पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्याच्या डोक्यावर दोन लिन्क्स दिल्यात. त्यातली दुसरी "आणि या ठिकाणी" क्लिक करा. तिथे 'गोडवा' नावाचा बीबी आहे. त्यावर क्लिक केल्यावर केक सापडतील.
sms, तिथेच 'वड्या' पण आहेत. तिथे आहे का पहा.

readymade whole milk पसुन घरी लोणी बनवता येते का? कुणाला आहे का अनुभव? थालीपीठ लोणी खायचा खुप मोह होत आहे.

स्टीलच्या भांड्यांवर उकळल्यामुळे पडणारे पाण्याचे डाग जाण्यासाठी काय करावे? बाळाचे पाणी आणि बाटली उकळलेल्या भांड्यावर डाग पडतात... काय करावे? नव्या मायबोलीवर हे विचारण्यासाठी योग्य जागा सापडली नाही.....

readymade whole milk पसुन लोण्याचं माहिती नाही पण रेडिमेड लोण्यापासून झक्कास तूप करता येते. थालीपीठ/तूप कसे वाटते आहे Happy

रेडिमेड लोण्यापासून झक्कास तूप करता येते.////
अग इथे तूप मिळते, मला लोणी-सा़खर खायचे आहे..त्याला काही पर्याय नाही ना Sad

लोणी-सा़खर खायचे आहे की थालीपीठ लोणी खायचे आहे Uhoh

अग इथे तूप मिळते>>>> तरी सुद्धा घरी करुन(च) बघ, चवीत फरक कळेल(च) Happy

'लोणी' खायचे आहे. Happy
sour cream खा थालीपीठाबरोबर. लोण्याच्या जवळची चव. Wink
मी दही लावते इथे, कधी लोणी बनवले नाही. पण whole मिल्क तापवून त्यावरची साय साठवून त्याला विरजण लावले तर लोणी काढता येऊ शकेल असं वाटतंय.

न्याती,
Cinderella म्हणते तसं रेडिमेड लोणी मिळते तर ते तु वापरु शकते ना???मला पण परवा थालिपीठ बरोबर लोणी खायची जाम इच्छा झाली होती पण...:अरेरे:

मी पण तुप च विकत आणते.
Cinderella : अग, हे लोणी कठे मिळेल सांग ना???

अनसॉल्टेड बटर आणा कुठल्याही ग्रोसरी मधून . लॅन्ड ऑफ लेकचे सगळ्यात बेस्ट. कॉस्टकोचं पण छान असतं. अन साध्या लोण्याचं करतो तस कढवा तूप . हाय काय अन नाय काय. काही काही जणी चार स्टिक अनसॉल्टेड बटर बरोबर एक स्टिक सॉल्टेड बटर घालून पण करतात. जास्त छान लागतं ( म्हणे). मी नाही केलं कधी तसं.

मी पण लॅन्ड ऑफ लेकचे अनसॉल्टेड बटरच वापरते.

मी पण Happy
ते १ स्टीक अनसॉल्टेडची वगैरे प्रकार माहित नव्हते मला. मी आपले घे बटर की ठेव कढवायला असला प्रकार करते जास्त विचार न करता.

बाजारातून फ्रेश क्रीम आणायचं. मिक्सी मध्ये फिरवायचं, थोड्याच वेळाने लोण्यासारखा जड गोळा तयार होतो. चवीने आणि दिसायला त्यातल्या त्यात लोण्याच्या जवळ. त्यापुढे फिरवलं तर तो जड गोळा पातळ होतो आणि लोण्यासारखी मजा राहत नाही.
मी करून पाहिलं होतं, पण अमेरिकेत कुठले क्रीम घ्याय्चे ते माहित नाही. मी इथलं (ऑस्ट्रेलिया) व्हिपींग क्रीम आणलं होतं बहुधा.

इतका गोधंळ लोण्यासाठी चाललाय.. कितीतरी ऑप्शन्स आहेत,
१) लालूने म्हटल्याप्रमाणे सॉअर क्रीम काही वाईट लागत नाही मी तर अर्धा चक्का नी अर्धा सॉअर क्रीम टाकते श्रीखंडात सुद्धा.
२) भाग्याचे ऑप्शन
३) शूनूचे ऑप्शन जरी लोणी नाही पण घरचे तूप मिळेल
शेवटचा ऑप्शन नी घरी राबायची तयारी आहे तर,
४) व्होल मिल्क नी हाफ न हाफ दूध उकळवून थंड कर. फ्रीज मध्ये ठेव, आधीची मलई काढ ठेव बाजूला नी पुन्हा दुसर्‍या दिवशी उकळ, थंड कर असे ३ दिवस कर मग अशी सर्व मलई हाताने फेट चार तास टीवी समोर बसून कारण ती हातानेच फेटून केली एकाच दिशेने तरच तो तलमपणा येतो, नाहीतर मिक्सीत फिरवून मलई फाटून बारीक बारीक कण होतात हीटने (स्वानुभव)

मी वरील चारही ऑप्शन्स एवा तेव्हा करून बघितले नी ऑप्शन १ वर गाडी अडते. कोण ती मगजमारी करणार २,३ नी ४.:)

अल्पना स्कॉच ब्राईट स्क्रबर ने घासुन निघतात ते डाग.

