सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्या ला अनुमोदन.. !! मला वाटलं मला एकट्यालाच तसं वाटलं की काय??

आपल्या शाळा कॉलेज मधे काही शिक्षक असतात जे अतिशय ज्ञानी/अनूभवी असतात पण त्यांना शिकवण्याची नॅक नसते.. आपल्या कडचे knowledge योग्य पध्दतीने लोकांपर्यंत पोचवण्यात किंचित कमी पडतात... तर काही शिक्षकांकडे मर्यादित अनूभव असतो पण असलेल्या गोष्टी अतिशय योग्य आणि मार्मिक शब्दात समोरच्याच्या गळी उतरवतात...
असं काहीस मला पंडितजी आणि शंकर महादेवन ह्या दोघांचे भाग पाहून वाटलं... शंकर महादेवन ने जशी कार्यक्रमाची नस पकडली अशी पंडीतजींच्या दोन्ही भागात झालं नाही असं हे भाग बघताना वाटलं..
अर्थात गेल्या भागात पंडीतजींनी सांगितलेले वेगवेगळ्या गाण्यांबद्दलचे अनूभव आणि आठवणी मात्र अतिशय श्रवणीय होत्या...
माझ्या मनात आलेलं हे मत.. दोघांच्याही ज्ञान आणि अनूभव दोन्ही बद्दल काही बोलायची माझी लायकी नाही ह्याची पूर्ण जाणिव आहे.. Happy

अरेच्चा मलापण असेच वाटले होते की मी एकटीच बोर झाले आहे. मुलांनी सगळी गाणी मस्तच गायली तरीपण.....
मी तर मधेमधे NDTV वर Indian of the year बघत होते, तो कार्यक्रम मला आवडला.

>>>>> शिव कल्याण राजा चीच प्रसिद्धी चालू असल्या सारखे वाटले.
आता अजुन कसली प्रसिद्धी करायची शिल्लक हे त्याची?
हे मत अमान्य!
हां, अस म्हणला अस्ता कि स्वातन्त्र्य चळवळीस कारणीभूत व सहभागी खास व्यक्ती, ज्या नॉर्मली जाणूनबुजून राजकीयदृष्ट्या दुर्लक्षीलेल्या आहेत, त्यान्ची प्रसिद्धी होत होती / करत होते, तर एक वेळ मान्य केल अस्त!
हो ना, काय गरज होती त्या रिकृटवीरास पुन्हापुन्हा दाखवण्याची नि त्याच्या त्या भुक्कड जड जड शब्दबम्बाळ रचना ऐकवण्याची??????/ चाल्ल अस्त, अस विचारल अस्त तरी चाल्ल अस्त!
अन सव्विसजानेवारीच निमित्त काढून पब्लिकच्या माथी 'हिन्दुइझम" अन "पेट्रिऑटीझम" थोपविण्याचा प्रयत्न केला गेला, असही म्हणल अस्त तरी चाल्ल अस्त! नाही का? नाहीतरी मन्गेशकर कुटुम्बियान्चे सावरकर प्रेम सर्वश्रुत हे!
अन शिवाजीवरची गाणी ती काय? पाच पन्चवीस रुपयात सिड्या नि कॅसेटी मिळतात हव्व्या तेवेढ्या! तीच तीच गाणी ऐकायला कण्टाळा नाही का येत आम्हाला?????? त्यापेक्षा ओये ओये, कुठ कुठ जायाच, आती क्या खन्डाळा अन झालच परवाच ते कोम्बडी पळाली असली जनसामान्न्यान्ना भावणारी, बहुजनसमाजाची आवडती गाणि ऐकवायला मन्गेशकरान्ना काय धाड भरली होती??????? असही विचारल अस्त तरी चालेल, चालेल काय पळेल! दौडेल! हो की नाही????
अरे कार्यक्रमाचा विषय काय निवडलेला, त्यास सुसन्गत जर काही दाखवायच तर शिवाजी नि सावरकर वजा जाता काही शिल्लक उरेल ते कितीस असेल???????? अन हे नको होत, तर मग काय दाखवायला, आपल ऐकवायला हव होत???? मला आवडेल समजुन घ्यायला!

