पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीट कोर्नची रेसीपी मला मराठीत दिसत नाही. काही उपाय?

दिनेशजी /कोणीही
मला प्रोन्स करी,भात या २ पदार्थान्बरोबर चालू शकेल असे काही (२-३)पदार्थ सुचवु शकेल का?
फिश फ्राय चालु शकेल पण चान्गली क्रुती हवी आहे.
अजुन काय करता येइल?
पोळी वगैरे नको आहे.मुख्य पदार्थ प्रोन्स करी,भात हाच आहे.
गोड सिझलिन्ग ब्राउनी विथ व्हनिला आईस्क्रीम ठरले आहे.

पार्ल्याच्या पानावर सिताफळ बासूंदी हा एक पदार्थ वाचला. नक्की हा पदार्थ कुठल्या भारतीय प्रांतातील आहे कळेल का?

आज माझ्या कोंकणी मैत्रीणीने केळीचा हलवा/बर्फी आणली होती. त्याची कृती इथे आहे: http://cuisineindia.wordpress.com/2008/09/22/banana-halwa/

जर केळी वाफवून घेण्याऐवजी तुपात परतून घेतली तरी ती वितळतील असे वाटते.

बी, असाच खजूर हलवा बनवू शकतोस तू.

hello mybolivar recipes chhan milalya thanks to u all

संकेश्वराची मिरची सर्वात छान की कोल्हापुरची?

microwave मधे पराठे कसे भाजतात? Grill वर की Convection वर?

प्रॉन्स करी भाताबरोबर, कोकमकढी, फिश फ्राय, बटाटा किंवा ईतर भाजी, सुरणाची कापं, लोणचे वगैरे चालेल.
फिश फ्राय साठी माश्याना हळद व मीठ लावून थोडा वेळ ठेवायचे मग
एका प्रकाराठी हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे वाटून लावायचे व दुसर्‍या प्रकारासाठी लाल तिखट, लसूण, आले व जिरे वाटून लावायचे. आंबटपणासाठी, चिंच, कोकम यांचे पाणी वा लिंबूरस चोळायचा ( हे मसाला लावायच्या आधी चोळायचे ) उत्तम चवीसाठी व्हीनीगर वापरणे उत्तम.
मग एका थाळीत कोरडा रवा वा तांदळाचे पिठ घेऊन त्यात तुकड्या दाबुन शॅलो फ्राय करायच्या. मासे फार वेळ मुरवत ठेवायचे नसतात. तसेच मासे फार लवकर शिजतात, त्यामूळे नाजुकपणे ते हाताळायचे.
सिताफळ बासुंदी हा एक शोधलेला पदार्थ आहे. सफरचंद, संत्री यांचीची बासुंदी मिळते. आंब्याचीही मिळते.
कोल्हापुरची लवंगी मिरची, साधारणपणे ओलीच वापरतात. संकेश्वरी, ब्याडगी वगैरे सुक्या मिरचीचे प्रकार. हे प्रकार रंगाने फिक्कट पण चवीने तिखट असतात. रंगासाठी काश्मिरी किंवा डेगी मिरची चांगली. बाजारात तयार मिळणार्‍या मिरची पावडरवर तसे लिहिलेले असते.
मायक्रोवेव्हमधे पराठे नीट भाजले जात नाहीत. ते तव्यातच चांगले भाजले जातात. आच मंद असली तर ते सोनेरी भाजले जातात. पराठा तव्यावर टाकल्याबरोबर एकदा पलटून तेल वा तूप लावावे म्हणजे वरचे लावलेले पिठ जळत नाही.
ग्रिल केले तर फक्त वरुन भाजले जातात. कन्वेन्शनमधे नीट भाजले जात नाहीत.

धन्यवाद दिनेश. तुमची अनुपस्थिती खरचं खूप जाणवत होती.

मी ३ प्रकारच्या चटण्या घरात ठेवतो - ऐवरेष्ट, डेगी, ऐम. टी. आर. या तीन पैकी ऐवरष्टची मिरची सर्वाधिक लाल वाटली. हल्ली कॅचची कुटा मिर्च म्हणून एक नविन मिरची बाजारात आली आहे. ती कांडलेल्या मिरचीसारखी भरड असते. छान वाटली मला ती.

इथे दाक्षिणात्यांच्या तळणीतल्या लाल मिरच्या मिळतात. वरणाला जर लाल मिरच्यांची फोडणी द्यायची असेल तर मी याच वापरतो पण त्या आतून फार भरीव नसतात आणि तिखट तर मुळीच नसतात. त्यामुळे तळलेल्या मिरचीचा स्वाद वरणात उतरत नाही.

