सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या बेश्ट आहे, पण "चमचम" एवढे काही भारी नाही हो झाल...

सारे सुर रुसले बिसारिचे... Happy
पर्फोर्मन्सच्या नादात असेल...

पण "शिवकल्याण राजा" ची गाणी काय गायलीये! म्हणुन माफ Happy

कोकण गन्धर्व तर जिन्कलाच आहे.

पण यात सगळ्यात जास्त लक्शवेधी गोष्ट म्हणजे पन्डीत ह्रुदयनाथ मन्गेशकर यान्चे इतिहास कथन!

लयच भारी!!!

- रुयाम :- ("वाटलं तसं" @ watla-tasa.blogspot.com/)

मुळात 'चम चम करता है ये नशीला बदन' , 'येशील येशील' सारखी गाणी लहान मुलांना गायला देउ नयेत अस मला वाटत !

खरंय.. पण परफॉर्मन्ससाठी करत असावेत...

असो. कालच्या भागातून 'गायकी' साठी फार अपेक्षा नव्हत्याच.. शेवटचा भाग म्हणून उत्सुकता होती. अवधूत आणि पल्लवी सेन्टी झाले होते.. मलाही उगाचच ईमोशनल वाटत होतं. हे पर्व खूप म्हणजे खूपच छान झालं.. आता अंतिम विजेता कोणीही होवो.. सगळेच विजेते आहेत माझ्यासाठी Happy

अलिकडे, लाईव्ह म्हणतात आणि लिप सिन्क करतात.. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मग 'लाईव्ह' म्हणतात तरी कशाला? समस तरी शेवटपर्यंत येतात का? का तेही आधीच ठरलेलं असतं कोण जाणे Sad Uhoh
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..

हे पर्व खूप म्हणजे खूपच छान झालं >>> अगदी अगदी..
पुढचं पर्व आता परत नेहमीचं आहे का?

मी कालचा भाग मिसला... ह्याचं repeat telecast कधी असतं??

पुढचं पर्व अजून घोषित नाही झालं. कालच्या भागाचं पुन:प्रक्षेपण आज दुपारी ३ ला असतं. रविवारी स.१० ला असतं बहुतेक.
आपण समस ला मराठी शब्द शोधूया का?
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

तरी शेवटपर्यंत येतात का? का तेही आधीच ठरलेलं असतं कोण जाणे
<<<पूनम,
मलाही नेहेमीच वाटत कि आधीचे रिझल्ट असतीलही 'कदाचित' प्रामाणिक, पण फायनल विनर नक्कीच हे सगळे सो कॉल्ड रिएलिटी शोज आधीच ठरवतात.
तसाही झी सांगेल तो रिझल्ट, ते म्हणतील तेवढी व्होट्स, काही proof देतात का votes चा ?

कालचा भाग खुपच लई भारी झाला.. बोलेतो चाबुक.... हुर्रर्रर्रर्रर्र .........
लातुरकराने "माझे राणी माझे मोगा" गाउन मला sms पाठवायला भाग पाडले. खरेतर आजवर मी या पर्वाच्या सुरुवातीस नेहा व नंतर प्रथमेशला sms पाठवीले होते. पण काल चक्क कोकणी गाणे गाणे गाऊन रोहीतने त्याचे अष्टपैलुत्व पुन्हा एकवार सिध्द केले.
अर्थातच या पर्वासाठी 'झी मराठी'चे पुन्हा एकवार अभिनंदन. खुप कालावधीनंतर Jr kg ते Sr. citiziens पर्यंत सर्वांना या कार्यक्रमाची मोहीनी घातली. सोमवार आणि मंगळवार रोजी घरातील रात्रीचे जेवण आटोपुन मागील ६ महिने या कार्यक्रमाचे रसग्रहन केले जायचे. तरी परत शनी / रवी रोजी back to back epicode चा आस्वाद घेतला जायचा. हेही कमी होते म्हणुन की काय त्यांचे "मस्ती की पाठशाला" चे धमाल epicode ही पाहीले जायचे.
इतके दिवस कधी होणार महाअंतीम फेरी ? कधी होणार महाअंतीम फेरी ? असा प्रश्न विचारला जायचा. पण आता अचानक महाअंतीम फेरी जाहिर झाल्याने एका सर्वांग सुंदर स्पर्धेला मुकणार... Sad
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