बाकी, हृदयनाथान्नी सान्गितलेल ते चर्चिलच वाक्य अगदी तन्तोतन्त लागू पडते! आजही!
येथिल पब्लिक तोन्डी काय गुणगुणत, केवळ हे समजुन घेवुन या राष्ट्राला काही भवितव्य आहे की नाही याची पारख होईल अशा अर्थाचे चर्चिलचे ते निवेदन स्वातन्त्र्यानन्तर ६० वर्षान्नी देखिल तेवढ्याच भीषणरित्या प्रत्यक्षात दिसते आहे!
असो! इति लेखनसीमा
...;
आपला, लिम्बुटिम्बु

LT.. कार्यक्रम म्हंटला की त्यामधले contents, मांडणी, सहभागी लोकांची कामगिरी, सादरीकरण, थिम ह्या सगळय गोष्टी येतात..
कार्यक्रामाचा एकूण प्रभाव पडण्या साठी ह्या सगळ्याची भट्टी जमून येणं आवश्यक असतं.. मग ह्या गोष्टी वेगवेगळ्या कितीही चांगल्या झाल्या असल्या तरी कधी कधी त्यांचा एकत्रित आस्वाद घेताना चांगले वाटेलच असेल नाही... पुरणपोळी, तूप आणि त्याबरोबर झणझणीत पंजाबी भाजी हे (नॉर्मल माणसे) एकत्र खाऊ शकत नाहीत.. आणि वरच्या कोणत्याही पोस्ट मधे कोणीच मन्गेशकर कुटुम्बियान्चे सावरकर प्रेम, 'हिन्दुइझम, पेट्रिऑटीझम, रिकृटवीराच्या भुक्कड जड जड शब्दबम्बाळ रचना, शिवाजी नि सावरकर ह्यांना वजा करणे ह्याबद्दल काहीच बोलललेलं नाहिये.. ! ही सगळं तुम्हीच लिहिलेलं आहे.. हीच सगळी गाणी त्या दुर्दैवी दिवसाच्या दुसर्‍या दिवशीच्या भागात पण होती.. आणि त्यावेळी इतर काही नसताना (फक्त पल्लव्चीच्या निवेदनासह) तो भाग अतिशय touching झाला होता..!

तेव्हा उगाच गैरसमज करून उत्साहाच्या भरात काही बाकी पोस्टू नका ही विनंती..
असो.. Happy

adm मी माझ मत मान्डल! Happy
तीच तीच गाणी पुन्हा पुन्हा सहजगत्या ऐकायला मिळाली की त्यान्चही अजिर्ण होऊ शकत सामान्य माणसाला.......! अन परिणामस्वरुप मग ती कशाचीही जाहिरातबाजी वाटू शकते!
तस वाटणे हे मी अमान्य करत नाहीये, पण तस का वाटून घेवु नये सामान्य माणसान्नीदेखिल, त्याची कारणे फक्त सामान्यमाणसाच्या "आवेशात" सान्गितली! Happy
पटली तर घ्या, नाहीतर सोडून द्या! काय सक्ती नाही! कस?
...;
आपला, लिम्बुटिम्बु

adm मी माझ मत मान्डल! >>> ते झालच...
पटली तर घ्या, नाहीतर सोडून द्या! काय सक्ती नाही! कस? >>> ते ही झालच..
फक्त तुम्ही तुमच्या पोस्ट मधे जे लिहिलय ती आमची मतं नव्हती हे सांगण्यासाठी तो पोस्टप्रपंच... Happy

>>>> तुमच्या पोस्ट मधे जे लिहिलय ती आमची मतं नव्हती हे सांगण्यासाठी तो पोस्टप्रपंच
बरं!

पं हृदयनाथ मंगेशकरांचे विचार ऐकायला खास योग्यता लागते , हे आज नव्यानेच कळले.
शिवकल्याण राजा काय किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जितके वेळा ऐ़कू तितके वेळा अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या आयुष्याचे इतिकर्तव्य काय , असा विचार एकदातरी मनात येतोच .
मनात नसेल येत , तर फक्त एकापेक्षा एक सारखे कार्यक्रम बघून आनंद मानावा.