इथे ओल्या लाल आणि हिरव्या तिखटजाळ मिरच्या मिळतात. पण चार पाच दिवस उलटले की त्यांना बुरशी चढते. मग त्या टाकून द्याव्या लागतात. काहीकाही वेळा लाल मिरच्या फ्रिजमधे सुकून जातात. मला ही सुकण्याची क्रिया बुरशी न लागता आपोआप कशी होते कळलेली नाही. मी काल रात्री लाल मिरच्या धुवून त्या फ्रिजमधे परातीत ठेवून दिल्यात. एक प्रयोग करून पाहतो आहे मिरची सुकवण्याचा.

मला मराठीत दिसत नाही
<<<
तुमचा मराठीचा चष्मा घाला पाहू Happy

भरड मिरचि अलिकडेच मिळायला लागलीय. पास्ता पिझ्झा वर ती चांगली लागते.
अख्ख्या मिरच्यांची फोडणी द्यायची असेल तर मिरच्याना थोडी चिर द्यावी, म्हणजे त्याचा स्वाद लागतो.
ओल्या मिरच्या धुवुन निथळायच्या, मग त्यांचे देठ काढायचे. त्या पुर्ण निथळुन कोरड्या करायच्या मग टिश्यु पेपरमधे गुंडाळुन हवाबंद डब्यात फ्रीजमधे ठेवायच्या. अगदी महिनाभर टिकतात.
किंवा या मिरच्यात २५० ग्रॅमला एक चमचा मिठ, लावुन मिक्सरमधे भरड वाटायच्या. त्यात दोन चमचे व्हीनीगर आणि दोन चमचे तेल घालुन मायक्रोवेव्हमधे, २ मिनिटे ठेवायच्या, मग थंड करुन डब्यात फ्रीजमधे ठेवायच्या. महिनाभर सहज टिकतात.
या मिरच्या कुठल्याही पदार्थात वरुन घातल्या तर फोडणीचीही गरज रहात नाही. स्वाद टिकुन राहतो.

कोल्हापुरची लवंगी मिरची, साधारणपणे ओलीच वापरतात. संकेश्वरी, ब्याडगी वगैरे सुक्या मिरचीचे प्रकार. हे प्रकार रंगाने फिक्कट पण चवीने तिखट असतात. रंगासाठी काश्मिरी किंवा डेगी मिरची चांगली. बाजारात तयार मिळणार्‍या मिरची पावडरवर तसे लिहिलेले असते. >>> अर्धी माहीती चुकिची आहे!

संकेश्वरी मिरची लवंगी मिरची पेक्षा कमी तिखट रंगाने ब-यापैकी लाल असते. ब्याडगी मिरची रंगाने खुप लाल असते (चांगल्या प्रतीची आणली असेल तर, जे मुंबई पुण्याकडे दिसत नाही.) आणि तिखटाला कमी असते. काश्मीरी मिरचीपूड आणि चांगल्या प्रतीच्या ब्याडगी मिरचीची पूड रंगाला साधारण सारखीच दिसते.

उद्य दोन्ही प्रकरच्य तिखटपुडीचे फोटो टाकेन इथे.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

दिनेशदा धन्यवाद!
तुमच्या कडून उत्तर मिळाले नाही असे होतच नाही.
कोकम कढी म्हणजेच सोलकढी ना?ती करेन.
हिरवा मसाला वापरून फिश फ्राय आणि पापड.
इथे सुरण नाही मिळत म्हणून जमले तर वांग्याची काप करेन्.छानच आहे बेत.

मिनोती, खरचं चित्र टाक आणि एकदा पाहू दे कशा दिसतात या चटण्या.

IMG_2562.jpg

डाव्या बाजुचे ब्याडगीचे आणि उजव्या बाजुचे संकेश्वरीचे तिखट आहे.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

आता ही ब्याडगी, संकेश्वरी आणि काश्मिरी, कुटायच्या आधी कशा दिसतात त्याचेही फोटो टाका.

मला पुढच्या महिन्यात मालवणी मसाला करायचा आहे तेही आईच्या मदतीशिवाय. दुकानात गेल्यावर मिरच्या ओळखता यायला पाहिजेत. नाहीतर भलतीच मिरची आणीन..

----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.

या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या नाकाला वेगळ्या झोंबतात की एकसारख्याच ? Happy

मिलिंदा, तु बघ ना नाकाला लावुन मग कळेलच Wink

मिनोती, अगदी हेच लिहीणार होते मी काल ते मिरच्यांबद्दल वाचलं तेव्हा. ब्याडगी नक्कीच खूप कमी तिखट असते. आईला अल्सर आहे आणि तिला फक्त ब्याडगीचं तिखटच सोसतं. आई इथे आली होती तेव्हाही ब्याडगी मिरच्या आणून तिखट घरीच करून घेत होतो आम्ही कारण इथे काही तयार मिळालं नाही. पुण्यात तिला मिळतं (की ती दळून आणते माहीत नाही). आणि हो, तू लिहीलेस तसेच, चांगली ब्याडगी असेल तर तिखटाचा रंग अगदी छान लाल असतो.