कालचा कार्यक्रम छानच झाला. रोहितने, आयचा घो गाण्याला धमाल उडवुन दिली.. त्याचं गाणं अष्ट्पैलुत्व दाखवुन देत.. कोणत्याहि प्रकारच गाणं मस्त गातो.. माजे मोगा नाहि जमलं त्याला बरोबर. आवाज साथ देत न्हवता त्याला.. पण रोहित रॉक आहे. Happy

>>मुळात 'चम चम करता है ये नशीला बदन' , 'येशील येशील' सारखी गाणी लहान मुलांना गायला देउ नयेत अस मला वाटत !
अगदी... अनुमोदन!
>>मलाही नेहेमीच वाटत कि आधीचे रिझल्ट असतीलही 'कदाचित' प्रामाणिक, पण फायनल विनर नक्कीच हे सगळे सो कॉल्ड रिएलिटी शोज आधीच ठरवतात>
"वैशालीच" उदाहरण..? Happy
मला अजूनही वाटतय हे लोक काहितरी ड्रामा करून आर्या अन रोहीत दोघांनाही विजेते घोषित करतील.. तसं झालच तर बरच होईल.. बघुया
for me on "personal" note मुग्धा सुध्धा विजेती आहे. कुठलही formal training नसताना केवळ instinct च्या बळावर काय गाणी सादर केली आहेत या मुलीने. इतक्या लहान वयात गाण्याची इतकी समज, इतका आत्मविश्वास, अन इतकं धाडस हे कुठल्याही पुरस्काराच्या पलिकडलं आहे.. अवधूतच्या भाषेत "दैवी चमत्कार"..
वैयक्तीक मला जरी आर्या च गाणं अधिक आवडत असलं तरी गाण्याबरोबर एक संपूर्ण परफॉर्मर म्हणून मला रोहीत विजेता झालेला बघायला अधिक आवडेल.
लिम्बू कुठे गेला..? बेट लावतोयस का...?:)

मुग्धाच्या बाबतीत खरंच 'चमत्कार' हा एकच शब्द योग्य आहे. गाण्याव्यतिरीक्त ती 'भरतनाट्यम' सुद्धा शिकते आहे हे कालच कळलं! कमाल आहे मुलीची! Happy
-योगेश

>>मलाही नेहेमीच वाटत कि आधीचे रिझल्ट असतीलही 'कदाचित' प्रामाणिक, पण फायनल विनर नक्कीच हे सगळे सो कॉल्ड रिएलिटी शोज आधीच ठरवतात>
"वैशालीच" उदाहरण..?
<<< Lol ..हो !
देबोजीत, अनीक , संचिता, वसुंधरा आणि हो, वैशाली सुध्दा जेंव्हा जिंकते तेंव्हा चॅनल चा स्वतःचा काही तरी फायदा असल्या शिवाय मेगा विनर होउ शकत नाही अस माझ प्रामाणिक मत आहे !:)
अस असताना जर एखाद्या वैशाली सारख्या डिझर्विंग विनर ला जिंकवुन दिल तर आनंद होतो, इथे पण खरच आर्या-रोहित दोघांना जिंकून दिल तरी आवडेल मला:).
एक मुलगा -एक मुलगी दोन विनर असायलाच आहेत खर तर !

आहे रे योग आहे इथेच! Happy
लावू की बेट!
माझ्या मते प्रथमेश विजेता ठरावा!
मेलफिमेल असे दोन विजेते काढले तर आर्या देखिल
रोहीत नि कार्तिकी उपविजेते ठरतील
मुग्धाला प्रोत्साहनपर काहीतरी पारितोषीक मिळावे!
अर्थात हे माझ मत
मी एसेमेस सगळ्यान्करताच करतो हे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

रोहीत विजेता झालेला बघायला अधिक आवडेल. > मलापण ...
-----------------------------------------
सह्हीच !

