सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगासेठ,

मराठी कोणी नाही म्हणुन वाईट वाटणारच ना थोडेसे..

असो..आता परत नाही लिहिणार हा..उगी उगी...डोळे पुसा बरं! Happy

तो स्वरीत शुक्ल मराठीच आहे की. त्याला करुया सपोर्ट:-)

mansmi18 सांत्वनाबद्दल धन्यवाद! Happy
Arch त्याला विसरल्याबद्दल सॉरी, अगदी एस्स डबल ओ आर ई सॉरी , त्याला नक्की सपोर्ट करू, पण इथे तो जिंकला तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यात म्हणून झी ने त्याला जिंकवला असे अन्य भाषिकांना वाटू नये म्हणजे झाले Wink Light 1

***************************
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची!
महावंदनीय अतिप्राणप्रिय ही मायमराठी आमुची!!

स्वरीत शुक्ल मराठी आहे कोणी सांगितलं ?
हे 'शुक्ल' last name सगळी कडे असतं आणि मला वाटत तो यु.पी कडचा आहे.

हो, कार्तिकी बाइंनी ही संधी फुकट घालवली, पण तिची लायकी हिंदी मधल्या ऑडिशन ला यायची सुध्द्दा नव्हती त्यामुळे ती नाहीच आली ते बरं झालं !
उपविजेत्यांना नाही संधी मिळाणार,( बहुदा आर्या -प्रथमेश-रोहित ची दहावी आहे असं वाचलं होत आणि हिंदी च्या ८ तो १३ एज गृप मधे पण कदाचित बसणार नाहीत हे तिघं)
त्यामुळे अता स्टँड बाय ठेवलेली सृष्टी भंडारी, झी बांगला विनर राहुल, अजुन एक मुलगी आणि नुकताच एलिमिनेट झालेला हेमंत परत येणार आहेत वाइल्ड कार्ड नी !

>> एस्स डबल ओ आर ई सॉरी अ ओ, आता काय करायचं
सिंडी, एस्स डबल ओ आर ई सॉरी असं 'असामी असामी' मध्ये आहे. rangaseth नी त्या रेफरन्सनी म्हटलं असेल.

सिंडे, त्याला नवीन स्पेलींग म्हणतात ग. Proud

दीप्स, तो मराठीच ग. त्याच्या आईने म्हटलेलं गाणं ऐकलस की नाही?

मुहब्बत म्हणते. म्हणज नक्कीच मराठी ग. आणि युपीचे शुक्ला असतात. गुजराथ्यांच्यातपण शुक्ल असतात. पण एवढा गाण्याचा टॅलंट म्हणजे नक्की गुजराथी नाही. Proud

हो, कार्तिकी बाइंनी ही संधी फुकट घालवली, पण तिची लायकी हिंदी मधल्या ऑडिशन ला यायची सुध्द्दा नव्हती त्यामुळे ती नाहीच आली ते बरं झालं ! >>>
अरेरे एका १० वर्षांच्या मुलीविषयी अशी भाषा ......:(

अरेरे एका १० वर्षांच्या मुलीविषयी अशी भाषा
<< अता लिट्ल चँप ची स्पर्धक म्हणजे याच वयोगटातली असणार ना Proud
आणि खरच नाहीये तिची लायकी हिंदी लिट्ल चँप मधे गायची तर अजुन कुठली भाषा वापरायची Wink

लिटिल चॅम्प्स पर्वाबद्दल माझं ही मत ( पूर्वीच लिहिलेलं ) इथे मांडावं म्हणून माझी मेल कॉपी करत आहे. परत चर्चा सुरु करावी असा अजिबात उद्देश नाही. केवळ माबोकरांना माझंही मत कळावं म्हणून Happy

<<< मला असे जाणवले की या वेळेचा result प्रचंड वादग्रस्त ठरला. आर्या किंवा प्रथमेश चे पाठीराखे बरेच होते. Personally कार्तिकी ला जिंकण्याइतपत sms आले असतील असे मला वाटत नाही. निकालामध्ये पारदर्शकता नाही. एकंदर निकालाने माझे फारसे समाधान झाले नाही. पण त्याचे कारण कार्तिकी विजेती झाली आणि मला दुसरे कुणी व्हायला हवे होते हे नाही.
एक सुजाण श्रोता म्हणून काही मुद्दे मांडावेसे वाटतात ...

ह्या आधीच्या दोन्ही पर्वांत ( वैशाली माडे आणि 40 + ) विजेतेपदासाठी फारशी चुरस नव्हती. 40 + मध्ये तर विजेते कोण होणार हे पहिल्या फेरीतच निश्चित झाले होते. वैशाली च्या पर्वात सायली पानसे deserving होती. ती मेहनती होती, गाणी अचूक सादर करत होती. पण तिचा आवाज कोता होता ... आणि वैशालीचं गाणं समग्र होतं. ती classical गात नव्हती हे खरं पण जी गाणी गात होती त्यावर तिने आपला ठसा उमटवला जे फार दुर्मिळ असते.

Little champs च्या पर्वात अंतिम फेरीत आलेले बाराही स्पर्धक उत्तम होते असे नाही. रागेश्री वैरातकर सारख्या काही गुणी मुलांना संधी मिळायला हवी होती असे वाटले.

