सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली ऍवॉर्डस आहेत महागुरु Happy
फक्त कार्तिकी सोडून !

२६ चा भाग अर्धा पाहुन झालाय. वर सर्वांनी बरेच काही लिहीले आहेच म्हणुन 'सुंदर' एवढेच लिहिते. आता बाकी राहिलेले भाग पण चवीने पाहीन.

श्री. मंगेशकरांनी सांगितलेल्या एका आठवणीवर श्री. शांता शेळके ह्यांनी लगेच एक कविता केली होती. त्याच्या २ ओळी त्यांनी सांगितल्या.. त्या ऐकुन डोळ्यात टचकन पाणी आले.

पाचही बाळांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत.. सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच. सतत प्रॅक्टीस सोपी गोष्ट नाही.

मंगळवारच्या भागात सर्वाची गाणी अफलातून झाली...
मला ऱोहित आणि कार्तिकिची गाणी जास्त भावली...पण त्याच बरोबर..प्रथमेश चा..'गालावर खळी' हा प्रयत्न पण चांगला होता..:)

'कोंबडी पळाली', या गाण्यात कर्तिकिने गाण्याचे male आणि female parts खूपच छान म्हंटले (तिला मिळालेली दाद योग्यच होती...IMO..;))...आणि त्यात कहर म्हंजे..एक तान तिने improvise करुन एकदम चाबुक गायली....टोप्या पड्ल्या...फेटे उडाले :)..नाद्खुळा..

आता अतिशय उत्सुकतेने अंतिम फेरिची वाट बघतोय...;)

-->-->-->-->-->-->-->-->-->
बुटक्यांच्या या देशात...आम्ही उंच माणसे..

मंगळवारच्या एपिसोड मधली २/३ गाणी बघितली..

कार्तिकी चं कोंबडी पळाली नाही आवडलं.. Sad तिचा आवाज त्या गाण्याला अजिबात सुट होतं नव्हता असं वाटलं.. मागे एक मुलीनी (जी फायनल ला पोचू शकली नव्हती) ते गाणं म्हंटलं होतं ते पण चांगलं वाटलं कार्तिकीच्या गाण्यापेक्षा..

रोहीत चं माझे राणी मस्तssssssच झालं एकदम.. ! मुग्धा चं डोकं फिरलया पण सही होतं एकदम.. Happy
अवधूत वैशाली आणि पल्लवी emotional झाले एकदम.. त्या तिघांनीही हे पर्व एकदम मस्त handle केलं.. !!

मुग्धा "चमत्कार"च आहे - तसे सगळेच "अलिबागचे वैशंपायन चमत्कार असतात (दिवे घ्या) Happy

माझ्या मते ज्याला शास्त्रीय बैठक आहे त्याला "उडती" गाणी ("परफॉर्मंस वाली) कमी प्रयत्नात येवू शकतात हे प्रथमेशने सिद्ध केलन ह्या भागात - मात्र converse is not true!
त्यामुळे मी पुन्हा असच म्हणेन की (भारतीय शास्त्रीय) गाण्याची समज (कार्यक्रमाच्या नावावरुन तरी हाच निकष असेल अस वाटत) बघून विजेता ठरवायचा असेल तर तो प्रथमेश आहे.