योग... आर्या जिंकणार.. !!! जिंकायला हवी.. Happy
खरतर फायनल ला शाल्मली, शमिका, अवंती आणि सागर पण हवे होते.. ! आणि रागेश्री बैरागकर पण.. ती खर तर मुग्ध्या आणि कार्तिकी च्या तोडीची होती.. पण फायनल ला पण नाही पोचली.. Sad

आलोच जरा.. आर्याची पोस्टर्स शोधून आणतो आणि टाकतो इथे.. Proud

शमिका, अवंती आणि सागर पण हवे होते.. ! आणि रागेश्री बैरागकर पण.. ती खर तर मुग्ध्या आणि कार्तिकी च्या तोडीची होती.. पण फायनल ला पण नाही पोचली >> नाही हां. कै चा कैच बोलतोस! शाल्मलीचं ठीक आहे एकवेळ.
उपविजेते म्हणजे १ सोडून उरलेले ४ का?
का १-२-३ मधले २-३?
मग उरलेल्या ४-५ ला काहीच नाही????? अन्याय!
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

आशु, अंतिम फेरीत ५ जण असतील एक विजेता ठरल्यावर बाकीचे सगळेच उपविजेते ठरतील नाही का?
आणि जर तसे करणार नसतील तर मग ५ जणांना अंतिम फेरीत आणायचे प्रयोजन काय?
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

अवंती आणि शमिका चांगलं गायच्या आशू... अवंती नी म्हंटलेली सगळी हिंदी गाणि भारी होती एकदम..
शमिका चा performance मधे एका आठवड्यात घसरला आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात ती बाहेर गेली.. Sad अवधूत नाही कसा येडा व्हायचा तिच्या लावण्यांवर.. Happy

रागेश्री बैरागकर तर खरच चांगली गायची.. सेमी फायनल चे लॉट्स ठरवताना झोल झाल्याने ती फायनल ला पोचू नाही शकली असं मला तरी वाटत... नाहितर राधिका नांदे ऐवजी anytime better होती ती..
सागर ने म्हंटलेली गाणी मला तरी आवडायची.. पण वैशाली त्याला फारच -ve fb द्यायची नेहमी..

खरचं काय जबरदस्त कार्यक्रम झाला हा,अजूनही आपल्या कुणाचेच एकमत होत नाहिये.असं फार कमी वेळा होते.
मी स्वतः कायम प्रथमेश की रोहित.आर्या की कार्तिकी या गोंघळात पडतो.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

प्रजासत्ताकदिन आणि 'सारे'चे 'तारे'
२६ व २७ जानेवारी रोजी 'झी मराठी' वरील 'आयडिया सारेगमप'मध्ये प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने 'शूरा मी वंदिले' हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लिट्ल चॅम्पसना हाताशी धरून सादर केलेला कार्यक्रम, छोटय़ांच्या अप्रतिम गानकौशल्याची चमक दाखविणारा पण तितकाच नियोजक व संकल्पक यांच्या बुद्धीच्या दिवाळखोरीचे व सांस्कृतिक अतिरेकीपणाचे प्रदर्शन करणारा होता.
या कार्यक्रमात विविध कवींनी लिहिलेली शिवकाळाविषयीची गाणी होती आणि काही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संगीतबद्ध केलेल्या कविता होत्या. कार्यक्रमाच्या शीर्षकाला अत्यंत समर्पक अशीच शिवराय व स्वातंत्र्यवीर ही नावं आहेत. त्यांचं गुणगान करण्यात आणि ते श्रवण करण्यात प्रत्येक मराठी

