सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर महाअंतिम फेर्‍यांपेक्षा कालची महाअंतिम फेरी जरा नीरसच झाली. आणि अंतिम फेरीत पोचलेले स्पर्धक खरंतर महाअंतिम फेरीतही गातात असा रीवाज आहे..... पण काल ती मुलं कुठेच दिसली नाहीत. सुरुवातीला त्यांची गाणी झाली असतील तर माहीत नाही कारण आम्ही ९ नंतरच कार्यक्रम पाहायला सुरुवात केली.

कार्तिकीला 'जिंकवून' कोणाला फायदा होणार आहे?
पूनम, २००% अनुमोदन...... आता धुरळा उडवण्यात काहीच अर्थ नाही. कार्तिकी विजेती ठरल्यामुळे तिचाच फायदा जास्त होणार आहे. आवश्यक ते एक्स्पोजर, मार्गदर्शन, आर्थिक मदत तिला मिळणार आहे ज्याची माझ्या मते तिलाच जास्त गरज होती.

>>अंतिम फेरीत पोचलेले स्पर्धक खरंतर महाअंतिम फेरीतही गातात असा रीवाज आहे..... पण काल ती मुलं कुठेच दिसली नाहीत.
अगदी अगदी... मला तर वाटलं होतं की प्रसाद ओकचं सुद्धा गाणं होईल... काही हरकत नव्हती खरंतर. कार्यक्रम अजून थोडा रंगतदार झाला असता.

-योगेश

आवश्यक ते एक्स्पोजर, मार्गदर्शन, आर्थिक मदत तिला मिळणार आहे ज्याची माझ्या मते तिलाच जास्त गरज होती. >>>> का??? "च" ने गोंधळ झाला असेल कदाचित.. Happy पण फक्त कार्तिकीलाच का गरज होती? बाकीच्यांना नव्हती?? खुलासा please.. Happy

मला तर त्यात शमिका, राधिका, अवन्ती कुठे दिसल्या नाहीत, कुणाला दिसल्या होत्या का? >>>> राधिका, अवंती होत्या... केतकी माटेगावकर ज्या ग्रुप मधे होती त्याच ग्रुप मधे.. पण शमिका नाही दिसली कुठे मलातरी..

भसाडा आणि लाउड असाच तिचा आवाज असेल तर वेळोवेळी तिला बेस्ट परफॉर्मर चे बक्षीस आणि याच बीबी वर मिळालेली दाद खोटी असेल काय >>>> दाद खोटी नाहिये.. पण दाद किती प्रमाणात मिळावी आणि नक्की कश्या स्वरूपात मिळावी ह्याच्याबद्दल चाललय सगळं.. Happy

>>>> कार्तिकीला 'जिंकवून' कोणाला फायदा होणार आहे? >>>>
हाच नव्हे तर सर्वदूर देशभरात पसरत असलेल्या या फायदातोट्याच्या गणितावर लौकरच एक बीबी उघडणार आहे! तोवर वाट पहा!

एनिवे, मी वर कुठेही "कार्तिकी" ची निन्दा केलेली नाही हे डोक्यात ठसवुन घेणे! कार्तिकीबरोबरच मुग्धालाहि मी प्रथम क्रमान्काच्या शर्यतीत धरत नव्हतो! व हे पूर्वीही स्पष्ट केले आहे! कार्तिकी मधे एक "गुणवत्ता" आहे व ती कोणीच नाकारीत नाही, पण ती गुणवत्ता "प्रथम" क्रमान्काच्या लायकीची होती का? हा प्रश्ण हे! व तरीही प्रथम क्रमान्क कसा मिळाला त्याची उत्तरे शोधतोय!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिम्ब्या, प्रामाणिकपणा आवडला! Happy
महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तोन्डी प्रमाणभाषा नाही... ग्रामीण जनतेचे उच्चार शहरी बोलीपेक्षा वेगळेच आहेत.. शहरांमध्ये तुलना केली तरी प्रत्येक शहरातल्या बोलीचा ढंग वेगवेगळाच आहे. अगदी पुण्याचे उदाहरण घेतले तरी वेगवेगळ्या पेठेतल्या बोलीतही फरक दिसतो. असे असतांना फक्त ग्रामीण उच्चार आहे म्हणून सर्सकट नाकारणे हा मूर्खपणा आहे असेच म्हणावे लागेल.