३ दिवस कर मग अशी सर्व मलई हाताने फेट >> विरजण न लावताच? Uhoh

http://www.webexhibits.org/butter/doityourself.html हे बघा.
प्रीती, हो, विरजणाशिवाय साईपासून डायरेक्ट लोणी करतात. (मला पण २ वर्शांपूर्वी प्रात्यक्षिक बघायला मिळालं तेव्हा कळलं.) Happy

मृ, माहितीबद्दल धन्यवाद!! करुन बघीन हे.....

सगळ्यान्ना खूप खूप धन्यवाद!!!
सिन्ड्रेला खरे तर लोणी साखर आणि थालिपिठ -लोणी दोन्ही खायचे आहे Happy
मि निवान्त आहे सध्या, तेव्हा सगळे उद्योग करुन बघेन..
मनुस्विनी, कशाने फेटायचे?

बर अजुन एक दोन प्रश्न आहेत मला.
डाळिम्बाचा रस कसा काढायचा?
मात्रा उगाळण्यासाठी सहाणे ला काही पर्याय आहे का?

लाकडी कटिंग बोर्ड वर जायफळ उगाळायचे उद्योग केलेत. एडिसनमधे, किंवा कदाचित फिलीच्या पटेल ब्रदर्स /सब्जी मंडीमधे सुद्धा सहाण मिळू शकेल.

डाळिंबाचा रस काढण्यासाठी डाळिंबाचे दाणे काढुन मिक्सर मधुन थोडे फिरवुन मग रस गाळुन घ्यावा.

लिंबु पिळायच्या भांड्यामधे दाणे टाकुन काढावा.

स्वच्छ फडक्यात दाणे घेउन पुरचुंडी करुन दाबुन रस काढता येतो.

मला तोंडली भाताची रेसिपी हवी आहे. जुन्या मायबोली वर आहे १ पण अजुन वेगळ्या पद्बतीची कोणाला माहीत आहे का ?

मात्रा उगाळण्यासाठी सहाणे ला काही पर्याय आहे का? >>>> हो, गझल किंवा कविता Wink

धन्यवाद सर्वाना!
किचन ओटा? /// नाही होत त्यावर Sad
मात्रा उगाळण्यासाठी सहाणे ला काही पर्याय आहे का? >>>> हो, गझल किंवा कविता डोळा मारा////////////// Happy टाकतेच काहीतरी उगाळुन, मग म्हणशील, तु आपली कीचनमध्येच राहा Wink

सहाणेला पर्याय : दगडी खलबत्ता मिळतो. खल उलटा करून त्यावर किंवा सरळ खोलगट भागात मात्रा उगाळून बघा.

भाजी कापायचा जो कटींग बोर्ड असतो तो मागिल बाजूस खरबरीत असतो. त्यावर उगाळता येईल बहुतेक बदाम वा जायफळ.

राजस्थानी लोक मक्याच्या पीठाची ढोकळी कशी बनवतात माहित आहे का? मी खाल्ले नाही पण वाफेवर बनवतात आणि गोल असतात हे कळाले... कुणी खाल्लयं का? कसा लागतो हा पदार्थ?

हा प्रश्न कुठे विचारावा कळलं नाही म्हणून इथे विचारतेय.
केक बेक झाला की टॉपला (फुगीर भागात) क्रॅक पडतोय छोटासा...काय कारण असावं त्याचं? बाकी केक व्यवस्थित होतो आहे.

सायुरी बहुतेक सगळ्या केकला असा क्रॅक पडतोय का दरवेळी? याला बरीच कारणे असतात (म्हणे), जसे की वापरलेले भांडे, केक मिक्स, ओव्हनचे तापमान. जर तू काचेचे किंवा काळे नॉन स्टीक भांडे वापरत असशील तर ओव्हनचे तापमान २०-२५ डीग्रीने कमी करुन बघ पुढच्यावेळी कदाचित त्याचा फायदा होईल.
बाकीचे जाणकार सांगतीलच.

मी मैत्री , काही कारणाने मला लॉगिन करता येत नव्हतं म्हणू न हे नविन नाव. (तसं नाव जुनचं आहे Happy )
मी काही दिवसापुर्वी इथे पफ पेस्ट्री पासुन चिरोटे बनवण्याची रेसिपी पाहिली होती पण आता सापडत नाहिये. कोणी सांगेल का प्लिज?

Pages