माणसालाच काय पण सर्वच भारतीयांना अभिमान वाटेल यात शंकाच नाही.
पण कार्यक्रम प्रजासत्ताकदिनानिमित्त होता हे लक्षात घेता त्या संदर्भात योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींची आठवण येणं साहजिकच नव्हे तर अपरिहार्यच आहे. यातली काही ठळक नावं म्हणजे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतीय घटनेची अंमलबजावणी करणारे पं. जवाहरलाल नेहरू. या नावांचा अनुल्लेख तीव्रतेनं खटकला. किंबहुना तो हेतुपूरस्सर गाळला तर नसावा ना, अशी शंकाही कुणाला येऊ शकते.
मंगेशकर बोलण्याच्या ओघात असेही म्हणाले. (कार्यक्रमाची दृश्यध्वनिफीत समोर नसल्यामुळे त्यांचे वक्तव्य स्मरणातून नोंदवीत आहे. तपशील नव्हे, मुद्दा लक्षात यावा.) 'आपल्या शत्रूकडे शस्त्र आहे आणि आपल्याकडे फक्त काठी आहे, याला मी शौर्य म्हणत नाही.' आपण हाती शत्रूसारखेच शस्त्र घ्यायला पाहिजे, असे त्यांना सुचवायचे असावे; परंतु शस्त्रे वा आयुधे अनेक प्रकारची असू शकतात. तलवार- बंदुकीसारखी शस्त्रे हातात नसूनही माणूस शूर ठरू शकतो हे आपल्याच स्वातंत्र्यचळवळीत अनेकांनी दाखवून दिलं आहे- पटकन नाव लक्षात येतं ते हुतात्मा बाबू गेनू यांचं. (काठीचा उल्लेख भेकडपणासाठी करताना मंगेशकरांच्या डोक्यात म. गांधींचा संदर्भ असावा असं मात्र कुणी समजू नये!)
भीमराव कर्डक, वामन कर्डक या शाहिरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर केलेली बरीच गाणी लोकप्रिय आहेत. आपल्या शाहीर उमप यांनीही बाबासाहेबांवर उत्तम गाणं केलं आहे. साने गुरुजींचं 'बलसागर भारत होवो' हे गीत तर सुप्रसिद्धच आहे. ही गाणी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने का आठवली नाहीत? का ती हृदयनाथांनी संगीतबद्ध न केल्यामुळे वीररसपूर्ण झाली नव्हती? त्यांनी कुसुमाग्रजांच्या 'गर्जा जयजयकार' या क्रांतिगीताचे जे मऊ मुलायम मुळमुळीत प्रेमगीत केले ते ऐकून चाल लावणाऱ्यालाच शौर्य समजाविण्याची पाळी आली.
या पत्रामागचा मुद्दा, राष्ट्र रक्षणार्थ वेळप्रसंगी हिंसेचा वापर करणं नैतिक ठरतं का, हा नसून प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कोणती नावं वगळली तर भारतीय मनाला चुटपूट लागेल हा आहे.
नाटकवाला असल्यामुळे एक निरीक्षण : या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पल्लवी जोशींचा भगवा-केशर जरतारी झंपर आणि वैशाली सामंत यांची भगवी केशरी साडी यांच्या विरोधात अवधूत गुप्ते यांचा जाडा-भरडा खादीचा पोषाखच उठून दिसत होता. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये हातात तिरंगा घेऊन उच्चरवाने 'येथून तेथून पेटून उठू दे देश' (साने गुरुजी) हे गाणे गात, इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळीची पर्वा न करणाऱ्या स्वयंसेवकासारखा.
अर्थात या कार्यक्रमातली गाणी आणि शिवकालाच्या संदर्भातील विवेचन रोमहर्षक झालं. अगदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रातील त्या संदर्भातील उताराच कुणी पाठ करून म्हणत असल्यासारखं वाटलं.
प्रेक्षक श्रोत्यांना या कार्यक्रमाने एक विशिष्ट प्रकारचा आनंद जरूर दिला कारण त्यांना अनायासे एक 'मंगेशकर रजनी'च अनुभवायला मिळाली.
हे सर्व लिट्ल चॅम्प्स अप्रतिम गातात यात शंकाच नाही, पण मनात खदखदणाऱ्या विशिष्ट मतांसाठी मुलांचा वापर करून घेणं, तेदेखील देशभर सर्वदूर पोहोचणाऱ्या वाहिनीच्या माध्यमातून हे कितपत योग्य आहे? पुढच्याच महिन्यात शिवजयंती हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणाचं निमित्त साधून हा कार्यक्रम झाला असता तर निदान नथीतून तीर मारणे तरी उघडकीस आले नसते. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करताना केवळ संगीतातील तथाकथित पंडितांची नव्हे तर पारदर्शक राष्ट्रीय दृष्टीच्या सामाजिक- राजकीय अस्सल पंडितांचीही नितांत गरज असते हेसुद्धा झी मराठीच्या नियोजकांना कळू नये ना?
कमलाकर नाडकर्णी, दादर, मुंबई

ह्याला काय म्हणावे? जाऊ द्या सोडा जाऊ द्या?????

सुनील... का पण? का? पुन्हा पुन्हा तेच ते.... Sad
-योगेश

माझा अंदाज असा -
आर्या
प्रथमेश
रोहित
विशेष - कार्तिकी & मुग्धा.

