१२ जानेवारी:
पहिली फेरी:
आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.
दुसरी फेरी:
आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...
साधना तुला
साधना तुला मोदक.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
झुळूक आणखी एक, आणखी एक पान गळले..
मला
मला दोन्हिही भाग २६ जानेवारीचे आवडले. वेगळे होते. ब-याच शहिदांच्या घरच्यांचे बोलणे ऐकुन वाटले कि आपण आपल्या देशाकरिता काहिच करित नाही आहोत. आज आपण जे सुरक्षित आणि मजेने आयुष्य जगत आहोत ते केवळ त्या सिमेवर लढणा-या शूरवीर जवांनामुळेच. त्यांचे अनुभव ऐकुन खरंच अंगात एक प्रेरणा संचारली. आणि जोडीला लिटिल चॅम्सची गाणी. पंडीतजींचे प्रत्येक गाण्याला दिलेले explaination. मला तरी कार्यक्रम आवडला.
एवढ्या दिग्गजाकडुन प्रत्येक ओळीचा अर्थ आणि गाण्याशी निगडित इतर अनुभव घर बसल्या ऐकायला मिळाले हे तर मी माझे भाग्य समजते.
त्यांना जे अपेक्षित होते कि उत्तुंग देशभक्तीची भावना आणि काहीतरी भरिव देशाकरिता करण्यासाठीची प्रेरणा मुलांमधे आणि तरुणांमधे उत्पन्न व्हावी ती काही प्रमाणात यशस्वी झाली असे मी म्हणेन.
आज १% जरी मुले हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना किती तरी गाणी समजली असतील आणि ते देशभक्तीने प्रेरित झाले असतील तरी हा कार्यक्रम यशस्वी झाला असे मी समजेन.
आता मुले थकली आहेत हेही खरे आहे पण तो एक वेगळा मुद्दा आहे.
कार्यक्रम मला आवडला आणि पंडितजींचे प्रत्येक गाण्यावरिल विवेचन खुपच आवडले.
>माझ्या
>माझ्या मते LT आणि त्याचे अनूमोदक हे काहीतरी भलत्याच विषयावर वाद घालतायत !!
बदलून बघा.. 
adm,
माफ करा पण तुमच्या चश्म्याचा नंबर चुकीचा दिसतोय...
मला दोन्ही
मला दोन्ही ऐपीसोड प्रंचड आवडले.
)
वीर रसात आणखी अनेक गाणी आहेत पण त्यांचतला फरक लिंब्याने सांगीतला. (सत्राने उड्डाने पोस्ट. लिंब्या कधी कधी फार मार्मीक लिहीतोस तू
त्यांनी स्वतची ऍड केली आहे असे ज्यांना वाटत आहे, त्यांनी कदाचित ही गाणि आत्ताच ऐकली की काय असा संशय आला.
अरे रे.
अरे रे.
इतका सुंदर कार्यक्रम मी भारतात नसल्याने बुडला आणि परत मला पहायला पण मिळणार नाही..
..
सुनिधी
सुनिधी पाहायला मिळेल. मराठीट्युब.कॉम पाहात जा. एखाद आठवडा उशीरा अपलोड होतात हे भाग.
सुनिधी, नेट
सुनिधी,
नेट वर येइल कि लवकरच, मी youtube/marathitube वर च पहाते.
मला पण आर्या डिझर्विंग वाटते, व्हर्साटाइल आहे आणि व्हॉइस क्वलिटी पण मस्त, आणि शिवाय X factor of good looks
कर्तिकि ला जजेस नी चढवून ठेवलय , लोक गीत्-अभंग छान गाते पण मुळात मला तरी तिची व्हॉइस क्वलिटी नाही आवडत्..जजेस च्या ओव्हर स्तुत्ती मुळे मुळे साधी सुधी मुलगी अता अगाउ वाटायला लागलीये:(...अवधूत च काय नॉन्सेन्स 'कार्तिकि देवींचा' चालु असत !
माझे टॉप ३
१.आर्या
२.प्रथमेश
३.रोहित.
