सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>शेवटची पोस्ट, शेवटची पोस्ट करत चालूच आहे यांचं...

Lol

यासाठीच मॉडनी हे पान बहुतेक वाहतं ठेवलं होतं Happy

बास काय बास?????
इतकी अभ्यासपूर्ण चर्चा माहिती मतमतान्तरे अशाच वादस्पर्धेच्या निमित्ताने वाचायला मिळणार ना?
आपल्या गावीही नसलेल्या कित्येक गोष्टी नव्याने माहित होतात! आपल्या विचारसरणीत बदल्/सुधारणा करवुन घेण्याची सन्धी मिळते असले वाद वाचले की! Happy
चालू द्या ना! शेवटी जोवर "प्रश्ण तत्वाचा धरुन" सारेगमप सन्दर्भात चर्चा/वाद होतोय तर होऊ द्या की! Happy
(जोवर दोघेही - वा जितके अस्तील तितके, एकाच उन्टावर बसून जात नाहीत तोवर काळजी करायच कारण काय?????? Proud )
[फक्त मला एक कळत नाही की मी कुणाची बाजू घेऊ?????? Lol की दोघान्च्या बाजुने बोलू???? ]
...;
आपला, लिम्बुटिम्बु

यासाठीच मॉडनी हे पान बहुतेक वाहतं ठेवलं होतं >> या पूर्वी या पानावर अशा पोस्ट्स येत नव्हत्या. इथल्या पोस्ट्स मोजक्याच आणि वारंवार वाचण्याजोग्या असायच्या म्हणून एडमिननेच वाहत्या पानाच्या ऐवजी पोस्ट संग्रहित करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती.
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

लिंब्याभाऊ,आपण बाजू वाटुन घेऊ आणि सुरु ठेऊ,कसं काय? Lol
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

युट्युब वर पाहिले शिवकल्याण राजा एपिसोड चे भाग.. मजा आली. पांडीतजिंन्नी प्रत्त्येक गाण्याची पार्श्वभूमी सांगितली त्याने अधिकच बहार आली... त्यातले काही संदर्भ माहीत होते, विशेषतः "फुलबाग मला हाय पारखा झाला.." तरिही प्रत्त्येक वेळी डोळे ओले होतातच.
पुन्हा एकदा हेच वाटले की प्रथमेश हा "एकसुरी" (सुरात गाणारा) गायक आहे पण Xpressions अगदीच कमी... फारच फ्लॅट वाटतात ऐकायला.. गाणी सुरात, तालात पण मनाला स्पर्श करत नाहीत.
रोहीतलाही फार झेपत नव्हते..
दोघी चिमुकल्या जमेल तसे चालू होते..
आर्या ने गाणी चांगलीच पेलली एकंदर.
सर्व मुलं खरच खूप थकल्या सारखी वाटतात.. एक ब्रेक आवश्यक वाटतो.
पण एकंदर २६ जानेवारी ची थिम खूप आवडली.. त्या निमित्ताने पुन्हा एकदा काही मूठभर देशप्रेमी वेड्या सैनिकांच्या जीवावर उरलेले करोडो आपण किती सुखासीन अन ग्रुहीत आयुष्य जगतो या जाणीवेने पुन्हा एकदा मन व्यथित झाले.

>>त्या निमित्ताने पुन्हा एकदा काही मूठभर देशप्रेमी वेड्या सैनिकांच्या जीवावर उरलेले करोडो आपण किती सुखासीन अन ग्रुहीत आयुष्य जगतो या जाणीवेने पुन्हा एकदा मन व्यथित झाले.
खरंय मित्रा... अगदी असंच वाटलं दोन्ही एपिसोड पहाताना...
-योगेश

मी_योगी, इथे लोकांनी भांडू नये म्हणून तलवारीच आणल्यास का धाक दाखवायला? Lol
दिवे घे! Happy