किंवा

आर्या आणि कार्तिकी (विभागुन)
प्रथमेश
रोहित आणि मुग्धा (विभागुन)

चॅनलवाले कोणाला नाराज करणार नाहित बहुदा, कारण वैशाली, अवधुत सकट सगळ्यांनाच हे पाचही जण जिंकायला हवे आहेत.

काल अवधूत आणि वैशालीने 'पाचही जणांना विजेते घोषित करा' असं आळवून प्रेक्षकांच्या काळजाला जणू हात घातला आहे. ही इमोशनल ब्लॅकमेलिंगची सुरुवात म्हणायची का?

अरे मला युट्युब वर सापडत नाहीये काही.. सारेगम लिटील दिले तर ०७ हिंदी चे येत आहे.. सलग भाग नाही का तिथे? एडीएम तुम्ही पण काहीतरी सांगितले होतेत ना?

मी एसेमेस सगळ्यान्करताच करतो हे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु >> म्हणजे कोणालाच फायदा नाही.. फायदा फक्त आयडियाला.. Happy

marathi little champs शोधून सगळे 17.1 पासून एपिसोड्स शोध. (वेगवेगळ्या पानांवर आहेत.
http://www.youtube.com/watch?v=4Lqwcdoh6u4 ही एक लिंक. आर्याचं 'नरवर कृष्णसमान')

थँक्स नात्या, म्रु. .. मला पण मराठी ट्युब वर पण काही सापडले आहे.. ते आत्ता ऐकत आहे..

सुनिधी..

http://www.glutv.com/default.aspx?channel=9

ह्या इथे register करून तुम्हाला सलग पूर्ण एपिसोड मिळेल..
त्याचं free registration थोड्या दिवसांपुरतच असतं.. पण आता मेगा फायनल पर्यंत नक्की पुरेल ते.. Happy

इथे पहा आला आहे नवीन आणि शेवटचा भाग.
ही रोहित च्या गाण्याची लिंक आहे, बाकी सगळे उजवीकडे दिसतील.
http://www.youtube.com/watch?v=IRv8MXqKssI&feature=PlayList&p=5D2615A0A5...

पुन्हा एकदा रोहित नी मारून नेला शो , गाण्या मधली एक्स्प्रेशन्स, त्याचा ऍटिट्युड आणि सॉलिड पर्फॉर्मन्स स्किल्स:), मला सगळ्यात रोहित च आवडला या आठवड्यात !
मस्त एकदम, 'हिस्टरी' !!:)
अर्या छन नेहेमी प्रमाणे..प्रथमेश पण त्याच्या नेहेमीच्य स्टाइल मधे गुड !
मुग्धा नी क्युट केला 'डोक फिरलया' परफॉर्मान्स्..
कार्तिकी च 'कोंबडी पळाली ' सर्वात वाईट झाल (पुन्हा एकदा इतक द्वयर्थी आयटेम साँग इतक्या लहन मुली साठी का निवडल?) आणि जजेस नी मात्र ऍज ऑलवेज हाइप केल तिला, कसली रेकत होती कार्तिकी आणि किती आगाउ वाटते आज काल..उगीच लहान आहे म्हणून कशालाही चांगल म्हणून जजेस मिसगाइड करतात तिला आणि प्रेक्षकांना , नकोच होती ती टॉप ५ मधे (IMO)!
बाकी अवधूत, वैशालीच्या लहान मुलांशी emotional attachment, भवना समजु शकते पण हे काय नवीनच पाचही लोकांना विनर बनवा ??
मग काय अर्थ राहिला स्पर्धेला, आणि कशाला मागतायेत मग एस एम एस ??
सगळे चांगले आहेत हे खरय पण बेस्ट एकच असु शकतो, इतके महिने मुलांना स्पर्धेत उतरवुन शेवटी पाचही लोकांना विनर केल तर सगळ्यात वाइट शेवट होइल इतक्या चांगल्या स्पर्धेचा !

मला वाटते पाचही जणांना विजेते करतील .. पण वेगवेगळ्या पद्धतीने.

आर्या: महागायिका - Winner
मुग्धा: ज्यु. लिट्ल चॅम्प्स विनर
प्रथमेशः महागायक - Best Male Singer
रोहीतः बेस्ट परफॉर्मन्स सिंगर
कार्तिकी: जजेस चॉईस अवॉर्ड

...सगळेच खुष !

Pages