पण कार्तिकि , मुग्धा ऐवजी शाल्मली -शमिका हव्या होत्या टॉप ५ मधे.
अवंति पण मला आवडायची, वेगळीच होती तिची स्टाईल.. तिचा गाण्यांचा चॉइस पण आवडायचा मला..'अहो पिकल्या पानाचा' तर जबरदस्त गायली होती ती.
LOL.. DJ.. welcome
LOL.. DJ.. welcome welcome..


"ते" संपल्यावर आता "हे" चालू का?? पण हा गाण्याचा कार्यक्रम असतो बर्का... ड्रामा, participatns ची style, त्यांचे कपडे, त्यांचं personal आयुष्य, आई वडिलांची भांडणं असं काही नसतं ह्यात..
इकडे पण टाक आता आर्या rocks वगैरे आणि तिची मोठी मोठी पोस्टर्स..
आणि हो आम्ही ही healthy discussion चं करतो.. भारत पाकिस्तान तणावासारखे स्फोटक विषय नाही आणत ह्यात...
सो.. आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकाचं स्वागत आहे..
NOM.. पण अगदीच रहवलं नाही म्हणून हा पोस्ट..
adm, "इथे" काय
adm,
"इथे" काय काय असत्/नसत माहिते, पाहिलेत मी ऑलमोस्ट सगळे एपिसोड्स .
तसाही भारत पाकिस्तान चर्चेचा इथे काय संबंध ?
तिथे होता म्हणून लिहिल , ते ही २००७ सारेगमप च्या discussion board वर च्या चर्चां मुळे.
"इथे" काय
"इथे" काय काय असत्/नसत माहिते >>>> तरी पण आर्या चं डिझर्विंग असणं हे तिच्या looks शी जोडण्याचं काय कारण??????????? आर्या ची गायकी उत्तम आहे आणि त्यामूळे ती आज तिथे आहे.. ती कशी दिसते आणि कोणते कपडे घालते ह्यामूळे नाही...
मला नाही वाटतं की ह्या कार्यक्रमात कोणाचे looks पाहून त्यांना मार्क्स दिले जातात.. !!!! तसं असतं तर इतर बरीच मुलं होती जी इलिमिनेट झालीच नसती फायनल मधे किंवा त्याच्या आधी..
उगीच आपलं कै च्या कै.. !!
anyways..
हटकेश्वर हटकेश्वर !!
या दोन
या दोन भागांची डीवीडी करुन संग्रही ठेवण्यासारखी आहे हे मात्र खर..
हे भाग परत केव्हा दाखवतात? मला वाटते रविवारी असते..पण जर पंडीतजींच्या भाष्याशिवाय नुसती गाणी असतील का? कारण मला त्यांचे भाष्य जास्त आवडलेय.
कृपया कोणाला नक्की वेळ माहित असेल तर पोस्ट कराल का?(युट्युब, मराठी ट्युब वर अजुन आले नाही)
२८ तारखेला पहाटे जाग आली नाही त्यामुळे रीपीट पहाता आले नाही. असो.
हटकेश्वर
हटकेश्वर हटकेश्वर >> अडमा जर्सीला कधी कधी भेट देतोस त्याचे परिणाम ...
-----------------------------------------
सह्हीच !
तरी पण
तरी पण आर्या चं डिझर्विंग असणं हे तिच्या looks शी जोडण्याचं काय कारण??????????? आर्या ची गायकी उत्तम आहे आणि त्यामूळे ती आज तिथे आहे.. ती कशी दिसते आणि कोणते कपडे घालते ह्यामूळे नाही...
<<अहो adm,
असं मी कधी म्हंटलं कि आर्या च्या लुक्स मुळे तिला मार्क्स मि़ळतात किंवा तिच्या छान दिसण्यामुळे इथ ती पर्यंत आली आहे?
आणि असं कुठी लिहिल मी कि ' ह्या कार्यक्रमात कोणाचे looks पाहून त्यांना मार्क्स दिले जातात..'