>माझ्या मते ज्याला शास्त्रीय बैठक आहे त्याला "उडती" गाणी ("परफॉर्मंस वाली) कमी प्रयत्नात येवू शकतात हे प्रथमेशने सिद्ध केलन ह्या भागात - मात्र converse is not true!
ये बात कुछ हजम नही हुवी दोस्त... उडती गणी आणि परफॉर्मंस वाली हे दोन वेगळे प्रकार आहेत असं मला वाटतं: ही चाल तुरू तुरू हे उडत्या चालीचं गाणं आहे..किंव्वा ठेकाप्रधान गीत म्हणुया. बिना परफॉर्मंसही ते छान होवू शकतं.. हा जोडीला performance असेल तर ते अधिक appealing होतं.
पण performance म्हणजे सादरीकरण असं समिकरण करता येईल..
आणि केवळ गाण्याची समज तेही निव्वळ शास्त्रीय गाण्याची इतका काही छोटा दृष्टीकोन अशा मोठ्या स्पर्धेत ठेवतील असे वाटत नाही.. अगदी puristic approach घेतला तर शास्त्रीय, नाट्य, सुगम, गझल, भाव, भक्ती, लोकगीत या प्रत्त्येक प्रकारच्या गीत संगीताची वेग वेगळी मांग आहे.. सर्वांचा बेस शेवटी सात सूर असले तरीही प्रत्त्येक पध्धतितील गाणी सादर करताना त्याचे "अंग" भिन्न आहे. ही सर्व अंगे तितक्याच ताकदीने पेलणार्‍या आशा, लता किंव्वा रफी, कीशोर (शास्त्रीय अपवाद वगळता) फार विरळे..
म्हणूनच निदान तसे potential असलेल्याला तरी विजेता घोषित करायचे तर मला तरी फक्त रोहीतच deserving वाटतो. नाहीतर मग सरळ वेगवेगळी गटवार बक्षिसं ठेवा ना रावः शास्त्रीय्/नाट्य, सुगम्/भाव
भक्ती, लावणी/लोकगीत, गझल/गुंदेही
मुळात या अशा स्पर्धांचा बेसिक मधे झोल आहे की: मुलगा/मुलगी यांच्यात तुलनात्मक स्पर्धा घेणं जे सूर्-संगीताच्या दृष्टीकोनातून साफ चुकीचं आहे, दुसरं म्हणजे dj ने लिहीलय तसं ८ ते १४ वयोगटामधिल तफावत, तिसरं म्हणजे "समस"..
हे technical glitch सोडले तर कार्यक्रमाचा मस्त आनंद घेता येतो हे खरं..
असो. वैशाली अन अवधूतचा मेसेज (पाचही विजेते घोषित करा) हा खास झी वाल्यांसाठी होता हे नक्की.. तरिही परीक्षकांचे गुण अन समस यांची काहितरी भन्नाट सापशिडी वगैरे रचून हे लोकं सर्वांन्ना विजेते करतील बहुदा... Happy

मला महागुरुनी सुचवलेल्या कॅटॅगर्‍या आवडल्या. Happy
तरी मला वाटतंय की अंतिम विजेता/ती एकच होईल.

सगळ्यांनाच या स्टेजला विजेते घोषित करणं काहीसं अन्यायकारकच आहे. तसेही, सगळ्यांनी आपली मनं जिंकून घेतलीच आहेत, आता अंतिम विजेत्याचं नाव ही फक्त एक फॉर्मेलिटी आहे माझ्या मते! Happy
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझेभी अपनेपे यह ऐतबार है की नहीं..

योगला अनुमोदन.
मला वाटतं, जर गायनाचे विविध प्रकार यशस्वीरित्या पेश करु शकणारा स्पर्धक असा जर निकष लावला तर फक्त आर्याच विजेती होणार! तिच्या गाण्यामध्ये अगदी सुरुवातीपासून कन्सिस्टन्सी आहे.(परीक्षकांनीही याचे कौतुक केले आहे.) नाट्यगीत(नरवर), भावगीत, मुजरा(पान खाए हा मुजराच आहे ना?), लावणी, शास्त्रीय, परफॉर्मन्सची गाणी ("चम चम करता")असं आर्याचं प्रत्येक गाणं हिट्ट झालंय. Happy रोहितची लक्षणीय प्रगती झालीय हे खरंय पण त्या जोरावर तो महाविजेता नाही होऊ शकत. कारण स्पर्धेपुरती गाणी तयार करणे आणि तशा प्रकारची कोणतीही गाणी सहज म्हणू शकणे यात फरक आहे. प्रथमेशला शास्त्रीय गायनापलीकडे काही येतं हे त्याने दाखवून देण्याचा केलेला प्रयत्न प्रयत्नच राहिला. कारण तो जितक्या सहजतेने 'त्याच्या' स्टाईलची गाणी म्हणतो तितकं त्याला "गालावर खळी" सारखी जमतात का? उसनं अवसान आणून उपयोग नाही. Sad
मुग्धा आणि कार्तिकी महाविजेत्या का नाही होऊ शकत याला कारण त्यांच्या वयामुळे त्यांच्या आवाजावर, रियाजावर आलेल्या मर्यादा आहेत. Sad
जसं आपण रोहित (परफॉर्मन्सची गाणी), प्रथमेश(शास्त्रीय), कार्तिकी(लोकगीत) अशी "होमपिच" ठरवू शकतो तशी आर्या अन मुग्धाची ठरवू शकतो का? या प्रश्नाच्या उत्तरातच विजेता कोण याचं उत्तर आलं. Happy
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