संकेश्वरी, ब्याडगी हे सुक्या मिरचीचे प्रकार म्हणजे काय ते मात्र कळलं नाही. म्हणजे ओल्या मिरचीला वेगळं नाव आणि वाळल्या की त्यांना वेगळं नाव असं काही आहे का? हे नवीनच कळलं. मी आपली समजत होते की या सगळ्या मिरच्यांच्या जाती आहेत.

बी - तू चटण्यांबद्दल लिहीले आहेस त्या कोणत्या चटण्या?

प्रिया,

मिरच्यांच्या दोन जाती म्हणजे एक संकेश्वरी आणि दुसरी ब्याडगी (बाडगी नाही). या मिरच्या वाळल्यात की त्याचं जे तिखट केलं जात भाज्यांना फोडणी देण्यासाठी त्याला मी चटणी म्हंटलं. Happy

कित्ती दिवसानंतर आणि .. आता परत हरवू नकोस Happy

मिनोती मस्त फोटो आणि माहिती
मी पण टाकतेच एक फोटो. Happy
DSC04040.jpg
Be yourself ........
The people that mind dont matter and The people that matter dont mind .

मिरच्या, तिखटाचा विषय काढल्यावर कोल्हापूरकर जमले. Happy
सीमा, फोटो कशाचा? संकेश्वरीचा ना? Happy

संकेश्वरी मिरचीचा बहुतेक घरी मसाला केला जातो. ब्याडगी वर लिहिल्याप्रमाणे रंगाचे काम करते तेव्हा काही जण. ती सुद्धा मिक्स घालतात.
कश्मिरी मिरची जसा रंग आणते तसा ब्याडगी.(बेडगी मी एकलेले नाव).
आजी तर घरीच कधी संकेश्वरी का तशीच एक गावची जाडी,बुटकी लालेलाल नी चवीला अतीशय तिखट(कोणाला नाव माहीतीय? बुटकी नी जाड मिरचीचे?. संकेश्वरी बारीक नी लांब असते;आई ती वापरायची मसाल्याला तर आजी ही गावची मिरची) अशी मिरची वापरून मसाला घरी बनवायची गावी गोव्याला. त्या मिरच्या चक्क घरी साफ करतात्.(त्याचे ट्क ने पण जळजळ होते.) नी भाजतात सुद्धा घरी. मग दळून आणायची आजी त्यावेळी.
कश्या काय हे कर्त माहीत नाही. लहानपणी आम्ही त्या |स्पेशल रूम मध्ये सुद्धा जायचो नाही वा जायला दिले जात न्हवते.

ती जाड बुटकी तिखट मिरची म्हणजे गुंटुर मिरची (हे मिरचीची जात आहे). लवंगी मिरची त्याहुनही तिखट असते.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

गुंटुर तर साडी असते ना ? Uhoh

गुंटूरचा चिवडा पण आहे ना Happy

काय ही पिठासारखी बारीक मिरची. घरी खलबत्त्यात कांडलेली जाडभरड मिरची कशी चवदार लागते.

माझा आज मी केलेला मसाला संपेल. तुमच्या कडे २ महिने टिकेल एवढीच मसाल्याची रेसिपी आहे का?

जुन्या हितगुजवर दिनेशजींनी वाटणा सारखी काहीतरी रेसिपी टाकली होती. पण आता ती सापडत नाही.

माझ्याकडे कडधान्य मसाल्याची कृती आहे. या मसाल्याचा फक्त सार देखील करतात. अर्थात फक्त गरम पाण्यात हा मसाला अगदी मोहागी उकळू द्यायचा. ऑफीसमधे हा मसाला अगदी हीट झाला आहे. या मसाल्याचे नाव 'येसोर' असे आहे. नाव जरा वेगळच आहे. म्हणून मी कडधान्य मसाला असे नाव दिले आहे.

जागु, ती मसाल्याची कृति ओल्या काजुची उसळ या कृतिमधे होती. तो मसाला मी अजुनही करतो. एकदाच मेहनत असते त्याला.
अलिकडे मॅगीचे ग्रेव्ही मिक्स बाजारात आले आहेत. दोन प्रकारचे आहेत. चांगले आहेत. परंपराचे पण चांगले वाटले मला.

बी त्याला कोकणात वेसवार असे म्हणतात. त्यात काहि कडधान्ये असल्याने, रस्सा दाट होतो. पुर्वी तो फार वापरत असत, आता जरा विस्मरणात गेलाय.

बी कृती द्या ना.

दिनेशजी धन्यवाद.

Pages