शिव कल्याण राजा चीच प्रसिद्धी चालू असल्या सारखे वाटले.
----------------------------------------------------
मला नाही वाटत की "शिवकल्याण राजा", "लता", "हृदयनाथ" किंवा "बाबासाहेब" हे कुठल्याही प्रसिद्धीचे मोहताज आहेत.
मी पहाटे साडेतीन वाजता उठुन तो कार्यक्रम बघीतला आणि मला माझा वेळ सार्थकी लागल्यासारखे वाटले. मला तर गाण्यापेक्षाही बाळासाहेब जे सांगतात ते अतिशय छान वाटते.
मी शिवकल्याण राजा किती वेळा ऐकले त्याची गणती सोडुन दिली आहे. जर हे आवडणे आणि परत परत ऐकणे हे सामान्यपणाचे लक्षण असेल तर मला "सामान्य" असल्याचा अभिमान आहे.

लिंबु इतकं लांबलचक काय बोलला? मला एकही अक्षर कळलं नाही! (त्याच्या पोस्टचा रोख तर अजीबातच नाही.) आता मधेच हा रिकृटवीर कोण? Uhoh

हीच सगळी गाणी त्या दुर्दैवी दिवसाच्या दुसर्‍या दिवशीच्या भागात पण होती.. आणि त्यावेळी इतर काही नसताना (फक्त पल्लव्चीच्या निवेदनासह) तो भाग अतिशय touching झाला होता..! >>>>>> adm तुमच्याशी १००% सहमत. तो कार्यक्रम बघताना आम्ही घरातले सगळेच सारखे डोळे पुसत होतो.

मी वरती माझे मत मांडले होते, पंडितजींनी गाण्याचे वर्णन चांगले केले पण ते मलातरी बोर झाले. त्यांची योग्यता काढणारे आपण कोण?

पण तरीसुद्धा मला असे वाटले की त्याचबरोबर त्यांनी जरा मुलांचेही कौतुक करायला पाहिजे होते, गाणी म्हणताना सगळ्या मुलांनाही किती टेन्शन आले होते. गाणी ऐकताना पंडितजींच्या चेहर्‍यावर कडक गुरुजींचे भाव होते, ते मला जरा खटकले.

आणि हे प्रत्येकाचे मत असु शकते. आपल म्हणणे दुसर्‍याला पटेल अशी अपेक्षा न ठेवुन आपण सगळ्यांनीच ह्या धाग्याचाही V&C करायला नको.

कालचा एपिसोड ही मस्त झाला. मी तर 'सरणार कधी रण'' ला रडलेच.
>>मला नाही वाटत की "शिवकल्याण राजा", "लता", "हृदयनाथ" किंवा "बाबासाहेब" हे कुठल्याही प्रसिद्धीचे मोहताज आहेत.>> २००% अनुमोदन...
शिवकल्याण राजा आणि त्याचा सारांश जितक्या अधिक वेळेला ऐकावयास मिळेल तितकं कमीच आहे.

ज्या ताकदीने सावरकरांनी किंवा इतर कवींनी काव्यं रचली त्याला पंडीतजींनी आपल्या संगितातून आणि लता मंगेशकरांनी पुरेपुर न्याय दिलाय. नुसतं गाणं रचून किंवा सादर करून श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभं करणं सोप्पं काम नाही.
शिवकल्याण राजा आणि पंडीतजींच्या प्रत्येक संगित रचनेला सलाम!

ने मजसी , सरणार कधी, आनंदवनभुवनी खरोखर काळजाला भिडली. आजीकडून गोष्टी ऐकताना जितकी गुंगून जायचे तशीच काल पंडितजी गाण्यांची पार्श्वभूमी कथन करताना गुंगून गेले. पंडितजींनी कवितांच्या निवडीबद्दल जे स्पष्ट मत मांडले ते म्हणजे कालच्या भागातला अत्युच्च बिंदू होता! Happy
बाकी कालच्या एपिसोड बद्दल आपण काही बोलायची योग्यताच नाही आपली!
(त्या वैशालीची पटर पटर आवरा रे! अवधूत दिवसेंदिवस मॅच्युअर झाल्यासारखा वाटतोय. आजकाल दिसतोही हँडसम! :डोमा:)
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

पंडितजींनी कवितांच्या निवडीबद्दल जे स्पष्ट मत मांडले ते म्हणजे कालच्या भागातला अत्युच्च बिंदू होता! >>> अगदी अगदी... शिवाय त्यांनी सांगितलेली बाजीप्रभूची गोष्ट पण खूप सही होती... !
रोहीत ने म्हंटलेलं अरूणोदय झाला पण मस्त होतं एकदम..

