पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशजी त्या वाटणामध्येच मिरची घातली तर चालेल का ?

दिनेश, तुम्ही तुमची कृती लिहा हा वेसवारची. इतकी छान चव असलेला मसाला विस्मरणात जाऊ शकतो यावर विश्वास नाही बसत.

दिनेश, जुन्या मायबोलिवर मी तुमची वेसवाराची कृती वाचली आत्ताच. ही लिंक -- http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115936.html?1149173731

आणि ई-सकाळ मधे वेसवार बद्दल - http://www.esakal.com/esakal/05282008/Family_DoctorD468DA6A12.htm

पण विदर्भात मात्र येसोर असा बनवत नाही. तो जात्यावर दळतात आणि त्याची व्यंजने अनेक आहेत - जसे की चना डाळ, गहू, उडीद डाळ, बाजरं, ज्वारी, तांदूळ, मसाला वेसची, दगडी फूल, मिरे, धणे, हळकुंड, सुकी मिरची, जिरे असे बरेच काही असते. हे सर्व भाजून, जात्यावर दळून, मग वस्त्रगाळ करून येसोर होतो. खूप पौष्टीक मसाला आहे.

सकाळ मधे लिहिले की वेसवार मासात घालतात पण येसोर कधी मासात मी पाहिलेला नाही.

जागु, वाटणात मिरची घातली तर बाकिचे स्वाद लपतात. त्यापेक्षा आयत्यावेळी लाल तिखट घातले तर छान चव येते. शिवाय आवडीप्रमाणे कमीजास्त तिखट करता येते.

बी आभार रे. मायबोलीवर मी इतके लिहुन ठेवलेय ना, सगळे लक्षात रहात नाही.

बरोबर दिनेश, तो प्रामुख्याने कारवारात केला जातो पण गोव्यात अगदी internal भागात सुद्धा करतात हा मसाला.
येस्वार्(असाच उच्चार मी एकलाय गावी) ह्याच्या बर्‍याच रेसीपी आहेत. तो मसाला म्हणून वापरता येत नसून त्याचे सूप वगैरे होवू शकते. जवळपास सारू टाइपने.
कोकणात फणस, आठळ्याची भाजी,गवार, चवळीच्या शेंगा ह्यात वापरून सुकी भाजी बनवता येते.

माला काहि healthy snack recipes पहिजे आहेत ज्या २,४ दिवस टिकतिल.

गूळपोळ्या, रेवडी, गूळपापडी, सर्व लाडू, ठेपले, खाकरा, चिवडा वगैरे प्रकार सूचवीन मी.

तिखट कोणत्या मिरच्यांचे बनवायचे ? मिक्सरमध्ये चालेल का ? आणि बाजारातले कुठले चांगले असते ?

आमच्या घरी संकेश्वरी आणि ब्याडगी अर्ध्या अर्ध्या घेतात.
मिक्सरमधे तिखट होते, पण हवे तितके बारिक होत नाही, त्याचा ठसका लागतो, आणि स्वाद कमी होतो ( मिक्सरच्या उष्णतेमुळे ) , मुंबईत अजुनही डंकावर मसाला कुटून मिळतो.
बाजारात अनेक प्रकार आहेत. त्यांची छोटी छोटी पाकिटे आणणे जास्त सोयीचे होते.

डंकावर म्हणजे काय...

तिखट कुटून जिथे मिळते त्याला डंक म्हणतात....

त्याला कांडप म्हणतात ना ?

पोंगल हा खाद्यपदार्थ चि रेसिपि कळेल का?

अविनाश..पोंगल प्रेमि

आम्ही सुद्धा डंक म्हणतो त्याला. Happy

तुला कुठले पोंगल हवेय? गोड की खारा पोंगल?

बरोबर आहे सिंड्रेला, त्या प्रोसेस ला कांडप म्हणतात पण ज्या मशिन ने मिरची (गिरणीवर) कांडप केली जाते त्याला डंक म्हणतात...हे, मिरची कुटताना मसाल्याचा वास येतो ना तो मला भारी आवडतो..:)

काल तिळगुळ केला. काहितरी बिघडल आणि खुप भुसभुशीत झाला. थोड्या वड्या झाल्या आहेत पण बराच भुगा शिल्लक आहे. त्याच काय करता येइल?

तिळगुळ करण्यासाठी रेसिपी शोधत आहे.कुठे आहे?
मला मऊ आणि कडक दोन्ही प्रकार करायचे आहेत.

तिळगुळ रेसिपी इथे आहे mb-
Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » तिळगूळ

या धाग्याच्या डोक्यावर दोन लिन्क्स दिल्यात. त्यातली दुसरी "आणि या ठिकाणी" क्लिक करा. तिथे 'गोडवा' नावाचा बीबी आहे.... Happy

स्वर, बिघडलेल्या तिळगूळाचे पंचामृत चांगले होते.
तेलाची फोडणी करु त्यात हिंग, हळद आणि हिरव्या मिरच्या घालायच्या. जरा परतून चिंचेचा कोळ घालायचा. मग काळा मसाला घालून जरा उकळायचे आणि मग तिळगूळ टाकायचा. दाट झाले कि उतरवायचे.

मस्त आयडिया आहे दिनेश. नक्की करीन आजच.
अजुन १ प्रश्न कारण बराच भुगा शिल्लक आहे :).
जर थोडया गुळाचा पाक करुन त्यात उरलेला भुगा टाकला तर परत वड्या पाडता येतील का?

स्वर
गॅसवर कढईत तो भुगा थोडे पाणी शिंपडून परता. व अगदी शेवटी गॅस बंद करून त्यात दोन चमचे पिठी साखर घाला. छान ढवळा . व गरम असतानाच ताटात ओतून वड्या पाडा.

धन्यवाद mmm333.

भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा करतात? (माझ्याकडे जे काही आहे ते कुरमु-यासारखे फुगीर आहे, पण कुरमुरे नाही. बहुतेक भाजके पोहेच असावेत)
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

साधना, त्या साळीच्या लाह्या तर नाहीत ?
त्या वा पोहे असले तरी, कढईत तेल न घालता मंद आचेवर परतून घ्यायच्या. दाणा कुरकुरीत राहिला पाहिजे.
मग तेलाची फोडणी करुन त्यात मिरच्या, कढिपत्ता वगैरे चिवड्याचे सामान घालायचे. आणि परतून घ्यायचे. मीठ, पिठी साखर वगैरे मात्र आच बंद करुन वरुन घालायचे.

पंजाबी पद्धतीची 'दही भेंडी'/मसाला भेंडीची कृती जर इथे कुणाला माहिती असेल तर मला हवी आहे.

कदाचित असु शकेल... पण साळीच्या लाह्या जरा पांढ-या दिसतात, ह्या पिवळसर आहेत..
तुमची रेसिपी आज करुन पाहते..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

गाभोळीच्या पाककृती मिळतील का?? तळायचे असेल तर कसे प्रिपरेशन करावे?

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

Pages