सायली पानसेचे क्णीतरी उदाहरण उगाच दिले आहे... किनर्‍या आवाजात अतिशय बेसूर गायची ती.. त्यावेळच्या अंतिम भागातच तिची किती दमछाक होत होती हे पाहीले आहेच आपण!

जातिचा उल्लेख अगदी घृणास्पद आहे!

त्याबद्दल शतसहस्त्र वेळा माझ्याकडून निषेध!
_________________________
-Impossible is often untried.

agaau
आता पॉप्यूलर व्होट्सचा मुद्दा- वैशाली जिंकते तेंव्हा ही व्होट्स 'प्रामाणीक'असतात,काल आर्या वा प्रथमेश जिंकले असते तरी ती प्रामाणिकच असती,कार्तिकि जिंकल्यामुळे ती एकदम अप्रामाणीक,मॅन्युप्युलेटेड वगैरे झाली याची मला फारच मजा वाटतेय.तरी बरं ज्युरी आणी जजेसची आडनावे;गुप्ते,फडके,अभ्यंकर,खाडीलकर,पंडित वगैरे होती.
<<<<<
First of all , I have not mentioned the "obvious" reason and don't think its necessary to mention here, so u shouldn't not do V n c assuming anything without seeing my actual post.
बाकी प्रामाणिक मतां बद्दलः
आधीची पोस्ट जर वाचली असेल तर अस म्हंटला नसतात.
इन केस वाहून गेल असेल तर परत एकदा सांगते.
मी म्हंटल होत कि " वैशाली सुध्दा जिंकते तेंव्हा देखील चॅनल चा काही तरी फायदा असल्या शिवाय नाही जिंकु शकत' !
आणि प्रथमेश-आर्य-रोहित जिंकले असते तर मी काय म्हंटले असते हे तुम्ही लिहिण्या आधी त्या मी आधी काय मत मांडल होत ते पण बहुदा नाही वाचल तुम्ही.
मी लिहिल होत " मेगा फायनल जो/जी जिंणार आहे ते झी ने आधीच ठरवल असणार., अस असताना जर आर्या-रोहित्-प्रथमेश जिंकले असते तर मला आनंद झाला असता एवढच माझं मत, बाकी तुमच्या किंवा इतरांच्या आवडी बद्दल मी तरी कधी V n C केला नाहीये, करणारही नाही, ज्यांची कार्तिकी आवडती आहे त्यांनी करा एंजॉय अस पण लिहिल वर, वाचल नसेल तर.

>>दाद खोटी नाहिये.. पण दाद किती प्रमाणात मिळावी आणि नक्की कश्या स्वरूपात मिळावी ह्याच्याबद्दल चाललय सगळं.>>
जाउद्या हो अडम,कशाला उगीच नाही ते फाटे फोडताय,आंबेकर आणी लघाटे सोडून 'गायकवाड' जिंकल्याने पोटशूळ उठलाय हे मान्य करुन टाका ना.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

गिरी,
"का" हा प्रश्ण मूळ dj ने उपस्थित केला.. त्यावर adm ने स्पष्ट विचारले तरी काही उत्तर नव्हते... लिंब्या ने जातीयवादाचा उल्लेख प्रथम केला आहे.. बाकी इतरांन्नी (केवळ) तेच कारण आहे असे म्हटले नाहीये.
पण तरिही "अनाकलनीय" निकाल लागतो तेव्हा कारणं शोधायची प्रक्रीया ही स्वाभाविक आहे. आणि इथे "अनाकलनीय" निकाल हे वैयक्तीक नाही तर सर्वसामान्य मत्/सूर आहे..