>>बाकी कालच्या एपिसोड बद्दल आपण काही बोलायची योग्यताच नाही आपली! >> आशु एकदम खर्र बोललींस...

ह्या आठवड्याचे भाग फारच अप्रतिम. गाणी .....गाणारी मुले आणि त्यामागच्या पार्श्वभूमीचे कथन्.....काही शब्दच नाहीत त्यासाठी.

खरच ती मुले नशिबवान. एवढ्या लहान वयात असे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम चालू असताना, मध्येच "एकापेक्षा एक" ची जाहिरात लागायची आणि दाणकन जमिनीवर आपटायला व्हायचे.

हे लिटिल चॅम्प गाणी कशी म्हणतात हे बाजुला पडून, हिन्दवी स्वराज्याच्या विषय ठळकपणे समोर आला, तेही मिडियामार्फत, मला वाटते की सत्तरच्या दशकात टीव्ही सुरू झाल्यापासून (रामायण महाभारत मालिका सोडल्या तर) हा राष्ट्रप्रेमाचा ऐतिहासिक ठेव्याचा विषय इतक्या ठळकपणे कधीच मान्डला गेला नाहीये! (अपवाद असल्यास चु.भु.दे.घे.)
हृदयनाथ, आयडीया नि झी चे कौतुक करावेसे वाटते ते याच प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जाण्याच्या वृत्तीचे!
अर्थात, लिटील चॅम्प्स नी या सादरीकरणात योग्य ती भुमिका अत्यन्त यशस्विपणे निभावलीच!
पण काल-परवाची थीमच येवढी उदात्त उन्नत होती की त्यापुढे बाकी "व्यावहारीक" बाबी गळुन पडाव्या!

(v&C नाही, पण हृदयनाथान्नी सान्गितल्याप्रमाणेच, बाराव्या शतकानन्तर तब्बल साडेतीनशे-चारशे वर्षानन्तर झालेल्या हिन्दू राज्याच्या राज्याभिषेक सोहळ्यावर आणि इतर अनेक प्रसन्गान्वर गाणिच उपलब्ध नव्हती, तेव्हाही, शिवकल्याण बनविताना, नि आत्ताही! जि आहेत ती आधीच शिवकल्याण मधे ऐकल्यामुळे हा कार्यक्रम देखिल शिवकल्याणचाच "प्रोमो" आहे असे वाटणे सहाजिक हे! पण वस्तुस्थिती तशी नाही!
दुसरे असे की, अन हा ज्याने त्याने स्वतःशीच विचार करावा, की २६/११ च्या ताज्या ताज्या पार्श्वभुमीवर ही गाणी ऐकताना जे वाटेल ते तसेच कालपरवा कसे काय वाटू शकेल? हा एक मुद्दा!
कळीचा मुद्दा वेगळाच - वीरोचित गाणी ऐकुन अन्गावर रोमान्च उठण्यासाठी दरवेळेसच २६/११ ची पार्श्वभुमी असणारे का? असायची गरज आहे का?
केवळ एका वाक्यावरील (जे अजाणताच टाकले गेले असेल असे धरुनही, प्रातिनिधिक वाटल्याने व नॉर्मली अशा अस्थानी अतिव्यावहारीक हिशेबान्चाच जास्त प्रसार होतो असे जाणविल्याने) मी माझी प्रतिक्रिया थोपवू शकलो नाही! माझ्या प्रतिक्रियेमुळे कुणाला राग यावा, कुणाचे डोळे उघडावे, कुणाची चिडचीड व्हावी अशी माझी सुतराम इच्छा नव्हती, उलट माझी प्रतिक्रिया केवळ अन केवळ माझा राग, उद्वेग, सन्ताप व्यक्त करीत होती! अन कधीतरी का होईना, लिम्ब्याला पण राग येऊ शकेलच की! नाही का? तर असो!)