असो. आर्या सुरेखच गाते. तीच विजेती होईल असे वाटत आहे.
प्रथमेशच्या गाण्यात गोडवा आहे, पण एक्स्प्रेशन्समधे मार खातो Sad
रोहीतला ते मात्र जमतं, शिवाय तो मेहेनतीही वाटतो.
बाकी दोघी अजून छोट्याच आहेत Happy

झीमराठी सारेगमपवर दोन उत्तम गोष्टी आहेत: १) अंतिम निर्णयामध्ये समसचा वाटा ५०% इतकाच आहे. उरलेले ५०% परिक्षण नावाजलेले परिक्षक करणार आहेत. ते नि:पक्ष आणि या करीयरमधले जाणकार आहेत. त्यामुळे निर्णय भावनेच्या भरात वगैरे होणार नाही.
२) अंतिम विजेत्याला रोख बक्षिस, दागिने, फ्लॅट असे चोचले नसून, लहान मुलं आहेत म्हणून तेवढ्याच रक्कमेची सर्टीफिकेट्स आहेत.
-हे दोन्ही मला कौतुकास्पद वाटले. (हिंदी सारेगमपमध्ये जे काही चाललेले असते, त्या पार्श्वभूमीवर तर अजूनच ठळकपणे जाणवते.)
-----------------------------------
तेरी उम्मीदपे ठुकरा रहा हूँ दुनियाको
तुझको अपनेपे ऐतबार है की नहीं..

पूनम,

त्या तलवारी नाहीयेत काही... नीट पहा. मधे लाल आणि दोन्ही बाजुला थोडी फिकट गुलाबी रंगाची गुलाबाची फुलं आहेत ती...

बाकी, तुम्ही मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सहमत!
-योगेश

शिवकल्याण राजाची प्रसिद्धी?? १०० शिड्या/कॅशेटी अधिक विकल्या गेल्याने मंगेशकरांचा बंगला पुरा होणारे काय? प्रवाहाविरुद्ध पोहून ("नच बलिये", कुठले कुठले आयडॉल आणि "एका पेक्षा एक" च्या जमान्यात) हा कार्यक्रम ताकदीने सादर केल्याबद्दल पंडितजी, झी आणि सर्व कलाकारांचे खरोखर आभार!

प्लीज समुवई, झाला तो उहापोह पुरे झाला ना. आता पुन्हा तो विषय नका काढू. काहींना तो कार्यक्रम आवडला काहींना नाही हाच शेवटी निष्कर्ष निघणार आहे.
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है

फक्त "गायकी" हा निकष लावल्यास प्रथमेश कुठल्या कुठे आहे. बाकी गाण ऐकताना फक्त गाण कस "गायल" हे ऐकाव ह्या मताचा मी आहे. माझ्या समजूतीप्रमाणे प्रथमेश सगळ्या जागा अचूक घेतो (उदा. "हे सुरांनो ..." मध्ये अर्चना कान्हेरेंनी ने घेतलेल्या जागा अधिक त्याच्या स्वतःच्या जागा).
versatility आर्याकडे जास्त आहे. आधुनिक संगीतकारांना आवडणारे सर्व गुण रोहीतकडे आहेत.

आशु_डी,
अरेरे, ह्या विषयावर झालेले महाभारत वाचले नव्हते पूर्ण - क्षमस्व! (नियामकांनी मागचा संदेश पुसुन टाकावा).

प्रजासत्ताकदिन आणि ‘सारे’चे ‘तारे’

२६ व २७ जानेवारी रोजी ‘झी मराठी’ वरील ‘आयडिया सारेगमप’मध्ये प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘शूरा मी वंदिले’ हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लिट्ल चॅम्पसना हाताशी धरून सादर केलेला कार्यक्रम, छोटय़ांच्या अप्रतिम गानकौशल्याची चमक दाखविणारा पण तितकाच नियोजक व संकल्पक यांच्या बुद्धीच्या दिवाळखोरीचे व सांस्कृतिक अतिरेकीपणाचे प्रदर्शन करणारा होता.
या कार्यक्रमात विविध कवींनी लिहिलेली शिवकाळाविषयीची गाणी होती आणि काही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संगीतबद्ध केलेल्या कविता होत्या. कार्यक्रमाच्या शीर्षकाला अत्यंत समर्पक अशीच शिवराय व स्वातंत्र्यवीर ही नावं आहेत. त्यांचं गुणगान करण्यात आणि ते श्रवण करण्यात प्रत्येक मराठी