योगला अनुमोदन,
माझ्या मनात त्या 'प्युरिस्ट' प्रकाराचीच धास्ती आहे,कारण सर्वच जजेस (वैशाली आणी अवधूत सोडून) शास्त्रिय संगीताच्या बैठकीला प्राधान्य देणारे आहेत,ज्याचा प्रथमेशला नक्कीच फायदा होणार.त्यात पुन्हा रोहितचा समसचा कायम लोचा झाला होता.सहमतीचा उमेदवार म्हणून माझेही मत आर्यालाच.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

योग,
तुम्ही वर दिलेल्या प्रत्येक गायनप्रकाराला स्वतःचा बाज असतो हे अगदी मान्य आणि सगळे प्रकार गाण "हर एक के बस कि बात" नसते. पण त्या सगळ्यासाठी लागतो तिनही सप्तकात सहजपणे फिरु शकणारा रियाजाने घोटलेला गळा! मोठ होवून गजल गायची की नाट्यसंगीत कि सिनेसंगीत हे ज्याच त्यान (आणि त्याच्या आवाजाच्या जातीनं) ठरवाव पण क्षमतेच (potential) परिमाण काय? आजवर जितके गायक्/गायिका लोक आवडीने आणि दीर्घकाळ ऐकतात त्या सगळ्यांच्या गायकिचा पाया शास्त्रीय आहे (लता दीदींपासून ते देवकी पंडीतांपर्यंत आणि रफी साहेबांपासून शंकर महादेवन पर्यंत). आता ही लोकं versatile नाहीत म्हंटल तर बोलणच खुंटल.
आणि मी फक्त puristic approach बद्दलच बोलतोय. कारण तो गणितासारखा आहे ५+२=७ (आणि फक्त ७) सांगणारा आणि सगळ्या निर्माणाचा पाया असणारा. त्याची झेपत नसल्याने बर्याच जणांना धास्ती असते पण काही "घडवायच" असेल तर तो अपरिहार्य आहे Happy

>>>पण त्या सगळ्यासाठी लागतो तिनही सप्तकात सहजपणे फिरु शकणारा रियाजाने घोटलेला गळा!