सगळं तुम्हीच म्हणाताय उगीच काही संदर्भ नसताना !
मी माझ मत सांगितलं कि व्हर्साटाइल आणि सुरेख आवजा बरोबर X factor of good looks , आहे तिच्या कडे , हे माझ मत आहे !
तुम्ही कशाला नाही त्या वाक्यांचा एकत्र संबंध जोडताय , मगाशी भारत पाकिस्तान बद्दल काय लिहिलत उगीचच, सगळच असंबध्द ..कै च्या कै च बोलता झालं :)!
आर्याबद्द
आर्याबद्दल डिजेशी सहमत...
डिजे, कूल डाऊन.
मला नाही वाटतं की ह्या कार्यक्रमात कोणाचे looks पाहून त्यांना मार्क्स दिले जातात.. !!!!
ऍडम, मुग्धाच्या बाबतीत असंच काहीसं होतंय असं नाही का वाटत तुला??? (रागवू नकोस हां माझ्यावर)
ऍडम,
ऍडम, मुग्धाच्या बाबतीत असंच काहीसं होतंय असं नाही का वाटत तुला??? >>> मंजू.. लूक्स नाही.. ती लहान आहे सगळ्यांच्यात त्यामूळे तिला थोडे जास्त मार्क्स मिळत असतील किंवा चूका नजरेआड केल्या जात असतील.. म्हणजे जसं घरी एखाद्या लहान मुलानी त्याच्या वयाच्या मानाने अवघड असे कुठले श्लोक, स्तोत्र, पाढे-बिढे बिनचूक म्हणून दाखवले की त्याचं जसं कौतूक होतं तसं...
पण "कित्ती सुंदर दिसते.. काय looks आहेत... म्हणून तू म्हणतेस ने भारी" वगैरेंवर मार्क्स जास्त मिळत नाहीत/ नसावेत असं मला वाटत...
रागवू नकोस हां माझ्यावर >>>> रागवायच काय त्यात??? शेवटी प्रत्येकाची मतं आणि आवडी निवडी असणारच... फक्त हिंदी सारेगमप मधल्या सारखी चर्चा लिल चँप संदर्भात होऊ नये असं मला वाटतं.. (e.g. good looks, कोणी कसे कपडे घातले, कसं दिसलं वगैरे)..
(आणि तसही आपण healthy discussion करायला जमलोय ना इथे.. :P)
मार्क्सचे
मार्क्सचे माहित नाही, पण एसेमेस नक्कीच येत असणार लुक वरुन! (मन्जु, मुग्धाचा मुद्दा देखिल पटतो)
...;
आपला, लिम्बुटिम्बु
फक्त हिंदी
फक्त हिंदी सारेगमप मधल्या सारखी चर्चा लिल चँप संदर्भात होऊ नये असं मला वाटतं>> असं सगळ्यांनाच वाटतं ना? मग इथे जी काही चर्चा गेले दोन दिवस चाललीये ती प्लीज थांबवा. विषय भरकटवू नका. एकमेकांची काही विधानं पटत नसतील (व्यक्तिगत पातळीवरील) तर ती संबंधितांच्या विपू त टाका.
----------------------
सुख है अलग और चैन अलग है.. चैन अपना और सुख है पराए
ये जो देखे वो नैना अलग है
मलाही हे
मलाही हे दोन भाग खूप आवडले. हृदयनाथ अतिशय छान बोलले.
आशुशी
आशुशी सहमत, इथे फक्त लिटल चॅम्पस विषयी लिहीलं गेलं तर बरं.
फक्त हिंदी
फक्त हिंदी सारेगमप मधल्या सारखी चर्चा लिल चँप संदर्भात होऊ नये असं मला वाटतं.. (e.g. good looks, कोणी कसे कपडे घातले, कसं दिसलं वगैरे)..