माणसालाच काय पण सर्वच भारतीयांना अभिमान वाटेल यात शंकाच नाही.
पण कार्यक्रम प्रजासत्ताकदिनानिमित्त होता हे लक्षात घेता त्या संदर्भात योगदान दिलेल्या महनीय व्यक्तींची आठवण येणं साहजिकच नव्हे तर अपरिहार्यच आहे. यातली काही ठळक नावं म्हणजे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारतीय घटनेची अंमलबजावणी करणारे पं. जवाहरलाल नेहरू. या नावांचा अनुल्लेख तीव्रतेनं खटकला. किंबहुना तो हेतुपूरस्सर गाळला तर नसावा ना, अशी शंकाही कुणाला येऊ शकते.
मंगेशकर बोलण्याच्या ओघात असेही म्हणाले. (कार्यक्रमाची दृश्यध्वनिफीत समोर नसल्यामुळे त्यांचे वक्तव्य स्मरणातून नोंदवीत आहे. तपशील नव्हे, मुद्दा लक्षात यावा.) ‘आपल्या शत्रूकडे शस्त्र आहे आणि आपल्याकडे फक्त काठी आहे, याला मी शौर्य म्हणत नाही.’ आपण हाती शत्रूसारखेच शस्त्र घ्यायला पाहिजे, असे त्यांना सुचवायचे असावे; परंतु शस्त्रे वा आयुधे अनेक प्रकारची असू शकतात. तलवार- बंदुकीसारखी शस्त्रे हातात नसूनही माणूस शूर ठरू शकतो हे आपल्याच स्वातंत्र्यचळवळीत अनेकांनी दाखवून दिलं आहे- पटकन नाव लक्षात येतं ते हुतात्मा बाबू गेनू यांचं. (काठीचा उल्लेख भेकडपणासाठी करताना मंगेशकरांच्या डोक्यात म. गांधींचा संदर्भ असावा असं मात्र कुणी समजू नये!)
भीमराव कर्डक, वामन कर्डक या शाहिरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावर केलेली बरीच गाणी लोकप्रिय आहेत. आपल्या शाहीर उमप यांनीही बाबासाहेबांवर उत्तम गाणं केलं आहे. साने गुरुजींचं ‘बलसागर भारत होवो’ हे गीत तर सुप्रसिद्धच आहे. ही गाणी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने का आठवली नाहीत? का ती हृदयनाथांनी संगीतबद्ध न केल्यामुळे वीररसपूर्ण झाली नव्हती? त्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’ या क्रांतिगीताचे जे मऊ मुलायम मुळमुळीत प्रेमगीत केले ते ऐकून चाल लावणाऱ्यालाच शौर्य समजाविण्याची पाळी आली.
या पत्रामागचा मुद्दा, राष्ट्र रक्षणार्थ वेळप्रसंगी हिंसेचा वापर करणं नैतिक ठरतं का, हा नसून प्रजासत्ताकदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात कोणती नावं वगळली तर भारतीय मनाला चुटपूट लागेल हा आहे.
नाटकवाला असल्यामुळे एक निरीक्षण : या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात पल्लवी जोशींचा भगवा-केशर जरतारी झंपर आणि वैशाली सामंत यांची भगवी केशरी साडी यांच्या विरोधात अवधूत गुप्ते यांचा जाडा-भरडा खादीचा पोषाखच उठून दिसत होता. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभात फेरीमध्ये हातात तिरंगा घेऊन उच्चरवाने ‘येथून तेथून पेटून उठू दे देश’ (साने गुरुजी) हे गाणे गात, इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळीची पर्वा न करणाऱ्या स्वयंसेवकासारखा.
अर्थात या कार्यक्रमातली गाणी आणि शिवकालाच्या संदर्भातील विवेचन रोमहर्षक झालं. अगदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रातील त्या संदर्भातील उताराच कुणी पाठ करून म्हणत असल्यासारखं वाटलं.
प्रेक्षक श्रोत्यांना या कार्यक्रमाने एक विशिष्ट प्रकारचा आनंद जरूर दिला कारण त्यांना अनायासे एक ‘मंगेशकर रजनी’च अनुभवायला मिळाली.
हे सर्व लिट्ल चॅम्प्स अप्रतिम गातात यात शंकाच नाही, पण मनात खदखदणाऱ्या विशिष्ट मतांसाठी मुलांचा वापर करून घेणं, तेदेखील देशभर सर्वदूर पोहोचणाऱ्या वाहिनीच्या माध्यमातून हे कितपत योग्य आहे? पुढच्याच महिन्यात शिवजयंती हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणाचं निमित्त साधून हा कार्यक्रम झाला असता तर निदान नथीतून तीर मारणे तरी उघडकीस आले नसते. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करताना केवळ संगीतातील तथाकथित पंडितांची नव्हे तर पारदर्शक राष्ट्रीय दृष्टीच्या सामाजिक- राजकीय अस्सल पंडितांचीही नितांत गरज असते हेसुद्धा झी मराठीच्या नियोजकांना कळू नये ना?
कमलाकर नाडकर्णी, दादर, मुंबई