असंही काही नाही.. रियाजाने गळा घोटला जातो बरोबर आहे पण प्रत्त्येकाची सप्तकाची रेंज ठरलेली असते. रियाजाने वरच्या सप्तकात उडी मारणे कदाचित शक्य होईल पण गळा फिरवणे नाही.. असो.
क्षमतेचं परिमाण हे अगदी सोपं आहे वेगवेगळ्या बाजाची, ढंगाची, भावाची, गाणि त्या प्रकारात शिरून गाता येणे. आणि समुवाई, तुला कदाचित माहीत असेल की बहुतांशी puristic शास्त्रीय संगीत वाले सुगम किंव्वा इतर light music च्या वाट्याला जात नाहीत. याचा अर्थ असा नाही की त्यांन्ना ते येत नाही पण एक बेसिक गोष्ट अशी आहे की (विशेषतः लहान वयात) गळ्यावर एकदा शुध्ध शास्त्रीय रियाज, गायन, बैठकीचे संस्कार झाले की त्याच्या परिणामस्वरूपी आवाज, स्वरंफिरक, शब्दफेक, इतकच काय आवाजाचं वजन या सगळ्यावर एक ठराविक संस्कार होतो. त्यातल्या त्यात नाट्यगीत हे शास्त्रीय पायावर किती उंचीला नेता येतं याची महान उदाहरण बालगंधर्व, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, भिमसेनजी आणि इतर अशा महान गायकान्नी सिध्ध करून ठेवली आहेत.. पण म्हणून "माझे राणी माझे मोंगा" किव्व्वा "चंद्र आहे साक्षीला", "कोळीगीते" अशा भावनाप्रधान अन एक वेगळीच treatment आवश्यक असलेली गाणी या मंडळीन्नी गायली तर कसे वाटेल..? तसच काहीसं. माझ्या तरी अनुभवात जे पाहिलय त्या नुसार केवळ अन केवळ शास्त्रीय गाणारे मुद्दामून सहसा या "ईतर" वाटेला जात नाहीत. तसच "ईतर" वाटेने जाणारे पुन्हा शुध्ध शास्त्रीय च्या वाट्याला जात नाही.. एक लक्षात घ्यायला हवे की त्या प्रत्त्येक वाटेला तितकीच साधना लागते..
म्हणूनच मि आधी म्हटल की लता, आशा, रफी, किशोरदा असे काही निवडक अपवाद सोडले तर verstality ही फार कमी पहायला मिळते.. आजकालचे अपवादः हरीहरन, सोनू निगम

तेव्हा शास्त्रीय म्हणजेच बेसिक आणि म्हणजेच मुलभूत पाया आणि केवळ त्याच्यावरच सर्व काही परीक्षण केले जावे हे मला वैयक्तीक पटत नाही..
>>>आणि मी फक्त puristic approach बद्दलच बोलतोय. कारण तो गणितासारखा आहे ५+२=७ (आणि फक्त ७) सांगणारा आणि सगळ्या निर्माणाचा पाया असणारा. त्याची झेपत नसल्याने बर्याच जणांना धास्ती असते पण काही "घडवायच" असेल तर तो अपरिहार्य आहे

खरच ५+२=७ इतकं सोप अन uniform संगीत असतं तर...? मला वाटतं बर्‍याच Variety ला आपण मुकलो असतो. पाढे गिरवायलाच हवेत, त्याबद्दल दूमत नाहीये, पण मला वाटतं गणिताच्या भाषेत संगीत हे एक infinite integration आहे.. कराल तितकं कमी. आणि जो मुलतः कलाकार असतो तो याकडे नेहेमीच डोळस दृष्टीकोनातून पाहील, धास्ती वाटण्याचं तर बिलकुलच कारण नाही. शेवटी ती एक कला आहे.. जसे शास्त्रीय ऐकून स्माधान लाभतं तसच भजन, भावगीत ऐकूनही मन तृप्त होतच.
असो. या निमिताने इथे थोडी संगितीक देवाण घेवाण होते आहे हेही नसे थोडके... Happy

>> गणिताच्या भाषेत संगीत हे एक infinite integration आहे..
क्या बात है योग, माझ्या पहीलीच्या गणिताला तुम्ही direct बारावीतल उत्तर दिलत Happy
पण पटल पटल.
छान चर्चा झाली.

>क्या बात है योग, माझ्या पहीलीच्या गणिताला तुम्ही direct बारावीतल उत्तर दिलत Happy
माफ करं रे दोस्ता! संगीत हा माझा जिव्हाळ्याचा (त्याहीपेक्षा अधिक) विषय आहे त्यामुळे भरकटलो.. Happy

>>>>> रियाजाने गळा घोटला जातो बरोबर आहे ????????? Lol
घोटला नाही रे, घटला, घटला जातो गळा!
योग, टेक्निकॅलिटी (असा शब्द आहे ना?) मधे तुझा शेवटचा पॅरा बरोबर वाटत असला तरी मला तितकेसे पटत नाहीये! एनिवे, जमल्यास पुढे मागे वेळ मिळाल्यावर यावर जरा लिहावे म्हणतो Happy
तोवर तूम्ही दोघे कुणाचे गळे घोटायच्या ऐवजी घटवायचे बघा! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