पुढील आठवड्यापासून पाचान्वर पैज लावायला देखिल माझी तरी काही हरकत असणार नाही! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

आशूशी सहमत.... 'सरणार कधी रण' ऐकताना माझ्याही अंगावर रोमांच उभे राहिले. त्या गाण्याची पार्श्वभूमी ऐकताना तर डोळ्यात पाणीच आलं.. कितव्यांदा तरी ऐकली असेल ही कथा तरीही....

खरंच ह्यावेळचे हे दोन्ही भाग अतिशय सुंदर झाले. इतक्या लहान वयात इतके कठिण शब्द असणारी गाणी म्हणणं सोपं नाही. आणि खुद्द बाळासाहेबांच्या तोंडून हा सगळा इतिहास ऐकणं अतिशय रोमांचित करणारं... लिटील चॅम्प्सवर झालेले हे अतिशय सुरेख संस्कारच आहेत.

मला ह्या आठवड्याचे दोन्ही भाग खुप आवडले.. हृदयनाथांनी गाण्यांचे अर्थ इतक्या छानपणे समजावून सांगितले... मला स्वत:ला 'इंद्रजीमी जंबपर' चा अर्थ माहित नव्हता. 'आनंदवन भुवनी' हे राज्याभिषेकानंतर झालेल्या आनंदीआनंदाचे वर्णन आहे असे वाटायचे. 'वेडात मराठे' ची पार्श्वभुमी माहित नव्हती. 'सरणार कधी रण' हे युद्धाला कंटाळलेल्या सैनिकाने म्हटलेय असे वाटले होते. कानात प्राण आणुन तोफांच्या आवाजाची वाट पाहणा-या बाजी प्रभुंसाठी ते लिहिलेय हे माहित नव्हते.

शिवकल्याणराजा ऐकलेय ब-याच वेळा, पण पुरंद-यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष व्हायचे आणि गाणीच जास्त ऐकली जायची.

साधना.
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

लिंब्या,
तुला पेटलेला पाहून बरे वाटले. आता शिवकल्याण राजा पाहून्/ऐकून (दर वेळी) कुणी "पेटत" नसेल तर बोलणेच संपले..:)
लिहीणार्‍याने "यावर लिहायची माझी लायकी नाही" हा disclaimer सुरुवातीला टाकला तर पुढचे वाद उद्भवणारच नाहीत.. Wink

शिवकल्याण राजा मधली गाणी, ती गाणारे लिटिल चॅम्प्स आणि बाळासाहेबांचे प्रत्येक गाण्यानंतर निरुपण छानच होते. खुप नविन माहिती मिळाली. पण ...........

या थीमचे नाव "शुरा मी वंदिले" असे होते ना, मग खालीलपैकी कुठलीच गाणी या थीम मध्ये बसू शकत नव्हती का???????

१. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत
२. भारतिय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी
३. माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू
४. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे
५. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
आणि अशी इतर असंख्य गाणी

वीररस म्हटला की मराठीमध्ये फक्त "शिवकल्याण राजा" आणि स्वातंत्रवीर सावरकरांचीच गाणी उपलब्ध आहेत, असं वाटतं का झी मराठी ला ???????
वरच्या लिस्ट मध्ये दिलेल्या गाण्यांपैकी काही गाणी निवडायला पाहिजे होती हे माझं प्रामाणिक मत आहे.