आधिच लिहिते की मला हा वाद वाढवायचा नाहीए.
पण मला जे म्हणायचे होते ते वरील लेखात स्पष्ट झाले आहे. हे शनिवारच्या लोकसत्ता मध्ये प्रसिध्द झालेले आहे. मी श्री. नाडकर्णी यांच्याशी एकदम सहमत आहे.

वर कोणीतरी म्हटले आहे की हे सगळे ऐकुन कोणी 'पेटत' नसेल तर बोलणच संपले पण शिवाजी, सावरकर यांचा प्रत्येकाला अभिमानच आहे. आजसुद्धा माझ्या मुलीला मी ईतिहासात सावरकरांचा धडा शिकवत होते तेव्हा तेवढ्याच तिव्रतेने माझा ब्रिटिशांवरचा राग प्रकट होत होता. काळ्यापाण्याची शिक्षा, तिकडे केलेला छळ हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी होते तर माझ्या लेकीच्या डोळ्यात राग दिसत होता, आणि मला तिला हे सांगणे सुद्धा सोपे गेले की काल आपण सारेगमप मध्ये जी गाणी ऐकली ती ह्यांनीच लिहली आहेत.

१. कार्यक्रम ‘शूरा मी वंदिले’ हा होता. घटनेचा पाया असलेल सार्वभौमत्व अबाधित ठेवायला ज्यांनी देह झिजवले त्या सर्वांना हा मानाचा मुजरा होता. सशस्त्र क्रांतीचा सेतू बांधणार्या लक्षावधी क्रांतीकारकांचे महाराज प्रेरणास्थान होते हे विसरु नका. स्वातंत्र्य आणि सार्वभोमत्वासाठी प्राण वेचणारे लक्षावधी विसरुन केवळ राजकीय स्वार्थापोटी मूठभरांचा उदो उदो करायचा ही परंपरा "झी" ने निर्भिडपणे मोडली म्हणून नाडकर्ण्यांचा पोटदुखा दिसतोय. नाटककार नाडकर्ण्यांना एक प्रश्न - जेव्हा "मी नथुराम ..." मधून गोडसेंची बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा जी हुल्लडबाजी झाली त्याबद्दल आपण अवाक्षर काडह्लेत काय?
सूर्य झाकून लपत नाही. बावनकशी सोन्यासारखा राष्ट्रवादाचा पर्याय लोकांसमोर आला की "विशिष्ट" विचारसारणी राजकीय स्वार्थासाठी कोण थोपतोय हे उघड पडेल म्हणून नाडकर्ण्यांचा खटाटोप दिसतोय.