आणि फक्त ज्युरी हा एकच क्रायटेरीया नव्हता तेव्हा त्यावर तरी विश्वास ठेवा वगैरे म्हणणार्‍यांन्नी जरा "समस" चं गणीतही लक्षात घ्यावं.. मला तर गम्मतच वाटते. अशा लोकांन्ना मी हेच विचारेन की मग कुणाला किती गुण ज्युरींचे मिळाले अन कुणाला किती समस आले हे स्पर्धेचा निकाल देताना सांगायला काय problem आहे कळत नाही. कुठल्याही स्पर्धेत स्पर्धकाला किती गुण मिळाले अगदी महाअंतीम फेरीतही हे किमान सांगणे हे स्पर्धा घेणार्‍यांवर बंधनकारक असायलाच हवे. निदान तेव्हडे घोषित केले तरी ईतर बर्‍याच शंकाना वाव रहात नाही... मग उगाच याच्या गाण्यात काहीतरी वेगळं दिसलं असेल तीच्या गाण्यातून काहितरी वेगळ पुढे येवू दे अशी शाब्दीक कारण मिमांसा द्यावी लागत नाही..
प्रामाणिकपणा जरा झी वाल्यांचाही दिसू द्या ना मग...
तो दिसत नाही म्हणून तर अशा ईतर सर्व करणांन्ना वाव मिळतो... तेव्हा अशी चर्चा करणार्‍यांना दोषी धरण्यात काही अर्थ नाही. ज्या स्पर्धेत call back वगैरे सारखे भावनाप्रधान अन धंदेवाईक प्रकार घडतात त्या स्पर्धेची विश्वासार्हता तेव्हाच गोत्यात येते अन हे कळायला आपण काही फार मोठे कानसेन वा गवई असायला हवे अशातलाही भाग नाही. तेव्हा निषेध करायचाच असेल तर झी च्या अप्रामाणिक धोरणांचा अन नियमांचा केला जावा.. ईती लेखनसीमा.

>>>> महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तोन्डी प्रमाणभाषा नाही...
गिर्‍या, लेका मी बोलतो ती मराठी अन माझ्या गावाकडे बोलतात त्यातदेखिल बराच फरक हे! अगदी मी बोलतो त्या अन लिम्बी बोलते त्या भाषेत देखिल बराच फरक हे!
दर पाच कोसावर भाषा बदलते असे म्हणतात, पण सन्गितात मात्र आसेतू हिमालय सन्गिताची भाषा तीही प्रमाणभाषा "अजुनतरी एकच" हे! असायला हवी! अन हेच मान्य नसेल तर बोलणेच खुन्टले!
पण हल्लीच्या या समर्थनावरुन असे वाटते की "बहुसन्ख्य" समाज "झुन्डशाहीच्या" जोरावर सन्गितादी कलाक्षेत्रातील प्रमाणभाषाही बदलू पाहील! पाहु दे बापड्यान्ना! Happy
कार्तिकीला आम्हि नाकारतो ते तिच्या ग्रामिण उच्चारणामुळे नाही तर अशुद्ध शब्दोच्चारामुळे! या दोन्हीत फरकच मान्य नसेल तर वादच खुन्टला! अन्य कारणे वर आधीच दिलीहेत

आता रहातो एकच प्रश्ण, कोणतरी विचारेलच, की लिम्ब्या, सन्गितावर बोलायची तुझी रे काय लायकी? इतक्या ठाम आत्मविश्वासाने बोलतो हेस तो?????? (विचारल तरी मी उत्तर देणार नाही ते निराळ)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

झीचे व्यावसायिक गणित पाहता रोहित राऊत जिंकणे अधिक रास्त ठरले असते...
मी महाअंतिम फेरीचे स्पर्धक ठरल्यापासून कोणालाच समस केला नाही.. त्या आधी माझे समस फक्त आणि फक्त प्रथमेशलाच जात होते!
_________________________
-Impossible is often untried.

>कार्तिकी मधे एक "गुणवत्ता" आहे व ती कोणीच नाकारीत नाही, पण ती गुणवत्ता "प्रथम" क्रमान्काच्या लायकीची होती का? हा प्रश्ण हे! व तरीही प्रथम क्रमान्क कसा मिळाला त्याची उत्तरे शोधतोय!
लिंब्या,
काही प्रश्णांची उत्तरं शोधायची नसतात... Happy विशेषतः जिथे "सब कुछ चलता है" अशी सर्वसाधारण मानसिकता असेल तिथे.