तळटीप : शिवकल्याण राजा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पलिकडे पण वीररसात्मक गाणी मराठीत आहेत, हेच सांगण्याचा उद्देश आहे इथे, सावरकरांचा किंवा छत्रपतींचा अपमान करायचा नाहिये

~~~~~~~~~~~~~~
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक, घडू नये ते घडले

नाही बसू शकत! Happy (असे माझे ठाम मत [अन माझ्या ठाम मताला "प्रामाणिक किन्वा अप्रामाणिक" अशी काही एक झालर लावायची गरज मला वाटत नाही])
सत्राणे उड्डाण्णे हुन्कारे वदनी या हनुमानाच्या आरतीत वा लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा या शन्कराच्या आरतीत अन
आरती कशी करु गोपाला, याने वाचविले जगताला या किन्वा पुन्डलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भिमा उद्धरी जगा या आरतीन्मध्ये
जो फरक आहे वा जाणवतो
तोच फरक, कार्यक्रमामधे सादर केलेल्या नि वर दिलेल्या गाण्यात जाणवतो (मला तरी) Proud

वरील स्वातन्त्र्योत्तर नजिकच्या इतिहासावरील गाणी (ज्यात एक युद्ध आपण आपल्या "तटस्थतेच्या" व "नि:शस्त्रीकरणाच्या" आचरट धोरणामुळे हरलेलो आहोत) व कार्यक्रमातील गाणी यान्चे बोल सलग समोर मिळाले तर यावर अधिक "बरेच काही" लिहिता येईल
(अगदीच वानगी दाखल उदाहरण द्यायचच तर, "उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू" यागाण्याच देता येईल, हे बोल ऐकताक्षणी अन्गावर शहार वगैरे राहुदेच बाजुला, पण ज्याला पुस्तकेतर थोडाफार इतिहास माहित आहे त्यास गमावलेला काश्मिर व अन्य प्रान्त, अक्साई चीन इत्यादी प्रदेश, बासस्टच्या चीन युधावेळचे कॅनव्हासचे शुज घालून हिमालयात लढणारे दुर्दैवी सैनिक आठवले नाहीत, अन त्याच्या कपाळाची नस तडतडा उडली नाही तरच नवल! [अशीच आठवण बहुसन्ख श्रोत्यान्च्या मनात येणार असेल तर हे किन्वा अशाप्रकारचे गाणे आपसूकच बाद होते- कदाचित अजुन पन्नास शम्भर वर्षान्नी खपुन जाईल Proud ] नुस्त इन्च इन्च लढवु असा धोषा लावल्याने काही होत नस्त!)
असो, लेखनसीमा!
जाणकारान्नी खुलासा करावा!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

योग, ते ठीके पण मला आता अभ्यास करावा लागेल
चिन्तन मनन कराव लागेल
मला वीरश्री युक्त रसरसती गाणि वर्सेस, "सहानुभुतीयुक्त" "हळव्या करुणायुक्त" "घाबरट" "दुसर्‍यावरच्या जबाबदारीचे तोन्डपुजे कौतुक करणारी" अशा अर्थान्च्या गाण्यान्ची "व्याख्ख्या" करायला आवडेल! Proud
काही मदत करू शकतोस का? Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

शिव कल्याण राजा चीच प्रसिद्धी चालू असल्या सारखे वाटले. >>>
असे म्हणावेसे वाटले ह्याला कारण एकच आहे.. कार्यक्रमाला तुम्ही 'शूरा मी वंदिले' असे नाव देता.. आणि त्यात फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या दोनच शूरांना स्थान देता हेच मुळी न पटण्यासारखे आहे.. ही दोन महाराष्ट्रातील खूप वंदानीय आणि मोठी व्यक्तीमत्त्वे आहेत..
मला ह्यांच्याबद्दल नितांत आदर आहे.. आणि ह्यांच्या संदर्भात उपलब्ध असलेले बरेचसे लेख मी वाचलेले आहे..
मराठी मध्ये सोमवार आणि मंगळवार ह्या दोन भागांत गायलेली गाणी सोडून दुसरी कोणतीच गाणी नाहीत का ज्यात वीर रस मांडलेला नाही...
सोमवारच्या भागत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना बोलवले होते.. तेव्हा तरी एखादे वेगळे गाणे सादर करायला काहीच हरकत नव्हती...
गेला बाजार बाकीच्या भागांमध्ये हिंदी गाण्यांचा उदोउदो केला तर हिंदी मधील तरी देश भक्ती पर गाणी सादर करायला कुठे अडचण आली..

२६ जानेवारीच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम करताना तो कार्यक्रम भारत देश ही संकल्पना घेऊन का साजरा केला गेला नाही.. २६ जानेवरी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे.. महाराष्ट्राचा नाही.. भारताच्या प्रजासत्ताक दिनी भारताबद्दल, भारतीय जवानांबदद्ल ज्या गाण्यांतून वर्णन केलेले आहे अशी गाणी सादर करायला हवी होती..

दोन्ही भागांत मिळून जी गाणी सादर झाली त्यातली काही गाणी गाताना मोठ्यांचे सुद्धा तारांबळ उडते.. अशा वेळेस ह्या लहान मुलांनी जी गाणी सादर केली ती अप्रतिम केली .. आणि संगीतकार स्वतःच त्यांच्या मदतीला असल्याने त्या मुलांना खूपच फायदा झालेला दिसून आला... पण गाणी ऐकताना पं. हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या चेहर्‍यावरची माशी सुद्धा हालत नव्हती.. 'मी तुला गाणे शिकवले आहे.. आता ऐकतो च मी तू किती चुका करतेस्/करतोस ते' असाच भाव घेऊन दोन्ही दिवशी बसले होते.. Sad

हाच कार्यक्रम शिवजयंती च्या वेळेस केला असता तर मी माझे वरील मत मांडलेच नसते..
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

पण ज्याला पुस्तकेतर थोडाफार इतिहास माहित आहे त्यास गमावलेला काश्मिर व अन्य प्रान्त, अक्साई चीन इत्यादी प्रदेश, बासस्टच्या चीन युधावेळचे कॅनव्हासचे शुज घालून हिमालयात लढणारे दुर्दैवी सैनिक आठवले नाहीत, अन त्याच्या कपाळाची नस तडतडा उडली नाही तरच नवल!
>>>
लिम्ब्या अनुमोदन (खूपच कमी वेळा होणारी गोष्ट आहे ही, तुला माझ्याकडून अनुमोदन Happy ) ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकुन असाच राग डोक्यात जातो..

शुरा मी वंदिले चे जे दोन भाग झाले त्याची DVD / CD काढायला हवी झी मराठीने. मला दोन्ही भाग अतिशय आवडले. हृदयनाथांचं बोलणं अगदी ऐकत रहावं असच वाटत होतं खरं तर गाण्यांपेक्षाही त्यांच्या बोलण्यामुळे जास्त श्रवणीय झाले हे दोन भाग. महान आहेत ते.