२. संगीतातील तथाकथित पंडित कोण? ह्रूदयनाथ???
आणि पारदर्शक राष्ट्रीय दृष्टीचे सामाजिक- राजकीय अस्सल पंडित कोण? नाडकर्णींसारखे लोक???

आक्षेपार्ह मुद्दे अनेक आहेत. पण ते सगळे "पोटदुखी" ह्या सदरात मोडत असल्याने सगळ्याला उत्तरे देण्यात वेळ आणि जागा दवडत नाही.

>वर कोणीतरी म्हटले आहे की हे सगळे ऐकुन कोणी 'पेटत' नसेल तर बोलणच संपले
Varsha11,
ते मी म्हटले होते, लीम्बूटींबू यांन्नी आधी लिहीलेल्या पोस्ट च्या संदर्भात. तेव्हा context काय तो जरा लक्षात घ्या (लिहीण्याआधी इथलं त्या आधीचा संदर्भ वाचत चला). उगाच तेव्हडच वाक्य वापरून नंतर "पण" म्हणून स्वताची पोस्ट लिहीण्याचं तुमचं प्रयोजन कळलं नाही. खरं तर ते नाडकर्ण्यांचं अक्ख पत्र दुसरा बीबी उघडून srgmp republic day event discussion अशा काहीतरी नावाखाली टाकलं असतत तर फार बरं झालं असतं.. इथला फोकस वेगळा आहे, असावा असं मला वाटतं.
असो.. नाडकर्णी किंव्वा इतर कुणाच्याही मताला सहमत वा असहमत असण ही तुमची वैयक्तीक बाब आहे. ते पत्र इथे टाईपलत म्हणूनः नाडकर्णींचं पत्र हे बौध्धिक अतीसाराचं उत्तम उदाहरण वाटतं मला. काय आहे, अतीसार होणार्‍याला वाटत असतं, अन्नात, खाण्यात दोष आहे, पण आपली "पचनशक्ती" मुळात कमकुवत (झाली) आहे याकडे ते सोयिस्कर दुर्लक्ष करतात. Happy बाकी त्यांच्या एकंदर पत्रातील फोलपणा samuvai यांन्नी स्पष्ट केलाच आहे. तेव्हा आपल्याला प्रत्त्येक गोष्टीतून काय घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे.
गीत, संगीत, सूर, ताल, राग, भाव, शब्द, काव्य या अनुशंगाने पत्र वा पोस्ट व्यवहार करायचा असला तर इथे नक्कीच त्याला अधिक constructive reply मिळेल असे वाटते.
limbu mode*
च्यामारी त्याच बाबतीत चर्चेची बोंब हे...:)

वाद वाढवण्याची इच्छा मलाही नाही. पण आज "शुरा मी वंदिले" दुसर्‍यांदा पहाताना मला सुद्धा एक गोष्ट खटकली - "शत्रूच्या हातात शस्त्र असताना हातात काठी घेउन आलेलं हौतात्म्य मला व्यक्तिशः मान्य नाही" हे पंडितजींचं वाक्य खरंच खूप खूप खटकलं. २६ नोव्हेंबर आठवलं... सी.एस.टी. वर हातात काठी घेउन एके-४७ ने अंदाधुंद गोळीबार करणार्‍या अतिरेक्यांना सामोरे गेलेले हवालदार (नाव आठवत नाही) आठवले. त्यांच्या शौर्याची किंमत एका वाक्यात शून्य केल्यासारखी वाटली.

