिहीता की.. Happy
>बाकी कोण चांगले कोण वाईट हे काळच ठरवेल.
आणि याचा अर्थ काय..? मग गेले सहा महीने काय स्पर्धेत हे लोकं झिम्मा खेळत होते का..? Happy
दिवे घे रे..

केदार,
मान्य आहे! म्हणूनच वरील झी च formal stamement फार बोलकं वाटतं. ...

कालच्या एकंदर प्रकाराबद्दल गोड मुग्धा च्या गोड भाषेतः
डोकं फिरलया ... Happy

कार्तिकी जिंकली त्याबद्दल तिच्ं अभिनंदन. अपेक्षितच होता निकाल, आणि बाकीचे चँप्स न जिंकताही जिंकल्याच्या थाटात वावरत होते. त्यावरून त्यांनी काही गमावलय असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांना जे काही मिळायचं होतं ते त्यांना या सगळ्या प्रवासात मिळालेलंच आहे. नुकसान फक्त एक लाखाच आहे. बाकी न जिंकुनही चँप्सना फारसा फरक पडलेला नाहीये आणि हे लाखभर रुपये मला नाही वाटत या मुलांना आनंद वा दु:ख देणारे असतील. जिथे उजाडायच आहे तिथे उजाडणारच. आपणही आहोतच आर्या प्रथमेश, रोहित मोठे होण्याची वाट बघु २-४ वर्षात काय ते दाखवून देतीलच ही मुलं . संजीव अभ्यंकरांनी प्रथमेशला दिलेली कमेंट फार मोठी होती" उद्याचा बैठकीचा गायक म्हणून तुझ्याकडे बघतोय आम्ही" त्याला हे एवढं मिळाल्यावर तो म्हणत असेल हे चँप कशाला व्ह्यायच बाबा, आता काय गरज?

आर्या आणि रोहित दोघेही आपापल्या जागी एकदम पक्के आहेत तेंव्हा त्यांच्याबद्दलही वाईट वाटून घेण्याची काही गरज नाहीये. कदाचित आत्ता लगेचच रोहितचा एखादा अल्बम रिलीज होईल. आणि आर्याबद्दल तर विचारायलाच नको. Happy

उगाच नको तिथे जातियवाद नका आणू. तिच्यात गायकीत नक्की काहितरी वेगळे पैलु दिसले असतील ज्युरींना, येउ दे ना वेगळी गायकी पुढे , त्यानं नुकसान कोणाचच नाहिये. झाला तर फायदाच आहे.:)
तेंव्हा सबुर. Happy

केदार आणि कूलला अनुमोदन! कार्तिकी जिंकली हे थोडंसं अनपेक्षित होतं, मलाही वाटत होतं की प्रथमेश आणि आर्यामध्येच चुरस होईल, पण म्हणून लगेचच बाकीच्या मुद्द्यांकडे का जाताय? Sad

या मुलांनी आपल्याला भरपूर आनंद दिला आहे. पडद्यामागे राजकारण असेलच, पण आपण त्यात पडायलाच हवं का? पाचही जण गुणी आहेत, वेगवेगळी गायकी आहे सगळ्यांची, आणि सगळ्यांनीच आपली मनं जिंकून घेतली आहेत. कार्तिकीला 'जिंकवून' कोणाला फायदा होणार आहे? झी ला की परिक्षकांना? समस आणि परिक्षकांचे मत यावर थोडा तरी विश्वास दाखवा लोकहो.

पाचही जणांना खूप खूप शुभेच्छा!
-----------------------------------
प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी बेडी...

मग गेले सहा महीने काय स्पर्धेत हे लोकं झिम्मा खेळत होते का..? >> एखादी स्पर्धा जिंकणे व त्या क्षेत्रात यशस्वी ठरणे या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे खरंच कोण यशस्वी होते हे कळायला काही वर्षे जावी लागतील.. आता यात आक्षेपार्ह काय आहे?

अरे मित्रा... चांगलं कोण वाईट कोण हे कळायला सहा महिने पुरेसे होते नाही का..? Happy
यश अपयश क्षणिक असतं.. सातत्य अन दर्जा कायम रहातात अन ते कळायला नक्कीच काळ जावा लागतो हे बरोबर आहे..
असो. गैरसमज नसावा..:)

>>एखादी स्पर्धा जिंकणे व त्या क्षेत्रात यशस्वी ठरणे या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे खरंच कोण यशस्वी होते हे कळायला काही वर्षे जावी लागतील

>>यश अपयश क्षणिक असतं.. सातत्य अन दर्जा कायम रहातात अन ते कळायला नक्कीच काळ जावा लागतो हे बरोबर आहे..

अनुमोदन

Pages