~~~~~~~~~

>>>> ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे ऐकुन असाच राग डोक्यात जातो..
एक्झॅक्टली! देअर यू आर! Happy
ते गाणही अत्यन्त सुन्दर हे, बरेच वर्षान्पुर्वी लतामन्गेशकरना टीव्ही वर असेच २६ जाने का १५ ऑगस्ट ला गाताना पाहिल हे, लाईव टेलिकास्ट पण ते गाण म्हणताना बाईन्च्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते! आजही ते दृष्य डोळ्यासमोरुन जात नाही! (त्यान्च्या डोळ्यात अश्रु का आले, तो त्यान्चा प्रश्ण, पण मला मात्र हे ही गाण ऐकल्यावर असच राहून राहून वाटत राहिल की शम्भरकोटीच्यावर जनसन्ख्या असलेल्या देशातील नागरिकान्ना इतकी कळवळून विनवणी करावी लागावी????? जरा याद करो कुर्बानी??????
त्यामुळेच गाण, सूर, वाद्ये वगैरे कितीही चान्गले असले तरी हे गाणही थीमला लागू होत नाही

एक प्रसन्ग हे पहिल्या दिवशीचा, हृदयनाथान्नी पल्लवीला सान्गितल की तुम्ही "हळव्या" होऊ नका, भावनावश होऊ नका, या थीमला ते सूट होत नाही! आणि ते बरोबरच होते! आता वादाकरता म्हणून केवळ एक गाणे "सरणार कधी रण" यावर शब्दच्छल होऊ शकतो! होऊ दे!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

ह्या भागांचे रिपीट टेलिकास्ट कधी आहे?

कालची गाणी ऐकताना सगळी मुले, विशेषत: आर्या, प्रथमेश आणि रोहित आता खुपच दमलीत असे मला वाटले. प्रथमेश सगळ्यात जास्त दमल्यासारखा वाटला.

महा अंतिम फेरीपुर्वी झीने सगळ्यांना एका आठवड्याची सुट्टी द्यायला पाहिजे. नाहीतर गातागाताच कोसळतील अशी भिती वाटतेय..

साधना
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

माझ्या मते LT आणि त्याचे अनूमोदक हे काहीतरी भलत्याच विषयावर वाद घालतायत !!
योग, हे ही सर्व्हर स्पेस वाया घालवणच नाही का?? Wink

Pages