, तिच्या गाण्या च पण कौतुक केलय, फक्त दिसण्याच नाही... आणि दिसण्याच कौतुक म्हणजे विषयांतर कस काय म्हणे.. आज काल गाणं फक्त ऐकण्याची गोष्ट राहिली नाहीये, कर्तिकि -रोहित च्या performance skills च कौतुक होत तसं आर्याच्या दिसण्याच stage presence च केल तर काय बिघडलं?
(आणि तसही आपण healthy discussion करायला जमलोय ना इथे.. )
<<<
मग प्लिज तसच करा हो, उगीच वाट्टेल ती statements माझ्या नावा वर खपवु नका आणि तुम्हाला जे लिहायचय ते तुम्ही ठरवा , तुमची मत इतरांवर लादु नका!
मी कुठे काय लिहु, हिंदी सारेगमप सारख लिहु कि नको, कोणाची पोस्टर्स लावु, कोणाला चांगल म्हणू,कोणाचे लुक्स , स्टाईल बघु याच्या कडे लक्ष देण्या पेक्षा खरच Little champs related तुमची स्वतः ची मत मांडा कि !
तसही मी सुंदर मुलीला मी सुंदर म्हणल्यानी कोणाला का इतका राग यावा
पुण्याची मैना नंतर वैशाली सामंत् नी पण केल होत आर्या च्या लुक्स च कौतुक !
आता नका ना
आता नका ना जास्त भरकटवू विषय
डीजे,
डीजे, कार्तिकीबाबत तुला मोदक. वरच्या पट्टीत तिचा आवाज जरा खुपतो कानाला. शिवाय उच्चारही बरेचदा चुकतात तिचे.
आणि मुग्धा बाबत बोलायचे तर तिच्यामुळे माझी मुलगी आजकाल खेळताना 'मुग्धा' बनुन गाणी म्हणते,नाहीतर आधी ती खेळात 'पल्लवी'च बनायची.:)
यात पल्लवीला कमी लेखायचा अज्जिबात विचार नाहीये माझा, पण सांगायची गोष्ट अशी, की आपल्यासारखी लहान मुलगी गाणी म्हणताना बघुन तिचाही गाण्याकडे कल वाढला आहे. अशी अनेक मुलं असतीलच ना? शिवाय वयाच्या मानाने ती खरंच खूप छान गाते. उच्चार, स्टेजडेअरिंगही छान आहे.
पण आर्यादा जबाब नहीं:)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
झुळूक आणखी एक, आणखी एक पान गळले..
असं कसं
असं कसं म्हणतोस सक्षम! आता तर हा बीबी माबोवरचा वाटायला लागलाय! हे पठ्ठे लई भारी! इतके दिवस नुसते विषयाला धरुन बोलत होतो,जाम बोअर झालं होतं राव.२६ जानेवारीचा कार्यक्रम चांगला झाला ह्यात शंका नाही,फक्त तो सारेगामाच्या आत्ताच्या फॉर्मॅटमधे व्हायला नको होता.ही अजूनही एक स्पर्धाच आहे,ती संपल्यावर याचा गायकांना घेउन केला असता तर अजून आवडला असता.
रोहितचा आवाज पार ढेपाळला आहे,बाकीचेही दमल्यासारखे वाटत आहेत,एक ब्रेक जरुरी है बॉस.
बा़की माझ्याकडे कार्तिकीचे पोस्टर नाहीये,असते तर नक्की लावले असते!!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
DJ, गेले सहा
DJ, गेले सहा महिने हा कार्यक्रम आणि ह्या बीबी वरची चर्चा हे दोन्ही चालू आहे.. मला तरी जजेस किंवा इथले कोणी मायबोलीकर कोणत्या स्पर्धकाच्या X factor of good looks बद्दल बोलल्याचं आठवत नाही.. सगळे जण प्रत्येक वेळी गाण्याबद्दलच बोलायचे...
ते हिंदी सारेगमप संपल आणि तुमचा त्या स्पर्धेच्या (ज्यात गाण्यापेक्षा बाकीच सगळ्याला महत्त्व होतं) वळणाने जाणारा पोस्ट सकाळी सकाळी डोक्यात घुसला...
