पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता लवकरच आंबे येतील बाजारात..

आंब्याचे रायते कसे करायचे कोणी सांगेल का?? आंब्याचे अजुन काही नविन प्रकार सुचवाल का? आईसक्रिम वगैरे सोडून..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

कच्ची कैरी गॅसवर भाजायची. उकडली तरी चालेल पण भाजली तर जास्त चांगले.
मग त्याचा गर घ्यायचा. त्यात फक्त तिखट आणि मीठ घालायचे. शक्यतो गूळ नाही घालायचा. झाले रायते.
याच गरात, नारळाचे दूध व साखर घालून मस्त चवीचे पेय होते. याच गरात नारळाचे पातळ दूध व मीठ घालुन उकळायचे, त्याला हिंग, कढीपत्ता, लाल मिरच्यांची फोडणी द्यायची. छान कढी होते.

यंदा थंडी कमी आहे, मोहोर नीट आला नै तर कैर्‍या/आंबे महाग असणारेत हां..उगी रायतं वगैरे करण्यात वाया नका घालवु Wink

सिंड्रेला, कोकणातली तर नव्हे ?
कोकणात अशी पद्धत आहे. दरवर्षी म्हणायचे, यंदा आंबा नाSSSSSSय !!!

अजून चारेक महिने शिल्लक आहेत आंबे यायला. हो पण इथे सिंगापुरात केंव्हाही आंबे आणि कैर्‍या मिळतात. पण अशा बेहंगामी फळांची चव काय चव असते!!!!!!

इथे मिळणार्‍या थाई आणि मलय आंब्याला तर वास देखील येत नाही.

नाही हो, पक्की "घाटी" आहे मी Wink बी, मोहोर आत्तापासून यायला सुरुवात होइल ना.

रायते कैरीचे करतात? मला वाटले आंब्याचे करतात. वाटले काय माझी खात्रीच आहे तशी. मी लहानपणी सावंतवाडीला खाल्लेले पण आहे एकदा. आंब्याच्या गोड रसाला तिखट चव देतात, शिवाय मोहरीची फोडणीही असते असे मला अंधुक अंधुक आठवतेय..

सिंड्रेला - मलाही आंब्याची वाट लावायला आवडत नाही. सरळ कापायचा आणि हादडायचा...
(करण्याचा आळस असलेले लोक असली कारणे देतात असे माझ्या आईचे मत आहे Happy )

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

रायते कैरीचे करतात? मला वाटले आंब्याचे करतात. >>>
मेथांबा कैरीचा असतो.. रायतेच की ते, की काय? Uhoh

तो वेगळा प्रकार साधना, पिकलेल्या रायवळ आंब्याचा करतात. खोबरे, मोहरी आणि लाल मिरची वाटुन लावतात. सासव म्हणतात त्याला.
गोव्याच्या भाषेत मोहरीला पण सासवा म्हणतात. बहुतेक.

अच्छा अच्छा....

मग आता त्याचीही रेसिपी द्या ना...
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

आणि आम्ही त्याला मोहोरवणी म्हणतो. एकदम मस्त प्रकार.

जून्या मायबोलीवर आहे बहुतेक ती कृति.

कोणी ब्याम्बीनओ च्या शेवया क्स्ट्र्ड वाप्रुन ब न् वुन पाहील्या आहेत का

सुधारसाची कृती कोणी देईल का?

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

सुधारसासाठी साखरेचा पक्का पाक करायचा आणि तो उतरून त्यात लिंबाचा ताजा रस घालायचा.
हवे तर त्यात केशर घालायचे. बदाम पिस्त्याचे कापही घालतात. याला प्रमाण असे नाही. आपल्याला जितके आंबट गोड हवे तसे करायचे.
जिलबीचा, गुलाबजामचा उरलेला पाक वापरुनही हा करता येतो.

सुधारसात पूर्ण पिकलेले केळे/केळी घातली व एक उकळी काढली तर सुधारस अप्रतीम होतो.

मी राजेळी केळे आणि एक लालबूंद टोमॅटो घालून हा प्रकार केला होता. पण मग त्याला सुधारस म्हणता येईल का अशी शंका आली. पण याची चव आणि रंग मात्र खासच आले होते.

त्याला टोमॅटो सुद्धारस म्हणता येइल Wink

बीटाच्या देठाचे/पानाचे सुप अथवा इतर काही करता येईल का?

पुनम बीटाच्या पानांची पिठ पेरुन भाजी करता येते, पालकांच्या वड्यां प्रमाणे वड्या करता येतात.

जागु, पालकाच्या वड्या कशा करतात?? की तुला भजी म्हणायचंय????
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

बिटाची पाने आणि चणाडाळ एकत्र शिजवून त्याची भाजी करता येते.
पालकाच्या कोथिंबीर वडी वा अळूवडी प्रमाणे वड्या करता येतात.

पालकाच्या वड्या माहितच नव्हतं.... कोथिंबिर वडी जमेल पण अळूबडीसाठी पाने अगदीच पिचपिचित होऊन जातिल....
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

पालकाची पाने ओव्हरलॅप पद्धतीने फॉईलवर पसरायची. ( देठ जून असतील, तर काढून टाकायचे ) मग त्यावर सारण पसरायचे. मग फॉईलसकट, पण फॉईल आत न जाऊ देता रोल करायचा. हा रोल फॉईलसकट्च वाफवून घ्यायचा.

धन्स जगु , दिनेशजी ....
भाजी जमेल.. पण पाने छोटी आणी देठ लांबच लांब असल्याने वडी जमेल की नाही माहीत नाही.
पालकाची वडी मात्र करुन बघायला हवी.

चण्याची डाळ भिजत घालुन वाटुन, त्यात बारिक चिरलेला पालक व ईतर मसाला म्हणजे, हळद, आले लसूण, हिंग, हिरवी मिरची, तेल, मीठ वगैरे घालून डब्यात थापून वाफवता येते. मग त्याच्या वड्या कापूण तळता येतात. या प्रकाराची खात्री देता येत नाही. कधीकधी वड्या निघत नाहीत. भगरा होतो. पण तोही परतून खाता येतो. वाटल्या डाळीप्रमाणे लागते.

microwave मधे करायच्या आणि पटकन होणार्या..काही क्रुती आहेत का??
शाकाहारी हव्यात...

thnks in advance!!

- केदार जोशी.
तोक्यो जपान.

ब्रोकोलीच्या रेसेपी सांगा न काही... मी कधीच खाल्ली नाहीये... आज घरची ब्रोकोली आलीये शेतातुन. गेल्यावेळी सासुबाईंनी आलु-गोबी प्रमाणे बनवली होती, पण कुणालाच आवडली नाही. भरपुर आहे ब्रोकोली कदाचीत फ्रीझ करुन ठेवावी लागेल.

ब्रोकोलीला फार मसाला लावून चालत नाही. नूसत्या लोण्यावर परतून त्यात मीठ मिरी पावडर घालून खाता येते. त्याचे सूपही चांगले होते. जोडीला फ्लॉवर वापरायचा.
ब्रोकोलीचे काहि प्रकार जून्या मायबोलीवर आहेत.

Pages