>>>>> आंबेकर आणी लघाटे सोडून 'गायकवाड' जिंकल्याने पोटशूळ उठलाय हे मान्य करुन टाका ना.
आगाऊ, लेको वर्म उघडे पडल्याने ते झाकायचे बघा आधी, तुमच्या मनात उपजलेल्या दुसर्‍यान्च्या पोटशुळाची फिकीर करण्यापेक्षा!
मी सरळ प्रश्ण विचारला, "रिझर्वेशन्स" इकडेही लागू झालीत का! असे का वाटले त्याची कारणमिमान्साही दिली! त्यात काही चुकले असे मला वाटत नाही वा त्यात काही "जातियवाद" आणला असेही नाही! फॅक्ट इज फॅक्ट, अन ते माण्डणे गुन्हा हे का?
माझे अजुनही असेच मत कायम हे की कार्तिकी व मुग्धा यान्च्यात फार फार तर चौथ्या व पाचव्या क्रमान्काबाबत विचार करता आला अस्ता, पहिल्या कदापीही नाही! कार्तिकी पहिल्या क्रमान्कावर आणली गेली हे पाहिल्यावर ज्या ज्या शन्का आल्या त्या इथे मान्डल्या, शन्का येणे गुन्हा हे का? जर माझे म्हणणे खोटे असेल तर ते पटवुन द्या की, लगेच "पोटशुळाच्या" तुमच्या त्या खास "गृहितकावर" का घसरता????

योग, तुझ म्हणण बरोबर हे! काही प्रश्णान्ची उत्तरे शोधायची नस्तात, (पुन्हा, का शोधायची नस्तात याचे उत्तरही शोधू नये शहाण्याने)!
तेव्हा लेखनसीमा!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

१]सर्वात बेकार रिझल्ट !!सुंदर पर्वाचा बह्यनक शेवट !आणि कार्तिकी "का" जिंकली ते सांगायला नको, समजदार लोकांना माहितच असेल "ते" एकमेव कारण !इथे लिहु शकत नाही पण कारण अगदी ऑबव्हियस आहे... !! [२]agaau,ईमेल करायची मला गरज नाही वाटत, तुम्ही कार्तिकी चे फॅन असाल तर एंजॉय करा.आर्या -प्रथमेश-रोहित सारख्या उत्कृष्ट गायकांना बाजुला करून कार्तिकी ला इतके flaws असताना ओव्हर रेट केले गेले तेंव्हा पासूनच बहुतेक आर्या-प्रथमेश्-रोहित च्या फॅन्स ना शंका होती, जी खरी झाली. [३]तुम्हाला जे वाटतय त्या कारणा साठी एंजॉय करा तुम्ही.आणि तसही तुम्हाला मेगा फायनल च ५० टक्के पॉप्युलॅरिटी व्होटिंग वगैरे गोष्टी प्रामणिक असल्याची खात्री वाटत असेल तर मग प्रश्न च येत नाही !
दिपांजली ताई तुमच्या तिन्ही पोस्ट पुन्हा तुम्हालाच वाचायला टाकत आहे,जे मुद्दे तुम्ही कधी लिहिलेच नव्हते ते मांडल्याचा खोटारडेपणा तरी करु नका.
आणी तुमची ती 'ओब्व्हियस' कारणे स्वतःहुन देण्याचे धाडस दाखवायला तुम्ही अजूनही तयार नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

लिम्बूशेठ, अशुद्ध शब्दोच्चार सुधारता येतील की.. लतादिदीचे हिन्दी आणि उर्दू शब्दोच्चार पूर्वी मराठी वळणाचे होते आणि त्यांनी ते प्रयत्नपूर्वक सुधारले . हे तर आपल्याला माहीत आहेच की! बहुसंख्य समाजाची झुन्डशाही अमान्य आहेच पण लटकी कारणे देऊन विरोध नकोय! संगिताला भाषा नसते असेच मी तरी ऐकत आलोय त्यामुळे संगिताची प्रमाणभाषा म्हणजे स्वरांची असेच तुला म्हणायचे असावे असे मी समजतो! त्याबद्दल मी काही जास्त बोलण्यात अर्थ नाही... आडात नाही तर आमच्या पोहर्‍यातकाय येणार? पण चांगलं ते कानांना कळतं,हृदयाला भिडतं हे मात्र नक्की! आर्याने गायलेले किशोरी आमोणकराचे कम्पोझिशन वेड लावणारे होते! आर्याने खूप सुंदर गायले! अगदी मंत्रमुग्ध केले!
प्रथमेशचे सुरत पिया की माझ्याकडे वसंतराव देशपान्डे यान्नि गायलेले आहे की जे त्याने गायल्यापेक्षा वेगळे आहे! वसंत्रावांचे खूप फास्ट आहे!
_________________________
-Impossible is often untried.