-योगेश

>>"वाद वाढवण्याची इच्छा मलाही नाही""..
हा सध्याचा इथला नविन disclaimer दिसतोय..:) चालू द्या...:)
असो. इथे नेट वा युट्युब वर कार्यक्रम पाहण्याबद्दल जे उत्सुक आहे त्यांच्यासाठी: आम्च्याकडे मराठी सारेगमप दिसत नसल्याने मी युट्युब वर या user ने अपलोड केलेल्या किल्प्स बघतो. quality of clips and his efforts are commendable. here is the link:
http://www.youtube.com/watch?v=73jqEKpcM40
you can browse other clips uploaded under his "username"..

योग,
अगदी हेच मी शेवटी लिहीणार होतो की हा बी. बी. लहानग्या गायकांच कोतुक करण्यासाठी, त्या बाबत आपली मते मांडण्यासाठी आहे - कोणाच्या राजकीय मळमळीच्या प्रदर्शनासाठी नाही. नियामकांनी ह्याबाबतचे *सर्व* संदेश खोडावे/हलवावे.

मी_योगी,
सगळ्यांची सगळी मते पटली पाहीजेतच असे नाही मात्र पंडितजींना - तुकाराम ओंबळेंसारख्या वीरश्रेष्ठांना सरकारच्या नालायकपणामुळे ए.के.४७ चा केवळ लाठीने सामना करावा लागला आणि होतात्म्य आले - अशा "प्रकारचे" हौतात्म्य मान्य नाही (त्याची चीड येते) - अस अभिप्रेत असावे.

admin/वर्षा,
मी तुमच्या मताशी सहमत नाही. एवढ्या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही बोर झालो म्हणता, मला आश्चर्य वाटतं. शंकर महादेवनने असे काय मोठे केले. प्रत्येक गाणार्‍याचे जाउन पापे घेतले..लोकांनाही पहायला आवडलं आणि मलाही. गेले ६ महीने त्यांच असंच कौतुक चाललंय, अर्थात ते कौतुकास पात्र आहेत याबाबत दुमत नाही. पण १ दिवस तेही २६जानेवारीला या थोर लोकांच, ज्यांच्यामुळे ही आवड्णारी गाणी तयार झाली, त्यांचं जरा कौतुक केलं तर तेही आवडत नाही कींवा बोर झालं? ईतर दिवशी सगळं नाचगाणं चालूच असतं की सगळ्याच शो मध्ये. बरं हा भावनात्मक मुद्दा सोडला तरी पंडितजींच निवेदन बोर होतं म्हणनं सुदधा पटत नाही. त्यांनी ईतक्या मनापासून सर्व गाण्यांचा अर्थ/आशय/पार्श्वभूमी समजावू सांगितली की खर्‍या रसिक माणसाला ते आवडेलंच. आणी अरसिक माणसांसाठी नव्हताच तो कर्यक्रम कारण त्या दिवशी तो कर्यक्रम म्हणजे एक माध्यम होतं. गाणारे लिटील चाम्प्स माध्यम होते तो कार्यक्रम सादरकरण्यासाठी. "ने मजसी ने..." चा खूपजणांना फक्त मुखड्याचाच अर्थ माहीत होता पण ते गाणं पुढे ईतकं निराळं आहे की भल्याभल्यांना त्याचा अर्थ लागत नाही. त्याचा आशय व पार्श्वभूमी त्यांनी ईतकी सुरेख समजावून सांगितली. ईतरही अनेक गाण्यांबदद्ल हेच म्हण्ता येईल... काय व्यासंग असेल त्या माणसाचा? मी तर म्हणतो की प्रत्यक्ष पंडितजींच्या तोंडून त्या लहान मुलाना हे ऐकायची संधी मिळाली हे अहोभाग्य आहे त्यांचे.

स्वप्नील,
तुमच्या पोस्ट शी १००% सहमत !
मला पण हृदयनाथ मंगेशकरांचा एपिसोड प्रचंड आवडला,एक तर शिवाजी महाराजां चा विषय, त्यात पंडितजींच narration, सगळ्या स्पर्धाकांचा गाताना feel सगळच वेगळ्याच दुनियेत घेउन गेलं!
अत्ता पर्यंत च्या एपिसोड्स मधे आलेल्या जजेस पैकी सर्वात अमुल्य माहिती, मर्गदर्शन माझ्या मते हृदयनाथ मंगेशकरांच च वाटल !
पूर्ण लिट्ल चॅम्प सिझन पैकी हा आणि २६/११ नंतर केलेला एपिसोड्स, सर्वात सुरेख झाला.