तसही मी सुंदर मुलीला मी सुंदर म्हणल्यानी कोणाला का इतका राग यावा >>>> सुंदर मुलीला सुंदर म्हणण्याचा राग नाहीच.. ते कशाचा संदर्भात म्हंटलं जातय त्याबद्दल सगळं...
आज काल गाणं फक्त ऐकण्याची गोष्ट राहिली नाहीये >>>> ऐ.ते.न. मुव्हीज मधले प्ले बॅक सिंगर दिसतात का हो तुम्हाला??
असो.. ही माझी ह्या विषयावरची शेवटची पोस्ट..
बा़की माझ्याकडे कार्तिकीचे पोस्टर नाहीये,असते तर नक्की लावले असते!!! >>>
मनोगतावरी
मनोगतावरील हा चर्चाप्रस्ताव वाचा:
सारेगम लिटिल चॅंप्स मध्ये मुलांचे बालपण हिरावून घेतले जात आहे का?
-योगेश
DJ, गेले सहा
DJ, गेले सहा महिने हा कार्यक्रम आणि ह्या बीबी वरची चर्चा हे दोन्ही चालू आहे.. मला तरी जजेस किंवा इथले कोणी मायबोलीकर कोणत्या स्पर्धकाच्या X factor of good looks बद्दल बोलल्याचं आठवत नाही.. सगळे जण प्रत्येक वेळी गाण्याबद्दलच बोलायचे...
ते हिंदी सारेगमप संपल आणि तुमचा त्या स्पर्धेच्या (ज्यात गाण्यापेक्षा बाकीच सगळ्याला महत्त्व होतं) वळणाने जाणारा पोस्ट सकाळी सकाळी डोक्यात घुसला...
<<<< तुमची मत काय असावीत, तुम्हाला कोण का आवडतं, तुम्ही गायका मधे काय पहाता, कि नुसते ऐकता हा तुमचा प्रश्न आहे , त्यावर इतर कोणी कॉमेंट केली नाहीये.
तसेच इतर लोक त्यांच्या मतां प्रमाणे लिहितात हे , त्याचा तुम्हीही respect केला पाहिजे हे लक्षात असु द्या.
मी फक्त लिट्ल चॅम्प विषयी माझ मत सांगत होते, तुम्हाला माझ पोस्ट पटल नाही तर पब्लिक मधे काहीही असम्बध्द लिहिण्या पूर्वी, कोणवर वैयक्तिक आणि खोटे आरोप करून विषय भरकटत नेण्या पूर्वी आपण पब्लिक मधे लिहित आहात याचे भान ठेउन बोलत चला , तुम्हाला जे पटत तेच इतरांनी लिहावे ही 'तालिबानी' वृत्ती दुसर्यांवर लादु नका!
गेले सहा महिने मी इथे का लिहिल नाही , अता का लिहिते, is none of your business , You please mind your own!
राहिली गोष्ट X factor ची, इतर कोणी बोलल्याच तुम्हाला आठवत नाही त्याला मी काय करु?
इतर मायबोलीकर बोलले नाहीत म्हणून मी किंवा बाकीच्या अर्याच्या फॅन्स नी बोलु नये हे ठरवणारे तुम्ही कोण ?
आणि जजेस बोलतात बर का सुंदर दिसण्या बद्दल, नक्की पहाता ना तुम्ही हा प्रोग्रॅम ????
तुम्हाला आठवत नसेल तर 'पुण्याची मैना' नंतर आर्याच्या लुक्स बद्दल परवा वैशालीने कौतुक केलेच, अगदी गाला वरची खळी, बद्दल !