लिंब्या,
जाऊदे रे भाऊ... उगा कशाला त्रागा करून घेतोयस..? पोरांन्ना भरपूर एक्स्पोजर मिळालं, कुणाला तरी विजेतेपद मिळालं, मराठी पाऊल पडते पुढे चा जयघोष करून झाला, व्यावसायिक दृष्ट्या स्पर्धेला प्रचंड यश मिळालं, शिवकल्याण राजा बद्दल काही नविन माहिती मिळाली, त्या निमित्ताने पुन्हा एकदा संगीत हा महाराष्ट्राचा जिव्हाळा आहे हे सिध्ध झाल... एव्हडं पुरे आहे की Happy
चर्चा, मतं मतांतरे याला काही अंत नाही विशेषतः प्रत्त्येकाला जेव्हा त्याची बौध्धीक अन तर्कयुक्तीवाद प्यारा असतो तेव्हा.
जा बरं- माणिक बाई, बालगंधर्व, अभिषेकी, दिनानाथ इत्यादींची पदं अन ठुमर्‍या ऐक.. सगळा कानातला कचरा साफ होईल Happy
मला तरी दाट संशय योतोय की अलिकडे झी मराठी वाल्यांन्नी गिर्‍याची ही signature तर वाचली नाही ना:
"Impossible is often untried." Happy

लिंब्याभाऊ त्या गृहितकावर मी घसरलेलो नाही तर ज्यांनी सुरुवातच तिथुन केली आहे त्यांना उद्देशून बोलत आहे.
झी चा फायदा कशात,समस किती प्रमाणीक या आणी अशा अनेक शंका कार्तिकि जिंकल्यावरच का उठतात कारण ती मुळातच कमी प्रतीची आहे आणी कसल्या तरी 'रिझर्वेशन' शिवाय जिकणारच नाही हे पक्के ठरवले गेलेले गृहितक.
नशीब एवढेच की तिची स्पर्द्धेतली एंट्रीच संशयास्पद होती असे तरी अजून कोणी म्हटलेले नाही.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

वैशाली म्हाडे पण "का" झिंकली (मराठीत अन हिंदीतही) हेही सर्वाना माहितच आहे तेव्हा तिला व तीच्यासारख्या ईतरांन्ना पाठीम्बा देणार्‍यांच्या तोंडी आता हे प्रश्ण शोभत नाहीत.. पेराल तसे उगवते!
<<
योग,
सर्व प्रथम एक दुरुस्ती, वैशाली म्हाडे नाही 'माडे'.
Well, मी कार्तिकी च्या जिंकण्या बाबत कुठलाही प्रश्न मांडला नाहीये, एवढच लिहिलय कि कार्तिकी जिंकण्याच कारण 'obvious' आहे.
वैशाली माझी सर्वात आवडती असली तरी ती धरून सगळ्याच रिऍलिटी शो चे विनर fixed असतात हे पण म्हंटल आहे मी .
अता अस असताना जर वैशाली माझी आवडती होती तर मला तिला सपोर्ट करायला आवडल आणि मी केल :).
कार्तिकी चे सपोर्टर्स जसे खुष आहेत आज तसा मलाही आनंद झाला वैशाली जिंकण्याचा , कुठलाही गहन प्रश्न मांडला नाहीये मी याची नोंद घ्या, बाकी चालु द्या.

येथे जातीचा प्रश्न येतोच कोठे,
जेव्हा अकरा वर्शे वयाची मुलगी सन्त एकनाथ, नामदेव यान्चे अभन्ग गाते तेव्हा तीच्या मनात जातपात असते का..........