या आठवड्यात आर्या ला इतरां पेक्शा जास्त coverage दिल का?
मी आर्या ची फॅन आहे पण ही स्पर्धा आहे आणि सगळ्या स्पर्धकांना एक सारख coverage द्यायला पाहिजे .(IMO)

हो... तस घडलं खरं. पण बरिचशी गाणीच अशी होती की ती आर्याच्याच आवाजाला सुट होतील त्यामुळे असेल कदाचित.

वर्षा११,
त्या नाडकर्णी चा लेख म्हणजे मोठा विनोद आहे. तो "हसा लेको" वगैरे सदरातून घेतलायस का अशी शंका येते. कारण सरदार वल्लभभाई पटेल आणी आंबेडकरांनी गाणी/कवीता वगैरे लिहीलेल्या (किंवा त्यांना अनुसरुन लिहीलेल्या) मला तरी माहीत नाही आणी आम्हा अजाण लोकांना माहीत नसल्यास त्या थोर नाडकर्णीनी पुढच्या लेखात छापाव्यात मग मंगेशकर साहेब त्याला चाल देतिल आणी मग पुढच्या sa re ga ma pa मध्ये ती गाणी ऐकवू.
आणि त्या नाडकर्णीनी लिहीलय "काठीचा उल्लेख भेकडपणासाठी करताना मंगेशकरांच्या डोक्यात म. गांधींचा संदर्भ असावा असं मात्र कुणी समजू नये!".
अहो तो उल्लेख गांधीजींसाठीच आहे हे कुणी शेंबडं पोर पण सांगेल आणि हे त्या नाडकर्णीना ही माहीत असावे.

आधीच सांगतो 'वाद वाढवण्याचीच मला इच्छा आहे'.
म.गांधींची काठी भेकडपणाचे प्रतीक होती असे मानणार्‍यांनी माबोवरचीच 'गांधीजींची अहिंसा' हा बीबी वाचावा. उठा की गांधींना झोडपा,आपल्या प्रत्येक कमतरतेचे खापर त्यांच्या माथ्यावर फोडा.कारण जेंव्हा कुठलीही विचारसरणि (उदा.वर बर्‍याच जणांनी उल्लेखलेला तथाकथीत 'ज्वलंत राष्ट्रवाद') राजकीय कारणासाठी वापरावी लागते तेंव्हा विरोधी,अडचणीत आणणार्‍या मताला अशाच प्रकारे चेचावे लागते,नाही का?.उदा. आपल्या विरोधी मते माबोवर दिसू लागली की त्यांना 'राजकीय मळमळ' संबोधून हटवण्याची मागणी करणे.
आणी आंबेडकरांवरची गाणी तुम्ही ऐकली असण्याची शक्यता नाहीच,कारण ती 'त्यांच्या' समाजाची गाणी आहेत. 'आपला' आणी त्यांचा संबंधच काय? नाडकर्णींना खरेच वेड लागलेय,आंबेडकरांचा अभिमान? काहीतरी काय? एनी वे ती गाणी त्यांच्या चळवळीतून पुढे आली आहेत,आणी संगीत देण्यासाठी त्यांना कोणा मंगेशकरांची गरज नाही.
मी माझ्या आधीच्या पोस्टमधे म्हणल्याप्रमाणे ही अजूनही एक स्पर्धा आहे,ती एकदा संपू द्या आणि मग असे कार्यक्रम पाहिजे तेवढे करा. आर्याला मिळालेल्या कव्हरेजचा मुद्दा पुर्णपणे मान्य.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

तुम्हा सगळ्यांचे मुद्दे वाचले. मला कोणाचाही अपमान करायचा नाहीए. मी आधीच्या पोस्टमध्येही लिहिले आहे की पंडीतजींनी माहिती खुपच छान सांगितली पण जरा त्या मुलांचेही कौतुक केले असते तर काय बिघडले असते का? एवढी अवघड गाणी म्हणणे काय खायचे काम नाही आणि जर नाचगाण्यांविषयी म्हणत असाल तर ते सध्या टि.वी. वरील प्रत्येक कार्यक्रमात, मालिकेत चालुच असते.