आशू ला मोदक.. Happy

मुलगा/मुलगी यांच्यात तुलनात्मक स्पर्धा घेणं जे सूर्-संगीताच्या दृष्टीकोनातून साफ चुकीचं आहे, दुसरं म्हणजे dj ने लिहीलय तसं ८ ते १४ वयोगटामधिल तफावत, >>>>> माझ्यामते एकाच वयाचा मुलगा/मुलगी ह्यांच्यात तुलना करणं खूप चूकीचं नाहिये.. पण अर्थातच तुलना करताना कोणते निकष लावणार ह्याला महत्त्व आहे... लावणी किंवा पोवाडा असे प्रकार कितीही नाही म्हंटलं तरी gender specific होतात.. पण मग केवळ हे च प्रकार ने घेता सगळ्यांना एका ground वर मोजलं तर ही तुलना किमान अश्या स्पर्धेपुरती तरी होऊ शकते असं मला वाटतं.. परंतु ८ ते १४ वयोगटामधिल तफावत ही बरीच मोठी आहे.. कारण १४ वर्षाच्या मुलाचा तयार झालेला गळा/ अनुभव आणि ८ वर्षाचा मुलाचा गळा आणि तयारी साठी एकूण आयुष्यात मिळालेला कमी वेळ ही तुलना जरा चुकीची वाटेल.. मुग्धा/कार्तिकी त्यांच्या वयोगटात among the best आहेत नक्कीच पण मोठ्या गटातील काही मुलं त्यांच्यापेक्शा जास्त चांगले सुर लावणे, expressions देणे, गाणं समजून गाणे हे सगळं करत असतील आणि हे त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या जास्तीच्या रियाजामुळे ही असू शकेल... पण म्हणून त्यांना डावलून लहान मुलांना प्राधान्य देणे हे बरोबर वाटतं नाही (मला).. त्यामुळे महागुरूंनी लिहिलेली बक्षिसे देऊन टाकावी झालं.. Happy

पण एकूणात आणि सगळ्याप्रकारच्या गाण्यांच्या प्रकारांमधे आर्याच बेस्ट वाटते.. Happy

>घोटला नाही रे, घटला, घटला जातो गळा!:)
खिखिखि... पण तसं असतं तर वयाच्या सत्तराव्या वर्षी देखिल आशा, लता, भिमसेनजी इत्यादी मंडळी गात नसती रे.. आता वयानुसार आवाज क्षीण होणारच..असो.
>योग, टेक्निकॅलिटी (असा शब्द आहे ना?) मधे तुझा शेवटचा पॅरा बरोबर वाटत असला तरी मला तितकेसे पटत नाहीये
पटावा असा आग्रही नाहीये... Happy music is free form art जरी अगदी काही बेसिक नियम घालून दिले असले तरी. अर्थात तू त्या बेसिक चौकटीबद्दलच बोलत असशील तर खरं आपलं दूमत व्हायला नको कारण ती चौकट सारखीच आहे. तरी तुझे विचार वाचायला निश्चीत आवडेल.. फक्त या वरील पोस्ट्स चा context या स्पर्धेच्या परीक्षणाचा आहे एव्हडं फक्त ध्यानात असू दे..नाहीतर उगाच रागदरबारी व्हायची Happy

योग, फारच छान मत..

तुमच्या रुपया मध्ये माझा एक आणा...
शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत ही एकाच किमतीची दोन रुपे आहेत असे म्हणायला हरकत नाही.. एक रुपयाची नोट म्हणजे शास्त्रीय संगीत म्हणले तर एक रुपयाचे नाणे म्हणजे सुमग संगीत..
कुणी कोणते रुप घ्यावे हे गायकाच्या आवाजाचा पोत, समज, सादरीकरणाची पद्धत, उपज, पिंड अशा बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे..