मला वाटते की आता कार्तिकी चे मनापासून तिला मिळालेल्या सन्धीबद्दल अभिनन्दन करुन अन सन्धीचे सोने तिच्याकडून व्हावे अशी शुभेच्छा देऊन हा विषय मी माझ्यापुरता इथे सम्पवतो, बाकिच्यान्नीही जमल्यास तसेच करावे Happy
एकन्दरीत पहाता या कार्यक्रमाकडून न भुतो न भविष्यती असे काम झाले आहे!
जी गाणी आम्ही आमच्या लहानपणी रेडीओवर ऐकत होतो, व कालौघात व अन्य सान्गितीक भाषान्च्या आक्रमणामुळे जी विस्मृतीत जाऊ पहात होती, त्या गाण्यान्ना, मराठी भाषेच्या त्या अलन्कारान्ना झी मराठी ने या कार्यक्रमामुळे उजाळा दिला, ते अलन्कार घरोघरी लोकप्रिय केले, हे काम थोर आहे
त्याशिवाय, पन्नास स्पर्धकान्ना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले हे ही नसे थोडके!
या सर्वाकरता, आर्थिक नियोजन हवेच हवे व ते करताना, समस सारखे, जाहिरातिन्सारखे उपाय करावे लागणे हे गृहितच आहे!
एकुणात झीने किती "धन्दा" केला या विषयात मला व एकुणच सन्गितप्रेमी प्रेक्षकान्ना काही गम्य असू नये! मला तरी नाही!
एक छान पायन्डा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पडला आहे! पुर्वीही सारेगमचे कार्यक्रम झाले पण या वेळेस जो प्रतिसाद मिळाला तो अभुतपुर्व असाच होता! याबद्दल कुणाचेच दुमत नसावे
आता वाट पहायची आहे ती पुढील, "प्रस्थापित" तरुण गायकान्च्या स्पर्धेची! किती मेजवानी मिळते त्याची आतुरतेने वाट पहायची!
वर कोणीतरी म्हणले आहे की काळाच्या कसोटीवर गुणवत्ता उतरेल ती खरी! मी तो विषय उचलला नाही कारण, पाचान्मधेही विशिष्ट गुणवत्ता जन्मजात आहेच, ती गुणवत्ता ते कसे जोपासणार, तिचे सन्वर्धन करणार हे काळ ठरवेल व त्या त्या व्यक्तिन्ची परिस्थिती ठरवेल, त्यान्ना इमानेइतबारे शुभेच्छा देणे हे आपले काम!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

धावशील शर्यतीत जिंकण्यास तू
अडथळा ठरेल जात! काय फायदा? Happy

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      कार्तिकी जिंकली काय किंवा इतर कुणी जिंकले काय, काय फरक पडतो?????? (ज्यांनी कार्तिकी ला समस न करता इतरांना समस केले असतील त्यांना नक्कीच फरक पडेल ........... Lol )

      रसिकांच्या दृष्टीने हे पाचही "विनर" आहेत आणि हेच रसिक उद्या या पाचही जणांकडे विनर म्हणूनच पाहणार आहेत .............. Happy

      काल पल्लवीने जाहीर केल्याप्रमाणे या पाचही जणांनी म्हटलेल्या गाण्यांची सीडी काढणार आहेत ना, मी त्याचीच वाट बघतो आहे. या सीडी मध्ये कार्तिकी जिंकली म्हणून तिची जास्त गाणी, आणि इतरांची कमी गाणी असं तर होणार नाही ............. Happy

      ~~~~~~~~~~~~~~
      शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
      प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले

      अगाउ
      <<<जे मुद्दे मी कधीच न मांडल्या बद्दल मला 'खोट' म्हणाताय ते इथेच prev page पान नंबर ४ वर पूनम आणि योग ला दिलेल्या उत्तरां मधे आहेत, वाचायच असेल तर वाचा नाही तर म्हणा काहीही, I don't care.
      बाकी कसल धाडस अन काय, जे मला इथे लिहायच च नाहीये ते मी लिहिणार नाही हे किमान ३ वेळा सांगितलय ते पण वाचा (पहिल्याच पोस्ट मधे लिहिलय मी, आवडत्या स्पर्धकाची विजय एंजॉय करा , माझ्या मतांची काळजी तुम्हाला नसावी, पुन्हा पुन्हा तेच तेच लिहु नका, धन्यवाद.)

      >>काल पल्लवीने जाहीर केल्याप्रमाणे या पाचही जणांनी म्हटलेल्या गाण्यांची सीडी काढणार आहेत ना, मी त्याचीच वाट बघतो आहे. या सीडी मध्ये कार्तिकी जिंकली म्हणून तिची जास्त गाणी, आणि इतरांची कमी गाणी असं तर होणार नाही .............