शिवाय 'खरा तो प्रेमा' नंतर सुध्दा वैशाली म्हणी " तू जितकी गोड दिसतीयेस, तितकीच गोड गायलीस(म्हणजे आधी काय पाहिल वैशालीने :)), आणि अवधूत ची कॉमेंट ऐकली का " आज तू प्रचंड सुंदर दिसतेयेस, सिंड्रेला, हिमगौरी,परीकथेतली राजकुमारी सगळ्या उपमा दिल्या तिल्या ...असो, तुमची मेमरी वीक दिसते, लक्षात नसेल तुमच्या तर हे पहा!
http://www.youtube.com/watch?v=qsvcIg96MC4&feature=related
आर्यालाच 'येउ कशी पिया' वर गेस्ट जज विजय घाटग्यांची कॉमेंट ऐक,'जितकी छान दिसतेस तितकीच छन गायलीस्'(म्हणाजे आधी कशा बद्दल बोलले:))
http://www.youtube.com/watch?v=oeVa5I7-crA&eurl=http://mandyspeaks.blogspot.com/2008/12/zee-saregamapa-little-champs-arya.html
आणि ही वैशालीने मुग्धाला दिलेली कॉमेंट,
जशी दिसतीयेस गोड, तशीच गायलीस !
http://www.youtube.com/watch?v=EiVkDWD0Yw8&feature=related
यामुळे मार्क्स मिळतात असं मी कुठीही म्हंटलेली नाहीये, पण तुम्हाला जे जजेस लुक्स बद्दल कधी बोलल्याचे आठवत नव्हते त्याची आठवण म्हणून या क्लिप्स दिल्या, पहा विसरला असाल !
मायबोली चा हा थ्रेड हा एकमेव आर्याचा फॅन क्लब नाही, असंख्य लोक आहेत, ज्यांना आर्याच्या संगीता बरोबर तिची प्लेझंट पेर्सनॅलिटी पण आवडते, आहे आर्या सुरेख आवाजा बरोबर दिसण्यात पण गॉड गिफ्टेड यात तुम्हाला काय एवढा त्रास होतोय ?
ऑर्कुट च्या अनेक कम्युनिटिज वर चुकुन गेलात तर पहा, आर्याच्या प्रत्येक लुक ची, प्रत्येक एपिसोड मधे कशी दिसली याचीही चर्चा होते, आणि हि चर्चा करणारे वय २१ ते ६१ सगळ्या वयोगटातले लोक आहेत, अर्थात हे झाले मुठ भर ऑनलाइन फॅन्स बद्दल, इतर पण बरेच असतील !
ते चूक कि बरोबर ही गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही जे म्हणता कि अशी चर्चा फक्त हिंदी मधे होते हे चूक आहे.
हिंदी मधे कशाला महत्त्व दिल जात हा भाग वेगळा आणि विषयही, तो हिंदी सारेगमप च्या फोरम वर मांडा.
वर लिंबुटिंबु ने म्हंटलाय तसा पब्लिक व्व्होटिंग च्या दृष्टिनी गुड लुक्स हा नक्कीच एक्स फॅक्टर आहे, तुम्ही मान्य करा किंवा न करा !
ऐ.ते.न. मुव्हीज मधले प्ले बॅक सिंगर दिसतात का हो तुम्हाला??
<< बसिक मधे राडा करताय तुम्ही !
ही प्ले बॅक सिंगिंग ची स्पर्धा आहे का हो, तुम्ही sound mute सारखी picture disable करून पहाता का ?
ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्यांना इथे सगळे गायक गाताना दिसतात, परफॉर्म पण करतात आणि जजेस पण गाणी 'पहातात', नुसतीच ऐकत नाहीत, आणि 'पहाताना' छान वाटली कि त्याच कौतुक पण करतात, आणि 'पहाताना' अजुन छान वाटावी या साठी टिप्स पण देतात, 'पहाताना' छन वाटणारी गाणी जास्त appreciate पण करतात..अवधूत तर नेहेमीच परफॉर्मन्स ला खूप महत्त्व देतो !
ड्रेस, गेट अप याला मराठी मधे महत्त्व नाही अस कस म्हणता ?