मला आंबेडकरांनी वगैरेंनी लिहिलेली गाणी काही माहित नाहीत पण २६ जानेवारीचा कार्यक्रमात ईतरही देशभक्तीची गाणी समाविष्ट करायला काहीच हरकत नव्हती. हा माझा मुद्दा आहे.

शिवकल्याण राजा मीही प्रचंडवेळा ऐकले आहे. ही गाण्याची स्पर्धा आहे तेव्हा त्याच्यात थीम घेऊन गाणी सादर करणे मान्य आहे पण ही गाणी आणि शहिद जवानांचे पालक हा मेळ काही माझ्यामते तरी जमला नाही, तो कार्यक्रम शिवजयंतीला साजरा करायचा होता.

आणि मी ईथले पोस्ट वाचुनच मग माझ्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. मला एवढा वेळ पण नाही दुसरा धागा सुरु करुन त्याच्यावर भांडत बसायला, माझे मत काही मी तुम्हा सगळ्यांवर लादत नाहीए तेव्हा तुमचे चालु राहुदेत. Happy

महागुरु,
कार्तिकि च्या लेखाची लिंक दुसरीकडे जातेय.

बाकी जर कार्तिकी-मुग्धा ऐवजी शाल्मली-शमिका टॉप ५ मधे असत्या तर एकट्या आर्याला इतक फुटेज नसत मिळाल, या दोघींचे अवाज पण तितकेच matured आहेत.... असो.
अगदीच झी ला लहान मुलींना पुढे आणायची इतकी हौस होती तर एक Senior champ आणि १ Junior Champ असे २ विजेते ठेवायला हवे होते, कारण वय ७ आणि १४ मधे बराच फरक पडतो.

बाकी पल्लवी चे होस्टिंग जितके छान तितकाच तिचा/तिच्या डिझायनर चा ड्रेस सेन्स महा भयानक आहे, अत्ता नाही गेल्या २ सिझन च्या सगळ्या सारेगमप सिझन्स मधे !
कसले मिस मॅच आणि काहीच्या काही आउट डेटेड कपडे देतात तिला Biggrin

yog यानी सान्गितल्या प्रमाणे....मला सुद्धा, पर्देशी असल्या कारणाने, SRGMP Live बघता येत नाही, पण youtube site var 'ahonkan' user every week videos upload करतो..आणि त्याचि quality सुद्धा अतिशय छान आहे...His comments on the videos are also excellent and to the point..

२६ January चा कार्यक्रम खूपच छान झाला....पण मला युद्धामधे शहिद झालेल्याच्या नातेवैकाना invite kelele titake avadale naahi..

These channels are using such people for increasing the TRP and nothing else, which is very sad!!...
tyaveli tya sarva lokana bolayala atishay avaghad jaat hote, aani ashi gani aani prasang tyana velo-veli aplyaa shahid jhalelya mulaachi athavan karun det hote...tyana tyanchya bhavana avarane atishay kathin jaat hote..tarihi te sarva lok bhavananavar avar ghalun bolat hote..

he sagale pahilyavar vatate...ki ashya lokana jar evadha traas hot asel tar tyana invite karu naye...aani program chi TRP vadhavnyaasaathi tyaancha vaapar karu naye...to program baghtana mala khoopach vaait vatale...

हे फक्त माझे वैयक्तिक मत आहे....पण ते सोड्ल्यास बाकी सादरिकरण आणि गाणी उत्तम झाली.

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

Pages