बाकीच्या स्पर्धंकात काही कमी तर काही जास्त होते. रोहित राऊतची तयारी चांगली होती पण त्याचा आवाज फुटत असल्याचा तोटा त्याला सहन करावा लागत होता. स्पर्धा ही स्पर्धा असते. तिथे potential बघून चालत नाही तर त्या timeframe मध्ये काय actual दिसते ते बघावे लागते. त्यामुळे विजेता ( महाविजेता !! ) होण्यासाठी तो पात्र ठरत नव्हता.

प्रथमेशचा रीयाज़ त्याच्या प्रत्येक गाण्यात दिसत होता. तो तयारीचा होता ह्यात वादच नाही. पण काही काळानंतर त्याची गाणी थोडी सरधोपट वाटू लागली. संजीव अभ्यंकरांनी त्याला योग्य सांगितले होते की आवाजातले चढ उतार, voice modulations and expressions कडे लक्ष दे. तो आवाज एकाच पद्धतीने लावायचा त्यामुळे तो विजेता झाला असता तरीही समाधान झाले नसते.

मुग्धाची समज वाखाणण्यासारखी होती. एवढ्या लहान वयात इतकी तयारी कौतुकास्पद आहे. पण जेव्हा ८ ते १४ वयोगट जाहीर होतो तेव्हा एखादी मुलगी लहान आहे त्या मानाने चांगली गाते असे म्हणून चालत नाही ( potential vs actual ) त्यामुळे तिच्याहून चांगलं गाणा़ऱ्या मोठ्या मुलींना डावलून तिला विजेता करणे योग्य नव्हते ( त्या मुली आठव्या वर्षी मुग्धाइतकं चांगलं गात नसतीलही किंवा मुग्धा १४व्या वर्षी त्यांच्याहून चांगली गाईल ... तरीही Happy )

आर्या इतकी हरहुन्नरी गायकी दुसऱ्या कुठल्याच स्पर्धकाची नव्हती. तिच्या गाण्यात नेमकेपणा होता. श्वासाच्या जागा, expressions च्या जागा ... गाणे अचूक बसवलेले असायचे. कार्तिकीऐवजी आर्या विजेती झाली असती तरी चालले असते ...पण आर्याचा आवाज कोता होता आणि तिचे खर्जातले सूर बरेचदा नीट लागत नव्हते. त्यामुळे ती विजेती झाली नाही तरी हरकत नाही.

कार्तिकीच्या गाण्याचा बाजच काही वेगळा होता. तिला दैवदत्त देणगी आहे हे खरेच ! ... इतका कमावलेला आवाज इतक्या लहान वयात ही अचाट गोष्ट आहे. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे कुणीहि कधीही न ऐकलेली गाणी रसिकांच्या काळजापर्यंत पोचवणं ही सोपी गोष्ट नाही. बाकीच्यानी गायलेली गाणी ही प्रसिद्ध गाणी होती. अशा गाण्यांतून नेहमी पुन:प्रत्ययाचा आनंद मिळत असतो. दुसरं म्हणजे आर्याची गायकी ही calculated होती तर कार्तिकीचं गाणं जास्त spontaneous होतं. आवाज unique होता. पण तरीही ती versatile नव्हती. काही काही प्रकारची गाणी ... विशेष करुन ( नाजूक ) भावगीतं ती नीट गाऊ शकली नाही.

मग विजेता नक्की कोण व्हायला हवं होतं ?? .... पाचजणं नक्कीच नाही ... कारण ही स्पर्धा आहे आणि फार फार तर दोन जणांना विभागून देता येईल पण विजेता हा कुणातून तरी निवडलेलाच हवा. दुसरे म्हणजे हे पाच जणं सर्वोत्तम होते असे मला वाटत नाही. शाल्मली सुखटणकर अत्यंत गुणी गायिका होती. And she deserved to be in final five ! ...

सगळीच मुलं फार talented होती. मोठे काय गातील असे गात होती. त्यामुळे खरं तर शेवटी शेवटी ही स्पर्धा न वाटता ह्या मुलांच्या गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे असेच सर्वांना वाटू लागले होते. कार्तिकी विजेता झाल्याची अस्वस्थता ही त्यातून आली असावी. बाकी कुणीही दुसरं विजेता झाले असते तरीही मला तेच वाटले असते ( आणि शाल्मलीवर अन्याय झाल्याची खंतही ... )

सारेगमप ने असे कधीही म्हटले नव्हते की अंतिम विजेता हरहुन्नरी असावा ... त्याला सगळ्या प्रकारची गाणी गाता यायला हवी. त्यामुळे आवाज, रीयाज़ आणि गाणे पोचवण्याची समज या निकषांवर कार्तिकी विजेती झाली असेल तर त्यात कुणावर अन्याय झाला असे मला वाटत नाही ! पण तरीही मनात एक अस्वस्थता उरतेच ... Happy >>>

अश्विनी, पोस्ट आवडली. Happy
यातल्या कुणाकडेही अंतिम विजेतेपद गेलं असतं तरी इतर चारांसाठी अस्वस्थ वाटलंच असतं, हे अगदी पटलं.

नवीन लिटील चॅंप्स आजपासून सुरू होणार आहे. पहिल्यांदा काही पात्रता फेरीच्या भागांचे प्रक्षेपण आहे असे दिसतेय. याच धाग्यावर चर्चा करायचीय की नवीन धागा काढावा?

Pages