संगीतामध्ये शास्त्रीय, उप्-शास्त्रीय आणि सुगम असे तीन ठळक विभाग दिसून येतात...
शास्त्रीय मध्ये बडा ख्याल, छोटा ख्याल असे पूर्णतः शास्त्रीय पद्धतीने गायले जाणार उपप्रकार आहेत. ह्यात शक्यतो शब्दाला फारसे महत्त्व दिले जात नाही.. पण आलाप, तान, हरकती, ताला बरोबर ची कसरत ह्या गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते..
उप-शास्त्रीय मध्ये टप्पा, ठुमरी, होरी, चैति, कजरी, नाट्य संगीत, भजन, गझल असे प्रकार आहेत.
ह्यात शब्दांना बर्‍यापैकी महत्त्व दिले जाते.. गझल आणि भजन मध्ये तर पूर्णपणे शब्दांना महत्त्व दिले जाते.. पण त्याच बरोबर ताना, हरकती ह्यांना ही महत्त्व दिले जाते.. नाट्य संगीतामध्ये तर ताना खूपच महत्त्वाच्या ठरतात..
तर सुगम मध्ये भावगीत, कोळी गीत, चित्रपट गीत असे प्रकार आहेत...
हा प्रकार पूर्णपणे शद्बप्रधान आहे. ह्यात सुद्धा हरकती, मुरक्या हे प्रकार आहेत पण त्या खूपच कमी प्रमाणात असतात.. पहिले शब्द महत्त्वाचे..

एखाद्यानी जर शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असेल तर तो उप-शास्त्रीय पण शिकतच असतो.. आणि तसेच तो ते गातही असतो पण सुगम शिकेलच असे नाही परंतु त्याला जर सुगम गायला सांगितले तर त्याची तयारी करताना त्याला शास्त्रीय संगीताचा जो पाया आहे त्याचा उपयोग खूप प्रमाणात होईल.. आणि ते गाणे सादर करताना पण त्यात कुठेतरी तो शास्त्रीय संगीत शिकलेला आहे हे जाणवेल..

एखादा जर सुगम संगीत शिकत असेल तर तो त्याला शिकवलेली गाणी त्या बरहुकूम एकदम १००% बरोबर गाऊन जाईल.. पण त्या थोडेसे बदल वगैरे सहज रित्या करणार नाही पण जर त्याला शास्त्रीय संगीताची बैठक असेल तर तो त्याही गोष्टी करेल.. हाच उप-शास्त्रीय पण गाणे म्हणेल पण त्यात उत्स्फूर्त अशा जागा नसतील तर शिकवलेल्याच जागा जास्त असतील पण जर तो हुशार असेल तर त्यातही तो स्वतःच्या जागा घेईलच.. पण शास्त्रीय संगीताच्या वाट्याला शक्यतो जाणार नाही..

काही जण असे असतात की त्यांना काही तरी दैवी देणगी असते.. कोणते ही सांगीतिक शिक्षण न घेता सुद्धा ते अप्रतिम गातात.. त्यांच्या डोक्यात गाणे हे देवानेच भरून पाठवलेले असते.

==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

>काही जण असे असतात की त्यांना काही तरी दैवी देणगी असते.. कोणते ही सांगीतिक शिक्षण न घेता सुद्धा ते अप्रतिम गातात.. त्यांच्या डोक्यात गाणे हे देवानेच भरून पाठवलेले असते.
अगदी! याचे एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणजे आमचे "गुरू" किशोरदा.. Happy
एकंदरीत कुठलिही कला ही दैवी देणगीच आहे असे मी मानतो. मग सुदैवाने तुम्हाला योग्य गुरू मिळाला, आणि तुम्ही मेहेनत घेतलीत आणि कलेची जोपासना केलीत तर ती कला तुमच्या स्वताबरोबर इतरांनाही तितकाच हमखास आनंद देवून जाते.. "ये अंदरकी बात है".. Happy

जे कोण लाइव्ह पहाणार आहेत त्या सर्वां साठी,
जमल तर प्लिज ग्रँड फिनाले चे रिझल्ट्स अपडेट करत रहा !!