दिवाळी च्या रेट्रो गाण्यां मधे सगळ्यांचे गेट अप, लुक या कडे हिंदी पेक्षाही काळाजीपूर्वक लक्ष दिल गेल होत, आठवा, कार्तिकि चा 'कुंकु' मधल्या पोर्याचा लुक, शाल्मली ची पगडी घेउन परफॉर्म करणारी नखरेल मैना, मुग्धा ची धोती कुर्ता मधली 'छडी लागे' ची खट्याळ अदा, प्रथमेश चा रामजोशी, रोहित चा , एक चतुर नार , राणी माझ्या मळ्या मंदी ही सगळी गाणी जितकी श्रवणीय तितकीच प्रेक्षणीय पण होती आणि जजेस नी पण त्याच कौतुक केल होत.
मुग्धा च्या 'उगवला चन्द्र पुनवेचा' च्या प्रतिक्रिया पहा, तिच्या facial expression बद्दल अवधूत ची कॉमेंट ऐका, त्या अभिनया बद्दल अवधूत नी सलाम पेश केला तिच्या गुरुंना , यशोमति मैय्या से मधे 'इसि लिये काला' च्या अभिनया बद्दल पण खास दाद दिली!सांगण्याचा मुद्दा असा कि ठिक आहे तुम्हाला वाटत नसेल प्रेक्षणीय पण इतर बर्याच लोकांना आणि जजेस ना ही संगीत 'पहायला' आवडते !
असो.. ही माझी ह्या विषयावरची शेवटची पोस्ट..
<< Good for you, तसेही तुम्हाला मुद्देसूद उत्तर देता येत ,डिबेट करता येत नाही, त्या ऐवजी तुम्ही असंबध्द इतर फोरम च्या चर्चा मिक्स करून वाट्टेल ते बोलता, तेंव्हा इथून पुढे काही मुद्दा नसताना निदान माझ्या वाटेला जायची चूक तर पुन्हा करूच नका.
इतर सर्वां साठी,
जर माझ्या पोस्ट नी इथले चर्चा भरकटली असेल तर sorry !
पण adm काही कारण नसताना, मी त्याच्या वाटेला गेले नसताना पब्लिक फोरम मधे मला उद्देशून असंबध्द,personal attack केले म्हणून हे उत्तर इथेच दिल, चु.भु.द्या.घ्या.
सुंदर
सुंदर दिसतेयेस, सिंड्रेला >>> हे मला आवडलं, बाकी चालुदेत
नक्की
नक्की पाहीन मट्युब किंवा युट्युब वर हे भाग. खरे तर मला श्री. मंगेशकरांचे बोलणे ऐकायचे आहे.. त्यांना बोलताना पहायला मिळणे दुर्मिळ.
DJ... पोस्ट
DJ... पोस्ट नोटेड.. त्यातले बरेचसे मुद्दे अजूनही न पटण्यासारखेच आहेत बरेच भरकटलेलेही आहेत.. पण आधी म्हंटल्याप्रमाणे ते शेवटचं पोस्ट होतं..
आज एव्हडी मोठी मोठी पोस्ट लिहिल बसण्या इतका वेळही नाही आज..
Good for you, तसेही तुम्हाला मुद्देसूद उत्तर देता येत ,डिबेट करता येत नाही, त्या ऐवजी तुम्ही असंबध्द इतर फोरम च्या चर्चा मिक्स करून वाट्टेल ते बोलता, तेंव्हा इथून पुढे काही मुद्दा नसताना निदान माझ्या वाटेला जायची चूक तर पुन्हा करूच नका. >>>> स्वत:बद्दल आणि दुसर्याबद्दल इतके गोड गैर्समज बागळू नका हो..
सुनिधी... glutv नावची एक वेबसाईट आहे त्यावर २/३ आठवड्यांचं free registration असतं तिकडे मिळतात सगळे एपिसोड.. सलग असतात आणि ते मुख्य म्हणजे.. clips नाही फक्त.. मला exact url सापडला तर नंतर टाकतो...
बास.... पुरे
बास.... पुरे आता....
यांना कोणीतरी आवरा रे! शेवटची पोस्ट, शेवटची पोस्ट करत चालूच आहे यांचं...
हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... (संक्रात होऊन गेली असली तरी!)
-योगेश
Pages