      बाकी, अरुणचं हे म्हणणं आपल्याला एकदम पटलं. मी पण त्या सीडी ची वाट पहातोय...
      -योगेश

      काल पल्लवीने जाहीर केल्याप्रमाणे या पाचही जणांनी म्हटलेल्या गाण्यांची सीडी काढणार आहेत ना, मी त्याचीच वाट बघतो आहे>>>>
      हेच म्हणतो आणि वाट पाहतो! Happy

      ________________________
      -Impossible is often untried.

      कार्तिकी देवींचा विजय असो.
      खरे तर ५ ही जण महाविजेते आहेत. काल शेवटच्या ३ तासात तब्बल १५ लाख sms आले. राहुन राहुन मला एकाच गोष्टीचे वाईट वाटले की मागील ६ महीन्यात मला एकदाही कार्तिकीला sms पाठवण्याची बुद्धी का झाली नाही ?
      असो भविष्यकाळासाठी सर्वांना मनःपुर्वक हार्दीक शुभेच्छा.
      ===================
      माझ्या तुमच्या जुळता तारा
      मधुर सुरांच्या बरसती धारा

      मला तर त्यात शमिका, राधिका, अवन्ती कुठे दिसल्या नाहीत, कुणाला दिसल्या होत्या का? >>>> नेहा दिसली का कोणाला ?

      मी टिव्हीवरची कुठलिच मालिका बघत नाही, पण दोन महिन्यापूर्वी चुकून या कार्यक्रमाचा एक भाग पाहिला, आणि मग हा कार्यक्रम नियमित बघायला लागलो. खरच छान कार्यक्रम होता. 'शूरा मी वंदिले' सारख्या भागांनी तर अक्षरशः खिळवून ठेवले...

      आर्या, प्रथमेश आणि रोहितसारख्या अव्वल स्पर्धकांना डावलून कार्तिकी विजेती होणे हे फारच धक्कादायक होते खरे, पण एकदा एसएमएसद्वारे विजेता ठरवण्यातील लबाडी आपल्याला माहित आहे हे गृहीत धरले आणि रिऍलिटी असला तरी 'शो' आहे हे लक्षात घेतले म्हणजे फार त्रागा करावासा वाटणार नाही.

      कोण आणि काय आवडले ही अभिरूचीसापेक्ष गोष्ट आहे, 'शूरा मी वंदिले' आणि त्यातील हृदयनाथांचे त्या त्या गाण्याची पार्श्वभूमी उलगडून सांगणे हे मला विलक्षण आवडू शकते, एक संगीतकार एवढ्या खोलात जावून विचार करतो हे भावू शकते, तसेच दुसर्‍या कोणाला ते कंटाळवाणे आणि 'जवा नवीन पोपट हा', 'डोक फिरलया' वगैरे महान मनोरंजक व श्रेष्ठतम गीते वाटू शकतात.

      संयोजक खरच कलेशी आणि लोकांचे काय मत आहे हे जाणून घेण्याशी प्रामाणिक असतील तर एका क्रमांकावरून एकच आणि एकदाच मत देण्याची सुविधा ठेवतील [फार तर फार चार मते, घरटी एक फोन धरला तर], पण तसे कोणीच ठेवत नाहीत.

      मागील ६ महीन्यात मला एकदाही कार्तिकीला sms पाठवण्याची बुद्धी का झाली नाही ? >>> अहो.. तुमच्या गोयंचे चेडू ला sms पाठवताना कार्तिकी ला sms पाठवण्याची बुध्दी कशी होणार..? Happy Light 1

      >सर्व प्रथम एक दुरुस्ती, वैशाली म्हाडे नाही 'माडे'.
      बरं... Happy
      >एवढच लिहिलय कि कार्तिकी जिंकण्याच कारण 'obvious' आहे.
      DJ,
      obvious या शब्दामागे तुला नेमकं काय अभिप्रेत होतं हे तुलाच माहीत.. आम्हाला कुणाला माहितच नव्हतं असं धरून चालुया.. Happy

      अगदीच अनपेक्षित झाला निकाल. आणि इथली चर्चा तर आणखीच अनपेक्षित!

      Pages