डिजे, http://www.watchindia.tv/ इथे १५ दिवसांसाठी फ्रि ट्रायल आहे. रजिस्टर कर. रविवारी सकाळी ८ वाजता ( सेंट्रल प्रमाने) लाईव्ह असनार आहे. तुलाही पाहता येईल. Happy

ग्रेट, थँक्स केदार !

अरे मी गेले वर्षभर केले होते सबस्क्राईब... त्यांचं नेट कनेक्शन किव्वा रिले अगदीच गोगलगाय आहे.. रेफ्रेश होईपर्यंत मालिका संपलेलेई असते.. Happy

अरे बाबा, मी गेले य महिने रोज पाहतो झी मराठी (पेड सब्सक्रिप्शन)

आम्ही देखिल गेले चार महिने www.watchindia.tv वरच बघत आहोत ( paid ).
मस्त दिसते....

कार्तिकी काय जिंकली???????????????????
Uhoh Uhoh Uhoh

full to manipulated decission वाटला...

आजची पण आर्या, प्रथमेश आणि रोहीतची पण गाणी मला कार्तिकीपेक्षा खूप चांगली वाटली..
रोहीतच शेवटचं मोरया खूपच सही झालं...

जाऊ द्या.. एकूण उत्तम पर्वाच्या उत्तम अंतिम फेरीच्या निकालात मात्र अपेक्षाभंग.. !!!

कार्तिकी देवींचा विजय असो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम!!!

खरच, अगदी अनपेक्षीत निकाल Sad
आर्या किवा प्रथमेश जि.न्कायला हवे होते.

आधी लिहील्याप्रमाने, आनंद पोटात माझ्या माईना, माईना.

रोहीत चे मोरया, मोरया फार आर्त होते. त्याच्या गाण्याने अगदी योग्य शेवट झाला कार्यक्रमाचा.

कार्तिकी ही भजन, अभंग, गवळन, गझल नितांत सुंदर गाते. अगदी श्रिनीवास खळ्यांनी तिला तू माझ्याकडे शिकनार का? हे विचारले, ह्यातच सर्व काही आले. ज्युरीज वैगरे मॅन्यीपुलेशन करणार नाहीत असे प्रामाणिक पणे वाटते. (संजीव अभ्यंकर आमचे दैवत आहेत Happy ) त्यांनी योग्य तो विचार करुनच हा निर्णय घेतला.
तिच्या आवाजाला वेगळाच टोन असल्यामूळे ती बर्‍याच जनांना आवडनार नाही, पण ती पोरगी भारी आहे असे पहिल्या ऐपीसोड पासून वाटत होते. उच्चारांवर पण ती आता मेहनत घेत आहे.
गाजलेली गाणि परत म्हणून कोणीही दाद मिळवते पण न गाजलेली, माहीतीच नसलेली गाणीही तिने गायली व आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व उभे केले, जे तिच्यानंतर फक्त प्रथमेश करु शकला. ( कुठलाही वाद चालु करायचा नाही. )

चिन्मयने लिहील्या प्रमाने हा लिप सिंक न्हवता तर खरच लाईव्ह होता. त्या स्टुडिओत कदाचित पंचरत्नचे रेकॉर्डिंग झाले असणार.

आर्या, रोहित, प्रथमेश किंवा मुग्धा जिंकली असती तरी मला आवडलेच असते. पाचही हिरे आहेत. एक कोहीनुर तर दुसरा शालीमार इतकाच काय तो फरक.

सर्वात बेकार रिझल्ट !!
सुंदर पर्वाचा बह्यनक शेवट !
आणि कार्तिकी "का" जिंकली ते सांगायला नको, समजदार लोकांना माहितच असेल "ते" एकमेव कारण !
इथे लिहु शकत नाही पण कारण अगदी ऑबव्हियस आहे... !!

Pages